अ-वास्तव
Submitted by बेफ़िकीर on 8 November, 2014 - 03:42
"यूअर पिझ्झा मॅम"
"ओह यॅ! इतका वेळ का लागला?"
"अॅक्चुअली......जरा धडक झाली"
"कोणाची? तुमची?"
"हो"
"मग? लागलंय का?"
"हो, म्हणजे विशेष नाही"
"पाणी वगैरे हवंय का?"
"नाही नको"
"अरे बापरे......अहो रक्त येतंय गुडघ्याजवळ"
"नाही ठीक आहे, आता संपलीच आहे ड्युटी"
"म्हणजे खाली पडला होतात का?"
"हो......पण..पार्सल नाही पडलं..ते सेफ होतं मागच्या बॉक्समध्ये.."
"नाही नाही..ते ठीक आहे..पण इतकं रक्त आलंय तर..दुसर्याला पाठवायला सांगायचंत ना?"
"तुमचे..फोन येत होते सारखे..आणि आधीच लेट झालो होतो.."
"हो पण..थांबा जरा..मी बँडेड देते"
"नाही असूदेत......निघतो"
विषय:
शब्दखुणा: