वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सणाच्या निमित्ताने केव्हातरी गोडधोड, तिखट खायला कुणाची ना नाही.
पण 'अरे, नैवेद्याच्या ताटाला मीठ लावायचं नसतं, आता मीठ लावून केलास ना अपशकून?' असं म्हणून सकाळपासून खपलेल्या सूनेला कुणी रागावलं किंवा
'आज सूनेचा तिसरा दिवस तिच्या हातचं देवाला चालत नाही' म्हणून सासू राबराब राबतेय
किंवा 'आपल्या आडनावाचे लांबच्या गावातले ते अमकेतमके आजोबा झाले आता सुवेरात गणपती आणू नाही ना शकत'

असे विचार मात्रं बदलायला हवेत.

देव ही फार मोठी अंधश्रद्धा आहे असे माणून उद्याला जर हे दोन्ही कार्यक्रम बंद केले तर तुम्हाला नाही वाटत की आपण एक फार मोठ्या आनंदाला मुकणार आहोत? मुळात सणवार हे गरीब दीन दु:खी लोकांच्या जीवनात चार क्षण आनंदाचे घेऊन येण्याकरिता आलेले असतात. देवासाठी म्हणून ही लोक चार घास गोड धोड करतात खातात. >>>
----

बी साहेब तुम्हाला ज्यादिवशी श्रध्दा आणि अंधश्रध्दा या संज्ञा कळतील तेव्हा बोलु

साति, हो पण मुळात सण आपण साजरे करतो कारण प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या देवासाठी असतो. बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती सण साजरे करेल का? माझ्यामते नाही.

विनित दवे, मला तुमचे ज्ञान नको. मी अहंकारी व्यक्तीच्या नादी लागत नाही.

असं काय बी?
मी नव्हते का गणेशोत्सव संयोजकांत?
आपल्या त्या ह्यांनीच शोधून काढलंय हे सिक्रेट!
Wink

अहंकारी ? Uhoh

असो कळल तुम्हाला नीट चांगल्या शब्दात विचारले होते त्याला तुम्ही अंहकार म्हणत असाल तर दोष तुमचा आहे ते प्रतिक्रियांवरुन दिसुन येतेच

असो

हेमंत मालवे शेतात पोहचले

साती, ह्याचा अर्थ तू बुद्धीप्रामाण्यवादी नाही. एकीकडे देव मानायचे नाही आणि दुसरीकडे अशा कार्यक्रमात भाग सुद्धा घ्यायचा.

<<<<<देव ही फार मोठी अंधश्रद्धा आहे असे माणून उद्याला जर हे दोन्ही कार्यक्रम बंद केले तर तुम्हाला नाही वाटत की आपण एक फार मोठ्या आनंदाला मुकणार आहोत? मुळात सणवार हे गरीब दीन दु:खी लोकांच्या जीवनात चार क्षण आनंदाचे घेऊन येण्याकरिता आलेले असतात. देवासाठी म्हणून ही लोक चार घास गोड धोड करतात खातात. >>>

. >>>हेच तर बदलायला हवे हे बिच्चरे गरिब लोक स्व्;ता साठि चार घास गोड धोड न खाता
<<<<<<<<<<< देवासाठी म्हणून ही लोक चार घास गोड धोड करतात खातात>>>>मग या साठि कर्ज का काढ्ने होइना खोटे बोलुन चोर्‍या मार्‍या का करने होइना देवा साठि केल तर काय बिघड्त
.
मुळात सणवार हे गरीब दीन दु:खी लोकांच्या जीवनात चार क्षण आनंदाचे घेऊन येण्याकरिता आलेले नसतात
तर व्यापारांच्या जिवनात आनंद घेऊन आलेले असतात. आनि व्यापारि गोर गरिब दीन दु:खी नसतात.
जास्त लिहन्यात अर्थ नाहि.

बी समजुन घ्या विरोध आस्तिक होन्याला नाहि अस्तिकतेच्या नावावर केल्या जानार्‍या कर्मकांडावर आहे.
ज्याला काहि शास्त्रिय आधार नसतो.
आस्तिक होने म्ह्नजे ज्या कुनाबद्द्ल तुम्हाला आस्था आहे त्यानि सांगितलेल्या मार्गा वरुन चालने किंवा त्यानि
सांगितलेले ऊपदेष आचरनात आनने जसे कि राम {मला जास्त देंवा माहित नाहित } रामाला मानताना आपन त्यांच्या सारख वागायचा प्रयत्न करतो का? भावाला लक्ष्मन समजुन वागवतो का?
गांधि जि बद्द्ल आस्था असनारे सत्य आनि अहिंसेच्या मार्गावर चालतात का? घरि रोज गांधिजि चि पुजा करायचि आना बाहेर जाऊन हिंसा तर त्याला आस्तिक म्हनायचे का?

सुरेखजी, तुम्ही जे म्हणत आहात त्याला माणसाची दांभिक वृत्ती म्हणतात. अशा वृत्तीची माणसे तर जागोजागी विखुरलेली असतात. दांभिक असणे ही माणसाची वृत्ती झाली.

तुम्ही गरीब लोकांवर जो आरोप लावला चोरीचा आणि कर्ज करुन सणवार करण्याचा तो वाचून फार वाईट वाटले. काबाडकष्ट करुन जगणारे स्वाभिमानी लोक सुध्दा खूप आहेत.

<<<< एकीकडे देव मानायचे नाही आणि दुसरीकडे अशा कार्यक्रमात भाग सुद्धा घ्यायचा. >>>>> एखादी गोष्ट करण्यामागचा प्रत्येकाचा हेतू वेगळा असू शकतो. मनोरंजन, लोकामध्ये मिसळणे या हेतूसाठी सुद्द्धा अश्या कार्यक्रमात भाग घेणारे बरेच असतात. किंबहुना आस्तिक लोकांचे सुद्धा हेच प्रबळ हेतू असतात (असे मला वाटते.) आता सार्वजनिक गानेशोत्सावाचेच उदाहरण घ्या. टिळकांनी तो 'सार्वजनिक' केला कारण - जनसंघटन व जनजागृती.

<<<<<तुम्ही गरीब लोकांवर जो आरोप लावला चोरीचा आणि कर्ज करुन सणवार करण्याचा तो वाचून फार वाईट वाटले. काबाडकष्ट करुन जगणारे स्वाभिमानी लोक सुध्दा खूप आहेत.>>>>>शब्दशा अर्थ घेउ नकात उद; दिले
वाईट वाट्ले असेला तर माफ करा.{मना पासुन माफि मागते }

दांभिक वृत्ती असने ,आस्तिक असने, नास्तिक असने म्हनजे काय?
आडान्या सारखा प्र्श्न आहे का?

इतरांच्या भावनांचा विचार करतांना आपल्या भावनांचा आपण बळी देत नाही ना हे ही पहायला हवं.
आणि तडजोडी एकतर्फी असायची आवश्यकता नाही. >>> ह्याला प्रचंड अनुमोदन !

प्रकाश घाटपांडे, परस्परांसाठी त्याग-त्याग खेळण्याची आवश्यकता नाही. बहुतांश वेळा 'जगा आणि जगू द्या' तत्वावर सहकार्याने जगता येते. समाजशील प्राणी असल्यामुळे जेव्हा तडजोड करायची वेळ येईल तेव्हा आलटून-पालटून एकमेकांच्या मनासारखे करणे साधणे एवढे अवघड आहे का ?
उदा. शनिवारी केस कापायचे नाहीत असे म्हणणे असेल तर तुम्ही तुमच्यापुरते पाळा, जोडीदारावर ते मत लादू नका. देवाला दिवा लावल्याखेरीज घराबाहेर पडायचे नाही असा नेम असेल तर तुम्ही लावा ( अर्थात जोडीदाराच्या प्रेमाखातर विश्वास नसूनही कुणी स्वखुशीने कुणासाठी काही करत असेल तर आक्षेप घेणारे आपण कोण Happy )
घराच्या भिंतीवर आपल्या गुरुंचे आशीर्वाद उमटवलेले असतील तर आपले कल्याण होईल अशी ( अंध) श्रद्धा असेल तर त्यावर विश्वास नसणारा जोडीदार त्याकडे दुर्लक्ष करुन घरात राहील कदाचित कारण त्यासाठी त्याच्या वर्तनावर निर्बंध येत नाहीत.

ह्याबाबतीतल्या सगळ्या सीमारेषा तशा बर्‍यापैकी लॉजिकल असतात.

सुरेखजी,

दांभिक म्हणजे ढोंगीपणा. एखाद्या गोष्टीचा आव आणणे. ईंग्रजीमधे हिपोक्राईट

आस्तिक म्हणजे एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणे. नास्तिक ह्याच्या अगदी विरुद्ध .. श्रद्धा नसणे.

आस्तिक = सश्रद्ध
नास्तिक = अश्रद्ध
बुद्धीप्रामाण्यवादी = जर एखादी गोष्ट सिद्ध करुण दाखवली.. जसे की विज्ञानाच्या मदतीने तरच ती मानायची. नुस्ता कोरडा विश्वास बाळगायचा नाही. इतर कोणी म्हणाले की हे अमुक अमुक असे आहे तर त्याला हो न म्हणता आधी बुद्धीने विचार करुन .. शास्त्रिय कारण जाणून मगच तिच्यावर विश्वास ठेवायचा. जसे की ही धरती गोल आहे हे आपण पाहिले नाही पण विज्ञान म्हणाते ना मग नक्कीच असेल.

बी खुप सुंदर शब्दात सांगितले आहे.
मग कदाचित मि सश्रद्ध मधे बसत असावि मला असे वाट्ते कि आपल्या आचरनात धर्म असावा जसे कि मि
(१) प्राण्यांची हत्या करणार नाही, (२) न दिलेली वस्तू घेणार नाही, (३) वैषयिक मिथ्याचार करणार नाही, (४) खोटे बोलणार नाही व (५) मादक पदार्थाचे सेवन करणार नाही.हि माझि सश्रद्ध आहे.आता हि माझि सश्रध्दा मि एका पोथित लिहुन रोज १००० वेळा वाचलि व आचरन याच्या ऊलटे केले तर त्याला काय म्ह्नायचे.?

छान लिहिते आहेस सुरेख. तुला काय म्हणायचे आहे ते अगदी मनापासून पटते. मुळात श्रद्धा आणि कर्मकांडाचा परस्पर संबंध काय? - हा विचारच होत नाही. कर्मकांड, व्रतवैकल्य ही तथाकथित श्रद्धावंत लोकांची साधनं कुण्या आपल्याच धर्मातील संत-महात्म्यानं आचरात आणली होती काय?

बी, तू जो दांभिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहेस त्यावर मी खूप विचार करत आले आहे आणि मला वाटतं, मला आता समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे.

मागे रैनाने एका धाग्यावर 'रिलिजियस बोनचा' उल्लेख केला होता. तसं माझा जर विश्वास नाही तर मी पूजांमध्ये, उत्सवात सहभागी का व्हावं आणि एका मर्यादेपर्यंत ते मला का आवडावं ? हा दांभिकपणा असतो का ? तर तो दांभिकपणा नसतो.

मुद्दे लिहून स्पष्ट करते :

१. एकतर माझी जडणघडण ह्या वातावरणात झाली आहे त्यामुळे मंत्रोच्चार, धूप-कापूर-अत्तराचा सुवास, घंटानाद, शंखनाद, झांजा आणि इतर वाद्यं, फुलं, प्रसाद, होम ( जास्त धूर झाल्यास मला अगदी नको होते हा भाग वेगळा ), लोकांचे पारंपारिक पेहराव ह्या सगळ्याची सांगड आनंदाशी आणि प्रसन्नतेशी घातली गेली आहे. क्लासिकल कंडिशनिंग आहे हे चक्क ! हे कंडिशनिंग नाकारण्यात अनावश्यक ऊर्जा खर्च करण्याची काय आवश्यकता आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे ? ती ऊर्जा दुसर्‍या जास्त विधायक कामांसाठी वापरलेली बरी.

२.चित्तवृत्ती आनंदी ठेवणे, सांस्कृतिक संदर्भ असलेल्या एका समान व्यासपीठावर ( उदा. दिवाळी, गणेशोत्सव ) चार लोकांत मिसळावेसे वाटणे आणि त्यानिमित्ताने आपल्या रुट्सशी नाळ जोडलेली ठेवणे - ह्यात भाषा, खाद्यसंस्कृती, पेहराव, गाणी, इतर कला असे सगळेच येते ह्याचा श्रद्धा/ अंधश्रद्धेशी काहीच संबंध नाही.

३. ह्यातला संस्कृतीशी संबंधित भाग बाजूला ठेवला तरी प्रकाश, सुगंध, स्वर हे आनंदाची आणि प्रसन्नतेची अनुभूती देतातच. त्यामुळे दिवाळीतला आकाशकंदील किंवा पणत्यांची रोषणाई पाहून जितके प्रसन्न वाटते तितकेच ख्रिसमसची रोषणाई, चर्चची बेल ऐकूनही वाटते.

४. जोपर्यंत ह्या श्रद्धा / अंधश्रद्धा निरुपद्रवी पातळीवर आहेत तोपर्यंतच त्यात इतर कारणांसाठी ( जी पहिल्या दोन मुद्द्यांत स्पष्ट केलेली आहेत ) सहभागी होण्याचा आनंद आहे. उदा. एका ठराविक विधीच्या वेळी बळी दिला जात असेल किंवा करणारा माणूस स्वतःला आणि इतरांना इजा पोचवत असेल ( दाभणं टोचणे वगैरे ) किंवा सार्वजनिक समारंभातील ध्वनीप्रदूषण, फटाके, चेंगराचेंगरी हे जिथे येईल तिथे मी सहभागी होऊ शकत नाही.

५.निरुपद्रवी श्रद्धांच्या बाबतीत जोपर्यंत माझी भूमिका निरीक्षकाची आहे तोपर्यंत ठीक आहे पण मला त्या पाळण्याची सक्ती केली तर अर्थातच चालणार नाही किंवा त्यातल्या काही पाळल्या तर ती इतर काही गोष्टींसाठी केलेली तडजोड असेल.
ह्याचा अर्थच माझा आनंद त्या अंधश्रद्धेत नसून त्या अनुषंगाने येणार्‍या दुसर्‍या गोष्टींत आहे.

६. जर माझा एखाद्या गोष्टीवर विश्वास नसेल किंवा मला ती करायला आवडत नसेल तर बघायलाही आवडू नये हे गृहितक तसेही चुकीचे आहे. कंडिशनिंग हा एक भाग झाला. कुतूहल/ मनोरंजन हा अजून एक. ह्याची उदा. रोजच्या जगण्यात पदोपदी सापडतील. तुम्हाला चित्रपट/ नाटकं बघायला आवडतात म्हणजे स्वतः अभिनय करायला आवडावे असे नाही, खवय्ये आहात म्हणजे रांधायला आवडेलच असे नाही, वाचायला आवडते पण लिहायची आवड असेलच असे नाही इत्यादी.

फार शांत वाटले हे लिहून. माझ्या मनातला संभ्रम संपला आज Happy

मला वाटतं, आस्तिक म्हणजे देवावर श्रद्धा असणारा किंवा सजीवांची आयुष्य नियंत्रित करणारी कुणी एक शक्ती आहे ह्या विचारावर श्रद्धा असलेला.
नास्तिक म्हणजे अशी कुठलीही शक्ती नाही हे मानणारा वर्ग.

दाभोळकरांचं एक खूप छान वाक्य आहे ह्याबाबतीत. पुस्तकात बघून मग लिहीन.

छान प्रतिसाद आहे अगोंचा:

मात्र त्यातील हे एक वाक्यः

>>>जोपर्यंत ह्या श्रद्धा / अंधश्रद्धा निरुपद्रवी पातळीवर आहेत तोपर्यंतच त्यात इतर कारणांसाठी ( जी पहिल्या दोन मुद्द्यांत स्पष्ट केलेली आहेत ) सहभागी होण्याचा आनंद आहे<<<

निरुपद्रवी ही कल्पना सापेक्ष म्हणावी लागेल. रोषणाई, पेहराव, मिठाई हे दिवाळीतील घटक निरूपद्रवी आहेत असे आपण म्हणू शकू, पण एखाद्या गरीबाला ते परवडत नसू शकतील. त्याला कर्ज काढून ते करावे लागत असतील तर तो त्याला झालेला उपद्रवच आहे. मग त्याने ते करूच नये असे आपण म्हणू शकू, पण त्याला स्वतःला ते करावेसे वाटत असेल, मे बी मुलांसाठी वगैरेही! मग दिवाळी ज्याला परवडते त्यानेच साजरी करावी का असा प्रश्न उपस्थित होईल आणि मग अशी प्रश्नांची एक अखंड मालिकाच तयार होऊ लागेल. आपण ज्या गल्लीत राहतो तेथील गणेशोत्सवाची वर्गणी भरणे, मिरवणूकीत सहभागी होणे, विविध गुणदर्शनात मुलाचे गायन ठेवणे, ऑर्केस्ट्रावर थिरकणे आणि फन फेअरला स्टॉल ठेवणे ह्यातून गणपतीला नमस्कार करणे हे वेगळे काढण्याची तरी गरज काय? केवळ तिथे हात जोडणे ही अंधश्रद्धा आहे म्हणून? जर सुगंध, स्वर, प्रकाश ह्याने पवित्र व प्रसन्न वाटतेच तर गणेशाच्या दर्शनानेही तसे वाटण्याचे कंडिशनिंग झालेले नसते का? फक्त श्री गणेशाला हात जोडायच्या वेळी 'मला हे पटत नाही' ही विचारधारा का अंमलात आणायची? आणि प्रसन्नच वाटून घ्यायचे असेल तर दिवाळीतच दिवाळी साजरी का करायची? जमेल तेव्हा, परवडेल तेव्हा का नाही करायची? जून महिन्यात आकाशकंदील लावला तर लोक हासतील ह्याची भीती का बाळगायची?

वगैरे!

असे अनेक प्रश्न निर्माण होत राहतील.

प्रत्येकजण आपापल्या भूमिकेशी ठाम राहणार व प्रत्येकाला आपलीच भूमिका योग्य वाटणार!

प्रत्येकाला आपलीच भूमिका योग्य वाटणार!
<<
व्हय जी.
यवरीबडी इज करेक्ट इन हिज ओन पाइंट आफ व्ह्यू.

गणपतीला नमस्कार करून बरं वाटतं इथपर्यंत ठीक असतं. नमस्कार नाही केला की अपराधीपणाची भावना आली तर प्रॉब्लेम. नमस्कार करावासा वाटत नसताना करायची सक्ती झाली, किंवा करावासा वाटत असताना (आज तू विटाळशी/सोयरात/सुतकात आहेस किंवा तत्सम कुठल्याही कारणासाठी) न करण्याची सक्ती झाली तर प्रॉब्लेम.

'मी अमुक गोष्ट का करतो आहे' याचं 'छान वाटतं म्हणून' हे उत्तर काहींना पुरतं, काहींना नाही पुरत.

नमस्कार नाही केला की अपराधीपणाची भावना आली तर प्रॉब्लेम. >> प्रॉब्लेम का? म्हणजे तुम्ही भलेही नास्तिकाचा अनेक टेस्ट पास करू शकत असाल पण तुम्ही कदाचित आस्तिक असू शकाल की.

हे वाक्य सोडलं तर पोस्टशी सहमत.

--

मुळात आस्तिक आणि नास्तिक असणे म्हणजे माझ्यामते प्रॉब्लेम नाही. श्रद्धेच्या उपद्रव मुल्यावर सगळे पर्स्पेक्टिव्ह अवलंबून आहेत.

डोळस आणि म्हणून अंधश्रद्ध नसणारे आस्तिक नसू शकतात का? की नास्तिक असणे म्हणजेच रॅशनल?

डोळस आणि म्हणून अंधश्रद्ध नसणारे आस्तिक नसू शकतात का? की नास्तिक असणे म्हणजेच रॅशनल?

बरोबर

मुळात आस्तिक आणि नास्तिक असणे म्हणजे माझ्यामते प्रॉब्लेम नाही. श्रद्धेच्या उपद्रव मुल्यावर सगळे पर्स्पेक्टिव्ह अवलंबून आहेत.>>>>

डोळस आणि म्हणून अंधश्रद्ध नसणारे आस्तिक नसू शकतात का? की नास्तिक असणे म्हणजेच रॅशनल?>>>>

+१

केदार, बेफींच्या वर्गणी व्हर्सेस नमस्कार प्रश्नाचं ते उत्तर होतं.
मुद्दा लक्षात घे.
अमुक नाही केलं म्हणून गिल्ट येतो - भटजी बोलावून शांत करा. मुळात ते अमुक का करायचं होतं हेही माहीत नसताना पुढचे विधी करायचे. गौरीच्या जेवणाला सोळा भाज्या झाल्या नाहीत - आता काहीतरी अशुभ होणार म्हणून डोक्याला हात लावून बसायचं - जसे काही गौरीगणपती हिशोबाच्या वह्या घेऊन बसतात मखरात. पितर उपाशी राहतील म्हणून श्राद्धं घालायची, हा कोपेल म्हणून नागबळी, तो रागावेल म्हणून सोळा सोमवार.. कुठे राहिला आनंद?!

Pages