माननीय श्री नरेंद्र मोदीसाहेब यांस,
आदरपूर्वक नमस्कार!
यंदाच्या राजकीय मोसमात आम्ही पाच पत्रे लिहिण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी हे चौथे पत्र तुम्हाला उद्देशून!
मोदीसाहेब, प्रथम तीन गोष्टींबद्दल तुमचे अभिनंदन! तीस वर्षांनंतर ह्या देशात तुमच्या नेतृत्वाखाली एकाच पक्षाचे स्पष्ट बहुमतातील सरकार आल्याबद्दल, सर्व माध्यमांचा पुरेपूर वापर करून भारतातील एकुण मतदानाबाबत जागरूकता निर्माण करून व मतदानाचा टक्का वाढवून जनतेला सरकारशी थोडेसे अधिक 'कनेक्ट' केल्याबद्दल आणि एक पूर्वाश्रमीचा चहावालाही लोकशाहीत पंतप्रधानपदी विराजू शकतो हे सिद्ध केल्याबद्दल!
त्यादिवशी मोदीसाहेब, आमच्या येथे अजूनही भरणार्या शाखेत दोघेजण स्कूटरवरून चाललेले असताना पुढचा मागच्याला हासत हासत म्हणाला होता......
"लोकांनी पैसे राष्ट्रवादीकडून घेतले, पण मत भाजपला दिले"
काय दिवस होता तो! कित्येक कोटी लोकांनी कधीपासून पापण्यांच्या आड लपवून ठेवलेले स्वप्न सत्यात उतरले होते आणि हा जल्लोष सुरू झाला होता. भारतीयांना गप्पांसाठी रात्र रात्र पुरू शकतात असे तीनच विषय आहेत. क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण! क्रिकेटमध्ये तेंडुलकर आहे, चित्रपटात अमिताभ आहे, राजकारणात आजवर कोणी नव्हते. तुमच्यारुपाने ते व्यक्तिमत्व मिळाले मोदीसाहेब! कित्येकांच्या महत्वाकांक्षा, दुराभिमान धुळीला मिळवत तुम्ही बहुमत प्राप्त केलेत. तीन दशकांनी जगाला जाणीव झाली की लोकशाही शासनप्रणालीमध्ये काय ताकद असते.
त्रिशुल चित्रपट कधी पाहिला आहेत का मोदीसाहेब? त्यात मिस्टर आर के गुप्ताचा रोल करणारा संजीवकुमार आपल्या सहकार्याला अमिताभ ह्या त्याच्या स्पर्धकाने टेंडर जिंकण्याबाबत म्हणतो......
"हैरानी इस बातसे नही है के उसने ये टेंडर अपने नाम करलिया, हैरानी इस बातसे है के वो ये जानता था कि वो ये कर सकेगा"
तुमच्या विरोधकांचाही आर के गुप्ता झाला होता मोदीसाहेब! तुमच्या विरोधकांचाच नाही तर दस्तुरखुद्द लालकृष्ण अडवानीसाहेबांचाही!
जणू जग क्षणभर स्तब्ध झालेले होते. इसवीसन २०१४ मध्ये ज्या देशाची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे आणि जेथे बहुसंख्य मतदार हे तरुण वयोगटातील आहेत तेथे झालेला हा सत्तापालट नुसता एक सत्तापालट नव्हता. पारंपारीक धर्मनिरपेक्ष विचारांपासून फटकून असलेला पक्ष अशी ज्याची ख्याती होती तो पक्ष जिंकला होता. तेही लोकशाही पद्धतीने! आणि तुम्ही भाषणात काय म्हणालात? तर 'जे आत्तापर्यंत झाले ते झाले, आता सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे'. मोदीसाहेब, मन जिंकलंत तुम्ही तमाम भारतीयांचं, हे वाक्य टाकून!
गावसकर बाद झाला की टीव्ही बंद करणारा, इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाल्यावर राजीवजींना भरघोस पाठबळ देणारा हा भारतातील व्यक्तीपूजक समाज! जो 'दिमाग' ऐवजी 'दिल' वापरतो तो हा समाज! हा समाज पागल झाला. जिकडे बघू तिकडे 'मोदी, मोदी' च्या घोषणा दुमदुमू लागल्या. तुम्ही गर्दीच्या ज्या भागाकडे बघाल तिथले तरुण उठून उभे राहून तुमच्या नावाचा गजर करू लागले.
तुम्ही काहीही करावंत आणि त्याची बातमी व्हावी असे होऊ लागले. शपथविधीला सार्कचे नेते तासनतास खोळंबून होते पण ढिम्म हलत नव्हते. पाकिस्तानपुढे तर धर्मसंकटच उभे राहिले. आमंत्रण स्वीकारावे तर मोदींना पाठिंबा असल्याचे सूचित होणार, नाकारावे तर नसल्याचे!
शासकीय कर्मचारी वेळेवर ऑफीसमध्ये येत नाहीत हे तुम्ही हेरलेत आणि त्याबाबत कठोर झालात. क्षणोक्षणी तुमच्या बातम्या येऊन आदळतात आणि मन मोहरते.
तुम्ही ताबडतोब विदेशी दौरे सुरू केलेत. जपान, चीन आणि अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्यांशी तुमच्या झालेल्या गाठीभेटी, त्यानंतर झालेले शाब्दिक करार, रॅपो डेव्हलपमेंट, सीमाशत्रूंविरुद्ध जगाचे मत तयार करण्यातील लाजवाब कसब, सगळेच दैदीप्यमान!
भर नवरात्रात नऊ दिवस लिंबू पाणी घेऊन तुम्ही अमेरिका गदागदा हालवलीत. पुन्हा आज म्हणायला मोकळे झालात की 'मी आजतागायत अमेरिकेचे मीठ खाल्लेले नाही'. सगळेच अद्भुत! इकडे पाकिस्तानची घुसखोरी होत होती, चीनची घुसखोरी होत होती, तुम्ही त्यांना सज्जड दम भरत होतात.
मोदीसाहेब, तुम्ही राज्यावर आलात आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या.
तुम्ही काही चांगले केलेत की आधीचे लोक म्हणू लागले की ही योजना आमची होती, मोदी नुसते श्रेय लाटत आहेत. तुमचे काही चुकले असे वाटले की हीच मंडळी 'आमच्यावेळी असे होत नव्हते' असे म्हणत होती. 'कुठे आहेत ते अच्छे दिन' हा प्रश्न विचारायची तर ह्या मंडळींना इतकी घाई की विचारू नका.
मोहन भागवत म्हणून कोणी आहेत हे पोराटोरांना माहीतही नव्हते. त्यांचे तर परवा भाषणच झाले. इतकेच काय तर तुम्ही थेट शाळेतल्या मुलांशी हितगुज केलेत. कोणत्या पंतप्रधानाने आजवर हे केलेले होते?
भारत स्वच्छ अभियान! हातात झाडू घेऊन तुम्ही कचरा साफ करू लागलात. खरे खोटे देव जाणे, पण तुमच्या मनातील भावना जनसामान्यांपर्यंत पोचल्या. मुख्य म्हणजे तुम्हाला विरोध कोण करणार? विरोधी पक्षच हलाखीच्या अवस्थेत आहेत.
महात्मा गांधींचे नांव तुम्ही चुकीचे उच्चारलेत. गुजरातमधील पाठ्यपुस्तकांत छत्रपतींबाबतच्या माहितीत तपशीलाच्या चुका असूनही महाराष्ट्रात बेधडक घुसलात. अमित शहांकडे पक्षाची सूत्रे सोपवलीत. अडवानींना निवृत्ती घ्यायची होती कधीची, तीही घेऊ दिलीत. ज्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत संभ्रम आहे त्यांना एच आर मिनिस्टर बनवलेत. जर्मनीच्या चॅन्सेलर बाई ब्राझीलमध्ये फूटबॉल बघायला गेलेल्या असताना त्यांच्या भूमिवर पाय ठेवून दाखवलात. विदेशी वस्तू खरेदी केल्या तर जास्त कर पडेल असा कायदा संमत करून घेतलात. करिष्मा तर एवढा वाढवलात की राहुलजींना खुद्द त्यांचेच पाठीराखे अशक्त नेतृत्व असे संबोधून स्वतःची हकालपट्टी करून घेऊ लागले.
मोदीसाहेब, मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर दुतर्फा असलेली गर्दी जेव्हा 'मोदी, मोदी' अश्या घोषणा देत होती तेव्हा अभिमानाने ऊर भरून आला. एवढे होऊन तुम्ही स्वतःला 'प्रधानमंत्री' नव्हे तर 'प्रधानसेवक' म्हणवत राहिलात.
ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही महाराष्ट्रात मुसंडी मारायला आलात. पंतप्रधानांनी किती प्रचार करावा ह्यावर काही दिलजल्यांनी उद्वेगही व्यक्त केला. लोकसभेतील महान यशानंतर सेनेला एकमात्र मंत्रीपद देऊन तुम्ही तुमची खरी ताकद दाखवलीत. 'कोण बाळासाहेब आणि कोण उद्धव' अशी तुमची देहबोली होती. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही महाराष्ट्रात आलात.
मोदीसाहेब, तुमची लाट इथे होतीच हो! त्यात आणखीन तुम्ही स्वतः आलात! एक नाही, दोन नाही, डझनावारी सभा घेतल्यात. हादरला अबघा सह्याद्री! हा कोण गुजराथचा चहावाला येतो आणि इथल्या जनतेला भुरळ पाडून जातो. महाराजांनी सूरत लुटली होती, तुम्ही निम्मा महाराष्ट्र लुटलात! म्हणजे निम्म्या महाराष्ट्राची मने लुटलीत.
शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती अलगद शस्त्रक्रिया करावी तशी तोडलीत तुम्ही! तोडली नसलीत तर तुटू दिलीत!
मोदीसाहेब, पन्हाळगड ते विशाळगड हा ट्रेक अठरा तासांचा आहे. महाराज भले घोड्यावरून काही तासातच पोचले असतील, पण एक बाजीप्रभू कामी आला होता तेव्हा! मधली दरी पार करताना महाराजांच्या एका डोळ्यात पन्हाळगडाच्या शिखराचे प्रतिबिंब होते तर दुसर्या डोळ्यात मधल्या दरीखोर्यात छातीचा कोट करून लढणार्या बाजीप्रभूंच्या छातीवरच्या जीवघेण्या जखमा!
दरी युतीतही होती मोदीसाहेब! पण ह्यावेळी मोठ्या नेत्याला मधे मरणार्याची किंमत नव्हती. 'तो असता काय, नसता काय, मी पोचलोच असतो' ही भावना तुमच्या दोन्ही डोळ्यांत होती मोदीसाहेब!
ती भावना जेव्हा बेरकी अमित शहा आणि तुमच्या भाषणांमधून जाणवली ना मोदीसाहेब, मनापासून सांगतो, आम्ही प्रार्थना केली की प्रभू रामचंद्राने तुम्हाला जागेवर आणावे.
अहो कसले स्वच्छता अभियान आणि कसले परदेश दौरे? मोदीसाहेब, इथे पुण्यात राहणार्या माणसाला सियाचीनला दहा जवान मेल्याने काही फरक पडत नसतो. त्याला फरक पडत असतो रस्त्याला खड्डे किती ह्याने! त्या पुण्यातल्या माणसाला सीमेवरच्या जवानाच्या कुर्बानीचे मोल समजावे ह्यासाठी राष्ट्रीय नेता आवश्यक असतो. तुम्ही सीमेवर गेलात तर तिथल्या लोकांना आवडेल असे बोलता, इकडे आलात तर आम्हाला आवडेल असे आणि मॅडिसन स्क्वेअरमध्ये तिथल्यांना आवडेल असे!
मोदीसाहेब, प्रश्न इनमीन काही जागांचा होता. पण आज जो इगो इश्यू येत आहे ना, त्यामागे तुमचा आगाऊ आत्मविश्वास आणि तुमच्यातील तेवढेच वैशिष्ट्य घेऊन प्रकटलेल्या अमित शहांचे वर्तन कारणीभूत आहे.
मोदीसाहेब, माफ करा, पण शिखरावर पोचल्याक्षणीच तुमची घसरण सुरू झालेली आहे.
कसे असते ना? जे विचार आणि आचार घेऊन ह्या देशात टिकून राहता येते, ते तुमच्या आचारविचारांपेक्षा फार वेगळे असतात. आणि तुम्ही जर ते विचार, आचार आत्मसात करायला गेलात, तर तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये फरक नाही उरणार मोदीसाहेब! ह्या देशात दहा मैलाला भाषा, चाळ ओलांडल्यावर जात आणि मुहल्ला बदलला की धर्म बदलतो. मोदीसाहेब, हा देश असा आहे जो चहावाल्याला पंतप्रधान करेलही, पण पंतप्रधानाला चहावाला नाही बनू देत!
मोदीसाहेब, तुमचे इतक्या उद्योजकांशी निकटचे संबंध आहेत, कधी त्यांना विचारून बघा! प्रत्येक कंपनीत अशी काही माणसे असतात जी वेळेवल नेमून दिलेले काम करतात आणि ब्र काढत नाहीत. आणि अशी काही माणसे असतात जी काहीही काम करत नाहीत आणि यंव केले आणि त्यंव केले हे सांगण्यात माहीर असतात. बघा विचारून त्या इन्डस्ट्रियालिस्ट्सना!
तुम्ही दुसर्या प्रकारात फार वेगाने जात आहात.
तुम्ही हातात झाडू धरलात तर झाडू हा ह्या देशात दागिना ठरत आहे.
तुम्ही हाफ स्लीव्ह कुर्ता घातलात तर तश्या कुर्त्यांची गरज भागवताना संबंधितांची दमछाक होत आहे.
होतं काय आहे मोदीसाहेब, की तुम्ही काहीही केलेत तरी त्याची अतीच जाहिरातबाजी करत आहात.
देश एखाद्या कंपनीप्रमाणे चालवणारा नेता अशी तुमची प्रतिमा विदेशात अवश्य बनलेली असेल मोदीसाहेब, पण भारत हा देश ही एक कंपनी नाही.
भारत देश म्हणजे चहाची तल्लफ भागवायला कुठल्याही टपरीवर थांबलेला अजाण नागरीक नाही.
ज्या टपरीवर पन्नासवेळा उकळलेलाच चहा असतो, पण 'येथे टपरी आहे' ह्या पाट्या दहा दहा किलोमीटरपासून असतात.
मोदीसाहेब, सत्तांध झाला आहात तुम्ही! सत्तांध सगळेच आहेत. तुम्ही उपलब्ध त्या सर्व पर्यायांचा आणि माध्यमांचा वापर करावात ह्यातही काही गैर नाही. पण जेव्हा व्हॉट्स अॅपवर असे चित्र येते की निवडणूक आयोग मतपत्रिकांची पिशवी घेऊन खालच्या लाळ घोटणार्या कुत्र्यांना सांगत आहे की 'आज नव्हे, एकोणीस ऑक्टोबरला उघडेल ही पिशवी' तेव्हा त्या लाळघोट्यांमध्ये स्थानिकांबरोबर तुमचेही एक व्यंगचित्र असलेले पाहून आम्ही काय समजायचे ते समजतो.
आम्ही चहावाल्यालाही पंतप्रधान करतो मोदीसाहेब, पण पंतप्रधान पसंतीस उतरला नाही, स्वस्त वागू लागला, तर त्याला चहावालाही बनू देत नाही.
ही एक लाट आहे मोदीसाहेब! ज्या लाटेला फक्त आणि फक्त बदल हवा आहे. 'बदल हवा असणे' ह्याचा अर्थ 'मोदी सरकार हवे असणे' असा मुळीच नसतो.
आणि एक महत्वाचे सांगू का?
तुम्ही सोडून तुमच्या पक्षात आता काहीच नाही ही स्थितीही तुमच्या ह्या भयानक सत्तांधतेमुळेच आलेली आहे.
तुम्ही खूप काही वेगळे करू शकत नाही आहात. आमूलाग्र बदल घडवण्यासाठी नवरात्रात उपास करण्याची आवश्यकता नसते मोदीसाहेब, वर्षभर उपास घडणार्यांना भाकरी देण्याची आवश्यकता असते. इस्रोत जाऊन 'यान नाही पोचले तर माझे अपयश ठरेल' असे कुचकामी पण वरवर भावनिक भाषण देण्याची गरज नसते, 'मी तर काही केले नाही, पण हे झाले तर मी सलाम झोडेन' असे म्हणण्याची आवश्यकता असते.
तुमचे मार्केटिंग जरा आवराच! मनमोहन सिंग हे एक टोक होते आणि तुम्ही दुसरे! अहो ते पदच असे आहे की तेथे विराजमान झालेला कोणीही काहीतरी अद्वितीय करूच शकत नाही. नका सांगू जनतेला की तुम्ही अद्वितीय आहात.
मोदीसाहेब, भानावर येऊन वागा! अन्यथा, चहावाल्याला पंतप्रधानपदी बसवणारी ही जनता, पंतप्रधानाला चहावालाही बनू देणार नाही.
==========================
-'बेफिकीर'!
महाराष्ट्राचे नवे
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री: देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
ज्या शोभा फडणवीस ला १९९७ चा रेशन डाळ घोटाळा केल्याबद्दल राजीनामा देऊन घरी बसावे लागले : तिचा मुलगा
बाकी इथे पहा
(No subject)
गौतम बुद्ध म्हणाला
गौतम बुद्ध म्हणाला "ज्याच्याकडून घोटाळा झाला नाही अशा पाच माणसांची नावे सांगा"
विनिताजी, देवेंद्र हे शोभा
विनिताजी, देवेंद्र हे शोभा फडणविसांचे पुतणे आहेत, पुत्र नव्हेत.
अगोबै , नेहरुची मुलगी पम्प्र
अगोबै , नेहरुची मुलगी पम्प्र झालीतर घराणेशाही.
सोनिया , राहुल सगळी घराणेशाही .
आणि शोभा देव्न्द्र ही घरानेशाही नाए ?
शोभा कोण होत्या? पंतप्रधान
शोभा कोण होत्या? पंतप्रधान होत्या का? की मुख्यमंत्री होत्या?
(No subject)
भाजपा या स्वच्छ पार्टीच्या
भाजपा या स्वच्छ पार्टीच्या आमदार-मंत्री. डाळ खरेदी घोटाळ्यामुळे त्यांना पाय उतार व्हावे लागले होते.
घराणेशाहीची यादी ईथेच थांबत नाही.
डाळ. शिजलि नव्हते का ?
डाळ. शिजलि नव्हते का ?
गौतम बुद्ध म्हणाला
गौतम बुद्ध म्हणाला "ज्याच्याकडून घोटाळा झाला नाही अशा पाच माणसांची नावे सांगा" >>
१. हर्षद मेहता
२. जयललिता
३. पंडीत सुखराम शर्मा (स्नानगृह वाले)
४. अटलबिहारी वाजपेयी
५. आदरणिय वंदनीय......
शोभा यांच्यावर आरोप असले तर
शोभा यांच्यावर आरोप असले तर लगेच पुतण्यावर पण तसेच आरोप होतील असे गृहित धरून कसे चालायचे?
--------------------------------------------------------------------
डाळ खरेदी घोटाळ्यामुळे त्यांना पाय उतार व्हावे लागले होते.
>>
रच्याकने, त्यांनी घॉटाळा केला हे सिद्ध झाले होते का? सिरिअसली विचारतोय.
बाकी विरोधकांनो तुमच्या प्रती
बाकी विरोधकांनो तुमच्या प्रती सहानुभूती आहे.
केन्द्रात मोदी, राज्यातही भाजपचे सरकार.
अर्रर्रर्र
मी तर काही भाजपच्या विरोधात
मी तर काही भाजपच्या विरोधात नाही ना....पण माणसांची त्यांची निवड मला दरवेळेस आश्चर्यात टाकत आहे
अहो तेच सांगतोय. त्यांच्या
अहो तेच सांगतोय. त्यांच्या काकूने काही केले असेलच तर तेही तसेच करतील कशावरुन.
त्यांना ओळखणार्या सगळ्यांचे हेच म्हणणे आहे की तो अत्यंत सभ्य, अभ्यासू, आणि कामाचा झपाटा असणारा आहे. आणि आपल्याला तसाच माणूस हवा आहे ना मुख्यमंत्रीपदी?
असो.
त्या बहुधा निर्दोष सुटल्या
त्या बहुधा निर्दोष सुटल्या होत्या. त्यांच्या आत्मचरित्रात वाचल्याचे आठवते.
राज्यातही मोदिन्चेच सरकार आहे
कोकण्स्थांशी सहमत. थांबा आणि
कोकण्स्थांशी सहमत. थांबा आणि पहा
ते जौद्या हो त्यांचे. आता हे
ते जौद्या हो त्यांचे. आता हे काय करतात ते बघायचे. राज्यात आणि केन्द्रात तेच असल्याने आता केन्द्र अमुक देत नाही आणि तमुक देत नाही याबाबतीत नो एक्स्क्युज.
(No subject)
स्वताश्वीच बोलणे ! देवा !!
स्वताश्वीच बोलणे ! देवा !!
माननीय
माननीय मोदीसाहेब,
छत्तीसगढमध्ये जवानांवर झालेल्या नक्षली हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे शब्द नाहीत असे तुम्ही म्हणाल्याचे आज दैनिक सकाळमध्ये छापून आले आहे. ह्यावरून आम्ही असा अंदाज बांधतो की बहुधा तूर्त आपण भारत नावाच्या देशात असावात, असलातच तर आणखी एक बाब आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छ्तो मोदीसाहेब! ते म्हणजे ह्याच हल्ल्याबाबत आपले कॅबिनेट मंत्री श्री. राजनाथ सिंह म्हणाले की 'नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे नक्षलवादी गोंधळून गेलेले असल्याने हा हल्ला झालेला आहे'.
मोदीसाहेब, त्या राजनाथसिंहांना आमचा एक निरोप सांगाल का दोघेही एकाच देशात असलात तर?
म्हणाव तुम्हाला केंद्रीय गृहमंत्री केलेले आहे म्हणून तुमची वक्तव्ये आता पेपरात छापून येत आहेत, तेव्हा जरा जपून राहा म्हणाव!
<< 'नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू
<< 'नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे नक्षलवादी गोंधळून गेलेले असल्याने हा हल्ला झालेला आहे'. >> अशी मखलाशी करण्याची संवय इतक्या लवकरच लागणार नाही, याची काळजी घ्या म्हणावं गृहमंत्र्याना !
काय ही नाटक मी मारल्यासारखे
काय ही नाटक
मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर
<< काय ही नाटक..मी
<< काय ही नाटक..मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर >> हा टोमणा म्हणून फारच छान. मानलं ! पण ..... ईरसाल टोमणे मारणारी सासू ही कजाग ती कजागच !!!
साडेचार हजार कोटींचा डाळ
साडेचार हजार कोटींचा डाळ घोटाळा : ग्राहक पंचायत
http://abpmajha.abplive.in/maharashtra/toordal-scam-in-maharashtra-lette...
सोसायटीच्या वॉचमनलाही पत्र लिहायचं म्हटलं तर तंतरते आमची..
Pages