Submitted by सावली on 13 October, 2014 - 11:53
एरवी घरी शांत बसुन ऐकायची गाणी आणि दुरवरच्या प्रवासात ऐकली जाणारी गाणी यात नक्कीच फरक आहे.
लाँग ड्राईव्ह करताना ऐकण्यासाठी हिंदी गाणी इथे सुचवा.
गाणी जोशपुर्ण, धांगडधींगा असलेली अशी हवी आहेत. ( एरवी अशी गाणी ऐकली जात नसल्याने फारशी माहित नाहीत. )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्याकडे उलटं आहे. मला
आमच्याकडे उलटं आहे. मला आवडणारी गाणी गाडीमध्ये असलेल्या बाकी कुणालाही आवडत नाहीत. मी तरी मग गाणी बंदच ठेवतो. रेडिओ एक पर्याय असतो पण तो मलातरी आवडत नाही, नसत्या अॅड्स अन अपूर्ण गाणी.
एक उपाय मी एकटा गाडीत असतांना करतो तो म्हणजे शॉर्ट प्लेलिस्ट्स, फारतर १० गाण्यांची एक अशी. ती कारमध्ये ड्राईव करत असतांना हँडल करायला सोपी पडते.
मला ड्राईव करतांना जर फार बोअरिंग रस्ता असेल तर हिंदी नवीन अन अपबीट असलेली गाणी आवडतात. उदा. आताच बँग-बँग मधलं विशाल चं गाणं...
सावली, मला यो यो हनी सिंग
सावली, मला यो यो हनी सिंग अजिबात आवडत नाही.
पण त्याची गाणी लावून केलेला प्रवास भन्नाटच होतो
तुला तो चालत असेल तर सांग. लिस्ट देते
सगळी आयटम सॉंगस् जोशपूर्ण
सगळी आयटम सॉंगस् जोशपूर्ण असतात! एखादी रिमिक्स गाण्यांची सीडी घ्या त्यात सगळी धांगडधिंगा गाणी असतील! Best of 2013/2012 अशी नावं असतात. पण मला चांगला डीजे कोण आहे ते माहिती नाहीये..कुणातरी कॉलेज मधल्या bollywood buff ला विचारून घ्या!
शम्मी कपूर रफी आणि आरडी..
शम्मी कपूर रफी आणि आरडी.. झकास गाणी...
ए अस्साच एक धागा येऊन गेला
ए अस्साच एक धागा येऊन गेला आहे आधी. शोधायला हवा, त्यामधे बरीच गाणी दिलेली आहेत लोकांनी.
एक्झॅक्टली. मला पण देजा व्हू
एक्झॅक्टली. मला पण देजा व्हू
http://www.stumbleupon.com/su
http://www.stumbleupon.com/su/8rGj2u/1VX-N9uJ2:c@$MWdtC/takelessons.com/blog/best-songs-to-sing-along-to
हिंदी:
बेबी डॉल
मौजा ही मौजा- जब वी मेट सर्व गाणी
सारी के फॉल सा
त्य्यब अल्ली प्यार का दुश्मन वन्स अपॉन अ टा इन मुंबै २
चार बॉटल व्होडका
यारिया मधले पानी पानी.
हायवे साँग्ज्स पटाखा गुड्डी
ताल गाणी
ये जवानी है दिवानी सर्व गाणी
जिंदगी जिंदगी आणि इतर गाणी दुनियादारीतली.
ड्रीमम वेकपम
बोल बच्चन सर्व गाणी
गो गो गो गोविंदा
रंग दे बसंती भांगडा.
रॉक ऑन
जिनामिदो. स रव गाणी.
अनारकली डिस्को
अनारकली डिस्को चली,
शीला की जवानी
मुन्नी बदनाम
फेविकॉलसा
फोटो नही तो फोटो कॉपी भी चालसे
रिमीक्सेस घेउ नका ओरिजिनलच ऐका.
>>मला पण देजा व्हू ओके, यांना
>>मला पण देजा व्हू
ओके, यांना पण देत जा पाहू
<< लाँग ड्राईव्ह करताना
<< लाँग ड्राईव्ह करताना ऐकण्यासाठी हिंदी गाणी इथे सुचवा.
गाणी जोशपुर्ण, धांगडधींगा असलेली अशी हवी आहेत. >>
रात्री वाहन चालविताना झोप येऊ नये असा उद्देश आहे का? धांगडधींगा गाणी ऐकण्यापेक्षा जरा वेगळ्या चालींची, वेगळ्या शब्दांची फारशी इतरत्र ऐकायला न मिळणारी गाणी ऐकली तर? गाण्यात पुढे काय आहे ह्याची उत्सुकता वाहनचालकाची झोप उडवून टाकते. हा निदान माझा तरी खात्रीशीर अनुभव आहे. या शनिवारीच साडे चारशे किमी अंतर ओम्नी चालवून (त्यातही दोनशे किमी अतिशय निर्जन आणि घाट रस्त्यावर भर मध्यरात्री एकट्याने केलेला प्रवास) रात्री दोनला परतलोय. फारशी लोकप्रिय नसलेली पण तरीही सुश्राव्य, अवीट गोडीची अशी गाणी ऐकत होतो, जराही झोप आली नाही.
And last but not the least
तुम्ही शिक्षा चित्रपट पाहिलाय का? प्रत्येक वाहनचालकाने किमान एकदा तरी पाह्यला हवा असा हा चित्रपट मी चार वेळा पाहिलाय. हा चित्रपट मन लावून पाहिल्यावर आणि त्यानंतर त्यातले
तेरी छोटीसी एक भूल ने सारा गुलशन जला दिया, क्या महकेंगे फिर फुल कभी; क्या फिरसे बहारे आयेंगी?
हे गाणे वाहन चालविताना ऐकले की सार्या चित्रपटाचे सार डोळ्यासमोर उभे राहते आणि वाहन चालकाच्या हातून अपघात होणे केवळ अशक्यच.
All the Best & Happy Journey.
योकु, रिया, जिज्ञासा,के अंजली
योकु, रिया, जिज्ञासा,के अंजली , महेश, इब्लीस, अमा, चेतन सुभाष गुगळे धन्यवाद.
योकु, रेडीयो असतोच पण अपबीट गाणी हवी आहेत.
रिया, मलाही आवडत नाहीत ती गाणी. पण इतर काही असेल तर सांग.
रिमिक्स गाण्यांची सीडी >> रिमिक्स नको. आयटम साँग्ज.. हम्म.
दुसरा धागा असेल तर लिंक द्या प्लिज
अमा, थँक्यु फॉर द लिस्ट. बहुतेक गाणी ऐकलेलीच नाहीत
शम्मी कपूर रफी आणि आरडी >> हो नक्कीच
रात्री वाहन चालविताना >> रात्री नाही, दिवसा वाहन चालवताना बोअर / मोनोटोनस होऊ नये म्हणुन. तुम्ही दिलेली गाणी ही बघते कुठे मिळतात का ते. काही माहित आहेत काही नाही.
मी पप्पांचा ढापून फोन >> हे गाणं आहे ?
शिक्षा चित्रपट >> नाही पाहिलाय. जमल्यास बघेन.
मी पप्पांचा ढापून फोन >> हे
मी पप्पांचा ढापून फोन >> हे गाणं आहे ?
>> हो. आणि अतीशय सुंदर गाणं आहे.
एकदा ऐका मग आपण या धाग्यावर बोलु.
अगदी आत्ता लगेच गुगल करुन ऐकले तरी चालेल.
<< एकदा ऐका मग आपण या
<< एकदा ऐका मग आपण या धाग्यावर बोलु.
अगदी आत्ता लगेच गुगल करुन ऐकले तरी चालेल. >>
लगेच नका ऐकवू त्यांना, पहिल्यांदा ऐकताना सुरुवातीला वाटतं छान गमतीचं बालगीत आहे, पण धक्कादायक रीत्या शेवटी तीव्रतेने रडायला लावतं ते..
एकांतात ऐका.
शिक्षा:-
https://www.youtube.com/watch?v=pu2wULVZgKM
हा पण शक्यतो एकट्यानेच आणि मन लावून पाहा. आरंभ, मध्य, शेवट अगदी प्रत्येक फ्रेम न् फ्रेम महत्त्वाची आहे. काहीच चुकवू नका.
सावली, ते खुप चांगले गाणे आहे
सावली, ते खुप चांगले गाणे आहे सलिल कुलकर्णीचे "मी पप्पांचा ढापून फोन"
फार म्हणजे फारच चांगले आहे. नक्की ऐक, आवडेल तुला.
लगेच नका ऐकवू त्यांना,
लगेच नका ऐकवू त्यांना, पहिल्यांदा ऐकताना सुरुवातीला वाटतं छान गमतीचं बालगीत आहे, पण धक्कादायक रीत्या शेवटी तीव्रतेने रडायला लावतं ते..
>> अगदी पर्फेक्ट शब्द आहेत.
जोशपुर्ण, धांगडधींगा असलेली
जोशपुर्ण, धांगडधींगा असलेली अशी हवी आहेत. >>> ह्या विशेषणांची जूनी गाणी चालतील का फक्त नविनच गाणी हवी आहेत?
अरे दोन तीन मराठी गाणी टाक
अरे दोन तीन मराठी गाणी टाक की चकणा म्हणून.:फिदी:
१) टेलीफोन धुनमे हसनेवाली
२) पल दो पल का ये सफर- हद कर दी आपने
३) दलेर मेहेन्दीची ढिन्चॅक गाणी
रन्गिलाची निवडक गाणी.
मराठी गाणी:-
मनाच्या धुन्दीत लहरीत ये ना
ही चाल तुरुतुरु
आठवले की लिहीन.
माझा हा बाफ बघ.
http://www.maayboli.com/node/44783
रावडी राठोड पण बघ.
रावडी राठोड पण बघ.
कालच भला मोठा प्रवास झालाय.
कालच भला मोठा प्रवास झालाय. त्यात ऐकलेली काही गाणी:
देवा श्रीगणेशा (अग्निपथ मधले ऋतिक चे) फार अमेझिंग फिलींग येते ऐकताना. जरा मोठा आवाज करून ऐका.
माऊली माऊली
साड्डा दिल वी तू (एबीसीडी)
शंभुसुताय (एबीसीडी)
शुभारंभ (कायपोचे)
प्रवासात बीट्स चीच गाणी
प्रवासात बीट्स चीच गाणी पाहिजे, पण अलिकडची अत्यंत कर्कश असली नको ज्यात शब्द सुद्धा ऐकायला येत नाही २००० नंतरची बरीच बीटस गाणी माझी फेव्हरेट
दिल चाहता है,डीडीएलजे,रंग दे बसंती अशा पट्टीत बसणारे आपल्या आवडीनुसार असलेली गाणी ,सरळ पेन ड्राईव्हला भरायची (आता बहुतेक गाड्यांना पेन ड्रार्व्ह किंवा मेमरी कार्ड लावण्याची सोय आहे. किंवा सीडी राइट करुन घ्यायची) आणि सुसाट सुटायचे , यात ही एक वरच्या सुरातले आणि दुसरे सायलेंट थीम असे कॉब्मो झाले की भारी वाटते,
रेडीओच्या नादी न लागलेलेच बरे एकतर गाणी कमी बकवास अणि जाहिराती जास्त त्यात रस्त्यावर प्रॉपर रेंजही नसते. गेल्या १०-१२ वर्षात चांगले अलबम पण आले आहेत. त्यातले सिलेक्टेड गाणी घ्यायची, संपुर्ण अलबम ऐकून कानावर अत्याचार नाही करुन घ्यायचा.
ओके ते गाणे ऐकेन नंतर. ह्या
ओके ते गाणे ऐकेन नंतर.
ह्या विशेषणांची जूनी गाणी चालतील का फक्त नविनच गाणी हवी आहेत? >> अरे जुनी तर चालतीलच.
थँक्यु रश्मी, अंजली, किरण कुमार
अन्जली अनुमोदन. फार मजा येते
अन्जली अनुमोदन.:स्मित: फार मजा येते ते गाणे मोठ्याने ऐकताना आणी म्हणताना देखील. निर्जन रस्ता असेल तर आम्ही खुशाल मोठ्याने लावतो आणी गाव आले की कमी आवाज ठेवतो.
सावली दलेर मेहेन्दीचे साडे दिलपे छुरीया ऐक. मस्त रिदम आहे.
आनन्द राज आनन्दचे दिवाना कर दिया खाली दिलेय.
http://www.youtube.com/watch?v=n--E7z1b9ko
मराठीतले गझाल खरी काय ( नारबाची वाडी)
नवीन हिन्दी हवी असतील तर खुश्शाल रॅप वापर. प्रवास मजेशीर होण्यासाठी देवान्ग पटेल, लेस्ली लुईस केव्हाही बरे.
सन्जय दत्तच्या काटे मधले माही वे आणी इश्क समन्दर दिल दे अन्दर
हम मधले सनम मेरे सनम, कसम तेरी कसम पण धमाल आहे.
रणबीर कपूरवर चित्रित झालेली
रणबीर कपूरवर चित्रित झालेली दोन गाणी
१) हैरत है - अंजाना अंजानी
२) वेक अप सिद (टायटल सॉंग)
हि गाणी मला ड्राईव्ह करताना खूप आवडायची ..
राहत फतेह अली खानचा आवाज आवडत
राहत फतेह अली खानचा आवाज आवडत असेल तर त्याची बरीचशी गाणी.
लागी तुझ से मनकी लगन
जिया धडक धडक जिया
तेरे मस्त मस्त दो नैन
तुझे देख देख सोणा
मैं तेनु समझावां
ओ रे पिया
रब्बा
आणि इतर बरीच...
वडाली ब्रदर्स
घुंघट चक वे सजना
याद पिया की
तू माने या ना माने दिलदारा
रंगरेझ
नटरंग चित्रपट, जब वुई मेट, लंडन ड्रीम्स, दबंग, मेरे ब्रदर की दुल्हन, रंग दे बसंती इत्यादी चित्रपटांमधील गाणी.
ही पोल्लीसाजूक तुपातली कस
ही पोल्लीसाजूक तुपातली कस विसरताय मराठी साठी?
भारतीय मधे पन एक मस्त गाणं आहे . नाव आठवेना
तुम ने मारी एंट्रिया दिलमें
तुम ने मारी एंट्रिया दिलमें बजी घंटियां टंग टंगः ह्यात गाडी साइडला लाउन हायवेवर नाच सुरू करण्याचा संभव आहे. ताडाताडी
यहा वहा सारे जहॉ मे - आन मिलो
यहा वहा सारे जहॉ मे - आन मिलो सजना
गुजर जाये दिन - अन्नदाता
तुम साथ हो जब अपने - कालिया
चला जाता हू किसीके धून मे - मेरे जीवन साथी
दिलको देखो चेहरा न देखो - सच्चा झूठा
जानू मेरी जान - शान
इस दुनीयामे जीना हो तो - गुमनाम
यम्मा यम्मा - शान
कही आग लगे लग जावे - ताल
कहो कैसे रस्ता भूल गये - बडे दिलवाला
बिंदिया चमकेगी - दो रास्ते
आप मुझे अच्छे लगने लगे - जीने की राह
बंगली के पिछे - समाधी
देखा ना हाय रे सोचा ना - बाँबे टू गोवा
हाय रे हाय तेरा घुंगटा - ढोंगी
मेहबूबा - शोले
मुंगडा - इन्कार
रंगीला - रंगीला
छय्या छय्या - दिल से
दुनिया में लोगोंको - अपना देश
बार बार देखो - चायना टाऊन
गुलाबी आखे - द ट्रेन
यार चुलबुला है - दिल देके देखो
ना रुठो - जवां मुहब्बत
ओ हसीना - तिसरी मंझील
आजा आजा - तिसरी मंझील
आज की रात कोई -
ये मेरा दिल - डॉन
आओ ना गले लग - मेरे जीवन साथी
मैने दिल अभी दिया नही - द ट्रेन
दो घूंट मुझे भी - झील के उस पार
पीया तू अब तो आ जा - कारवां
चढर्ती जवानी - कारवां
मेरा नाम चीन चीन चू - हावडा ब्रिज
चला जाता हू किसीके धून मे -
चला जाता हू किसीके धून मे - परिचय>>>> अरे हे गाणे तर मेरे जीवन साथी फिल्म मधील आहे
शास्त्रीय संगीत आवडत असेल तर
शास्त्रीय संगीत आवडत असेल तर - किशोरी ताई, पं कुमार गंधर्व, पं वसंतराव देशपांडे, बेगम परवीन सुलताना, वीणा ताई, मालिनी ताई, पं जसराज, अभिषेकी बुवा, ह्यांचे कुठलेही राग... सध्याच्या गायकांपैकी उ. रशीद खाँ, संजीव अभ्यंकर, कौशिकी चक्रवर्ती... आणि वादकांमध्ये हरीजी, शिवजी, विश्वमोहन भट, रवी शंकर, विलायत खाँ,
स्नेहनील, धन्यवाद. चूक
स्नेहनील, धन्यवाद. चूक सुधारली आहे
Pages