निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
धन्यवाद दा. तिथेच एका झाडाला
धन्यवाद दा. तिथेच एका झाडाला दुधीभोपळ्याच्या आकाराची आणि चिंचेच्या (पिकलेल्या) टरफलाच्या रंगाची फळं दिसली. फळाची देठ एखाद्या वेली सारखी लांबलचक होती. >>>>> हे बहुतेक ब्रह्मदंड म्हणजेच सॉसेज ट्री म्हणजेच Kigelia pinnata असणार
हे खातात का? चिंचेचा फोटो
हे खातात का?
चिंचेचा फोटो टाक अबरं कोणीतरी छानसा. माझ्या तोंडाला पाणी सुटलं चिंचेचा विचार करून
अरे मस्त धावतोय धागा. सर्व
अरे मस्त धावतोय धागा.
सर्व फोटो सुरेख.
येस, शशांक हीच ती फळं. मला
येस, शशांक हीच ती फळं. मला शंका होतीच की ही गोरख चिंच नसावी म्हणुनच म्हटल की फोटो टाकते मग तुम्हीच सांगा
वरच्या फोटोत एकेका देठाला १ - २ फळ आहेत, मी पाहिल त्याला एकाला एकचं होत.
दिनेशदा हो!! अगदी बरोबर! इथे
दिनेशदा हो!! अगदी बरोबर!
इथे कुणी तॉम याम सुप प्यायले आहे का? काल मी त्याच्या शेंगा पाहिल्या. म्हणजे शेंगापण म्हणतात येणार नाही. काहीतरी वेगळाच प्रकार आहे तो. मी उद्याला चित्र डकवतो.
येस, शशांक हीच ती फळं. मला
येस, शशांक हीच ती फळं. मला शंका होतीच की ही गोरख चिंच नसावी म्हणुनच म्हटल की फोटो टाकते >>>> पुण्यामधे कमांड (कमान) हॉस्पिटल परीसरात (ए. एफ. एम. सी.च्या मागे) ही खूप झाडे आहेत - जमल्यास जरुर पहा - मार्च-एप्रिल-मे हा बहुतेक फुलांचा सिझन आहे.
जमल्यास जरुर पहा -
जमल्यास जरुर पहा - मार्च-एप्रिल-मे हा बहुतेक फुलांचा सिझन आहे >> नक्की जाईन फुल पाहायला. आता फुल पाहायला नाही मिळालीत.
एक रिक्वेस्ट पोस्टमधून
एक रिक्वेस्ट पोस्टमधून जास्तित जास्त निसर्गाबद्दलच्या माहीतीसाठी प्रश्न किंवा माहीती येउद्यात. बी तुमच्याकडचे वेगवेगळे फोटोही येउद्यात.
खूप ढिगभर फोटो आहेत. मला ते
खूप ढिगभर फोटो आहेत. मला ते खरेच इथे देऊन छान छान प्रतिक्रिया मिळवायच्या आहेत
पुण्यात ब्रह्मदंड /सॉसेज ट्री
पुण्यात ब्रह्मदंड /सॉसेज ट्री ची झाडे सिंहगड रस्त्याला समांतर असणार्या नदीपात्रातील रस्त्यावरही पुष्कळ आहेत.
पुणे मनपाने एकदा ट्री फेस्ट मध्ये ट्री हंट स्पर्धा घेतलेली. ही स्पर्धा म्हणजे धमाल असते. नकाशा दिलेला असतो, त्यातल्या रस्त्यांवरून फिरायचे आणि दिसणारी सगळी झाडे ओळखून त्यांची नोंद करायची. झाडांच्या दुर्मिळतेनुसार गूण असतात!
तर त्या स्पर्धेसाठी मी या रस्त्यावरून फिरत होते, तेव्हा हे ब्रह्मदंड मोजता मोजता वैतागलेले. शेवटी अंदाजे आकडा ठोकून दिला. एका ब्रहदंडाला एकच गूण होता
-अश्विनी
अदीजो, ब्रम्हदंड ला आपल्याकडे
अदीजो, ब्रम्हदंड ला आपल्याकडे निरुपयोगी वृक्ष मानत असत. उलट फळ डोक्यावर पडून अपघात व्हायचीच भिती.
पण त्यातून लेप्रसी साठी औषध मिळू शकेल, असे मी वाचले.
मी मागे पण लिहिले होते.
मी मागे पण लिहिले होते. ब्रह्मदंडीचे लहान मुलांना अगदी महिन्याच्या बालकांपासून एक औषध देतात. अलिबागवाल्यांना माहीत असेल. आमच्याकडेही अलिबागवरून मागवतात सगळे. आकडी येणे, उचकी लागणे ह्यासाठी उपयोगी म्हणतात. पण टॉनिक म्हणून नियमीत देतात.
जागू, ते बहुतेक वेगळे झाड
जागू, ते बहुतेक वेगळे झाड आहे. गूगल करून बघ.
ब्रम्हदंडला घाणेरड्या वासाची मोठी मरून रंगाची फुले येतात. आणि दोरीला बांधलेल्या वरवंट्यासारखी कठीण कवचाची फळे येतात.
मुंबईला, पारसी कॉलनीत झाड आहे
मुंबईला, पारसी कॉलनीत झाड आहे एक. मी माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहिले होते.
>>जागू, ते बहुतेक वेगळे झाड
>>जागू, ते बहुतेक वेगळे झाड आहे. गूगल करून बघ.>>
हो औषधात वापरली जाणारी ब्रह्मदंडी वेगळी आहे. Flowers of India वर वेगवेगळी तीन छोट्या फुलांची झाडे दिसताहेत.
वरच्या फोटोतले फळ खात नाहीत,
वरच्या फोटोतले फळ खात नाहीत, त्याचे कवच पण फार कठीण असते.
दोरीला बांधलेले वरवंटे.. ही जी ए कुलकर्णींची उपमा बरं !
दोरीला बांधलेले वरवंटे.....
दोरीला बांधलेले वरवंटे.....
मस्त!
माझ्या होम मेड बर्ड (स्पॅरो)
माझ्या होम मेड बर्ड (स्पॅरो) फीडरवर चिमण्या येऊ लागल्या आहेत. >>>>> वर्षा,आयडिया मस्त आहे.गुगलवर ते कसे करायचे तेही पाहिले आहे.पण तुमच्या खिडकीत , फीडर टाइट कसे बांधले आहे की काही वेगळा सपोर्ट आहे?सांगाल का?माझ्याकडे कबुतरांचा फार त्रास आहे म्हणून हे फीडर बांधले नाही.सांगाल का?
दोरीला बांधलेले वरवंटे.....
दोरीला बांधलेले वरवंटे..... सॉलीड नाव.
मस्त फोटो सगळेच .चिमणीचा तर
मस्त फोटो सगळेच .चिमणीचा तर खुप सुंदर.
व्वा!! २३ वा भाग आला आणी
व्वा!! २३ वा भाग आला आणी धावू ही लागला... मस्त मस्त फोटोज आणी माहिती ची पर्वणी सुरु झाली..
सायली, मनोगत खूपच गोड आहे..
बी, तोम यम सूप , हे तर थाय फूड चं अविभाज्य अंग आहे.. तू जसं म्हटलंस तसं मी थायलँड च्या वास्तव्यात , कुठल्याच प्रकारच्या शेंगा या सूप मधे पाहिल्या नाहीत.. फोटो टाकलास तर त्या इन्ग्रेडिएंट चं नांव सांगू शकेन..
या सूप चा बेस लेमन ग्रास, काफिर लाईम पाने, गालांगाल, लिंबाचा रस ,फिश सॉस या इन्ग्रेडिएंट्स ने तयार होतो.
काय मस्त चाललाय धागा मस्त
काय मस्त चाललाय धागा
मस्त फोटो आहेत सगळ्यांचे
मागच्या पानावर म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे ही ब्रह्मकमळ म्हणतात त्याला कळ्या आल्या आहेत
अदीजो,>>>>>> 'पुण्यात
अदीजो,>>>>>> 'पुण्यात ब्रह्मदंड /सॉसेज ट्री ची झाडे सिंहगड रस्त्याला समांतर असणार्या नदीपात्रातील रस्त्यावरही पुष्कळ आहेत'<<<<<<.... हा रस्ता म्हणजे म्हात्रे पुलाकडून हॉटेल मल्टीस्पाईस ला जाणारा का? त्या रस्त्यावर खूप आहेत हे वृक्ष. शिवाय नीलायम टॉकीज कडून कॉन्टिनेंटल प्रकाशन कडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर एस पी कॉलेजच्या मैदानाच्या बाजूने पण हे वृक्ष लावलेत... हे काहीच नाही असं म्हणजे वा दि वैद्य शाळेकडून नव्या पेठेतल्या विट्ठल मंदिराकडे जायच्या रस्त्यावर (बोळावर) कडेने हे वृक्ष लावलेत आणि आणखी सांगण्यासारखं म्हणजे, सुजाता मस्तानीकडून बाजीराव रोडकडे जायच्या बोळात आणि भिकारदास मारुतीकडे यायच्या बोळात सुद्धा मोठ्या करमळीचे आणि मुचकुंदाचे वृक्ष लावलेत!! आता बोला!! मला एक समजत नाही; एकतर पुण्यातल्या बोळ म्हणता येणार्या रस्त्यांवर हे प्रचंड मोठे वाढणारे वृक्ष कशाला लावावेत? म न पा चा अजब कारभार आहे हा!!!
शांकली, हे असे वेगळे वृक्ष
शांकली, हे असे वेगळे वृक्ष लावलेत हेच महत्वाचे मानू आपण. नव्याने असे वृक्ष फार कमी लावले जातात. त्यात जितकी विविधता असेल तेवढी चांगली.
लावलेत ते जोपासले जावेत एवढीच इच्छा !
दिनेशदा तुम्ही आणलेला
दिनेशदा तुम्ही आणलेला गोरखचिंचेचा रस, त्याची चव अजुन लक्षात आहे. खुपच चवदार आंबट गोड. मी पहिल्यांदा चव घेतली.
मी मागे पण लिहिले होते. ब्रह्मदंडीचे लहान मुलांना अगदी महिन्याच्या बालकांपासून एक औषध देतात. === जागु, हे तुला मी तेव्हाच लिहणार होते ब्रह्मदंडीचे औषध कसे करतात हे माहीती काढ, राहुनच गेले आता फोटो आणि माहीती दे. ( तु जे ब्रह्मदंड म्हणतेस त्याचे )
निगप्रेमीन्नो, इथे मी एक ललित
निगप्रेमीन्नो, इथे मी एक ललित लिहिल आहे ते वाचःhttp://www.maayboli.com/node/51550
काही फोटो इथे देतो आहे:
चहूकडे ही अशी फुलेच फुले:

बी, इतके फोटो हे पान उघडलं
बी, इतके फोटो

हे पान उघडलं की हँग होतोय माझा ब्राऊझर! फोटो सुंदर आहेत पण माझ्यासाठी त्रासदायक आहेत
मित्रांनो, माझी एक कल्पना
मित्रांनो, माझी एक कल्पना आहे. बघा पटते का:
सिन्स इथे अनेक निगप्रेमी आहेत आणि हा धागा अव्याहत सुरु असतो. प्रतिसाद भरपुर असतो. तर आपण त्रेमासिक एखादा अंक काढावा का? आता वसंत येईल तर वासंतिक अंक असे करता येईल का? फक्त निसर्गाविषयी लिहायचे. विषय एकच असल्यामुळे फार ताण पडणार नाही.
काल रात्री मुंबईत पाऊस पडला
काल रात्री मुंबईत पाऊस पडला आणि आज ढगाळ वातावरण.
बरं मला सांगा, हारामध्ये जी सफेद शेवंती (पिवळी, बट शेवंती नाही) असते ती सुकल्यावर मोहरीसारखे दाणे बाहेर पडतात. या शेवंतीच्या बिया असतात का? जर त्या बिया असतील तर कुंडीत लावता येतात का?
मित्रांनो हे पहा
मित्रांनो हे पहा सम्मेलन…
http://www.maayboli.com/node/51551
Pages