बंधन

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 30 September, 2014 - 06:40

रविवारची दुपार, त्यात मे महिना.. खूपच उकडत होत, जेवण उरकून झालेल, त्यामुळे घरातले पुरूष मंडळी आणि मुले बाहेर अंगणात , मोकळ्या हवेत बसले होते. मोकळी हवा कसली कोन्डत हवा- चाळीच्या लांबसडक वाटेमधली (चार पावलात समोरच्या घराच दुसर दार) तरीही बसलेले सगळे शांत...दर रविवारी फिरकणारे कुल्फीवाले काका आले. २० वर्षापासूनचा त्यांचा व्यवसाय हा एरिया आणि इथले लोक अगदी तोंडपाठ झाले होते त्यांना, "कुल्फी.... गारेगार कुल्फी" लगेच ऑर्डर घेऊन काका कुल्फी बनवायला बसले सुद्धा आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पा सुरु झाल्या... बोलता बोलता मधेच त्यांनी प्रश्न केला,"स्वराज दादाच लग्न झाल का हो?"

एका चाळीत अस चित्र होत तर त्याच चाळीच्या मागच्या चाळीत गर्दीच गर्दी.. तेराव होत... श्राध्य वगैरे पार पडल... त्या कार्यासाठीच गर्दी जमली होती, त्यांचीही जेवण उरकली होती... सुतक आणि त्यात बुडालेले चेहरे शून्य नजरेने बघत होते. त्याचे आई बाबा धक्क्यातून सावरतच नव्हते. २७ वर्षांचा, त्यांच्या म्हातारपणीचा एकुलता एक आधार, त्यांचा तरुण मुलगा त्यानी गमावला होता. मुलाचे सारे हट्ट त्यानी पुरवले पण एक हट्ट नाकारला शेवटचा. मुलगा आदन्याधारकच होता …आई वडिलांच्या शब्दाबाहेर गेला नाही... सार डोळ्यासमोर येत होत... एखाद्या चलचित्रासारख.

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट्. मल्टीनेशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर रुजू झाल्यानंतर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर तो पर्मनंट झाला. आता तो स्वतहाच्या पायावर उभा होता आणी नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी खंबीर होता. त्या खुशीतच त्याने फोन केला, " हाय, काय करतेस?"तीचा गोड़ आवाज 'काही नाहि विशेष, नेहमिसारख ऑफिस". तीने उत्तर दिले. "मग ऐक, संध्याकाळी लवकर निघ ऑफिस्मधून, घरी जा आणी छान तयार हो. आज मी ठरवल आहे तुला आई बाबांना भेटवायच". आणी पुढे तीच काही न एईकता त्याने फोन ठेवलाही. ती थोडिशी वैतागली, चिडली. "असाच आहे हा". मग हसली अन लाजली. संध्याकाळचे सात वाजले होते, ती तयार होऊन आली. तिच्यावर जीवही ओवाळून टाकेल अस त्याच प्रेम, गेला तीला घरी घेऊन.............. पण त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याच्या प्रेमाला वा लग्नाला इतका विरोध होईल. ती अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी, तिच्या घराण्याची काहीच महिती नव्हती, चांगल्या कुळiतली नसेल असाच त्याच्या घरच्यानी अंदाज बांधला, आणी तिच्या संस्कारी, कुलीन स्वभावाकडे दुर्लक्ष केल. या क्षणी पहिल्यांदा आपल्या उच्च विभूषित आई वडिलांच्या क्षुद्र विचारसरणीचा प्रत्यय त्याला आला. तरीही तो सावरला ती मात्र खचली.... पुढे दोंन वर्ष तो त्याच्या जन्मदात्यांच मन वळवत होता, प्रयत्न करत होता, आपल्या प्रेमाची भिक मागत होता.... दोन वर्ष... खूप काही बदलल पण त्या चौघांचे विचार नाहि बदलले... त्यांच प्रेम संसार रुपी बंधनात बांधल जाउ शकत नव्हत... आणखीन किती? किती वर्ष? ते कंटाळले, थकले, हरलेसुद्धा. आज न उद्या समोरच्याला आपल् म्हणन पटेल या अपेक्षेवर सारे जगत होते. “ऐकेल हो तो आपल्, आपल्या शब्दाबाहेर कधी गेला नाही तो, आता कसा जाईल?" ……..

... ….. कुल्फीवाल्या काकांनी बोलता बोलता मधेच प्रश्न केला,"स्वराज दादाच लग्न झाल का हो?" कोणी काही उत्तर देत नाही हे पाहून त्यांनी आपली बडबड चालूच ठेवली. "नाही म्हणजे कस आहे... हल्ली उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, रात्रीची समुद्रकिनारी खूप गर्दी असते, रात्रीचा मी तिथेच फिरत असतो, आमचा धंदा चांगला चालतो या दिवसात. तर त्याच काय आहे- सांगायचा मुद्दा असा की अलीकडे १०-१२ दिवस झाले मी बघतोय स्वराज दादा रात्री-बेरात्री १-१.३० वाजेपर्यंत समुद्राजवळ फिरताना दिसतात आणि एकटे नव्हे कोणी एक मुलगी असते बरोबर. दोघे हातात हात घालून दूरवर चालत असतात- समुद्राच्या पाण्यामध्ये. एक-दोनदा त्यांना साद घालण्याचा प्रयत्न केलाही, पण अचानकच लांब गेल्यासारखे वाटतात. आणि मग कोणीतरी येत मधेच कुल्फी घ्यायला आणि मग राहून जात. आता एवढ्या रात्री बायकोशिवाय कोणती मुलगी अशी बिंधास्त फिरेल तेही दररोज?.. म्हणून आपल् विचारल. काय कधी झाल त्यांच लग्न?"

त्यांच्याकडून हे ऐकल आणि सर्वांचे चेहरे पांढरेफटक पडले. पण काका हे सारे शुद्धितच बोलत आहेत याची खात्री पटल्यावर कोणीतरी उत्तर द्यायची हिम्मत दाखवली. "स्वराजच्या घराजवळ गर्दी दिसली का आज?""हो... मग?" "आज स्वराजच तेरiव झाल, त्याचीच ती गर्दी.... तेरा दिवसांपूर्वी त्याच आणि त्याच्या प्रेयसीच फुगलेल प्रेत सापडल समुद्रकिनारी... अगदी हातात हात घालून कायमचे झोपले होते ते. जिवंत राहिले असते तर आयुष्यात संसाराच्या बंधनामुळे एकत्र जगू शकले नसते. म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला त्यांनी, आयुष्यIच बंधन झुगारून टाकल. स्वराज तेरा दिवसांपूर्वीच हे जग सोडून गेला आणि जर तुम्ही खरच त्याला बघितल असेल तर तो स्वराज नव्हे, त्याचा आणि त्याच्या प्रेयसीचा आत्मा असेल... मरतो तो देह पण आत्मा कधीच मरत नाही त्यांच्या प्रेमासारखा....त्यांचे आत्मे अजूनही भटकत असतील एकत्र". पुढे कोणीच काही बोलल नाही.... एक शांतता पसरली.... जीवावर बेतणारी...

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑनर किलिंग म्हणत पोटच्या पोरांना मारणारे आईबाप असतात, हे दोघे नशीबवानच म्हणायचे स्वताला एकत्र आयुष्य संपवायची संधी मिळाली ......... माफ करा कडवट प्रतिसाद दिला, कथा आहे ही बातमी नाही.. तरीही राहवत नाही, चीड आहे मला काही प्रकारांची........... एवढं प्रेम करणार्‍यांना जगू द्यायचं

आभार...

पण मग आत्महत्या हाच पर्याय का??????????
>>>>>
वरकरणी पाहता आत्महत्या हे भ्याडपणाचे लक्षण वाटते. जगाशी लढायला जमले नाही म्हणून आत्महत्या केली...
पण नीट विचार केला तर जाणवेल, दुनियेशी नाही तर आप्तेष्टांशी, आपल्याच जीवलगांशी लढायची हिंमत नसल्याने हा आत्महत्येचा पर्याय निवडला जातो. त्यामुळे इथे आत्महत्येचे कारण भ्याडपणा नसून प्रेमातील आणि भावनांमधील सच्चाई असते.

पण आत्महत्या हा मार्ग कधीही योग्य नव्हे.
>>>
कधीही असे तर जगातल्या कुठल्याच गोष्टीला म्हणू शकत नाही.
दुसर्‍याचा खून करण्याचेही जिथे समर्थन करता येते तिथे प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे आपले आयुष्य जगता येत नसेल तर ते संपवण्याचा अधिकार* आहेच. कायदा काहीही बोलो.

तळटीप - मला आत्महत्या करणार्‍यांचे कौतुक आहे असे समजू नका कोणी, मी त्यांच्या भावनांची कदर करतो.