
थँक्स गिविंग डेच्या सुमारास बाजारात मोठ्या मोठ्या भोपळ्यांच्या राशी दिसायला लागतात. (काही देशांतच थँक्सगिविंग वेळेवर करतात, बाकी आळशीपणा, पण असो :)). पाव किलो भोपळा आणण्याची सवय असलेल्या कुटुंबात वाढलं असल्यानं या भोपळयाचं करायचं काय असा सुरुवातीला प्रश्न पडायचा. पण लोकांनी वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे भोपळे घराच्यासमोर ठेवलेले दिसले आणि भोपळा आणून त्याची बेक्कार भाजी न करता इतरही उपयोग असू शकतात या ज्ञानाने पाश्च्यात्यांबद्दलचा आदर दुणावला.
या भोपळ्यावर स्पुकी चित्र कोरून (कार्व करून) त्यात बारकी मेणबत्ती लावून घराच्या बाहेर ठेवलं की भारी दिसतं हे लवकरच समजलं. गेल्यावर्षी पहिल्यांदा प्रयत्न केला आणि फार कठीण नाही हे जाणवल्यावर या वर्षी परत करून फोटो काढले.
साहित्य: भोपळा, कार्विंग टूल (बारीक करवती सारखं), आयस्क्रीम स्कूप/ मोठा चमचा/ डाव, मेणबत्ती, सुरी, कचऱ्याचा डबा.
१. एक मध्यम आकाराचा भोपळा आणा. बाहेरून भोपळ्याला बघून तो जाड आहे का पातळ (थिन) हे समजत असेल तर पातळवाला (वाली नाही) आणा. नारळ आणताना वाणी अंगठी मारतो तसं ४-५ भोपळ्यावर मारा. फरक काहीच कळणार नाही (वाण्याला तरी कुठे कळतो). मग एक न फुटलेला, जरा गोरा गोमटा दिसणारा, ओबडधोबड न दिसणारा असा भोपळा निवडा. भोपळ्याची रास जरी दुकानाच्याबाहेर पडलेली असेल तरी आता जाऊन पैसे द्यावे लागतात हे विसरू नका. आत सेल्फ चेकआउट असेल तर वरील सगळी स्पेसिफिकेशन विसरून ज्या भोपळ्यावर ४ आकडी नंबर दिसेल तो उचला.
२. हॅलोविनच्या आदल्या दिवशी ऑफिसमध्ये 'पमकीन कार्विग स्टेनसिल' असा सर्च देऊन जे आवडेल/ सोपं वाटेल अशा स्टेस्न्सिलची प्रिंट घ्या. ती न विसरता घरी न्या.
३. आता पेनने भोपळ्याचा देठाकडच्या भागावर एक वर्तुळ काढा. (कंपास शोधू नका) हाताने जसं जमेल तसं काढा.
या वर्तुळाला एका बाजूला एक notch काढा, जेणे करून ते देठ परत झाकण म्हणून ठेवलं तर कसं ठेवायचं ते समजेल.
४. आता मोठ्या सुरीने तो आकार कापून घ्या, झाकण उघडलेला भोपळा असा दिसेल.
५. बिया खायला आवडत असतील तर त्या हाताने आधी काढून घ्या. नंतर आतून भोपळा स्वच्छ करा. आयस्क्रीम स्कूप/ डावेच्या मदतीने आतुन खरवडून काढा. आतला पृष्ठभाग जितका स्वच्छ करता येईल तेवढा करा. आत मेणबत्ती लावायाचेय, भोपळा ग्लो व्हायला हवा तर तो आतून नितळ करा. जास्त स्कूप करायचा आणखी एक फायदा म्हणजे जास्त जाड कोरत बसायला लागत नाही. ज्या बाजूला कार्व करणार आहात त्या बाजूने थोडा जास्त स्कूप करा. साधारण असा दिसेल.
६. आता ते स्टेनसिल भोपळ्यावर ठेवून एखाद्या अणुकुचीदार वस्तूने (बारीक स्क्रू-ड्रायवर, पिन) बाह्यारेषांची नक्षी भोपळ्यावर टिंब टिंब काढत उतरवून घ्या. तुम्ही कलाकार असला तर हातानेही काढू शकता. फक्त काय ठेवायचं आणि काय उडवायचंय याचं भान ठेवून चित्र काढा. तयार कार्विग केलेल्या भागाला स्ट्रेन्थ असली पाहिजे इतका तरी भाग जोडलेला असुद्या.
हे ट्रेस करताना कागद हलू देवू नका. हलणार असेल तर सरळ चिकटपट्टीने कागद चिकटवा आणि ट्रेस करा. ट्रेस करून झाल्यावर गोंधळ होत असेल तर पेनने परत एकदा रेषा ठळक काढून घ्या.
७. आता सावकाश जॉईन-द-डॉटस करत, कार्व करा. वरील चित्रातला काळा भाग काढायचाय आणि पांढरा ठेवायचाय.
८. कार्विंग बऱ्यापैकी सोपं आहे, ढोबळ आकार आले तरी चालेल. झालं. आता आतमध्ये एक छोटी मेणबत्ती लावा आणि ट्रिक-ओ-ट्रिटला लहान पोरांबरोबर कोस्चुम घालून दारोदार भटकून भरपूर chocolates आणा.
९. हा Jack-o'-lantern घराबाहेर ठेवतात. आपण केलेला सगळ्यांना कळायला नको का? फोटो काढून फेस्बुकावर, whatsappवर टाकून लोकांना वात आणा.
>>आपण केलेला सगळ्यांना कळायला
>>आपण केलेला सगळ्यांना कळायला नको का? फोटो काढून फेस्बुकावर, whatsappवर टाकून>>
मस्त जमलाय.
भारी. आम्ही यंदा भोपळे आणले
भारी.
आम्ही यंदा भोपळे आणले नाहीत आणि त्यामुळे कोरले पण नाहीत. धनश्री तुम्हाला झब्बू देइल
मस्त लिहिलंय. आणि
मस्त लिहिलंय. आणि जॅक-ओ-लॅन्टर्नही मस्त.

आता त्या पम्प्किन सीड्सच्या आणि कोरून काढलेल्या गराच्या रेसिप्यापण लिही. आणखी वात आणू शकशील.
हा हा हा ... मस्त लिहिल आहे
हा हा हा ... मस्त लिहिल आहे
छान झाला आहे Jack-o'-lantern !
गराच्या रेसिप्यापण >>>>
गराच्या रेसिप्यापण >>>> बियांतली पोषणमुल्ये, रेसिपीचा झटपटपणा. हौद्याखर्च!
मस्त लिहलय>
मस्त लिहलय>
मस्त, स्टेप बाय स्टेप कृती !
मस्त, स्टेप बाय स्टेप कृती !
हा हा ! मस्त लिहिलेस अमित
हा हा ! मस्त लिहिलेस अमित .
>>आपण केलेला सगळ्यांना कळायला
नको का? फोटो काढून फेस्बुकावर whatsappवर टाकून>> हे भारीच की
फोटोही मस्त . वात आणायच अजून एक मार्ग म्हणजे कैप्शन लिहून tag करणे
भारीये
भारीये
जॅक-ओ-लॅन्टर्न मस्त केलाय
जॅक-ओ-लॅन्टर्न मस्त केलाय
मस्त लिहिलयं! कार्विंगही छान
मस्त लिहिलयं! कार्विंगही छान झालयं!
झकास झालंय कार्व्हिंग!
झकास झालंय कार्व्हिंग! लिहिलंय पण मस्तं!
पहिलं वाक्य वाचून जाम गडबडले!
पहिलं वाक्य वाचून जाम गडबडले! कॅनडात उलटं आहे नाही का.. आधी थॅंक्सगिव्हिंग मग हॅलोविन..
मस्त झालंय कार्व्हिंग! पण मला ते काय चित्र आहे कळ्लंच नाही एकदम. मग witch दिसली cauldronढवळणारी!
मस्त!
धन्यवाद सगळ्यांना. बस्के,
धन्यवाद सगळ्यांना.

बस्के, अमेरिकेत उलटं आहे.
आहा..मस्त आहे कार्विंग!!!
आहा..मस्त आहे कार्विंग!!! ग्रेट जॉब... सुपर!!!
भारी लिहिलय....मस्त कार्विंग
भारी लिहिलय....मस्त कार्विंग झालय
मस्त!
मस्त!
मस्त झालय कार्व्हिंग.... हा
मस्त झालय कार्व्हिंग....
हा घे झब्बू.. दोन्ही जुनेच आहेत. ह्यावर्षी मित्राच्या मुलांबरोबर त्याच्याघरी केला पण फोटो नाहीये त्याचा.
हॅप्पी हॅलोविन!!
मस्तच
मस्तच
फारच सुरेख
फारच सुरेख
लै
लै भा...........................री!
मस्त! ते स्कुपिन्ग करण फार
मस्त! ते स्कुपिन्ग करण फार तापदाय्क असतय ह! आम्ही य.न्दा नाही केला त्यामुळे सदा टवटवित पिलास्टीकचा ठेवलाय..
मस्तच अमित. एकदम भारी
मस्तच अमित. एकदम भारी दिसतोय.
यावेळी आम्ही भोपळे ३/४ दिवस आधीच कोरले आणि खारींनी एकदम वाट लावली. सगळे कुरतडून टाकले.
अमित, झकास कार्विंग! लिवलंय
अमित, झकास कार्विंग! लिवलंय बी छान!
सुपर! झकास जमलंय- कार्विंग
सुपर! झकास जमलंय- कार्विंग आणि लिखाण दोन्हीही.
आत मेणबत्ती ठेवल्यानं आतून खरपूस भाजून निघालेल्या भोपळ्याच्या काही रेस्प्या नसतात का?
छान दिसतोय.
छान दिसतोय.
मस्त
मस्त जमलंय...............कार्विन्ग, फोटो आणि लिखाण!
ज्या भोपळ्यावर ४ आकडी नंबर
ज्या भोपळ्यावर ४ आकडी नंबर दिसेल तो उचला. >>> म्हणजे काय? प्रकाश पाडा कृपया.
मामी अमित बहुदा बार कोड स्कॅन
मामी अमित बहुदा बार कोड स्कॅन करायला असणार्या स्टीकरवरच्या नंबरबद्दल बोलतोय. स्वतः चेक आउट करतांना तो चार आकडी नंबर टाकावा लागतो सुपरमार्केट मधे. अजून दुसरे काही असेल तर कल्पना नाही
हां तसंच असेल.
हां तसंच असेल.
Pages