Submitted by नंदिनी on 17 October, 2013 - 00:34
२०१३ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद चिनूक्स
धन्यवाद चिनूक्स
बालनेटाक्षरीत कविता नवरे
बालनेटाक्षरीत कविता नवरे यांची एक बालकथा आणि बालगीत वाचले.
कविता नवरे आणि बालनेटाक्षरीच्या संपादिका अनघा हिरे माबोकर आहेत ना?
हो विजय
हो विजय
२०१३ दिवाळी अंकांबद्दल- काही
२०१३ दिवाळी अंकांबद्दल-
काही आवडलेले-न आवडलेले- सोडून दिलेले.
सध्या हातात असलेले अंक- मौज, पद्मगंधा, अक्षर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, माहेर, शब्द, ऋतुरंग, अनुभव, मुशाफिरी, लोकमत दीपोत्सव, साहित्य, इत्यादी.
भाग-एक
पद्मगंधा- हा अंक मला नेहमीच आवडतो. आजवर कधीही कंटाळवाणा झालेला नाही. वैचारिक/ललित लेख, कथा, प्रवासवर्णने, मुलाखती यांचा छान समतोल असतो. वर्षानुवर्ष दर्जेदार दिवाळी अंक काढणारे संपादक अरुण जाखडे निश्चितच अभिनंदनीय कामगिरी करत आहेत. (दि.अंकावर बाईचं मुखपृष्ठ कधीच नसणारे जे अंक आहेत त्यापैकी हा एक. रविमुकुल यांची सगळीच मुखपृष्ठे मला आवडत नाहीत, उदा. यावर्षीचप, पण वेगळेपणा असतोच.).
ज्यांच्या प्रकाशन संस्था आहेत त्यांच्या संपादकांनी काढलेले अंक नि:संशय वेगळे आणि दर्जेदार असतात.
पद्मगंधातले आत्तापर्यंत वाचून झालेले-
गुलझार यांच्याशी अंबरिश मिश्रांचा संवाद- गुलझारच्या 'देवडी' कथासंग्रहाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशनसमारंभात अंबरिश मिश्रांनी त्यांची जी मुलाखत घेतली होती तीच अनुवाद करुन छापली आहे. मी अर्धवट सोडून दिली वाचता वाचता कारण मी मुळ मुलाखत गुलझारजींच्या ओघवत्या हिंदी-उर्दूमधे, त्यांच्या कवितांच्या रिसायटेशनचे लोभस अर्धविराम वेळोवेळी एंजॉय करत टीव्हीवर पूर्ण ऐकली होती.त्या तुलनेत सविता दामलेंनी केलेला अनुवाद कंटाळा आणतो. खास गुलझारीश टच हरवला आहे. अर्थात ज्यांनी संवाद ऐकला नाही, त्यांनी नक्की वाचावी मुलाखत.
ता.क.- देवडीमधे साहिर आणि जावेद अख्तर या दोघांच्या भावनिक नात्याविषयी लिहिलेले, तसेच कुलदीप नय्यर यांचा पीरसाहेब हा लेख अप्रतिम आहे. त्याकरता देवडीतल्या बाकी कंटाळा आणणार्या मजकुराला माफी. बिमलदा यांच्या आठवणीही छान आहेत पण त्या एरवी वाचलेल्या आहेत.
डॉ. द,भि. कुलकर्णींसोबतचा संवाद-मुलाखत (सुनेत्रा मराठे)- कादंबरीरहस्यः मुक्तचिंतन-,मला खूप आवडलं. एकतर मराठीत कादंबरी लेखनाची तंत्र, अडचणी फारशा कोणी लिहिण्याची पद्धतच नाही. दभिंनी मस्त लिहिले आहे. त्याबद्दल वेगळे लिहायला हवे. मला जास्त आवडला कादंबरीच्या समिक्षेबद्दल त्यांनी काव्यमुखानं आणि रसिकमुखानं केलेली समिक्षा यातला जो फरक स्पष्ट केला आहे तो.
लीनता वझे यांनी मैहर घराण्याचे अर्ध्वयु अल्लाउद्दीन खानसाहेब यांची कन्या आणि सूरबहार, सतार, सरोद या वाद्यांवर अभूतपूर्व हुकूमत मिळवलेल्या कलाकार अन्नपूर्णादेवी यांच्या शिष्या या नात्याने काही वैयक्तिक आठवणी लिहिल्या आहेत. अन्नपूर्णादेवी या पं.रविशंकर यांच्या प्रथम पत्नी. रविशंकर यांचे नुकतेच निधन झाल्यावर माध्यमांमधे त्यांच्या आणि अन्नपूर्णादेवींच्या नात्याविषयी बरेच छापून आले होते. त्या तुलनेत या आठवणी संयमाने लिहिल्या आहेत. तरीही अन्नपूर्णादेवींच्या मनातला कडवटपणा, त्यांच्या मुलाची शुभोची नंतरच्या काळात पंडितजींकडून झालेली जाणीवपूर्वक हेळसांड वाचताना खिन्न होते. अन्नपूर्णादेवींच्या गुरुत्वाची महती लीनता वझेंनी योग्य दर्शवली आहे.
ज्योती कानेटकरांची 'नेहा' कथा बोरिंग. वेळ फुकट गेला वाचून.
बाकी अंकात आहे. त्यापैकी काही- जे मी वाचीन, जे सोडून देईन.
नागनाथ कोत्तापल्ले, दादा ध्यात यांची मशिदीतील कबुतरी कथा. वाचणार.
अरुण साधूंची कथा- सोडून देणार.
श्रीकांत बोजेवारांच्या 'शब्द' कथेची सुरुवात कंटाळवाणी, पण ती पूर्ण वाचणार.
प्रल्हाद जाधवची चकण्या पोपटाची डोळस फिल्मी ट्रॅजेडी वेधक वाटतेय. बघूया.
दुरावा या विभागातले- मीनाकुमारी आणि कमाल अमरोही (जयश्री बोकिल), कुमार गंधर्व आणि रामकृष्ण बोंद्रे (रविप्रकाश कुलकर्णी), गांधीजी, हरिलाल आणि सुभाषबाबू (अरुण खोरे) हे वाचणार.
सोडून देणार- रुक्मिणी आणि सत्यभामा (अरुणा ढेरे),
धर्मसुधारणा- विचाराचा एक अंतर्गत प्रवाह (नरेन्द्र चपळगावकर), ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद आणि रवीन्द्रनाथ हे दोन लेख वाचणार पण त्यातले किती कळेल माहीत नाही.
वाडेश्वरोदय (लीला दीक्षित)- काय आहे कल्पना नाही, पण वाचीन.
पुढच्या भागात- ऋतुरंग आणि अनुभव बद्दल.
विमर्श अंक अनुक्रमणिका
विमर्श अंक अनुक्रमणिका -
विमर्श दिवाळी अंक २०१३
आर्थिक आव्हाने - या विषयावरचे दोन लेख ( गुरुमूर्ती, सुरेश प्रभू )
ऐंशी नंतरचे साहित्यजीवन
शं. ना. नवरे ( शं. ना. जायच्या फक्त काही दिवस आधी घेतलेली मुलाखत ),
रा.ग. जाधव,
द.मा. मिरासदार,
अनंत मनोहर
रंगीत विभाग
प्रकाशाची चित्रे - स्वप्नाली मठकर,
बदलत्या भूमिका- भगवान दातार,
रेषांची भाषा - शि. द. फडणीस ,
कविता विभाग
संवादातून अनुवाद - उमा कुलकर्णी, विरुपाक्ष कुलकर्णी
मुंगी उडाली आकाशी - हेमा क्षीरसागर,
ओव्हरकोट - निकोलाय गोगोल - अनुवाद अनिल आंबीकर
सरहद को प्रणाम - राकेश - अनुवाद - प्रियांका पुगावकर
गुरुकृपेवीण -- दीपक कलढोणे
कालानुरूप संघर्ष - विजयराज बोधनकर
आणि रवींद्र गोळे, अनुजा कुलकर्णी, श्रीपाद कोठे , प्रमोद डोरले, क. क्षीरसागर, आशिष भावे यांचेही लेख आहेत
अंकातला माझा लेख.
सावली,फ फोटोचा दिवाळी अंक
सावली,फ फोटोचा दिवाळी अंक नुकताच नजरेखालून घातला. मस्त अंक आणि विषय आवडता! त्यामुळे वेळ काढून वाचणार आहे. याची माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
विमर्श दिवाळी अंक नक्की वाचेन.
डॉ. द,भि. कुलकर्णींसोबतचा
डॉ. द,भि. कुलकर्णींसोबतचा संवाद-मुलाखत (सुनेत्रा मराठे)- कादंबरीरहस्यः मुक्तचिंतन-,मला खूप आवडलं. एकतर मराठीत कादंबरी लेखनाची तंत्र, अडचणी फारशा कोणी लिहिण्याची पद्धतच नाही. दभिंनी मस्त लिहिले आहे. त्याबद्दल वेगळे लिहायला हवे. मला जास्त आवडला कादंबरीच्या समिक्षेबद्दल त्यांनी काव्यमुखानं आणि रसिकमुखानं केलेली समिक्षा यातला जो फरक स्पष्ट केला आहे तो.<<< यावर जरा सविस्तर लिही प्लीज.
अरे वा , अभिनंदन सर्वांचे
अरे वा , अभिनंदन सर्वांचे
अजून एक आनंदाची गोष्ट. अग्रसेन या दिवाळी अंकामधे जागूचा "चूल माझी सखी" हा लेख आलाय. अन इतकेच नव्हे तर त्याला दुसरे पारितोषिक मिळालेय जागू खूप खूप अभिनंदन
माहेर मध्ये बाबा आमटे यांच्या
माहेर मध्ये बाबा आमटे यांच्या त्यांच्या आईवर लिहीलेला लेख आवडला.
Sharmila chhan details det
Sharmila chhan details det aahes. Thanks.
अक्षरगंधः इरावती कर्वे,
अक्षरगंधः इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गोदावरी परुळेकर आणि इंदिरा संत या चार साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या लेखिका / कवयत्रींवर हा अंक आहे. त्यांचे काही लेख आणि त्यांच्यावर इतर मान्यवरांनी लिहिलेले लेख अशी रुपरेखा आहे. अनुक्रमणिका चाळतानाच प्रेमात पडलोय या अंकाच्या मी.
स्वरप्रतिभा: आशा भोसले यांच्यावर खास दिवाळी अंक आहे हा
मुशाफिरी : मुशाफिरीचा यंदाचा
मुशाफिरी :
मुशाफिरीचा यंदाचा अंक हा 'युनिक फिचर्स'तर्फे निघालेला दुसरा अंक. गेल्यावर्षी बूकस्टॉलवाल्याने सुचवला म्हणून घेतला आणि तो खूप आवडला. त्यामुळे ह्या वर्षीचा अंक वाचायची उत्सुकता होती. शिवाय ह्याच बाफवर कळलं की मायबोलीकर ललिता-प्रीति ह्या अंकाची सहसंपादिका आहे त्यामुळे ही उत्सुकता अधिकच वाढली.
आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षीचा अंकही अतिशय सुंदर आहे आणि खूप आवडला. अंक हातात पडल्यावर अंकातले बरेच लेख एका बैठकीत वाचून काढले. यंदाच्या मुखपृष्ठावर घाटात वळण घेणार्या आगगडीचं चित्र आहे. आगगडी हा घरी एकंदरीतच फार जिव्हाळ्याच्या विषय असल्याने ही आगगाडी खंडाळ्याच्या घाटातली डेक्कन क्विन की आणखी कुठली ह्या विषयावर घरी चर्चा झाली.
अंकाचे विभाग पण कल्पकतेने पाडलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांचा वाचला तो म्हणजे 'असे मार्ग, असे प्रवास' मधला ललिताचा 'गर्दी, गंमती आणि रेल्वेप्रवास' हा लेख. लेख खूप आवडला. खरतर ह्या विषयावर लिहावं तितकं कमीच! रेल्वेने नियमितपणे प्रवास करणार्या मंडळींकडे अक्षरशः अनुभवाचं गाठोडं असतं. ललिताने नेहेमीप्रमाणेच ओघवत्या शैलीत रंगवून रंगवून लिहिलं आहे. ह्याच विभागातला दुसरा लेख 'शिडाच्या होडीतून जगप्रदक्षिणा' हा लेखही खूप आवडला. कमांडर दोंद्यांनी केलेल्या अश्याच जगप्रदक्षिणेबद्दल मायबोलीच्या दिवाळी अंकात त्यांच्या मुलाखतीत वाचलं होतं. नौदलातल्या अभिलाष टॉमी ह्यांनी दोंद्यांच्याच होडीतून ही प्रदक्षिणा केली. हा लेख रोजनिशी स्वरूपातला असल्याने खूपच उत्कंठावर्धक वाटला. हृषीकेश पाळंदे ह्याच्या 'दोन चाकं आणि मी' ह्या पुस्तकातला संपादित भाग अहमदाबाद ते जम्मू ह्या प्रवासातले काही अनुभव सांगतो. पण हा लेख मधेच सुरु होतो आणि मधेच संपतो. संदर्भ सोडून काढल्यासारखा वाटला. त्यामुळे फारसा आवडला नाही. पूर्ण पुस्तक वाचलं पाहिजे. ह्या विभागातला शेवटचा लेख म्हणजे अमिता बेहेरेंचा बायकींगची झिंग. मुंबई ते अरूणाचल प्रदेश पर्यंतचा बाईकवरचा प्रवास ह्या लेखात छान रंगवला आहे.
ह्या नंतरचा मला सगळ्यात आवडलेला विभाग म्हणजे 'नद्यांच्या संगतीने'. ह्यातला 'नदीचं मूळ शोधताना' ह्या अंजली कीर्तने ह्यांनी लिहिलेल्या लेखात दुर्गाबाई भागवतांनी मध्य भारतातील नंद्याचे उगम शोधताना केकेल्या पायपिटीची कहाणी आहे. त्यांचे महानदी आणि तिच्या दोन उपनद्यांची उगमस्थानं शोधतानाचे अनुभव खूप सुरेख आहे. दुर्गाबाईंच्या शब्दांतली नद्यांची वर्णनं अफाट सुरेख आहेत! तर दुसर्या एका लेखात यशोदा वाकणकरांनी देशोदेशी भेटलेला नद्यांची ओळख करून दिली आहे.
'परदेश भ्रमंती'मध्ये नेहेमीचे यशस्वी देश न घेता आपले शेजारी श्रीलंका आणि नेपाळची ओळख होते. हे दोन्ही लेख ठिक ठिक वाटले. ह्या शिवाय जपानमधल्या खेड्यातल्या सफरीची सचित्र माहिती एका लेखात आहे. हा लेख आवडला. अगदी संपादकीयात विशेष नमूद केलेल्या अमेरिकेतल्या यलोस्टोन नॅशनल पार्कवरच्या लेखाने मात्र निराशा केली! कदाचित हे पार्क स्वतः बघितलेलं असल्याने लेखातून दिसलेलं पार्क फारसं आवडलं नाही.
गेल्यावर्षीच्या अंकाप्रमाणे ह्याही अंकात आपल्या देशातली अनवाट वाटांची भटकंती पण आहेच. हिमाचल प्रदेशातल्या तिबेटला लागून असलेल्या 'लाहौल- स्पिती' ह्या शीत वाळवंटाची आपल्याला ओळख होते. मनाली लेह मार्गावर एका फाट्याला आता वळून ह्या भागाकडे जाता येतं. ह्या लेखातलं एकही ठिकाण मी आधी ऐकलेलं नव्हतं. त्यामुळे जरा विकीवर अजून शोधाशोधी करायची आहे. 'पुणे ते पूर्व घाट : व्हाया बस्तर' ह्या लेखात आपल्याला छत्तीसगढ मधल्या बैलाडिला माईन्सपासून विशाखापट्टणम पर्यंत जी गाडी जाते त्याची सफर घडते. ह्याही लेखातली बरीचशी ठिकाणं याआधी ऐकलेली नव्हती. काश्मिरमधल्या फक्त पटेल स्पॉट्स बद्दल न लिहिता तिथे हल्लीच तयार केलेल्या ट्युलिप गार्डन बद्दल सचित्र माहिती आहे. हा लेख पण छान वाटला. ही सगळी ठिकाणं आता 'टू-विजीट' यादीत घातली आहेत.
ह्या खेरीज दिल्ली आणि कलकत्ता शहरांची ओळख करून देणारे लेख आहेत. सध्या मला ह्या दोन्ही शहरांबद्दल फार उत्सुकता निर्माण झालेली असल्याने हे लेख पाहून छान वाटलं. पैकी दिल्लीवरचा लेख जास्त आवडला. दिल्लीतली म्युझियम्स, ग्रंथालये, देवालये, खरेदीची आणि खादाडीची ठिकाणी ह्यांची माहिती त्यांच्या वैशिष्ट्यांसह दिलेली आहे.
'खाद्यसंस्कृती'त मायबोलीकर नंदिनीचा चेट्टीनाड खाद्यसंस्कृतीबद्दल लेख आहे. एकंदरीत लेख छान आहे. पण अधे मधे पदार्थांच्या नावांची यादी सतत येत राहिल्यासारखी वाटते आणि ती नावे माहितीची नसल्याने तेच तेच वाचल्यासारखं वाटतं. आसाम आणि राजस्थानवरचे लेख नेहमीचं तेच ते असलेले आहेत. लखनऊवरचा लेख आवडला कारण लखनऊतल्या खाद्यवैशिष्ट्यांबद्दल फार वाचलं नव्हतं.
एकंदरीत मुशाफिरीचा सलग दुसरा अंक खूप वाचनीय आणि संग्राह्य आहे !
पराग छान लिहीलं आहेस परीक्षण.
पराग छान लिहीलं आहेस परीक्षण. अंक आहेच छान. यावेळचा लोकसत्ता चा अंक पण आवडला. खालसा झालेल्या संस्थानांच्या आजच्या वंशजांचा घेतलेला मागोवा आहे. सगळे लेख आवडले. कालनिर्णय पण आणलाय. पण अत्ताशी वर्वर चाळलाय. गो.पु. देशपांडे, साळगावकर, बाळ ठाकरें वरचे श्रद्धांजली पर लेख आहेत. गूगल आणी टेड टॉक वर आलेले लेख छान आहेत.
फोटो सर्कल सोसायटीचा अंक
फोटो सर्कल सोसायटीचा अंक सुंदर झालाय. गोपाळ बोधेंची मुलाखत आवडली
'अक्षर'च्या दिवाळी अंकानं
'अक्षर'च्या दिवाळी अंकानं बहुतांश निराशा केली.
नावं उत्तम. विषय उत्तम. मजकूर, शब्दांकन वाईट.
लोकमत चा "दीपोत्सव"
लोकमत चा "दीपोत्सव" आवडला.
त्यातली "बोइंग"चे दिनेश केसकर यांची मुलाखत(स्वता:च कथन केलं आहे.) आवडली.
मुशाफिरी आणि मौज ही आवडले.
लोकसत्ता दिवाळी अंकातील गिरीश
लोकसत्ता दिवाळी अंकातील गिरीश कुबेरांचा जमशेटजी टाटांवरचा आणि वर्षा गजेंद्रगडकर यांचा लीला पुनावाला यांच्यावरील लेख छान आहेत. याच अंकात पेशव्यांच्या सध्याच्या वंशजांवर लेख आहे. त्यांच्यावर आवर्जून लेख लिहिण्यासारखं काय आहे, असं वाचून वाटलं.
पराग मुशाफिरी बद्दल छान
पराग मुशाफिरी बद्दल छान लिहीलयस. आता आमच्या लायब्ररीतून तोच अंक उपलब्ध असल्यास आणून वाचेन.
सकाळचा साप्ताहिक सकाळ अंक वाचला. त्यातील अनिल अवचट यांचा पक्षांवरील लेख त्यात त्यांनी सांगितलेले परिक्षण अत्यंत आवडले.
वर्षा लोकसत्ताचा दिवाळी अंक मी पण वाचला. तू म्हणतेयस त्याप्रमाणे पेशव्यांबद्दल इतक प्रभावी लेखन झालेल नाही. अर्थात हे आपले वैयक्तीक मत.
आमचे दिवाळी अंक आले. अनुभव
आमचे दिवाळी अंक आले.
अनुभव आणि कथाश्री वाचले. कथाश्रीमधली प्रीतिची कथा फारशी झेपली नाही. "कथालेखनासंबंधीची" ही तिचीच मी वाचलेली तिसरी कथा.
लोकमत दिपोत्सवमधला रणबीर कपूरचा लेख वाचला, बर्याच लॉजिकल झोलमधे आहे ती मुलाखत. खूफ्शी फेक पण वाटली.
अक्षरः अक्षरचा अंकाने माझी
अक्षरः
अक्षरचा अंकाने माझी खूप निराशा वगैरे नाही केली. मला तरी अंक ठिक ठिका वाटला. अंकातले सगळे विषय उत्तम आहेत. कदाचित मी ह्या विषयांबद्दल आधी खूप वाचलं नसल्याने आणि काही ठिकाणी मजकुराची ऑथेंटिसिटी माहित नसल्याने लेखन ठिक वाटलं असेल. (किंवा मग माझं प्यॅकेज.. दुसरं काय!! )
अंकातला पहिलाच विभाग म्हणजे 'रिपोर्टींग करताना'. ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या पत्रकारांचे अनुभव त्यांच्या दृष्टीकोनातून मांडले आहेत. युवराज मोहित्यांचा राजकारण विषयक पत्रकारितेवरचा लेख ठिक ठिक आहे. क्रीडा पत्रकारितेबद्दल सुनंदन लेल्यांचा 'हेवा वाटणारं प्रोफेशन' हा लेख आहे. लेल्यांचं लेखन मला फारसं आवडत नाही. ते फार उथळ वाटतं. (त्यापेक्षा मायबोलीवरचे कितीतरी जण खेळांबद्दल खूप चांगलं लिहितात!) ह्या लेखातले काही काही अनुभव ठिक वाटले. दिप्ती राऊतांचा दंगलीबद्दलचा लेख चांगला आहे. तर अशोक राण्यांचा सिनेपत्रकारितेबद्दलचा लेख फारसा आवेश नसलेला प्रामाणिक वाटला. 'ग्लॅमरचं थ्रिल' हा फॅशन करस्पॉन्डन्ट शाल्वी माणगावकरांचा लेख त्या क्षेत्रातलं फारसं काही माहित नसल्याने ठिकच वाटला.
कुमार केतकरांचा 'बाळासाहेब नावाची आख्यायिका' लेख आवडला. बाळासाहेबांबद्दल गेल्या वर्षभरात (खरतर त्याआधीही) इतकं लिहून आलेलं आहे की दरवेळी आणखी काय नवीन लिहिणार! पण त्यांचं व्यक्तिमत्त्व अणि त्यांच्याभोवती असलेलं वलयच असं होतं की त्यांच्याबद्दल लिहून आलेलं प्रत्येकवेळी वाचलं जातच.
अभिनेत्री नीना कुलकर्णी ह्यांचा त्यांचे दोन गुरु सत्यदेव दुबे आणि विजया मेहता ह्यांच्याबद्दल 'दोन गुरु' हा लेख ठिकठिक वाटला. 'झिम्मा'मध्ये बाईंनी स्वत:च इतकं सविस्तर लिहिलेलं आहे की त्यांच्याबद्दल दुसर्या कोणी लिहिलं तरी ते आधी वाचलेलचं आहे असं वाटतं. दुब्यांबद्दलचा भाग नवीन होता. 'मराठीपेक्षा इंग्रजी आणि हिंदीशी मी जास्त कम्फर्टेबल आहे' ह्या लेखातल्याच वाक्याचा पदोपदी प्रत्यय येतो. लेखात इंग्रजी शब्दांची खैरात आहे.
डॉ. आनंद नाडकर्णींचा 'रूमीच्या गावात' हा लेख आवडला. विषय वेगळा वाटला. निळू दामल्यांचा 'शोध असंतोषाचा' हा ट्युनिशीया, लिबिया, इजिप्त वगैरे देशांमधल्या उठावांबद्दलचा लेख आहे. ह्यासंबंधी गोष्टीही वाचलेल्या आहेत पण एकंदरीत ठिकठिक आहे.
जतीन देसाईंचा 'माझ्या पाकिस्तानी मैत्रिणी' हा लेख आवडला. शेरी रेहमान, अस्मा जहांगीर, बिना सरवार आणि मेहमल सरफराझ ही नावं ऐकलेली आहेत पण त्यांच्याबद्दल फारसं वाचलेलं नव्हतं. काही काही ठिकाणी पाकिस्तानातल्या अनुभवांची भारतातल्यांशी तुलना करून लगेल 'वा वा काय तिथले अनुभव! भारतात असं कध्धी कध्धी घडलं नसत!' छाप सुर मात्र खटकला. मलाला बद्दलचा भाग त्यात उगीच लिहिल्यासारखा वाटला. दत्तप्रसाद दाभोलकरांचा लेख खूपच परखड आहे पण फार एकांगी वाटला. त्यांनी भारतातल्या संशोधन क्षेत्राची फक्त वाईट बाजूच तेव्हडी मांडली आहे! ह्याला दुसरी बाजू नक्कीच असणार. शिवाय लेख लिहितानाही मधे मधे फार भरकटला आहे. मुद्दे इकडचे तिकडे मांडले गेले आहेत. हेमन्त देसाईंचा 'टॉप सीक्रेट'हा सीबीआय बद्दलचा लेखही एकांगी वाटला.
कथांपैकी मधुकर धर्मापुरीकरांची कथा वाचली पण ती फारशी आवडली नाही. त्यांची दुसर्या एका अंकातली कथाही आवडली नाही. इथे मायबोलीवरच नाव ऐकलेल्या नंदा खर्यांची कथा सुद्धा आहे. पण ती एक-दोनदा वाचायला सुरुवात करूनही पुढे सरकली नाही. आता पुन्हा एकदा प्रयत्न करेन.
मुशाफिरीबद्दल मस्त लिहिलयं
मुशाफिरीबद्दल मस्त लिहिलयं पराग. मी तुझी पोस्ट वाचून काल लगेच घेतला आणि बर्यापैकी वाचून काढला.
बिल्वा, ऑनलाइन घेतलास का? तू
बिल्वा, ऑनलाइन घेतलास का? तू आधी दुवे दिले होतेस पण पुन्हा एकदा दे ना सगळ्याच ऑनलाइन अंकांचे.
धन्यवाद प्रॅडी, जागू आणि
धन्यवाद प्रॅडी, जागू आणि बिल्वा
मटाच्या अंकात कसाबबद्दलचे दोन लेख आहेत. पैकी पहिला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा म्हणजे आर.आर.पाटलांचा आहे. त्यांनी कसाबच्या फाशीच्या अंमलबजावणीबद्दल म्हणजे 'ऑपरेशन एक्स'बद्दल लिहिले आहे. किती सांगावं आणि किती झाकावं ह्याचं व्यवस्थित भान ठेऊन हा लेख लिहिला आहे. सिस्टीममध्ये आलेले चांगले अनुभव लिहितानाच आपल्या सहकार्यांचं कौतूक करायला ही पाटीलसाहेब विसरले नाहीयेत. शब्दांकन दुसर्याने केलेलं असलं तरी हा लेख आवडला.
दुसरा लेख कसाबला तपासणार्या डॉ.वाकचौरे ह्यांनी लिहिलेला आहे. ह्या लेखाने मात्र डोक्याला जबरी शॉट बसला!! लेखाचं नाव 'कसाबच्या सहवासात'! अरे आपल्या देशावर हल्ला केलेला, निरपराध्यांना मारलेला माणूस हा.. ह्याच्या सहवासाबद्दल लेख देऊन कश्याला उगीच महत्त्व द्यायचं आणि किंमत वाढवता त्याची.. ! अनुक्रमणिका इंटरेस्टींग वाटावी म्हणून काही विषन निवडताना आपण नक्की कश्याबद्दल लिहितो आहे ह्याचं तरी भान ठेवायचं जरा !
धनंजय मधे माबोकर आशिष
धनंजय मधे माबोकर आशिष निंबाळकरांची (कवठीचाफा???) 'गावची गोष्ट; ही कथा आली आहे.
या वर्षीचा धनंजय अंक खुप
या वर्षीचा धनंजय अंक खुप शोधुनही नाही मिळाला. online मागवण्यासाठी कोणते संकेतस्थळ बरे पडेल?
प्रथम म्हात्रे, मी बूकगंगा
प्रथम म्हात्रे, मी बूकगंगा डोट कोमवरुन ओर्डर केला आहे. नवलचा २०१४चा अंक मात्र कोठे मिळेल हे शोधतेय. अमी
बुकगंगावरून अमेरिकेत मागवता
बुकगंगावरून अमेरिकेत मागवता येतात का? मी खूप ट्राय केला पण रूपयातच किमती दिसतात.
बुकगंगावरून इबुक्स व
बुकगंगावरून इबुक्स व इमॅगेझिन्स मिळतील. पण पुस्तकांचे शिपिंग इंडीयातच होत असावे. त्यामुळे मी तिकडून फक्त इबुक्स व इअंक घेतले आहेत. किंमती अगदी शेवटी डॉलर्समध्ये दिसतात. इकडचे क्रेडीट कार्ड चालते.
प्रथम म्हात्रे, धनंजय इथे
प्रथम म्हात्रे,
धनंजय इथे उपलब्ध आहे. http://kharedi.maayboli.com/shop/Marathi-Diwali-Ank/Dhananjay.html
धन्यवाद
धन्यवाद
Pages