श्री. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!!!

Submitted by नरेश माने on 10 October, 2014 - 06:11

भारतातील लहान मुलांच्या हक्कासाठी चळवळ उभारणारे समाजसेवक श्री. कैलाश सत्यार्थी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई बरोबर जाहिर झाला आहे.

आपल्या देशात असे अनेक जण आहेत जे आपल्या नकळत सामाजिक जाणिव ठेऊन अनेक चांगली समाजोपयोगी कामे करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल काहीच ज्ञान नसते. जसे आज पर्यंत श्री. कैलाश सत्यार्थी यांच्या बद्दल मला काहीही माहिती नव्हती पण ही बातमी प्रसिध्द झाली आणि विकिपिडीया वर त्यांच्या बद्दल माहिती वाचली. एका भारतीयाला हा पुरस्कार मिळाला याचा आनंदच आहे. अधिकाधिक लोकांना त्यांच्या कार्याची माहिती मिळावी व श्री. कैलाश सत्यार्थी यांचे अभिनंदन करण्यासाठी हा धागा उघडण्यात येत आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Kailash_Satyarthi

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या देशात असे अनेक जण आहेत जे आपल्या नकळत सामाजिक जाणिव ठेऊन अनेक चांगली समाजोपयोगी कामे करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल काहीच ज्ञान नसते. जसे आज पर्यंत श्री. कैलाश सत्यर्थी यांच्या बद्दल मला काहीही माहिती नव्हती पण ही बातमी प्रसिध्द झाली आणि विकिपिडीया वर त्यांच्या बद्दल माहिती वाचली. >>>>>> अगदी अगदी

मलाला युसुफजाई व कैलाश सत्यर्थी यांचे अभिनंदन

आताच बातमी दुरदर्शनवर ऐकली.

श्री. कैलाश सत्यर्थी यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!!!

दुसर्‍या बाजुला पाकिस्थानी १७ वर्षाच्या एका स्त्रीला नोबेल सहभागुन मिळाले आहे.मलाला युसुफजाई असे तिचे नाव.

वयाच्या १२ वर्षी त्यांनी पाकिस्थान मधील स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल काही नाव बदलुन लिहल होत. पुढे तालिबान्यांनी ९ अक्टोबर २०१२ रोजी त्यांच्यावर हल्ला झाला. या दोनच गोष्टी त्यांच्या नोबेल च्या सहभागितेसाठी पुढे आल्या.

श्री. कैलाश सत्यर्थी यांनी ८० हजार बाल कामगारांचे पुनर्वसन केले या तुलनेत त्या पाकिस्थानी स्त्रीचे कर्तुत्व एकतर पुढे आले नाही किंवा पाकिस्थानात नोबेल देण्याच्या बहाण्याने तालीबानी विचारांचा विरोध हा विचार असावा.

आपल्या देशात असे अनेक जण आहेत जे आपल्या नकळत सामाजिक जाणिव ठेऊन अनेक चांगली समाजोपयोगी कामे करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल काहीच ज्ञान नसते. जसे आज पर्यंत श्री. कैलाश सत्यर्थी यांच्या बद्दल मला काहीही माहिती नव्हती पण ही बातमी प्रसिध्द झाली आणि विकिपिडीया वर त्यांच्या बद्दल माहिती वाचली. एका भारतीयाला हा पुरस्कार मिळाला याचा आनंदच आहे. अधिकाधिक लोकांना त्यांच्या कार्याची माहिती मिळावी व श्री. कैलाश सत्यर्थी यांचे अभिनंदन करण्यासाठी हा धागा उघडण्यात येत आहे.
>> + १

मी पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. श्री. कैलाश सत्यार्थी ह्यांचे अभिनंदन.

बादवे, आडनाव सत्यार्थी असे आहे. धाग्याचे जनक, आडनाव प्लीज दुरुस्त करा. धन्स.

खूप खूप अभिनंदन! अतिशय अभिमान वाटावा असा क्षण आहे प्रत्येक भारतीयासाठी!
नितिनचंद्र.. तुम्हाला काय म्हणायचंय ते मला कदाचित नीट समजलेले नसेल. पण 'मलाला' या वयाने लहान असलेल्या अश्या व्यक्तिमत्त्वा विषयी मला खरोखर आदर आहे. मी तिचा एक ईटरर्व्हु पाहिला होता आणि त्यात त्या चिमुरडीच्या डोळ्यांतला बाणेदारपणा मला अजूनही लक्षात आहे. या पारितोषिकाची बातमी आल्यावर मी विकिपेडियावर तिच्याबाबत अजून माहिती वाचली आणि तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला आहे.

छान बातमी. मनःपूर्वक अभिनंदन! लहान मुलांच्या हक्कांसाठीच्या लढ्याला यातून अधिक बळ मिळावे.
मलालाचेही अभिनंदन!

कैलाश सत्यार्थींचे नाव ऐकले नव्हते. पण ते चालवतात, त्या बचपन बचाओ आंदोलनाबद्दल ऐकले होते.
श्री सत्यार्थी आणि मलाला दोघांचेही अभिनंदन

हे फार चमत्कारीक आहे. कैलास सत्यार्थींचे नाव मला माहीती नव्हते. माबो वर पण कोणाला माहीती नाहीये असे दिसतय. माणुस भारतीय आहे आणि भारतातच रहातोय. असे असुन कोणालाच माहीती नाही हे कसे? आणि एकदम नोबेल च. खरच काही कळत नाही.

हा प्रतिसाद नकारात्मक वाटला तर त्याबद्दल क्षमस्व. पण विकी वर माहीती वाचुन पण फार काही प्रकाश पडला नाही. माणुस जगातल्या काही संस्थांच्या बोर्डावर असावा पण बाकी काही दिसत नाही.

आमटे कुटुंबिय, वनवासी कल्याण आश्रम, बंग आणि असे बरेच लोक असताना हे कुठुन नाव आले.
आणि इतक्या वर्षात पद्मश्री पण कसे नाही?

श्री. कैलाश सत्यार्थी ह्यांचे नाव मलाही माहित नव्हते. नोबेल पुरस्कार मिळविण्याएवढे कार्य त्यांनी केले असेल तर त्यांना एकही पद्म पुरस्कार नाही असे कसे? ही भारत सरकार ची उदासीनता आहे की नोबेल पुरस्कार समितीची पुरस्कार देण्याची घाई?

सुमुटोचा, टोचा- खरंच मलाही नव्हतं माहीत हे नाव. मिडियात कधीच आलं नाही आणि आता एकदम नोबेल? पण अर्थातच- अभिनंदन करण्याचाच हा दिवस आहे Happy

मलालाचं वय आणि कार्य हे नोबेलच्या लेव्हलचं आहे का? का खूप लवकर दिला गेलाय पुरस्कार? असाही प्रश्न पडतो. पण मला आनंद झाला कारण तालिबानने तिथल्या स्त्रियांची जी वाट लावली आहे त्याला हे सणसणीत उत्तर आहे. एनि स्टेप अगेन्स्ट तालिबान इस वेलकम!

KAILASH SATYARTHI ....
Have we any right to congratulate him...?
He was awarded following awards and Honours.....
Out of them which is Indian?
2014: Nobel Peace Prize [1/2]
2009: Defenders of Democracy Award (US)
2008: Alfonso Comin International Award (Spain)
2007: Medal of the Italian Senate (2007)
2007: recognized in the list of "Heroes Acting to End Modern Day Slavery" by the US State Department
2006: Freedom Award (US)
2002: Wallenberg Medal, awarded by the University of Michigan
1999: Friedrich Ebert Stiftung Award (Germany)
1998: Golden Flag Award (Netherlands)
1995: Robert F. Kennedy Human Rights Award (US)
1995: The Trumpeter Award (US)
1994: The Aachener International Peace Award (Germany)
1993: Elected Ashoka Fellow (US)

If we don't know enough about their work, it doesn't. mean it does not deserve the recognition it has got. Listening to Malala right now, and she is too mature for her age. She says she wants to become a politician and she exhibited the right qualities. Has invited both Indian and Pak PM for the award ceremony.

दोन निर्भिड आणि ध्येयाने प्रेरित होवून त्याचा पाठपुरावा करत ती स्वप्ने नि:स्वार्थी वृत्तीने साकार करणर्‍या दिग्गजांचे नोबेल बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
त्यांना पद्मश्री मिळाले नाही हा सत्यार्थींचा दोष आहे का की स्वार्थी सरकारी यंत्रणेचा अन त्या धैर्यवान मलालावर प्रश्न उठवणार्ञाम्नी कूपातून बाहेर यावे. तिचा सी एन एन आय बी एन वरील इंटर्व्हेयु ऐअकतांना माझ्या डोळ्यात अभिमानाने अश्रू आले. ह्या दोघांनी जगात महत्त्वाकांक्षेने प्रेरित लोक किती उच्च शिखरे गाठतात हेच दर्शवून दिले आहे.
रॉबिनहूड, पगारे,श्री, भरत्,जाई , रांचो, स्वाती, मुग्धमानसी , बी, अंजू, अनंतरंगी, दिनेश, रश्मी, हर्पेन, बाजिंदा मी नताशा, नरेश माने ++++++++++++ १००००००००००००००००
बाकीच्यांबद्दल न बोललेले बरे Sad

फार मस्त वाटले सकाळी सकाळी ही बातमी ऐकून! मलालाचा अभिमान आधीपासून वाटत होता पण कैलाश सत्यार्थी यांचे नाव आधी ऐकले नव्हते. पण त्याने काय फरक पडतो! We are (at least I am) ignorant of many good things/people in the world! ह्या निमित्ताने त्यांची, त्यांच्या कार्याची ओळख होईल ते महत्वाचे!

मलाला बद्दल असा विचार करून पाहा कि आपण तिच्या वयाचे आहोत नि त्या परिस्थितीत आहोत असे समजा, अशा वेळी जे तिच्या बाबत झाले ते झाले असते तर तुम्ही कितपत तुमच्या मूल्यांशी ठाम राहू शकला असता ? ज्यांच्या विरोधात तिने आवाज उचलला होता त्या लोकांशीतुम्ही logical arguments करून जिंकू शकता का ? त्यांच्या विरोधात जायची काय किम्मत कशी चुकवायला लागेल हे माहित असतानाही तिने जे धैर्य दाखवले ते मला तरी असामान्य वाटले. ती गेले वर्ष UK मधे राहात असली तरी तिला अजूनही तालीबान कडून धमक्या मिळत आहेत. पण ती तिच्या विचारांवर ठाम आहे. ABC वर मधे एक फीचर होते ज्यात बोको हरामने पळवलेल्या मुलींकडे लक्ष वेधून घ्यायला तिने नायजेरियात राहून जे काहि विचार मांडले आहेत ते वाचल्यावर (परत संपूर्ण मिडियाचा फोक्स तिच्यावर असताना तिने ज्या तर्‍हेने kidnap झालेल्या मुलींचा problem highlight करायला वापरला ते बघून ) तरी मला she is an undeserving candidate असे चुकूनही वाटत नाही. किती वर्षे काम केले हे मह्त्वाचे नाहि असे नाही पण कशाच्या विरोधात केले हे तितकेच मह्त्वाचे आहे. It's an inspiration indeed. अशा intangible गोष्टींमधे parity न बघणे चांगलेच.

Pages