दुबई / अबु धाबी सहल - भाग १३ ( समारोप ) पाम आयलंड्स, अटलांटीस वगैरे

Submitted by दिनेश. on 13 October, 2014 - 07:34

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789

दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816

दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823

दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत http://www.maayboli.com/node/50900

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग अ ) http://www.maayboli.com/node/51032

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग ब ) http://www.maayboli.com/node/51051

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग क )
http://www.maayboli.com/node/51066

दुबई / अबु धाबी सहल - भाग ११ - अबु धाबी, http://www.maayboli.com/node/51173

दुबई / अबु धाबी सहल - भाग १२ - फेरारी वर्ल्ड वगैरे http://www.maayboli.com/node/51179

परदेशी प्रवासात बोलका गाईड मिळणे यासारखे सुख नाही. आम्ही आग्रहाने बदरलाच विनंती केली आणि त्याला
पण आमची कंपनी आवडली बहुतेक. त्याने स्वखुषीने आम्हाला अबु धाबी नंतर दुबई मधेही फिरवले.

दुबईमधे समुद्रात काही कृत्रिम बेटे निर्माण केली आहेत. दोन पाम च्या आकाराची आहेत तर एक जागाच्या नकाशाप्रमाणे आहेत. हि बेटे विमानातूनही दिसतात.
यापैकी एका पाम आयलंडला आम्ही भेट दिली.

१) एका वॉटर फ्रंटजवळची जागा ( बेवकुफियाँ मधे इथला एक शॉट आहे. )

२) ही मोनोरेल आपल्याला पाम आयलंडच्या मधल्या मार्गातून नेते. पॅनेलवर जे डिझाईन दिसतेय त्याच
आकारात हे बेट आहे. यातल्या ज्या पानासारख्या दिसणार्‍या शाखा आहेत तिथे बंगले ( व्हीलाज) बांधलेल्या
आहेत. या प्रत्येक व्हीलाला खाजगी समुद्रकिनारा आहे.

३) या मोनोरेलचा प्रवास केल्यास दोन्ही बाजूने या आयलंडचे छान दर्शन होते.

४) इथे काही इमारतीही आहेत.

५) ही मोनोरेल विनाचालक आहे.

६)

७) सर्वच ठिकाणी पामला फुलोरा आलेला दिसत होता.

८)

९)

१०)

या आयलंडच्या टोकाशी अटलांटीस नावाचे हॉटेल आहे. फराह खानच्या हॅपी न्यू इयरमधे हे दिसणार आहे. मी पुर्वी याच्या आतही गेलोय. आत खुप मोठे अक्वेरियम आहे.

११)

१२)

१३) अटलांटीस मधे राहिल्यास या सर्व राईड्स घेता येतात. याचे चांगले डील मिळू शकते.

१४) इथे यायला या बसचाही पर्याय आहे. ( आम्ही मोनोरेलने आलो व बदर गाडी घेऊन रस्त्याने आला. त्याने आम्हाला इथे पिक अप केले )

१५) अटलांटीसचे प्रवेशद्वार

१६ )

१७)

१८) बूर्ज अल अरब च्या समोरचे ( तुलनेने स्वस्त Happy ) हॉटेल

१९) बूर्ज अल अरबचा चार्म आता कमी झाल्यासारखा वाटतो. हे ७ स्टार हॉटेल आहे. हे पण "हॅपी न्यू इयर" मधे
दिसणार आहे.

२०)

२१) हमारा विवेक खुश हुआ.. दुबई एअरपोर्ट्वरून मुंबईला प्रयाण..

ही सहल संपली खरी.. पुढच्या सहलीचे वेध आतापासूनच लागलेत. मी, माझा कॅमेरा आणि मायबोलीकर !!

अधिक टिप्स् :

दूबईचा व्हीसा ऑनलाईन आहे. जिथे राहणार ते हॉटेलच सहसा व्हीसा स्पॉन्सर करते. त्यासाठी पासपोर्टची क्लीअर कॉपी आणि एक रिसेंट फोटो लागतो. ( साधारणपणे ओठ बंद, व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे नेहमीचे नियम आहेत. ) एमिरेट्स एअरलाईन पण व्हीसा स्पॉन्सर करते. ( त्यांच्यातर्फ बूकिंग केले तर )

साधारणपणे २ दिवसात व्हीसा येतो. हे सगळे ट्रॅव्ह्ल एजंट करू शकतात. प्रत्यक्ष जायची वा पासपोर्ट द्यायची गरज नसते. शॉर्ट व्हीजिट्साठी मेडीकल वगैरे नाहीत. बाकि कसली कागदपत्रे लागत नाहीत. ऑन अरायव्हल कष्ट्म्स क्लीयरन्स आणि पासपोर्ट कंट्रोल पण विनासायास होतो. कुठलाही फॉर्म भरावा लागत नाही. व्हीसा फी कधी कधी हॉटेल भरते तर कधी स्वतः भरावी लागते. ती पण आधीच भरायची असते. उतरल्यावर कसलेही चार्जेस नाहीत.
दुबईचा व्हीसा म्हणजेच संयुक्त अरब अमरातीचा व्हीसा, तो सर्व अमरातीत चालतो. काही ठिकाणी भेट देताना आपण काही काळ ओमानमधे असतो, तिथे क्वचित पासपोर्ट दाखवावा लागतो. पण त्यावर स्टँप वगैरे मारत नाहीत.

आणखी माहिती हवी असेल तर मी आणि दुबईस्थित मायबोलीकर आहेतच !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम भारी च दिनेश दा !!

सगळ्या मालिकेतले फोटु लय्य भारी !!
मज्जा आली !
Thanks for sharing with us

श्री.. दूबईचा व्हीसा ऑनलाईन आहे. जिथे राहणार ते हॉटेलच सहसा व्हीसा स्पॉन्सर करते. त्यासाठी पासपोर्टची क्लीअर कॉपी आणि एक रिसेंट फोटो लागतो. ( साधारणपणे ओठ बंद, व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे नेहमीचे नियम आहेत. ) एमिरेट्स एअरलाईन पण व्हीसा स्पॉन्सर करते. ( त्यांच्यातर्फ बूकिंग केले तर )

साधारणपणे २ दिवसात व्हीसा येतो. हे सगळे ट्रॅव्ह्ल एजंट करू शकतात. प्रत्यक्ष जायची वा पासपोर्ट द्यायची गरज नसते. शॉर्ट व्हीजिट्साठी मेडीकल वगैरे नाहीत. बाकि कसली कागदपत्रे लागत नाहीत. ऑन अरायव्हल कष्ट्म्स क्लीयरन्स आणि पासपोर्ट कंट्रोल पण विनासायास होतो. कुठलाही फॉर्म भरावा लागत नाही. व्हीसा फी कधी कधी हॉटेल भरते तर कधी स्वतः भरावी लागते. ती पण आधीच भरायची असते. उतरल्यावर कसलेही चार्जेस नाहीत.
दुबईचा व्हीसा म्हणजेच संयुक्त अरब अमरातीचा व्हीसा, तो सर्व अमरातीत चालतो. काही ठिकाणी भेट देताना आपण काही काळ ओमानमधे असतो, तिथे क्वचित पासपोर्ट दाखवावा लागतो. पण त्यावर स्टँप वगैरे मारत नाहीत.

हे फोटोजही मस्तच, दिनेशदा Happy

अशा प्रकारच्या सहलीसाठी लागणार्‍या विजाच्या टिप्स पण देता येतील का ?>>>>+१

हा वरचा प्रतिसाद हेडरमध्ये अपडेट करा. Happy

दिनेशदा, संपुर्ण प्रकाशचित्र मालिका म्हणजे एक पर्वणीच ठरली, अनेक सुंदर स्थळं पाहता आली. वाळवंटातसुध्दा नंदनवन फुलवले आहे. वाळवंटाचा रूक्षपणा आणि मानवनिर्मित हिरवळ अशी दोन टोकाची रूपे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एकदम शिस्तबध्दरित्या आखणी केलेली आहे.

आज जरी मिडल ईस्ट रिजनच्या देशांची अर्थव्यवस्था पेट्रोलियम पदार्थांमुळे बहरली असली तरी तिचे साठे मर्यादित आहेत आणि पुढील भविष्यात पर्यटन हेच आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख अंग असणार आहे ही जाणिव ठेऊनच ते ह्या भागाला पर्यटनदृष्ट्या विकसित करत आहेत. ह्यालाच म्हणतात भविष्याचा विचार.

नितांतसुंदर प्रकाशचित्रमालिकेबद्दल धन्यवाद.

नरेश, दुबईचा विकास तेलापेक्षा व्यापाराने जास्त झालाय. दृष्टे राज्यकर्ते आणि त्यांचा निस्वार्थी कारभार यांनीच ते शक्य झाले. मूळात धार्मिकदृष्ट्याही ते तितकेसे कडवे नाहीत.... भ्रष्टाचाराची किड नव्हतीच कधी. आणखी काय पाहिजे ?

दिनेशदा!! खुपच भारी मालिका आहे ही... खरच मजा आली... खुप परिश्रम घेतलेत तुमचा अनुभव आमच्या पर्यंत पोहचवायला... त्यासाठी धन्यवाद!...

आभार परत एकदा.
खुपदा मी भेट देतो ती ठिकाणे नेहमीच्या भारतीय पर्यटकांच्या यादीवर नसतात. हे सगळे त्या लोकांना उपयोगी पडावे म्हणून लिहितो. हे सर्व फोटो वॉटर मार्क नसलेले आहेत. कुणालाही फॉरवर्ड करू शकता.

मस्त...