Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत रांगोळ्या. मी
मस्त आहेत रांगोळ्या.
मी गणपतीत काढलेली रांगोळी.
वुमन्स डे..

वारली..

दिवाळीसाठी केलेली प्लास्टीकच्या रांगोळीचा पहिला प्रयत्न..


धन्यवाद कांचन! सुंदर काढलीत
धन्यवाद कांचन! सुंदर काढलीत रांगोळी! वार्ली अप्रतिम, प्लास्टीकची पण छानच!
स्नु, खुपच ठसठशीत रांगोळ्या, काय सफाई आहे हातात आणि रंग संगती तर क्लास!
सायली मस्त आहेत सगळ्या
सायली मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या !! ही माझी वर्गणी.

सुंदरच आहेत रांगोळ्या..
सुंदरच आहेत रांगोळ्या.. लहानपणी खुप काढायचो. पाण्यावरची, पाण्याखालची, भुश्यावरची असे अनेक प्रकार काढायचो मी आणि बहीण मिळून. मुंबईत खुप ठिकाणी प्रदर्शने भरायची रांगोळीची. अजूनही भरतात. त्या रांगोळ्या तर हुबेहुब काढलेल्या असतात.
दा! तुम्हाला अजुन काय काय
दा! तुम्हाला अजुन काय काय येतं हो! सगळ्याच बाबतीत तुम्ही निपुण कसे?
सायली, आम्हा दोघांना आमच्या
सायली, आम्हा दोघांना आमच्या घरातूनच शह मिळालाय. माझी वहिनी आणि बहिणीची सून दोघी प्रोफेशनल रांगोळी कलाकार आहेत.
सुंदरच....खूप मस्त...वार्ली
सुंदरच....खूप मस्त...वार्ली तर विशेष आवडली
सायली , काय सुंदर काढल्या
सायली , काय सुंदर काढल्या आहेस ग रांगोळ्या.
निपुण आहेस अगदी.
धागा ही छान . मस्त मस्त रांगोळया बघायला मिळतायत.
सॉलीड मस्त आहेत रांगोळ्या
सॉलीड मस्त आहेत रांगोळ्या सगळ्यांच्या.
सर्वच रांगोळ्या मस्त.
सर्वच रांगोळ्या मस्त.
अरे व्वा.. सायली, खूप
अरे व्वा.. सायली, खूप सुर्रेख..
कांचन्,स्नू तुमच्या रांगोळ्या ही खूप आवडल्या..
धन्यवाद ....
धन्यवाद ....
सायली.. सुरेख रांगोळ्या..
सायली..
(रेणुकेची तर जोरदार आहे)
सुरेख रांगोळ्या..
सगळ्यांच्याच मस्त एकदम!!
ह्या माझ्या काही रांगोळ्या..
ह्यातल्या ज्या फक्त पांढर्या आहेत त्या बंगाली अल्पना आहेत! (तांदुळ रत्रभर भिजवुन मग कमी पाण्यात वाटुन त्याच्या पेस्ट नी कापसाच्या बोळ्याने काढलेल्या)
आणी बाकिच्या संस्कार भारती सारख्या..
(मला संस्कारभारती जमत नाहीत करण बोटांमधे फार फटी आहेत.. सगळी रांगोळी पडते मधुनच)
सगळयाचे आभार... दिनेश दा! अरे
सगळयाचे आभार...
दिनेश दा! अरे व्वा छानच!
हेमा ताई, वर्षु दी
धनुकली काय सुरेख रांगोळ्या काढल्यास.. अल्पना पण छान. समोर उडीया भाभी राहायच्या त्या गेरुनी रंगवुन मग काढायच्या, ४ , ५ दिवस जशीच्या तशीच रहाते ना रांगोळी.
मला संस्कारभारती जमत नाहीत करण बोटांमधे फार फटी आहेत.. सगळी रांगोळी पडते मधुनच) ++ नाही नाही, खरच छान काढतेस तु.
सगल्याचजणी एक से बढकर एक
सगल्याचजणी एक से बढकर एक कलाकार आहात! सुरेख रांगोल्या !दिवालीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्स गं सायली
धन्स गं सायली
ही आज सकाळी काढलेली (९ ते १
ही आज सकाळी काढलेली (९ ते १ दोन्ही बाजुनी). साधीशीच आहे..

सायली, मला हीच रांगोळी आठवत
सायली, मला हीच रांगोळी आठवत नव्हती
रिया तुझ्यापण रांगोळ्या टाक
रिया
तुझ्यापण रांगोळ्या टाक न इकडे...
माझा रांगोळ्या फोन मधे आहेत
माझा रांगोळ्या फोन मधे आहेत आणि फोन डब्बा आहे
त्यावरुन इथे नाही टाकता येत.
लॅपटॉप मधे व्हायरस आहे त्यामुळे फोन लॅपटॉपला नाही लावता येत
तरी प्रयत्न करेन.
उद्या रांगोळीत लक्ष्मी काढणार
वॉव! फोटो नक्की टाक...
वॉव! फोटो नक्की टाक...
सुंदर रांगोळ्या.. तो
सुंदर रांगोळ्या.. तो रांगोळीचा स्पर्श अजून बोटांना जाणवतोय.
नायजेरियात आम्ही ४ वर्षांपुर्वी दिवाळी साजरी केली होती. तिथे रंग रांगोळी कुठली मिळणार ? मग हळद आणि नीळ
वापरून रांगोळी काढली होती. हे दोन्ही डींकाच्या पाण्यात भिजवले आणि इयर बड्स वापरून रेखाटले. हे दोन्ही मिसळून हिरवा रंगही मिळाला.
दिनेश दा --------- /\
दिनेश दा --------- /\ -------------
वसुबारस...
वसुबारस...


माझ्या पन काही .. १. २. ३.
माझ्या पन काही ..
१.
२.
३.
मला ही वारलीवाली आयडीया जाम
मला ही वारलीवाली आयडीया जाम आवडलीये

मी आज काढते एक वारलीची रांगोळी घरी जाऊन
टीना , मी पहिली रांगोळी
टीना , मी पहिली रांगोळी डाऊनलोड करू का तुझी?
टीन क्लास कलेक्शन...
टीन क्लास कलेक्शन... वार्ली,चेरी ओन द टॉप
धन्यवाद तुझ्यामुळे ३ नविन रांगोळ्या शिकायला मिळाल्यात..
टीना, वारली रांगोळी तर भरतकाम
टीना, वारली रांगोळी तर भरतकाम वाटतेय..
आणखी एक आमची लहानपणीची आयडीया. पुर्वी बर्फाच्या लाद्या बैलगाडीवर विकायला यायच्या. त्या लाकडाच्या भुश्यात ठेवलेल्या असायच्या. तो गाडीवाला असा भुसा स्वस्तात देत असे.
तो ओला असतानाच त्याला रांगोळीचे रंग लावायचे आणि मग त्याचा जाड थर देत रांगोळी घालायची. त्याला त्रिमिती आकार देता येत असे. आणि हा ओला भुसा वार्याने उडतही नसे.
भुश्याची रा.न्गोळि छान दिसते!
भुश्याची रा.न्गोळि छान दिसते! सुरेख आहेत रा.न्गोळ्या..
Pages