१)
२)
३)
४)
५)
६)
७)
मी नेहमी ट्रेकीँगला जातो त्यावेळी काही पक्षी दिसतात .ते कोणते हे कळावे यासाठी संजय मोंगा यांचे 'बर्डस् अव मुंबई' हे छोटेसे पुस्तक( ६ बाई चार ईंच)नेतो .यामध्ये नावाप्रमाणे फक्त बोरिवली मुलुंड पर्यंतचे पक्षी नसून पालघर ते अलिबाग तसेच लोणावळा इगतपुरीचा सह्याद्रीचा भाग (नावे आणि नकाशा) अतर्भूत आहे .पक्ष्यांची रंगीत चित्रे (१६०) ,हालचाली आणि आवाजही दिलेले आहेत . इतर जाडजूड पुस्तकांपेक्षा (सलिम अलिंचे आणि सतिश पांडेंचे) हे पुस्तक सह्याद्रीत भटकणाऱ्या नवीन ट्रेकरांसाठी आपलेसे वाटेल
सप्टेँबरनंतर भटकतांना फुलपाखरेही दिसू लागतात .त्यांच्या पंखांच्या रंगावरून ती ओळखायची असतात आणि ती आपण दहा फुटांपर्यंतच पाहात असतो .
आईझेक केहिमकरचे पुस्तक मुलीच्या कॉलेजच्या लाइब्ररीतून आणले .या जाडजूड पुस्तकात फुलपाखरांचे आठशे फोटो आहेत पण बरीचशी असम ,अरुणाचल ,सिक्कीम ,उत्तराखंड ,निलगिरि येथील आहेत .पुस्तक विकत घेण्यात उपयोग नव्हता .मग इकडची 'कॉमन' शंभरएक फुलपाखरे चित्र रंगवण्यासाठी निवडली .
मुलीची शाळेतील कोलमनची अठरा रंगांची (वॉटरकलर)पेटी होती .ड्रॉईँग पेपर कापून चार घड्या केल्या .एकाला एक जोडल्यावर घडीचे पुस्तक बनले .नेण्यास सोपे . चौसठ (दोन्ही बाजूने बत्तीस) ची दोन पुस्तके केली .पुस्तकातले फोटो पाहून एकशेवीस चित्रे रंगवण्याचा प्रयत्न केला .चित्र पाहून फुलपाखरू ओळखता येते .
@ Srd तुम्ही तुमच्या प्रत्येक
@ Srd
तुम्ही तुमच्या प्रत्येक धाग्यावर फोटोसाठी स्वत:च्या ब्लॉगची लिंक देण्याऐवजी, तिथले फोटोच इथल्या पोष्ट मध्ये देत चला. म्हणजे ते पहायला सोपे जाईल. फोटोची लिंक इथे कशी देतात हे माहीत नसेल तर इथे मदत मिळेल.
धन्यवाद @vikas_pandit.
धन्यवाद @vikas_pandit.
छान आहेत. तुमचा प्रयत्न पण
छान आहेत. तुमचा प्रयत्न पण कौतुकास्पद आहे.:स्मित:
सुंदर.... फुलपाखरू आणि माहिती
सुंदर....
फुलपाखरू आणि माहिती
व्वा छानच! प्र.ची, माहिती येऊ
व्वा छानच! प्र.ची, माहिती येऊ द्या!
छानच ! नॅशनल पार्कात बरीच
छानच !
नॅशनल पार्कात बरीच दिसतात.
अंबोलीला आणि गोव्याला काही वेगळ्या जाती पण दिसतात.
( आम्ही नुसते बघे.. हे असे चित्रबित्र काढणे नाही जमायचे )
मस्तच Srd
मस्तच Srd
अॅन्ड्रॉईड फोन असेल तर ठाणे
अॅन्ड्रॉईड फोन असेल तर ठाणे मुंबई मधील फुलपाखरांच्या माहिती साठी हे अॅप उपयोगी पडू शकेल...
Take a look at "I Love Butterflies" - https://play.google.com/store/apps/details?id=com.butterfly.love
खूपच मस्तं.
खूपच मस्तं.
मस्तच.
मस्तच.