"यूअर पिझ्झा मॅम"
"ओह यॅ! इतका वेळ का लागला?"
"अॅक्चुअली......जरा धडक झाली"
"कोणाची? तुमची?"
"हो"
"मग? लागलंय का?"
"हो, म्हणजे विशेष नाही"
"पाणी वगैरे हवंय का?"
"नाही नको"
"अरे बापरे......अहो रक्त येतंय गुडघ्याजवळ"
"नाही ठीक आहे, आता संपलीच आहे ड्युटी"
"म्हणजे खाली पडला होतात का?"
"हो......पण..पार्सल नाही पडलं..ते सेफ होतं मागच्या बॉक्समध्ये.."
"नाही नाही..ते ठीक आहे..पण इतकं रक्त आलंय तर..दुसर्याला पाठवायला सांगायचंत ना?"
"तुमचे..फोन येत होते सारखे..आणि आधीच लेट झालो होतो.."
"हो पण..थांबा जरा..मी बँडेड देते"
"नाही असूदेत......निघतो"
"किती झाले?"
"दोनशे सत्तर"
"एक मिनिट हं?..हं..थ्री हंड्रेड.."
"अं..चेंज..नाहीये.."
"नाही नाही असूदेत"
"नाही......आम्ही नाही घेऊ शकत टीप"
"अहो टीप नाहीये ती..आता तुमच्याकडेही चेंज नाहीये आणि तुम्हाला इतकं लागलंय..लवकर घरी पोचा.."
"मी तीस रुपये उद्या आणून देईन"
"नाही त्याचं काही एवढं नाही, तेवढ्यासाठी काही हेलपाटा मारू नका"
"हेलपाटा नाही..मला बाईक इथेच ठेवावी लागणार आहे..बाईक बंद पडलीय..मोडतोड झालीय"
"अरे बाप रे"
"इथे पा..पार्किंग आहे का व्हिजिटर्ससाठी?"
"हो आहे ना, समोर बागेच्या बाजूने टू व्हीलर्स आहेत त्यात लावा"
"थँक यू मॅम......थँक यू फॉर कॉलिंग जोसफ'स किचन......गुड नाईट"
"गुड नाईट...थँक यू...तुम्ही......तुम्ही लंगडताय किती......थांबा थांबा मी वॉचमनला रिक्षा आणायला सांगते"
"नाही नाही"
"अहो थांबा..इथे बसा..हे घ्या"
"राहूदेत मॅम"
"आय थिंक यू नीड टू सी अ डॉक्टर इमिजिएटली"
"मॅम, आमच्यासाठी इन्शुअरन्स आहे, त्यातलेच डॉक्टर उद्या तपासतील मला"
"उद्या? पण हे रक्त वाहतंय ना? थांबा..वॉचमन??..वॉऽऽचमन....वॉचमन प्लीज ऑटो आणा लवकर, म्हणाव रौशन मल्टिस्पेशॅलिटीला जायचंय"
"मॅम माझ्याकडे ..पैसे नाहीयेत हो...."
"मी आत्ता देते....तुम्ही नंतर द्या परत..बरंच रक्त वाहतंय......कोणाशी धडक झाली? पळून गेला का तो?"
"नाही..अॅक्च्युअली..त्याचीच चूक होती..पण मलाच मारलं"
"मारलंऽऽऽ? अहो थांबा मी तुमच्या कंपनीला फोन लावते"
"नको मॅम, ते काढून टाकतील"
"का?"
"इन्शुअरन्स क्लेम झाला की ते तेवढा क्लेम प्रोसेस करून घेतात आणि मग त्या माणसाला जायला सांगतात.."
"का पण? हा एक अपघात आहे, कोणालाही होऊ शकतो!!!!!!"
"आमच्या पॉलिसीज जरा......अश्याच आहेत मॅम......आणि मला नोकरीची गरज आहे"
"हा ज्यूस घ्या रिक्षा येईपर्यंत"
"ओह..सो काईंड ऑफ यू मॅम.."
"तुमचं नांव काय आहे?"
"रोहित हर्ष"
"तुमच्या..डोळ्यांत ..पाणी का आलंय..? प्लीज रडू नका, घरच्यांना फोन करा तुमच्या"
"इथे कोणी नसतं मॅम, इथे एकटा असतो मी"
"म्हणजे? मित्र?"
"एक रूममेट आहे पण .."
"..पण काय?"
"मला दोन महिन्यांचे रेंट देता आले नाही म्हणून त्याने काल नवा रूममेट आणलाय.. त्या रूममध्ये दोघांनाच राहायला परवानगी आहे..तिथून आता बाहेर पडावे लागणार आहे"
"वॉचमन आला नाही अजून! तुम्हाला पैसे हवे आहेत का थोडे? पगार झाला की परत द्या हवे तर"
"नाही नाही, धन्यवाद, असूदेत मॅम मी निघतो आता! ज्यूसने बरेच बरे वाटले! रक्तही जरा थांबलंय!"
"आय अॅम सो सॉरी टू नो ऑल धिस!"
"हं! थँक यू! निघतो, मला भेटेल वाटेत वॉचमन आणि ऑटो! बाईक न्यायला उद्या आलो तर चालेल ना?"
"हो हो! अगदी अवश्य! नाहीतर असं करा, आमच्याच पार्किंगला लावा! डी ४०६ मध्ये!"
"डी ४०६! ओके मॅम! तिथे लावली की बाईकची काळजी नाही मला!"
"पण......तुम्ही राहणार कुठे आहात?"
"नाही नाही, आठवडाभर राहता येणार आहे मला तिथेच"
"ओके..टेक केअर..उद्या याल तेव्हा मला भेटून जा.."
"हो नक्की..मेनी थँक्स मॅम...."
"अहो?..हे..हे पाठीला काय झालंय तुम्हाला? तिथेही जखम??"
"ते..तिथेच मारलं ना त्यांनी! त्यांचं ते कडं लागलं मनगटातलं"
"माय ग्गॉड?? अहो किती शांतपणे बोलताय? वेट अ मिनिट! लेट मी स्पीक टू जोसफ्स!"
"अहो.. नको मॅम"
"थांबा कॉल लावलाय! ह्याला काही अर्थ आहे का? हां हॅलो? जोसफ्स? तुमचा एक डिलीव्हरी बॉय आहे रोहित! त्यांनी आत्ता माझी ऑर्डर डिलीव्हर केली इथे! हो..केली केली..! ..पण त्यांना अॅक्सीडेंट झालाय आणि मार पण लागलाय बराच! जरा कोणालातरी पाठवा ना मदतीसाठी? ही इज नॉट एबल टू यूझ हिज बाईक अॅज वेल! आय डोन्ट नो! कोणी नाही म्हणजे काय? तुमचा माणूस आहे, त्याला लागलंय, तुम्ही स्वतः या ना कोणी नाही तर? अहो त्याला इतकं लागलंय आणि रक्त येतंय! हां प्लीज! लवकर या! रोहित, थांबा इथेच, कोणीतरी येतंय"
"कशाला त्रास घेताय मॅम!"
"बसा इथे! वॉचमन आला! काय झालं हो? आली का? पण आता ह्यांना न्यायला ह्यांच्याच कंपनीतले एक जण येतायत! हे घ्या, त्या ऑटोचे वीस रुपये देऊन टाका, म्हणाव कॅन्सल झालं जाणं!"
"मॅम! तुम्ही कशाला त्रास घेताय? आणि तुम्ही आत्ता घरात एकट्याच आहात ना?"
"हो! मिस्टर मित्रांबरोबर बाहेर गेलेत! ते बाहेर चाललेत समजल्यावर मग मी माझ्यापुरता पिझ्झा मागवला होता. तुमचं घर कुठे आहे?......हॅलो??......काय बघताय माझ्या लॅपटॉपमध्ये? तुमचं घर कुठे आहे??"
"रतलाम! एम पी!"
"मग तिथून इथे?"
"......तुम्हाला काय सांगायचं मी?"
"म्हणजे काय??????"
"म्हणजे..तुम्ही कस्टमर लोक..आमच्या कहाण्या कुठे सांगत बसू..?"
"अहो तसं काही नाही! रतलामहून इथे कसे काय आलात एकदम?"
"मला शिक्षणातलं काही कळत नव्हतं मॅम! खूप प्रयत्न केला तरी फेल व्हायचो! कसाबसा अकरावी झालो. इंग्लिश मिडियमला असल्याने इंग्लिश तेवढं येतं! आई वडील गेले. मोठ्या भावांनी हाकलून दिलं. म्हणाले बाहेर पडलास की ताळ्यावर येशील! वेगवेगळ्या नोकर्या करत इथपर्यंत पोचलो. बाईक कंपनीनेच दिली आहे. त्यामुळेच एकदा क्लेम झाला की त्या बॉयला काढून टाकण्याची पॉलिसी आहे त्यांची! शिक्षा म्हणून! आज अॅक्च्युअली बाईक स्किड झाली जरा वळणावर! मी घाईघाईत असल्याने! नेमकी समोर डस्टर होती! जोरात धडकलो. बाईकचे खूप नुकसान झाले. डस्टरलाही एक स्क्रॅच गेला. डस्टरवाल्याने बाहेर येऊन मला मारले. शिव्या दिल्या. मी घाबरून बाईक ढकलत इथे आलो"
"कु......कुठे झालं हे सगळं?"
"हे..कॉलनीच्या गेटबाहेरच्या फर्स्ट टर्नवर...."
"डस्टर........चा नंबर काय होता?"
"नाही बघितला..आणि नंबर बघून मी काय करणार?"
"कलर?"
"असा......बिस्किट टाईप कलर होता"
"कितीजण होते?"
"तिघे होते मॅम! तिघेही शिव्या देत होते......पण मारलं फक्त एकानेच.......ड्रायव्हिंग करणार्याने"
"कोणी..मदतीला नाही आलं?...."
"नाही..सगळे बघत हो..ते........मॅम???? मॅम हा मागचा फोटो?"
"इट्स मी अॅन्ड माय...... हसबंड! हेच......हेच होते ना? डस्टरमध्ये?"
"......"
"अं?...... हेच होते ना?"
"मी निघतो मॅम! बाईक रस्त्यावर ढकलून नेऊन लावतो. प्लीज मला जाऊदेत"
"हेच होते ना डस्टरमध्ये?"
"असूदेत मॅम! मी निघतो"
"वेट! आता तर मी तुम्हाला जाऊच देणार नाही तशी! आय विल मायसेल्फ टेक यू टू अ हॉस्पीटल"
"प्लीज डोन्ट मॅम! माझे......आई बाबा गेल्यापासून असल्या कौतुकाच्या सवयी नाही राहिलेल्या, त्या उगाच लागायच्या पुन्हा"
"......"
"तुम्ही......तुम्ही कशाला डोळ्यात पाणी आणताय मॅम? पिझ्झा गार होतोय"
"मी दोन मिनिटांत आले, आपण लगेच निघू"
"तुम्ही......हॉस्पीटलचे बिलही देणार असाल मॅम"
"ऑफकोर्स. का?"
"त्यापेक्षा, मला तीन हजार रुपये द्या ना? दोन हजार रुपये मी रेंटचे भरून टाकेन आणि उरलेल्या एक हजारमधून महिनाभर रोज सायबर कॅफेत तीन तीन तास जाऊन बसू शकेन"
"काय??????"
"फावल्या वेळात काहीच काम नसल्यामुळे मी नेट कॅफेत जाऊन चॅट करत बसतो मॅम! तुम्ही तीन हजार रुपये दिलेत तर माझी रूमही राहील, जोसफ्सला पुन्हा फोन करून त्या माणसाला न यायला सांगितलंत तर माझा जॉबही राहील आणि उरलेल्या पैश्यांमधून मला चॅटिंगही करता येईल. ह्या अंगावरच्या जखमा लगेच दिसेनाश्या होतील, पण मी चॅटिंगला न आल्यामुळे एक व्यक्ती कदाचित कायमची दुरावली तर ती रागावून एखादवेळेस पुन्हा नाही भेटणार"
"तुम्हाला वेडबिड लागलंय का?"
"आय अॅम हर्षेन२४२८ मॅम! ज्याची आयडेंटिटी अजिबात न मागता आणि त्याला स्वतःची आयडेंटिटी समजू न देता ज्याच्याशी तुम्ही सकाळ दुपार तासनतास चॅट करता! कौमुदी९२ ह्या आय डी ने तुम्ही ज्याच्या प्रतीक्षेत ऑनलाईन असता तो मीच आहे. पण.... हे तुम्हाला सांगायची मला लाज वाटत होती.."
=================================
-'बेफिकीर'!
लिटिल प्रेडिक्टेबल.. या कथे
लिटिल प्रेडिक्टेबल..
या कथे ला अवास्तव नाव का बरं >.
अ-वास्तव नाव बहुधा virtual
अ-वास्तव नाव बहुधा virtual गोष्टींबद्दल आहे म्हणून दिलं असावं. Nice one!
लिटिल प्रेडिक्टेबल..>> +१
लिटिल प्रेडिक्टेबल..>> +१
कथा थोडी विचीञ आहे .
कथा थोडी विचीञ आहे .
(No subject)
मजेशीर आहे कथा. माझ्या
मजेशीर आहे कथा. माझ्या डोक्याने काहीतरी खूनाचा किंवा वेगळ्या गुन्ह्याचा वगैरे प्लॉट बनवून टाकला होता शेवटाला येईपर्यंत.
बेफिकीर, आ.न., -गा.पै.
बेफिकीर,
आ.न.,
-गा.पै.
शेवट आला तेव्हा यडा झालो
शेवट आला तेव्हा यडा झालो .
भारी .
पुलेशु .
मस्त!! actually
मस्त!! actually "तुम्ही......हॉस्पीटलचे बिलही देणार असाल मॅम",
या वाक्यने जरा कलटणी दिली होती ती ताणली असती तर मजा आली असती
एकदम मस्त्...बेफीकीर फॉर्म
एकदम मस्त्...बेफीकीर फॉर्म परत आलाय तर आल्या पावली भुक्कड्,अन्या पुर्ण करा की प्लीज...
अनझेपेबल
अनझेपेबल
नवर्याने गाडी ठोकली हे
नवर्याने गाडी ठोकली हे प्रेडिक्टेबल वाटले पण पुढचे नाही वाटले.
"मी दोन मिनिटांत आले, आपण
"मी दोन मिनिटांत आले, आपण लगेच निघू">>>
इथपर्यंतची कथा पुरेशी गंभीर आणि उत्कंठावर्धक!
त्यानंतरच्या ओळींनी संपूर्ण कथेचे गांभीर्य लयाला घालवले असे म्हणावेसे वाटत असले तरी लेखकाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य ह्या मुद्द्यांतर्गत मनाची समजूत घालत आहे.
<< "आय अॅम हर्षेन२४२८ मॅम!
<< "आय अॅम हर्षेन२४२८ मॅम! ज्याची आयडेंटिटी अजिबात न मागता आणि त्याला स्वतःची आयडेंटिटी समजू न देता ज्याच्याशी तुम्ही सकाळ दुपार तासनतास चॅट करता! >>
( आधी घाईत चुकून हर्पेन वाचलं. असो. )
हे वास्तव ठाऊक असल्यानेच बहुदा डस्टर चक्रधारी नवरोबांनी त्याला चोपले असावे.
हे वास्तव ठाऊक असल्यानेच
हे वास्तव ठाऊक असल्यानेच बहुदा डस्टर चक्रधारी नवरोबांनी त्याला चोपले असावे.
>>>>>>>> चेतन, भारी डोक लावलतं.. ही पण एक शक्यता आहे
WOW!
WOW!
हाहाहा चेतन! तर्क
हाहाहा चेतन! तर्क आवडला.
आ.न.,
-गा.पै.
@बेफी, मस्तच जमलीय.
@बेफी, मस्तच जमलीय.
त्या डिलीवरी करणार्या
त्या डिलीवरी करणार्या माणसाच्या काळजीने बाईंच्या जीवाची होणारी घालमेल संवादात छान उतरली आहे. बाकी कथा प्रेडिक्टेबल झाली तरी बाईंना वाटणारी टोकाची कणव, काळजी आणि बाईंचे चॅटमधे गुंतणे हे कुठेतरी लॉजिकली पुरक झाले. मला नीट सांगता येत नाहीये.
अवांतर- भारतात पिझा डिलिवरी वाल्यांना टीप घेता येत नाही का?
लिटिल प्रेडिक्टेबल..>> +२ ,पण
लिटिल प्रेडिक्टेबल..>> +२ ,पण नंतरची गुगली मस्त ,आवडली कथा . हा "पिझ्झा" पहा पण धोक्याची सुचना वाचुन http://www.maayboli.com/node/48143?page=16
बे ss फिकीर!
बे ss फिकीर!
पु.ले.शु.
पु.ले.शु.