मनमोहन सिंग यांना जपानचा राष्ट्रीय पुरस्कार

Submitted by भरत. on 3 November, 2014 - 23:49

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जपानचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. : Grand Cordon of the Order of the Paulownia Flowers
भारत-जपान मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांत केलेल्या कार्यासाठी डॉ. सिंग यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. असा सन्मान दिला जाणारे ते पहिलेच भारतीय आहेत.

जपानमध्येच डॉ. सिंग यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. Economic Research Institute for ASEAN and East Asia (ERIA), Jakarta, Indonesia) यांच्याकडून दिल्या जाणार्‍या दुसर्‍या ASIA COSMOPOLITAN AWARDS च्या Grand Prize साठीही डॉ. सिंग यांची निवड झाली आहे. पूर्व-आशियाई समूहांत शांतता,स्थैर्य व विकासासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद हा पुरस्कार घेत

या दोन्ही पुरस्कारांसाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,

भरत मयेकरांच्या एका विधानाबद्दल खुलासा करेन म्हणतो :

>> पहिल्या पानावरच्या "त्यांच्या योगदानाबद्दल व्यक्तिश: मला काहीच माहीत नाही." पासून तिसर्‍या पानावर "काही
>> लोक पुरस्काराच्या पलीकडले असतात. उदाहरणं द्यायची झाली तर लतादीदी, मेजर ध्यानचंद ही नावं चटकन
>> डोळ्यासमोर आली. मनमोहन सिंग हे अर्थक्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. शिवाय ते भारताचे माजी पंतप्रधानही
>> आहेत." पर्यंतचे परिवर्तन पाहताना पैलवान र्‍हिदमिक जिम्नॅस्टिक्स करीत असल्याचे चलचित्र डोळ्यांसमोर आले.

मनमोहन सिंगांच्या अर्थक्षेत्रातल्या कर्तृत्वाबद्दल मी केवळ ऐकून आहे. ज्याअर्थी बरेच लोक त्यांना उच्च कोटीचे अर्थतत्ज्ञ समजतात त्याअर्थी ते खरं असावं. मला त्यांच्या अर्थक्षेत्रीय योगदानाविषयी अधिक वाचायला आवडेल.

माझ्या बाबतीत नेमका असाच प्रकार मेजर ध्यानचंदांसंबंधीही घडला आहे. त्यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. ते मैदानात नक्की काय जादू करायचे ते मला माहीत नाही. कोणी त्यावर लेख लिहिल्यास वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

गामांचा हा प्रतिसाद वाचल्यानंतर:

डॉ. मनमोहन सिंग ह्यांना जपानने तो पुरस्कार देण्यामागे मनमोहन सिंग ह्यांचे काय काय कार्य कारणीभूत होते हे समजून घेण्याची उत्कंठा खरोखरच वाढली आहे. कोणाकडे तपशील असल्यास तो कृपया दिला जावा अशी विनंती!

हा खवचटपणा नसून ह्या धाग्याशी अतिशय सुसंबद्ध अशी पोस्ट आहे असे माझे मत!

अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करणार्‍या मितभाषी, अर्थतज्ञ दिग्गजाला पदावरून पायउतार झाल्यानंतर हा पुरस्कार एका वेगळ्या देशाने जाहीर केला आहे. त्या व्यक्तीने पस्तीस वर्षे कसे कसे कार्य केले हे समजून घेण्याचे कुतुहल वाटणे हा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन मानला जाऊ नये अशी विनंती!

असा तपशील उपलब्ध नसेल / माहीत नसेल / द्यायला फार वेळ लागत असेल, तरी हरकत नाही. अभिनंदन निखळ मनाने केलेले आहेच.

>>> ऋग्वेद | 5 November, 2014 - 20:14 नवीन

पीएमओ पत्रव्यवहार करुन कामगिरी विचारुन घ्यावी.
<<<

हा धागाही त्या शहानिशेनंतरच काढावा असा (तुमच्यासारखा) अ‍ॅडमीनच्या थाटातला उपदेश मी तरी करणार नाही.

सर्वप्रथम मन्मोहन सिंग यांचं पुरस्काराबद्दल अभिनंदन!

आता थोडंसं अवांतर - >>मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ओबामांनी त्यांना I will miss you असे लिहिले होते.<<
आयला, ओबामा खरंच असं म्हणाले कि "यु विल बी मिस्ड" म्हणाले? पहिल्या वाक्यात थोडा जास्त दोस्ताना ध्वनित होतोय... ")

ऋग्वेद | 5 November, 2014 - 20:30 नवीन

केला तरी कोणी ऐकणार नाही
<<<

उपदेशच नसेल तर ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. येथे स्वातंत्र्य आहे धागे काढण्याचे!

पस्तीस वर्षे म्हणजे १९७९ पासून डॉ. मनमोहन सिंग ह्या संदर्भात कार्य करत असावेत.

(म्हणजे मधे आलेल्या सरकारांच्या राजकीय विचारांचा त्या कार्याशी संबंध नसावा असे म्हणण्यास वाव आहे. कोणतेही सरकार असते तरी त्यांनी ते कार्य सुरूच ठेवले असते, असावे, हे उघड आहे).

ते कार्य कोणते?

या पुरस्काराबाबत माझ्या वाचनात आलेली मनमोहन सिंगांची प्रतिक्रिया अशी- << He said it had been his dream to see India-Japan relationship grow and prosper and "this is an objective towards which I have worked, not only in my tenure as the Prime Minister of India, but across the larger part of my career in public service".>> मला वाटतं पंतप्रधान म्हणूनच नव्हे तर अनेक वर्षं केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार, रिझर्व बँकेचे गव्हर्नर इ.इ. पदांवर असताना जपानच्या संदर्भात त्यानी वेळोवेळीं घेतलेली भूमिका उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी पोषक होती असं जपानला वाटलं असावं. ह्यामागें कांहीं राजकारणच आहे अशी शंका घ्यायला जागा नसेल तर हा सन्मान समर्थनीयच आहे असं गृहीत धरून मनमोहन सिंगांचं निर्भेळ अभिनंदन करणं योग्य.

>>>ह्यामागें कांहीं राजकारणच आहे अशी शंका घ्यायला जागा नसेल तर हा सन्मान समर्थनीयच आहे असं गृहीत धरून मनमोहन सिंगांचं निर्भेळ अभिनंदन करणं योग्य.<<<

अ‍ॅबसोल्यूटली!

त्यामुळेच, ज्यांनी ह्या धाग्यावर प्रथमतः पक्षीय राजकारण आणले (त्यातील महेश ह्यांनी ज्यांच्यावर टीका केली ते सोडून) त्यांना उत्तरे देणार्‍यांनीही उत्तरे द्यायलाच नको होती तर तुम्ही कोट केलेली पोस्ट कोट करायला हवी होती भाऊसाहेब!

मी स्वातंत्र्य भारताचा स्वातंत्र्य नागरीक असल्यामूळे मी ममोसीं चे अभिनंदन करण्याचा प्रश्नच येत नाही........ Proud

मि. ऋ. हा धागा काही काळाने पाहिला तेव्हा तुम्ही आमची आठवण केल्याचे निदर्शनास आले.
शेन्डे नक्षत्र यांना एक सल्ला देऊ शकतो,
तुम्हाला जर टीकाच करायची तर शर्करावगुंठित नको, सरळ सरळ टीका करा.

भाऊ, पोस्ट आवडली. १९७९ पासून म्हणजे जनता पक्षाचे सरकार असताना पासून, ते नंतर पुढे ८-१० वर्षे काँग्रेस चे बहुमत, मग मधली काही कडबोळी सरकारे, मधे नरसिंह राव सरकारात अर्थमंत्रीपद, नंतर एकदा भाजप व नंतर पुन्हा काँग्रेस व स्वतः पंतप्रधान पदावर असे बरेच बदल झालेले असताना व मधल्या काळात आंतरराष्ट्रीय समीकरणे बरीच बदलत असताना जपान शी संबंध विकसित करावेत असे त्यांना का वाटले व त्याबद्दल कार्य करताना यातील विविध कालात काय अडचणी आल्या, सरकारे बदलली तेव्हा काय फरक पडला वगैरे त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकायला वाचायला आवडेल.

अमेरिका, रशिया, तेल वाले देश वगैरेंशी भारताचे संबंध कसे असावेत याबद्दल बरेच वाचायला मिळते. जपान चे स्थान भारताच्या दृष्टीने काय आहे - विशेषतः आर्थिक दृष्टीकोनातून- याबद्दल त्यांचे विचार नक्कीच वाचनीय असतील.

<< .... वगैरे त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकायला वाचायला आवडेल.>> फारएन्डजी, खरंच हा कुतूहलाचाच भाग आहे. पण बर्‍याच वेळां दोन राष्ट्रांच्या संबंधातील दृश्य भागापेक्षां [ राष्ट्रप्रमुखांच्या भेटी, करार सही करणं इ.इ.] अनेक आर्थिक किंवा इतर हितसंबंधांच्या छोट्या मोठ्या मुद्द्यांवर दोन्ही देशांचे संबंधित राज्यकर्ते, पदाधिकारी, नोकरशहा इ.इ. वेळोवेळीं काय भूमिका घेतात, यावरच संबंधांची खरी दूरगामी घडण अवलंबून असावी. ममोंचा अशाप्रकारच्या बाबींमधे किती परिणामकारक सहभाग होता हा तपशीलापेक्षांही जपानला [ किंवा कोणत्याही देशाला ] तें चर्चेतून, प्रत्यक्ष भेटीतून किती तीव्रतेने व नियमितपणे जाणवलं हा भाग महत्वाचा असावा. अशा अनेक बाबींवर वेळोवेळीं झालेल्या चर्चेचा, बैठकांचा व निर्णयांचा तपशील देवून आपला सहभाग कसा महत्वाचा होता, हें सांगण्याची ममोंकडून अपेक्षा करणंही तितकंसं योग्य नसावं. जपानला तो सहभाग जाणवला व महत्वाचा वाटला, यावर आपण समाधान मानावं हें उत्तम.
<< जपान चे स्थान भारताच्या दृष्टीने काय आहे - विशेषतः आर्थिक दृष्टीकोनातून- याबद्दल त्यांचे विचार नक्कीच वाचनीय असतील.>> याबद्दल १०० % सहमत.

१९७९ पासून डॉ. मनमोहन सिंग ह्यांनी भारत जपान संबंध सुदृढ करण्यासाठी नेमके काय केले? फक्त जपानशीच का संबंध दृढ केले? किमान ३५ वर्षे काम केले तरच हा पुरस्कार मिळतो का?

ह्याबाबत थोडा अधिक प्रकाश टाकण्यात आला तर बरे होईल, माहिती मिळेल.

बेफि, नाही मिळाला फारसा. विकीवर फक्त थोडी त्रोटक माहिती आहे. २००६ व ७ साली केलेल्या गोष्टींची. बाकी माहिती सध्या त्या अ‍ॅवॉर्डबद्दलच जास्त दिसते. तो असा कोठे सहज उपलब्ध असेल अशी शक्यता कमी आहे. बहुधा पुढे मागे त्यांच्या एखाद्या मुलाखतीत मिळेल.

बैठकांचा व निर्णयांचा तपशील देवून आपला सहभाग कसा महत्वाचा होता, हें सांगण्याची ममोंकडून अपेक्षा करणंही तितकंसं योग्य नसावं. >>> भाऊ - तसे नाही, तसा काही हट्ट नाही. ते स्वतःहून त्यांचा जो काही viewpoint सांगतील तो ही आवडेल अशा अर्थाने.

आणि भाऊ, "जी" काय? तुम्ही किंवा कोणीही मला अहो-जाहो सुद्धा करू नका Happy

जयंती बद्दल विचारल्यावर फुशारक्या मारणार्यांच्या तोंडाला कुलुप लागले. मुद्दामुन विषयांतर करुन अवांतर बडबड करायला लागले बघुन मनोरंजन होत आहे. Wink

<< आणि भाऊ, "जी" काय? >> ठीक आहे, फारएण्ड, नाही लावणार "जी" तुमच्या नांवापुढे. [ पण तुम्हाला आदरार्थी "जी" कां लावायचा याचा तपशील मात्र माबोच्याच अनेक धाग्यांवर सहज उपलब्ध आहे ! Wink ]

मनमोहन सिंग यांच्या बद्दल....

मनमोहन सिंग १९७१ मध्ये प्रशासकीय सेवेत विदेश व्यापार विभागात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. ते अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार (१९७२–७६) होते. तेथील कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सदस्य (१९७६–८०) तसेच नियोजन आयोगाचे सदस्य-सचिव (१९८०–८२) म्हणून नियुक्ती झाली होती. पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य आणि भारत-जपान संयुक्त अभ्यास समितीचे अध्यक्ष (१९८०–८२) म्हणून काम केले. त्यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (सप्टेंबर १९८२– जानेवारी १९८५) म्हणून नियुक्ती झाली होती. दरम्यानच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालयात, व्यापार विभागात पुरवठा विभागाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय फेररचना व विकास बँक यांच्या संचालक मंडळांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. शिवाय भारतात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (१९८५–८७) होते. तसेच त्यांच्याकडे १९८७–९० यांदरम्यान जिनीव्हा येथील गरीब व विकसनशील देशांच्या उन्नतीसाठी नेमलेल्या दक्षिण आयोगाचे सरचिटणीसपद सोपविण्यात आले. चंद्रशेखर पंतप्रधान असताना भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी (१९९०-९१) त्यांची नियुक्ती झाली. पुढे काही महिने त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

बाकी एक मात्र खरे.
ड्रम वाजवुन , जपानी मधे ट्विट करुन पुरस्कार मिळत नसतो. त्यासाठी खरे खुरे काम करावे लागते. अर्थात हे दिखावुगिरी करणार्यांना जमत नाही. ते सोप्पा मार्ग निवडतात. त्याच्या अनुयायींना मात्र फारच मोठ्ठा धक्का बसला आहे आणि अजुन ते त्यातुन सावरले नाही. सगळी कडे फिरुन विचारत आहे कोणत्या कामासाठी पुरस्कार मिळाला Lol आयुष्यात कधी काम केले असते तर ही विचारत फिरण्याची वेळ आली नसती

Pages