Submitted by दुसरबीडकर on 5 October, 2014 - 12:16
हा देहाचा सुर्य कलू दे..
आयुष्याची सांज ढळू दे..!!
इतके प्रेमळ बनव मला की ..
मी मेल्यावर दुःख रडू दे...!!
हळहळणार्या तुळशीलाही..
मुसमुसते अंगण समजू दे ..!!
काच मनाची कणखर व्हावी..
ओरखडेही 'नरम' पडू दे..!!
हट्ट मुलाचे पुरवत असता...
'माझे बाबा' परत कळू दे..!!
दे सुख नावाचे तणनाशक ..
बहर मिळू दे दुःख जळू दे..!!
-गणेश शिंदे..!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली. बाबा हा खयाल व हाताळणी
आवडली. बाबा हा खयाल व हाताळणी मध्ये नाविन्य जाणवले नाही बाकीचे सगळे शेर आवडले तुळशीचा खयाल बेस्ट वाटला .गुणगुणायला शेवटचा छान वाटला . जरा शुभंकरोतीचा फील आला शेवटच्या ओळीत आवड्ले !
असो
लिहीत रहा सरावाने सफाई येइलच
शुभेच्छा
छानच
छानच
दुसर्या आणि तिसर्या शेरावर
दुसर्या आणि तिसर्या शेरावर रेंगाळलो आहे
दु:ख, तुळशी, बाबा खूप आवडले.
दु:ख, तुळशी, बाबा खूप आवडले.
गझल आवडली, मतला, दुसरा, पाचवा
गझल आवडली,
मतला, दुसरा, पाचवा खूप आवडले
धन्यवाद गणेश
मनपुर्वक आभार मान्यवर
मनपुर्वक आभार मान्यवर स्नेहीजनहो..!
मतला आणि सुरूवातीचे दोन शेर
मतला आणि सुरूवातीचे दोन शेर जास्त आवडले