श्री. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!!!

Submitted by नरेश माने on 10 October, 2014 - 06:11

भारतातील लहान मुलांच्या हक्कासाठी चळवळ उभारणारे समाजसेवक श्री. कैलाश सत्यार्थी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई बरोबर जाहिर झाला आहे.

आपल्या देशात असे अनेक जण आहेत जे आपल्या नकळत सामाजिक जाणिव ठेऊन अनेक चांगली समाजोपयोगी कामे करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल काहीच ज्ञान नसते. जसे आज पर्यंत श्री. कैलाश सत्यार्थी यांच्या बद्दल मला काहीही माहिती नव्हती पण ही बातमी प्रसिध्द झाली आणि विकिपिडीया वर त्यांच्या बद्दल माहिती वाचली. एका भारतीयाला हा पुरस्कार मिळाला याचा आनंदच आहे. अधिकाधिक लोकांना त्यांच्या कार्याची माहिती मिळावी व श्री. कैलाश सत्यार्थी यांचे अभिनंदन करण्यासाठी हा धागा उघडण्यात येत आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Kailash_Satyarthi

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलालाला नोबेल मिळाले ते फक्त तिच्या कर्तुत्वासाठीच नाही. त्यामागे जो विचार आहे त्यासाठीदेखील ते नोबेल मिळालेले आहे. नोबेल पीस प्राईझ केवळ त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ दिले जात नाही, तर त्या व्यत्क्तीनं ज्या विचारांशी, मूल्यांशी आणि धारणेशी एकनिष्ठ राहून काम केलेले आहे, त्यासाठी रीकग्निशन म्हणून दिलेले हे बक्षीस आहे.

मलालाचे कर्तुत्व तिचे वय लक्षात घेता कमी आहेच, तिच्या घरच्यांच्या साथीमुळे, त्यांच्या अपब्रिंगिंगमुळे ( इथे संस्कार शब्दाचे प्रीलोडेड अ‍ॅप येते म्हणून वापरता आला नाही, असो) ती इतकी प्रसिद्ध झाली हे कुणालाही मान्य आहेच. पण त्या एकट्या मलालापाठीमागे असलेली स्वातंत्र्याची विचारधारा, दडपशाहीविरूद्ध उठवलेला आवाज त्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती, आपला लढा इतरांपर्यंत पोचवून त्यामध्ये सहभागी करून घेण्याची कळ्कळ, धार्मिक मूलत्तत्त्ववाद्यांच्या विरोधामध्ये जात असताना कसलाही आक्रस्ताळेपणा न करत शांतपणे प्रसंगी जीवाची बाजी लावून दाखवलेला ठामपणा या सर्व मूल्यांना हे नोबेल मिळालेले आहे.

ज्या क्षणाला तिसर्‍या महायुद्धाचा भडका दक्षिण आशियामधे उठायची शक्यता परमसीमेवर असताना, ज्या क्षणाला धर्माचे वाट्टेल तसे अर्थ लावून विचारसरणी कैक शतके मागे जात असताना, त्यावेळी एका भारतीय आणि एका पाकिस्तानी व्यक्तींना नोबेल कमिटीने दिलेले हे बक्षीस आपल्या सर्वांनाच बरंच काही सांगून जात आहे.

केवळ "पाकिस्तानी" मुलीला नोबेल मिळाले म्हणून ज्यांना पोटशूळ उठला आहे त्यांच्या बाबतीत दोनच गोष्टी संभवतातः एक तर त्यांना जगात काय चाललंञ ते माहित नाही. ते जाणून घ्यायची गरज नाही. दोनः नोबेल कशाला म्हणतात ते त्यांना माहित नाही.

हा हा. बराक भाऊंना २ आठवड्यांच्या कामगिरीवर नोबल पीस प्राइज मिळु शकतं तर कोणालाहि मिळु शकतं... Happy

कैलाश सत्यार्थी आणि मलालाचे अभिनंदन. बचपन बचाओ आंदोलनाबद्दल माहित होतं, पण ते आंदोलन सुरु करणारे कैलाश सत्यार्थी आहेत हे नव्हतं माहित.

जामोप्याशेट, यु आर मिसिंग द पॉइंट.

#१. नोबल पीस प्राइजची विश्वासार्हता ढासळलेली आहे, गेल्या काहि वर्षात.
#२. यात अर्थात, मलाला किंवा सत्यार्थी यांचा दोष नाहि. त्यांचं कार्य उल्लेखनीय आहेच परंतु जगातला सर्वोच्च पुरस्कार देण्याजोगतं आहे का?

पीस पुरस्कार देण्यातसुद्धा राजकारण आहे (ओबामा, गोर, अम्मान यांना पुरस्कार प्राप्त होतात पण गांधीना नाहि), याची तुम्हाला कल्पना आहे का? वर नोबल पीस पुरस्काराची महती सांगण्यात आली म्हणुन हा खुलासा...

आणि हो बादवे, निलंगेकरांच्या मुलीच्याच कॉलेजमधुन तुम्ही डिग्री घेतली असेल तर माझा आक्षेप तुमच्यावर नाहि तर त्या कॉलेजच्या इंटीग्रिटीवर असेल. इन सच मॅटर्स, आय अ‍ॅम स्टिल ओल्ड स्कुल... Happy

>>>> #२. यात अर्थात, मलाला किंवा सत्यार्थी यांचा दोष नाहि. त्यांचं कार्य उल्लेखनीय आहेच परंतु जगातला सर्वोच्च पुरस्कार देण्याजोगतं आहे का? >>>
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!!!!

मुग्धमानसी/ सडेतोड

मलाला यांच्या कार्याबाबत बातमीच इतकी त्रोटक होती की मला त्याचे आश्चर्य वाटले. नंतर विस्त्रुत बातमीने समाधान झाले. अनवधानाने मलाला यांचे अभिनंदन राहुन गेले.

तालेबानी मनोवृत्ती विरुध्द संघ्रर्ष करणार्‍यांचे अभिनंदन करावे तितके कमी आहे.

सडेतोड, माझ्या नावाच्या मागे तुमच्या मनात एक टॅग आहे तो तसाच ठेवावा. माझ्यात बदल होणारच नाही. हे नक्की की माझे मत लिहीत असताना मी कुणाचा अपमान करणार नाही.

#१. नोबल पीस प्राइजची विश्वासार्हता ढासळलेली आहे, गेल्या काहि वर्षात. >> ++१

लोकसत्तेतला अग्रलेखही चांगला आहे.

हे मोदीजींचेच कर्तुत्व आहे ज्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव अमेरिकन लोकांवर पडला आणि त्यांनी भारतीयांकडे वेगळ्या दृष्टीकोनातुन बघायला सुरुवात केली. नोबल पारितोषिक मधे सत्यार्थी यांचे कार्य उल्लेखनिय आहेच त्याच बरोबर मोदींचा प्रभाव देखील थोडाफार फरकाने असेलच. ही तर सुरुवात आहे बघा मोदी कुठल्या कुठे भारताला घेउन जातील

Pages