Submitted by नंदिनी on 17 October, 2013 - 00:34
२०१३ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिवाळी अंकामधले
दिवाळी अंकामधले मायबोलीकर:
माहेरः
श्रद्धा - अचाट आणि अतर्क्य चित्रपट
अरूंधती कुलकर्णी- प्राची आणि समीर दुबळे यांची मुलाखत
साजिरा: कथा
चिनूक्स: टागोरांवरील लेख.
मुशाफिरी:
ललिता-प्रीति यांचा लेख.
कथाश्री:
ललिता-प्रीति यांची कथा.
अजून माहिती जमेल तसे इथे अपडेट करत जाईन. याव्यतिरीक्त दिवाळी अंकाबद्दल इतर माहितीदेखील इथे देत जाऊ या.
हा धागा चालु केल्याबद्दल
हा धागा चालु केल्याबद्दल धन्यवाद.
सप्तसुर या अंकाविषयी: हा अंक
सप्तसुर या अंकाविषयी:
हा अंक संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांनी काढला आहे. संपादन वैभव जोशींचे आहे. सप्तसूर म्हणजे सा ते नि असे सात विभाग केले आहेत. सार्थक, रेशीमगाठी, गरज, मर्म असे सात विभाग.. आणि त्यात पं दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर, पं जसराज यांसारख्या व्यक्तीमत्त्वांची याच क्षेत्रातल्या लोकांनी करून दिलेली ओळख, संगीतकारांनी खळेकाका, पं अभिषेकी, गुलाम अली अशांना लिहिलेली पत्र, आरती अंकलीकरांचा लेख, गाण्याची जन्मकथा, सांगीतिक राशीभविष्य असं बरंच काही. अंक रसिक साहित्य, आप्पा बळवंत चौक इथे उपलब्ध आहे.
अनुभव दिवाळी २०१३ ** :
अनुभव दिवाळी २०१३ **
: अनुक्रमणिका
० ललित ०
- उदाहरणार्थ पुरुष : विजय तेंडुलकर
- हजार वेळा 'शोले' पाहिलेला माणूस : हृषिकेश गुप्ते
- चार कथा : रंगनाथ पठारे
- चित्राची गोष्ट : समीर कुलकर्णी
० अनुभव ०
- घडीबाजांच्या देशात अवचित्तो! : अनिल अवचट
- सरस्वतीच्या शोधात... : मयूरेश प्रभुणे
काळोखाच्या लेकी : गौरी कानेटकर
० लेख ०
- 'नव्या' राजकारणाच्या पाऊलखुणा : सुहास पळशीकर
- सैल मुठी, बंद आवाज... : सुहास कुलकर्णी
० माणसं ०
- अमृता शेरगिल : साधना बहुळकर
- बाळ ठाकूर : अशोक शहाणे
नंदिनी थॅन्क्स हा खास धागा
नंदिनी थॅन्क्स हा खास धागा चालू केल्याबद्दल.
मला तर [दुर्दैवाने] डोळ्यांच्या त्रासामुळे यावर्षी जितक्या उल्हासाने वाचायला हवेत तितके दिवाळी अंकसाहित्य वाचता येणार नाही हे तर स्पष्टच आहे, पण तुझ्या लेखाच्या आधारे निदान कुठे दर्जेदार वाचनीय प्रकाशित झाले आहे हे तरी कळेलच.
आत्तही "बाळ ठाकूर : अशोक शहाणे...." या बद्दल उत्सुकता वाटत आहेच.
सप्तसुर या अंकाविषयी:>>>
सप्तसुर या अंकाविषयी:>>> माबोकर पौर्णिमा सहसंपादिका आहे सप्तसुरची.
ऑनलाईन दिवाळी अंकांची लिंक
ऑनलाईन दिवाळी अंकांची लिंक असेल तर क्रूपया शेअर कराल का?
'मुशाफिरी' या पर्यटनविषयक
'मुशाफिरी' या पर्यटनविषयक अंकाचं दुसरं वर्ष.
*अनुक्रमणिका*
० असे मार्ग, असे प्रवास ०
- गर्दी, गंमती आणि रेल्वेप्रवास : प्रीति छत्रे
- दोन चाकं आणि मी : हृषीकेश पाळंदे
- बाईकची झिंग : अमिता बेहेरे
- शिडाच्या होडीतून जगप्रदक्षिणा : अभिलाष टॉमी
० नद्यांच्या संगतीने ०
- नदीसखी : यशोदा वाकणकर
- नदीचं मूळ शोधताना : अंजली कीर्तने
० खाद्यसंस्कृती ०
- चेट्टीनाड : नंदिनी देसाई
- आसाम : गायत्री मिश्रा
- लखनऊ : ऋषी मिश्रा
- राजस्थान : अंश भटनागर
ग्रेट.... मुशाफिरी मधील
ग्रेट.... मुशाफिरी मधील 'चेट्टीनाड' च्या नंदिनी देसाई तुम्हीच असाल तर आत्ताच अभिनंदन करतो.
अशोक काका
अशोक काका
'मुशाफिरी'ची अनुक्रमणिका
'मुशाफिरी'ची अनुक्रमणिका संपूर्ण नाहीये असं वाटतंय.
वा.. नंदिनी आणि ललिता अभिनंदन
वा.. नंदिनी आणि ललिता अभिनंदन !
गेल्यावर्षीचा मुशाफिरीचा अंक सुरेख होता ! मी ह्यावर्षीही विकतच घेऊन टाकणार आहे...
प्रीति,फेबुवर शेअर केली होती
प्रीति,फेबुवर शेअर केली होती तेवढीच इथे टाकली आहे. अजून काही लेख असतील तर अॅड करा प्लीज.
पराग, अंक विकत घेऊन वाच. टाकू-बिकू नकोस.
त्यांच्या जाहिरातीत
त्यांच्या जाहिरातीत दिल्ली-कलकत्ता शहरांवर आधारित लेख, हिमाचलवरचा एक लेख - वगैरे पण आहे.
हिमाचलवरचा लेख बहुदा राणी दुर्वेनं लिहिला आहे. त्या हिमाचल-सफरीवर तिच्यासोबत शर्मिला फडकेपण होती.
कालपरवा लिहायचे राहूनच गेले.
कालपरवा लिहायचे राहूनच गेले.
पण शर्मिला फडकेने अंजोली इला मेनन या चित्रकर्तीची घेतलेली मुलाखत "लोकमत" या दिवाळी अंकामधे आहे.
.....
.....
मुशाफिरी च्या दिवाळी अंकाचे
मुशाफिरी च्या दिवाळी अंकाचे संपादन ललिता प्रीतिने केले आहे.
राणीबरोबर मी भीमबेटका केलं अग. हिमाचल नाही.
अरे वा, लली आणि पौचं खास
अरे वा, लली आणि पौचं खास अभिनंदन. माबोलेखिका आणि लेखकांचंही अभिनंदन.
आता पर्यंत कोणकोणते दिवाळी अंक बाजारात आले आहेत ते ही वेळोवेळी नमुद करा प्लीज.
शर्मिला, त्यांच्या जाहिरातीत
शर्मिला, त्यांच्या जाहिरातीत 'हिमाचलवरचा लेख' इतकं पाहिलं होतं. मला वाटलं, तू गेलीस तेच ते ठिकाण असावं. (मला ते 'भीमबेटका' नाव नीट आठवत नव्हतं. म्हटलं उगीच काहीतरी चुकीचं नको लिहायला. :हाहा:)
मी मुशाफिरीचं संपादन-साहाय्य केलं आहे.
काल 'मुशाफिरी'चा अंक चाळला.
काल 'मुशाफिरी'चा अंक चाळला. छान दिसतो आहे. आता वाचेन.
लोकमत दीपोत्सवच्या अंकात सगळी मोठी नावं आहेत. पण दोन ओळींमध्ये स्पेसिंग खूप आणि फॉन्ट मोठा वाटला. हा अंकही वाचेन आता.
वा !! माबोकर फॉर्मात आहेत
वा !! माबोकर फॉर्मात आहेत एकदम..
ललिता, पौ आणि चिन्मयचे (तो आहेच ना माहेर चा सहसंपादक) खूप अभिनंदन.
सप्तसुरचा अंक खूप म्हणजे खूप भारी आहे !!! नंतर लिहिन त्याबद्दल सविस्तर !
अरे वा सगळ्या लेखक-लेखिकांचे
अरे वा सगळ्या लेखक-लेखिकांचे अभिनंदन.
'युनिक फीचर्स' च्या सहा
'युनिक फीचर्स' च्या सहा दिवाळी अंकांचं (अनुभव, मुशाफिरी, कॉमेडी कट्टा, पासवर्ड- मराठी/ इंग्रजी /ऑडिओ) सतीश आळेकर, रंगनाथ पाठारे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज प्रकाशन आहे. या समारंभासाठी मायबोलीलाही आमंत्रण आहे. कुणा मायबोलीकरांना यायचं असल्यास अवश्य या. (एस.एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे. आज सायंकाळी ६ वाजता). रंगनाथ पाठारे आणि सोनाली कुलकर्णी हे अभिवाचनही करणार आहेत.
'मुशाफिरी' बद्दल वर लिहिलंच गेलं आहे. याशिवाय यातल्या 'कॉमेडी कट्टा' या अंकात आशूडीचा 'दिवाळी त्यांची' (http://www.maayboli.com/node/20826) हा लेख प्रसिद्ध झाला आहे.
अरे वा! आशू-डी, मस्तच!
अरे वा! आशू-डी, मस्तच!
मायबोलीकर एकदम फॉर्मात आहेत
मायबोलीकर एकदम फॉर्मात आहेत की.
माबो.कर जोरदारच फार्मात
माबो.कर जोरदारच फार्मात आहेत.... दरवर्षी माबो.करांचा समावेश असलेल्या दिवाळी अंकाची नावे वाढु लागली आहेत.
ललिता, पौर्णिमा, साजिरा,
ललिता, पौर्णिमा, साजिरा, श्रद्धा, नंदिनी, चिनूक्स, शर्मिला अभिनंदन
'विमर्श' दिवाळीअंकात माझा फोटोग्राफीबद्दलचा लेख आणि फोटोग्राफ्स आहेत. मी अजुन अंक पाहीला नाही. कोणी पाहीला तर प्लिज लिहा.
सावली, हा फ फोटोग्राफीचा
सावली,
हा फ फोटोग्राफीचा अंक: या अंकामधे सावलीने घेतलेल्या मुलाखती आहेत. (इंद्रनील मुखर्जी इत्यादि)
http://www.fotocirclesociety.com/diwali-ank-13/about-ank/index.html
अंकाचे नॅव्हेगेशन अगदी मस्त केलेले आहे. विषयदेखील वेगळे आणि चांगले आहेत. मागच्या वर्षीसारखाच वेगळा आणि अनोखा अंक आहे. गोपाळ बोधे यांच्या फोटोंचा स्लाईड शो कसला भन्नाट आहे.
सावली, या अंकाबद्दल जरा सविस्तर लिहीशील का प्लीज?
http://www.weeklysadhana.com/
http://www.weeklysadhana.com/dmdocuments/Sadhana%20Diwali%202013.pdf
साधनाचा ऑनलाईन दिवाळी अंक.
नंदिनी, थँक्यु ऑनलाईन अंकाची
नंदिनी, थँक्यु
ऑनलाईन अंकाची लिंक कुठे द्यावी हा विचार करतच होते.
मी या अंकाची कार्यकारी संपादक म्हणुन काम केले आहे. अंकाचे शेड्युलिंग, डिसिजन मेकिंग, लोकांशी बोलणे, फॉलोअप घेणे ( म्हणजे मागे लागणे ), फोटो एडीट करुन घेणे / करणे, अनुवाद करणे, अगदी हस्तलिखीत लेख टाईप करणे, पुन्हा पुन्हा वेबसाईट चेक करुन नीट करुन घेणे इत्यादी सर्व केले. मजा आली. पूर्ण वेळ बिझी होते.
मायबोलीतले मंजूडी, मंजिरी, आणि ललिता-प्रीति यांनी मुद्रीतशोधन केले आहे, त्यांचे मनःपूर्वक आभार त्यानंतरही काही चुका सापडल्या तर त्या माझ्या आणि वेबडीझायनरच्या गफलतीमुळे असतील. अशा काही चुका सापडल्या तर नक्की इमेल करा, सुधारण्याचा प्रयत्न करेन.
नॅव्हीगेशन आवडल्याचे वाचुन आनंद झाला. मागच्या वर्षी पीडीएफ वर्जन होता त्याचा बराच त्रास झाला होता ते डोक्यात ठेवून बराच काथ्याकुट करुन हे नॅव्हीगेशन तयार केले आहे. तरी काही त्रुटी आहेत ज्या आम्हाला काढता आल्या नाहीत. पण अॅरो कीज वापरुनही पुढचे पान /मागचे पान वाचता येईल.
बहुतेकवेळा प्रकाशचित्रण या विषयावर काही लिहीले गेले तर ते प्रकाशचित्रणच्या तांत्रिक बाबींबद्दल असते. प्रकाशचित्रणात तांत्रिक बाबी खूप महत्वाच्या असल्या तरीही प्रकाशचित्रकार हा एक कलाकार आहे. कुठल्याही कलेची निर्मिती करताना त्यामागे काहीतरी भावना, कुठलातरी अनुभव, विचार याची एक बैठक नक्कीच असते. प्रकाशचित्रकारांना त्यांचे अनुभव, त्यांचे विचार शब्दांकित करून लोकांसमोर सहज मांडता यावेत, मोठमोठ्या मान्यवर प्रकाशचित्रकारांशी मुलाखतीच्या रूपातून संवाद साधता यावा हा विचार करूनच 'फ' फोटोचा या दिवाळी अंकाची निर्मिती झाली आहे. अशी यामागची भावना. त्याशिवाय प्रकाशचित्रणाच्या कलेतला तांत्रिक भाग सोडला तर इतर रसिकांनाही या कलेचा पुरेपूर आनंद मिळवून द्यायला हवा असेही मनात होतेच त्यामुळे अंकातले लेख घेताना तांत्रिकमुद्दे टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
या अंकात
- अमेरीकेतले ऑर्थर मोरीस - पक्षी आणि वन्यजीव प्रकाशचित्रकार व सिया खारकर या कॅलिफोर्निया ( इथले कुणी ओळखत असाल कदाचित) इथे स्टुडियो असलेल्या प्रकाशचित्रकारांच्या मी घेतलेल्या / अनुवादीत इ-मुलाखती .
- गोपाळ बोधे यांची मी घेतलेली मुलाखत आणि स्लाईड शो.
- इंद्रनील मुखर्जी - स्पोर्ट्स प्रकाशचित्रणावरचा लेख ( अनुवाद - स्वप्नाली) ,
-अनूप नेगी - आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकाशचित्रकार यांचा केरळ संस्कृतीवरील ( अनुवाद - स्वप्नाली) लेख,
- पहिली महिला वन्यप्रकाशचित्रकार रतिका रामसामी ( अनुवाद - स्वप्नाली) , अतुल धामणकर, युवराज गुर्जर, गिरिश वझे यांचे वन्यजीव प्रकाशचित्रणावरचे लेख
- निलेश भांगे यांचे पेपर अॅब्स्ट्रॅक्ट
- संघमित्रा बेंडखळे, नीरज भांगे, सिंबॉयसीस फोटोग्राफी संस्थेचे शिरिष कारळे, सतविंदर सिंह भामरा ( अनुवाद - स्वप्नाली ), यांचे विविध विषयावरील लेख आहेत.
- फोटोसर्कल सोसायटीच्या काही नवोदित लेखकांनी लिहीलेले प्रकाशचित्रणावरचे लेख
- माधवी नाईक यांचा आणि संजय नाईक , प्रविण देशपांडे यांची प्र.चि. असलेला दुष्काळातले पाण्याचे दुर्भिक्ष दाखवणारा लेख.
अंक आवडला तर नक्की सांगा. काही चुका सापडल्या, सुचना असतील तर त्याही सांगा. फेसबुकवर कंमेटही दिलीत तर ती आमच्या इतर सदस्यांपर्यंतही पोहोचेल.
http://www.fotocirclesociety.com/diwali-ank-13/about-ank/index.html
Pages