थोडक्यात वृत्तांत -
दि. : १८ जुलै
वेळ : संध्याकाळी ६:०० ते १०:३०
ठिकाण : 'मो' ह्यांच्या घरी
एखाद्या अनोळखी ठीकाणी, काही अनोळखी लोकांना भेटून.... 'कसली धम्माल केली' अशी प्रतिक्रीया येणे हे मायबोलीकरांना नवीन नाही. हेच मायबोली कुटुंबाचे यश आहे असे म्हणता येईल. आजपर्यंत अनेक मायबोलीकरांनी असेच अनुभव घेऊन त्याबद्दल इथे वृत्तांत लिहीले आहेत.
अटलांटा GTG सुद्धा ह्याला अपवाद नव्हता. ७ मायबोलीकर आणि त्यांचे कुटंबीय ह्यांनी ३ - ४ तास एकत्र जमून धमाल केली.
सुरुवात, मी मायबोलीकर कसा(कशी) झालो(झाले ), इथुन झाली. माबोवरचे सध्याचे ताजे विषय, विशेष लक्ष पुरवावे असे बाफ.... थोडक्यात रोज पार्ले/बारा/शिट्टी/पुपु/अटलांटा बाफ वरचे ड्वायलॉग पुढे चालू....
माबोकरणींनी खादाडीची जय्यत तयारी केलीच होती. बटाटेवडे, सामोसे, पावभाजी, पुलाव खात खात गप्पा चालू राहिल्या.
('एक्झोटीक डेझर्ट' चा विषेशोल्लेख इथे आवश्यक आहे. ).
निघायच्या आधी पुणे-मुंबईकरांच्या वविसाठी फोन वरून शुभेच्छा दिल्या.
आणि पुन्हा भेटायच्या तयारीवर सगळ्यांनी निरोप घेतला.
त.टी. : माझ्या ऑर्कुटवर GTG चे फोटो टाकले आहेत.
विनायक, आज
विनायक, आज वर्क फ्रॉम होम का?
एस जे, वेल
एस जे, वेल कम,
आर जे, १० वी तली क्रशवाली ही काय "भानगड" आहे हो? नाही, इतर राज्यातले आणि इतर देशातल्या लोकांना माहीती दिसतयं, आणि तुमच्या इथल्या लोकांना काही पत्ता नाही.....
आज वर्क
आज वर्क फ्रॉम होम का
मो केवढ ते धाडसी विधान,
अग बाई,
अग बाई, धाडसाला पर्याय नाही.
आणि "विशिष्ट" बाफ वर वर्क फ्रॉम होम चा जो अर्थ आहे, तो नाही हं इथे! तू अपले उगाच काही अर्थ काढत बसू नकोस बरं!
हो, आज थोडं
हो, आज थोडं वर्क (आणि जास्ती टाइम पास) फ्रॉम होम....ह्म्म्म्म मायबोली वर गेली ६ वर्ष काढूनही तुम्हा मुलींची ही कोड लँग्वेज नाही कळत बाबा....मो, तुला फोन करतो ....कूठला तो "विशिष्ट" बाफ हे विचारण्यासाठी???
कोड
कोड लँग्वेज नाही कळत बाबा >>>> you have to be at right bb at right time..
अरे वा
अरे वा जोरदार झालेला दिसतोय गटग. वृत्तांत वाचून मजा आली. जनतेने धमाल केलेली दिसतेय एकुणात. पुढच्या एखाद्या गटग ला सर्वांना भेटायला आवडेल.
वा! जोरदार
वा! जोरदार गटग. अड्म - तुझा वृत्तांत पण मजेदार. !!
अबे आला तो वास्सप - हौडी वगैरे करत आला की काय?
य वर्ष झाली त्याला माबोवर भेटून.
~~
परिमळु विद्गदु रे भ्रमरा |
हाय
हाय प्रॅडी! फिओना कडून कळलं की तू पण अॅटलांटाची माबोकर आहेस.
नक्की भेटू पुढच्या गटग ला.
जीत आणि तू हे दोन अॅटलांटा माबोकर ह्या वेळेला अनुपस्थित होते. पुढच्या वेळेला मोठठा ग्रूप होणार तर
नमस्कार, णए
नमस्कार,
णएशविल्ल, TN madhale koni ahe ka?
- Ketaki
हो
हो आर्चाक्का असतात TN मधे.. णएशविल्ल मधे असतात का माहित नाही पण..
मोहिनी
मोहिनी नक्कीच भेटू. सध्या आमचं पिल्लू खूपच छोटं आहे अगदी सव्वा महिन्याचं त्यामुळे जमलं नाही या वेळी. तिचं पहिलं आउटिंग बहुदा महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव. तुम्ही कुणी येता का महाराष्ट्र मंडळात? ऑगस्ट एंडला गणेशोत्सवात एखादं गटग जमवता येईल.
प्राडी, आम्
प्राडी,
आम्हाला पण तुला भेटायला आवडेल.
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!
RJ | 3 August, 2009 -
RJ | 3 August, 2009 - 11:48
GTG - part doux
=========
अटलांटावासी GTG साठी एकदम उत्साही.
"विकेंडला भेटायच का?" ह्या एवढ्याश्या पोस्टवर आमचं दुसरं GTG ठरलं आणि पार पडलं सुद्धा.
परवा 'मो'नी इथेच एक पोस्ट टाकलं की मुलांना piedmont park मधे न्यायच का?
पार्कमधे नेऊन मुलांना दमवले की घरी येऊन ती पटकन झोपतात. केवळ ह्या शुद्ध हेतुनी मी हो म्हटलं.
आणि एकत्र जमतोच आहोत तर नंतर कुठे तरी खादाडीसुद्धा करून घेऊ, असं शेपुटपण त्याला जोडून दिलं. अटलांटा बाफवर आधी झालेल्या 'मुलं आणि रेस्टॉरंट्स' ह्या चर्चेमुळे, नंतरच्या खादाडीसाठी एखादं देसीच ठीकाण गाठावं असही ठरलं.
त्यानुसार फोना-फोनी झाली. पोरं-बाळंवाले साधारण ५:०० वाजता piedmont park मधे जमणार आणि बाकीचे नंतर direct खादाडीसाठी येणार असा साधारण प्लॅन ठरला.
५:३० पर्यंत मो-राहुल आणि शिल्पा-राहुल बच्चे मंडळींसकट जमलो. आणि थोड्याच वेळात piedmont park च्या मोऽठ्या हिरवळीवर सतरंजी टाकून आयांच्या गप्पा, बाबामंडळींचा फ्रिस्बी खेळण्याचा (!) प्रयत्न आणि सैरावैरा धावत सुटलेली मुलं, असा अगदी प्लॅनींग केल्यापप्रमाणे कार्यक्रम चालू झाला. मधेच अडमानी एक फोन करून, पार्कमधे अजून किती वेळ लागेल ह्याची चौकशी करून घेतली. (तेवढ्या वेळात आ.स्व.पू. उरकून घेण्याचा त्याचा विचार असावा ). भावना-सुनीत सुद्धा पार्कमधून निघण्याच्या थोडं आधी, भोज्जा देण्यासाठी आले. मग पुन्हा एकदा गप्पा आणि फ्रिस्बीचा एपिसोड झाला.
आता कधी नव्हे ते केलेल्या पळा-पळी मुळे जोरदार भुक लागली आणि मोर्चा वळवला सर्वाणा भवन कडे. मंदळी स्थानापन्न झाली. मुलांना सांभाळणं अगदी सोपं असतं, असा अडमनी जोरदार दावा केला असल्याने आपसुकच जेवताना 'बेबी सिटींग' त्याच्याकडे आलं. अडमाच्या दुर्दैवाने सगळ्यात नाठाळ पोरग त्याच्या शेजारी बसलं होतं. आदित्यनी (RJ Jr.) सुरुवातीला ५-१० मिनीट शांत बसून दाखवलं. मग थोड्याच वेळात आपल्या करामतींनी अडमाला जेरीस आणलं. बाकीच्या पोरांनी तो पर्यंत आरडा-ओरडा करून, टेबलाभोवती पळा-पळी करून पार ठेसनाची कळा आणून सोडली.
१५ मिनीटात अडमानी पांढरे निषाण काढले. (तुमच्या) पोरांना सांभाळणे ही फार कठीण गोष्ट आहे आणि मी 'डे केअर' संकल्पनेचा पुनर्विचार करत आहे, असं म्हणून पार शरणागतीच पत्करली.
तेव्हा NJ ए.वे.ए.ठी. करांनो, बेबी सिटींगसाठी अडमावर विसंबून राहु नका (असा एक अनाहुत सल्ला ).
बाकी सर्वाणाचं साऊदींड्यन फूड छानच. (फिल्टर कॉफी मात्र अजीबात जमली नाही). त्या अनुशंगाने पुण्यातल्या साऊदींड्यन हाटीलांचा एक आढावा घेऊन झाला. (म्हणजे फक्त वैशाली आणि वाडेश्वर... त्या पुढे गाडी जात नाही. )
आता ह्या नंतर सुद्धा उत्साही मंडळी कोल्ड स्टोनच आईसक्रीम खाऊन घरी जाणार होती. कोल्ड स्टोनच आईसक्रीम एकदम अफलातून. त्यामुळे ऑफर एकदम टेम्प्टींग. पण आम्ही गाडीत बसल्यावर पोरं झोपणार असा सुज्ञ विचार करून घरी.
निघण्याआधी मागच्या पायंड्याप्रमाणे पुस्तकांची देवाण-घेवाण. आणि पुन्हा भेटुयाचा वायदा.
संपादन प्रतिसाद adm | 3 August, 2009 - 12:00
वृत्तांताचा निषेध..
ज्यूनिअर आर्जे ला मी नीट संभाळलं होतं... सर्वाणा मधे तो एकदाही रडला नाही... मी त्याला डोश्याच्या एक तुकडा बिस्कीट असं सांगून खायला दिला.. त्याने त्याचा राडा केला.. ते सगळं बघून एस्जे ने माझ्या कडे तु्.क. टाकला..
त्या तु.क. चा रागिट क. होण्यापूर्वी मी त्याला मागच्या भिंती वर चढू देऊन चमच्यांची फेकाफेक करू दिली.. मग तिथल्या म्यानेजरने पण आमच्या कडे तु.क. टाकला... पण मी त्याच्या कडे टोटल दुर्लक्ष केले.. !
त्याउलट मो चा मुलगा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून भावना बरोबर माबो च्या गॉसिप करत बसल्याने अधून मधून रडत होता... शेवटी तो स्वतःचे मन रमवण्यासाठी इकडे तिकडे पळत होता...
निघण्याआधी मागच्या पायंड्याप्रमाणे पुस्तकांची देवाण-घेवाण.. >>>>> सध्यातरी नेहमी घेवाण च होते..
मी आजच सभासद झालो आणि ह्या
मी आजच सभासद झालो आणि ह्या group बद्दल वाचतो आहे. मला पण तुमच्यामध्ये यायला आवडेल. पुढच्या वेळेस तुम्ही भेटाल तेंवा मला कोणी सांगेल का?
राजेश स्वागत मायबोलीवर..आपण
राजेश स्वागत मायबोलीवर..आपण कुठे असता अटलांटात?
राजेश मायबोली वर स्वागत...
राजेश मायबोली वर स्वागत...
Pages