Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायली मस्त धागा, तुझ्या आणि
सायली मस्त धागा, तुझ्या आणि इथल्या सर्वांच्याच रांगोळ्या सुंदर!
आमच्याकडे शरद नावाचा मुलगा काम करतो तो सर्व सणांना मस्त रांगोळ्या घालतो.
त्यातल्या काही.
धन्यवाद मनुषी ताई.. कीत्ती
धन्यवाद मनुषी ताई.. कीत्ती छान रांगोळया! तुलसी विवाहाची छानच काढली आहे..
सायली, मस्त धागा. सर्वांच्या
सायली, मस्त धागा.
सर्वांच्या रांगोळ्या छान!
अभार सरिवा..
अभार सरिवा..
सायली यू आर व्हेरी स्वीट :*
सायली
यू आर व्हेरी स्वीट :*
मानुषी >> पहिल्या २ मधे
मानुषी >> पहिल्या २ मधे चाळण्याचे साचे वापरले आहेत का गं त्याने ?
रांगोळ्या बाकी मस्त हं ..
हो टिना बहुतेक. पण तो
हो टिना बहुतेक. पण तो हातानेही तितक्याच सिमेट्रिकल रांगोळ्या काढतो.
मानुषी, शरदला आम्हा सर्वांनी
मानुषी, शरदला आम्हा सर्वांनी कौतूक केले असे अवश्य सांगा बरं का !
एक सो एक भन्नाट प्रकार!
एक सो एक भन्नाट प्रकार!
धाग्यावर आलोच आहे..तर १ माझी आपली नेहमीची फुलांची रांगोळी टाकून जातोच!
शरद ची ३री रांगोळी पण
शरद ची ३री रांगोळी पण सेमेट्रिकल आहे.
आत्मा. हिरवी पानं कसली आहेत?
अ.आ. धन्यवाद, तुमच्या रांगोळी
अ.आ. धन्यवाद, तुमच्या रांगोळी ने या धाग्यावर चार चांद लागलेत.:) खरच सोपी आणि उठावदार रांगोळी..अजुन रांगोळ्या येऊ द्या..
रिया
ही आज सकाळची... साधीच आहे (९ ते ९)
अरे व्वा! मस्तच आहेत सगळ्या
अरे व्वा! मस्तच आहेत सगळ्या रांगोळ्या. एक से बढकर एक!
माझे आणि रांगोळीचे फारसे कधी जमलेच नाही. मला हमकास जमणारी एकच रांगोळी, पेन्ट ब्रश वापरून काढली आहे.
जुन्या मायबोलीत पण एक रांगोळी नावाचा धागा असायचा दर महिन्याला.
आज एकादशी :
आज एकादशी :
ही माझी पण... नलिनी, तुझी
ही माझी पण...
नलिनी, तुझी रांगोळी बघुन लहान पणीची आठवण झाली बघ... खुप गाजली होती ना ही रांगोळी चांदण्या आणि शंकर पाळे
टिना मस्त आहे रांगोळी, रंग छान भरले आहेत.. अगदी पेन्ट केल्यासारखी वाटते आहे..
ही कमळाची शुक्रवारी काढु
ही कमळाची शुक्रवारी काढु शकतो...
सायली >> कमळाच्या रांगोळी ची
सायली >> कमळाच्या रांगोळी ची रंगसंगती सुपर्ब ..
सर्वच खुप सुन्दर ......Hats
सर्वच खुप सुन्दर ......Hats off to all!
मानुषी, शरदला आम्हा सर्वांनी
मानुषी, शरदला आम्हा सर्वांनी कौतूक केले असे अवश्य सांगा बरं का !>>>>>>>>>> हो दिनेश नक्की.
सायली पुंडलीक वरदा ..............हस्ताक्षर मस्तच पण.........."हारी" च्या ऐवजी "हरी" हवे होते का?
म्हणताना ताल आणि मात्रा जमवण्यासाठी "हरी" चा "हारी" होतो पण लिहिताना.................????
टीना, प्रीती, मनुषी ताई
टीना, प्रीती, मनुषी ताई आभार...
हारी" च्या ऐवजी "हरी" हवे होते का?
म्हणताना ताल आणि मात्रा जमवण्यासाठी "हरी" चा "हारी" होतो पण लिहिताना.................????+++ हो ताई, तुम्ही लक्षात आणुन दिल्यावर मला पण असेच वाटु लागले आहे... धन्यवाद पुढच्या वेळेस काढतांना लक्षात ठेवील...
ही आज सकाळची....
@अदिति >>> ते स्र्पिंगल
@अदिति >>> ते स्र्पिंगल नावाचे गवत आहे.
@ Sayali Paturkar >>> धन्यवाद.
ही एक रांगोळी .. एका शाळेत काढलेली ..जेव्हढी आणि जशी फुलं मिळाली,त्यात उरकलेला खेळ आहे. पण कमी जिन्नस असताना जे मिळेल,त्यात करुनही चवदार झालेल्या पदार्थासारखी रंगली एकदम!
सायली तुझ्या रांगोळ्या बघून
सायली तुझ्या रांगोळ्या बघून माझ्या आई च्या रांगोळ्यांची आठवण झाली.
पूर्वी आमच्या कडे फक्त ठिपक्यांचीच रांगोळी असे. त्या काढताना कोणतीच ट्रिक कामाला येत नसे. मोजून काढल्या सारखे ठिपके आणि रांगोळीची नाजूक रेघ . रांगोळी पांढरी ठेवू नये म्हणून हळदी कुंकू. बस्स.
रंग फक्त दिवाळीतच
.........."हारी" च्या ऐवजी
.........."हारी" च्या ऐवजी "हरी" हवे होते का?
म्हणताना ताल आणि मात्रा जमवण्यासाठी "हरी" चा "हारी" होतो पण लिहिताना.................????>>>>..
नाही, हारी विट्ठल हेच योग्य असावे असे मला वाटते. पुंडलिक करीत असलेली माता-पित्यांची सेवा पाहून तो विट्ठल त्याने फेकलेल्या वीटेवर २८ युगे ऊभा राहिला, पुंडलिकाचा भाव पाहून विट्ठलाची हार झाली, म्हणून कधीही पुंडलिक वरदा हारी विट्ठल असेच म्हणतात, ताल- मात्रा जमवण्यासाठी नाही.
अवांतराबद्दल क्षमस्व, मानुषी - कृपया गैरसमज नसावा.
सायली तुझ्या रांगोळ्या बघून
सायली तुझ्या रांगोळ्या बघून माझ्या आई च्या रांगोळ्यांची आठवण झाली. +++ धन्यवाद
कमी जिन्नस असताना जे मिळेल,त्यात करुनही चवदार झालेल्या पदार्थासारखी रंगली एकदम!++ अगदी अगदी
आशिका कीत्ती छान फोड करुन सांगीतलीत... आभार..
हारी विट्ठल हेच योग्य असावे
हारी विट्ठल हेच योग्य असावे असे मला वाटते. पुंडलिक करीत असलेली माता-पित्यांची सेवा पाहून तो विट्ठल त्याने फेकलेल्या वीटेवर २८ युगे ऊभा राहिला, पुंडलिकाचा भाव पाहून विट्ठलाची हार झाली, म्हणून कधीही पुंडलिक वरदा हारी विट्ठल असेच म्हणतात, ताल- मात्रा जमवण्यासाठी नाही.
अवांतराबद्दल क्षमस्व, मानुषी - कृपया गैरसमज नसावा.>>>>>>>>>>>
आशिका गैरसमज कसला? छान आहे हाही विचार. ही शक्यताही नाकारता येत नाही.
पुर्वी धान्यांची रांगोळी पण
पुर्वी धान्यांची रांगोळी पण काढत असत. मूग, उडीद, लालचवळी, उडदाची डाळ वगैरे वापरून. ही रांगोळी वाया जात नसे. या सर्वाची मग छान उसळ होत असे.
या मी काढ्लेल्या रांगोळ्या
या मी काढ्लेल्या रांगोळ्या ,लहानच काढल्यायत वेळेअभावी दिवाळीच्या इतर गडबडीत .आता खरतर तुळशीविवाहाच्या ३ दिवसांतच शांतपणे काढता येतील.मी तर देवदिवाळीलाही काढते.
ही जरा वेगळ्या अॅंगलने, .
ही पण दुसरी लहानच , .
ही कोपरयात कुंकवाची कोलम रांगोळीची लक्ष्मीची पावलं .
अजुन आहेत आधीच्या घराच्या दारातल्या त्यापुढे
या आधीच्या घरातल्या तिथेतर
या आधीच्या घरातल्या तिथेतर समोरच्या शेजार्यांच्या दारातही मीच काढायचे
ही माझीच सर्वांत आवडती रांगोळी .
ही गावी काढलेली ,पहील्यांदाच गावी गेलेलो दिवाळीला इतक्या वर्षांत नाहीतर नेहमी उन्हाळ्यातच.
अजुन जुन्या सापडतायत का ते बघते .
सिनि शेवटची दिसतेय फक्त. बाकी
सिनि शेवटची दिसतेय फक्त. बाकी दिसत नाहीयेत
मलातर सातही फोटो दिसतायत .
मलातर सातही फोटो दिसतायत .
काहीतरी प्रोब्लेम झालाय बहुतेक, माझे कालचे कोणतेच फोटो दिसत नाहीयेत मलाही आता .थोडा धीर धरा बघते काय झालेय ते.फोटोंच्या साईजमुळे असेल.
एकही फोटो दिसत नाही.
एकही फोटो दिसत नाही.
Pages