मनमोहन सिंग यांना जपानचा राष्ट्रीय पुरस्कार

Submitted by भरत. on 3 November, 2014 - 23:49

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जपानचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. : Grand Cordon of the Order of the Paulownia Flowers
भारत-जपान मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांत केलेल्या कार्यासाठी डॉ. सिंग यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. असा सन्मान दिला जाणारे ते पहिलेच भारतीय आहेत.

जपानमध्येच डॉ. सिंग यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. Economic Research Institute for ASEAN and East Asia (ERIA), Jakarta, Indonesia) यांच्याकडून दिल्या जाणार्‍या दुसर्‍या ASIA COSMOPOLITAN AWARDS च्या Grand Prize साठीही डॉ. सिंग यांची निवड झाली आहे. पूर्व-आशियाई समूहांत शांतता,स्थैर्य व विकासासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद हा पुरस्कार घेत

या दोन्ही पुरस्कारांसाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, तुझ्या या नीच आणि रोगट शंकेला स्पष्टीकरणाने गौरवू इच्छित नाही. (I am not going go dignify your disgusting comment by an answer).

मनमोहन सिंग यांचे अभिनंदन.

गापैंच्या असल्या पोस्टींकडे दुर्लक्षच करायला हवं. मुद्दाम लिहिलेल्या असतात.

बेफिकीर,
तुम्ही विचारताय म्हणूनच सांगतो. भारत आणि जपान यांचे आधीपासून चांगले संबंध आहेतच. आधीपासून चांगले असलेले संबंध वृद्धिंगत करायलाच अधिक कर्तृत्व लागतं. त्यामुळेच डॉ. मनमोहनसिंग यांचे अधिक कौतुक आहे असं स्पष्टपणे त्या पोस्ट मधे लिहीलेले आहे.

मलाही गापै, कोकणस्थांसोबतच इब्लिसदांचीही पोस्ट पटली नाही.
आपल्याला दिसतंय कोणी तरी मुद्दाम खोड काढायला जातंय तर तेंव्हा त्याला अनुल्लेखाने मारता येत नाही का?

गापै,
आपल्याच देशाच्या एखाद्या महत्वाचं पद भूषविलेल्या व्यक्तीचा कुठे योग्य तो सन्मान होत असेल तर त्याबद्दल आपल्याला खरा आनंद/अभिमान वाटला पाहिजे. इतर काही रोष असेल तर तो प्रत्येक ठिकाणी येता कामा नये. तो तेवढ्यापुरताच असावा.

बरोबर अश्विनी. गापै, हा पुरस्कार त्याना एका त्रयस्थ आणी विकसीत देशाने दिलेला आहे. तिथे काही कुणाच्या वशिल्याचा सम्बन्ध नाहीये, मग अशी पोस्ट का? पटले नाही हे.

काही वर्षापूर्वी लोकसत्ता मध्येच डॉ. मनमोहन सिन्ग आणी कम्युनीस्ट पक्ष दोघानी मिळुन भारताची आर्थिक बाजू कशी स्टेबल ठेवली यावर उत्तम लेख आला होता. ( माझाच वेडेपणा की मी त्याची तारीख नाही लक्षात ठेवली आणी कात्रणे पण नाही साम्भाळली) वास्तवीक त्याच काळात अमेरीकेत मन्दी आली होती. डॉ. मनमोहन कॉन्ग्रेसचे मेम्बर नन्तर पण ते आधी आपल्या देशाच्या रिझर्व्ह बॅन्केचे गव्हर्नर होते हे लक्षात घ्या. त्यान्चा बायोडाटाच बोलतो ते काय आहेत ते. उगाच त्यान्च्या कर्तुत्वावर नको त्या शन्का कशाला?

ते तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा. बाकी, कट आणि पेस्ट करुन पोष्टी तयार करण्यात तुम्ही वाकबगार आहातच.

कोकणस्था'आधीपासुनच विकसीत गुजरातला मोदींनी आणखि हातभार लावला 'हे वाक्य कसे वाटते हो!
गुळचट गोग्गोड भाषणं व टीवी रेडीयोचे स्लॉट विकत घेणे यातुन वेळ मिळाला आणि पुण्यभू भारताचा यदाकदाचीत विकास झाल्यास 'आधीपासूनच..' चे पालुपद जोडा बरं!

वाद नसावा..... अर्थतज्ञ आणि आरबीआय चे गव्हर्नर म्हणून मनमोहन सिंग यांचे कर्तृत्व श्रेष्ठच आहे आणि पंतप्रधान म्हणून ते दुबळेच होते हे आत्ता जगजाहीर झाले आहे .
राजकारणात असूनही ते सभ्य होते हे अगदी मान्य .

असो पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!!!!

यांच्याने एक धागाही नाही सुटत, मोदिंना शिव्या घालण्यासाठी. या मन्नुच्या धाग्यावर तरी द्या त्यांना शुभेच्छा. असाही त्यांना शुभेच्छा द्यायचा योग फार कमी वेळा आलाय त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत.

त्यांना शुभेच्छा द्यायचा योग फार कमी वेळा आलाय त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत.
<<
तो अनेकदा होताच, फक्त आपण तेव्हाही देत नव्हतो, अन आताही तोंडदेखल्याही द्यायला जमत नाहिये. हे असे डायलॉगच डोक्यात जातात.

*

कोकणस्थ, तुमच्या कोणत्याही प्रिय व्यक्तीची मन:पूर्वक शपथ घेऊन फेबुचा एस्सेस खोटा आहे, असे स्वतःशीच म्हणा पाहू?

"बोलणार्याचे शेणही विकले जाते ,पण न बोलणार्याचे सोनेही विकले जात नाही >>>>>>>

ह्यांचे शेण सुद्धा विकले गेले न बोलता. खाली मुंडी ..... ही म्हण त्यांना लागू होते.

तो स्क्रीनशॉट खोटा आहे

इब्लिसभौ तुम्ही लवकरच माबोवर खोटे स्क्रीनशॉट्स कसे बनवावेत याचे वर्ग घ्यायला सुरुवात करा पाहू.... Happy Happy

Pages