वरी कोसळे अंबराचा जिव्हाळा, दुजा स्वर्ग ऐसे दिसे विश्व डोळा
असे हे जगाचे फिरे चक्र बाळा, हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा
...पुन्हा पावसाळा असे जरी असले तरी त्याचे येणे सुखावह असते. प्रत्येक वेळी त्याचे रूप वेगळं असतं. कधी सुखावणार तर कधी दुखावणारं. पण काहिही असलं तरी त्याच्या येण्याने आनंद न होणारा मनुष्य विरळाच. वळवाचा पाऊस, आषाढात गरजत बरसणारा धुवांधार पाऊस, श्रावणात उनपावसाचा खेळ खेळत बरसाणारा पाऊस तर भाद्रपदात रिमझिम झरणारा पाऊस. वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरं या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणाऱ्या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात. अशा या वेड लावणार्या पावसाचे रूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. घाटमाथ्यावर कमी-अधिक तर कोकणात धुवांधार.
घाटमाथ्याला कोकणात जोडणार्या सह्याद्रीच्या घाटरस्त्याचे सौंदर्य तर काही औरच. पुण्याहुन मुळशीमार्गे माणगाव कोलाडला जाणारा "ताम्हिणी घाट", भोर मार्गे महाडला जाणारा "वरंधा घाट", कराडहुन चिपळुणला जाणारा "कुंभार्ली घाट", तर कोल्हापुरहुन कोकणात उतरणारा "अंबा घाट" ,"फोंडा घाट", "गगनबावडा" आणि "आंबोली घाट". प्रत्येक घाटरस्त्याचे सौंदर्य पावसात किंवा पाऊस पडुन गेल्यावर जरा जास्तच खुलते. एखाद्या जर्जर वृद्धेचे अल्लड नवतरूणीत रूपांतर व्हावे असा या घाटरस्त्यांचा पावसात कायापालट होतो. अशाच एका देशावरच्या गावाला कोकणाशी जोडणार्या अशाच एका "वरंधा घाटाचा" हा चित्र परीचय.
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
ऋतु हिरवा..... ऋतु बरवा
प्रचि ०१
सांग चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
निरा भाटघर धरण
प्रचि ०२
चंद्रहार
प्रचि ०३
निरा देवधर धरण
प्रचि ०४
वरंधाच्या वाटेवर
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
वरंधा घाट
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
शिवथर घळ
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
(प्रचि सौजन्यः जिवेश)
प्रचि ३६
पुन्हा भेटुच
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
खूप सुंदर फोटो ! प्रची २४.
खूप सुंदर फोटो ! प्रची २४. मधला रस्ता तर स्वर्गीय !
डोंगर ,मखमली हिरवळ ,धबधबे सारेच मस्त ! चंद्रहार पण सुरेख टिपला आहे .>>>पूर्ण अनुमोदन
२० वर्षांपूर्वी नवीन लग्न झाले तेव्हा मित्राची अॅंबॅसिडर घेऊन वरंधा घाटात गेलो होतो, अप्रतिम आठवणी अजून जाग्या आहेत.
व्वा! जिप्सी कसले मखमली,
व्वा! जिप्सी कसले मखमली, हिरवे डोंगर दर्या.... खुप सुरेख...प्र.ची ११, १२ आणि २४, २५ खुपच आवडल्या
१५ नं पासुन कावळ्याचे फोटो
१५ नं पासुन कावळ्याचे फोटो मस्त आहेत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
पुण्याहून public transport ने शिवथर घळ च्या स्टेशन ला उतरलं तर घळीपर्यंत चाल्नेबल distance आहे का >>>>हो अगदी स्वारगेटहुन शिवथर अशी एसटी सुद्धा आहे.
व्वा ! अप्रतिम
व्वा ! अप्रतिम प्र.चि.
चंद्रहार खूप छान दिसतोय.
प्र.चि. १० ते १५ तर अक्षरशः डोंगर्-दर्यांनी हिरवीजर्द शाल पांघरली आहे असेच वाटते..... मस्तच !
निसर्गराजाने अगदी खूष केले
निसर्गराजाने अगदी खूष केले जिवाला.
अन् घळीपाशी खाली एक काका फार
अन् घळीपाशी खाली एक काका फार मस्त जेवण देतात
घळीपाशी खाली एक काका फार मस्त
घळीपाशी खाली एक काका फार मस्त जेवण देतात>>>>विनिता, तिथेच पिठलं भाकर खाल्ली.
रम्य !!!!!
रम्य !!!!!
जिप्सीभाऊ सलाम घ्या बंद्या चा
जिप्सीभाऊ सलाम घ्या बंद्या चा ! गेल्या शनिवार रविवार आपली भेट अगदी होता होता राहिली म्हणायची
आम्ही वरंधा cancel करून बहोत परिसरात गेलो तिथून पुढे राईरेश्वर. थोडे फार फोटो मिळाले आहेत ते पोस्तेन लवकरच.
साहेब चंद्रहार कमाल पकडला आहात. लेन्स कुठली हो ?
सोनकी नि कळवा फुल लहान होती. मला वाटत कि अजून २ आठवड्याने जाव परत. घाटातला जांभळा तेरडा कमाल आलाय.
दुरून यष्टी साजरी
प्राची ३८ - RBG फोटो सुंदर
धम्माल आली भाऊ फोटो पाहून
तो प्राची ८ मधला धबधबा जर रस्त्यःच्या बाजूला आतमध्ये आहे तोच का? गेल्या वर्षी त्या धबधब्याचा एक फोटू मिळाला होता. हा बघा
धन्यवाद अमित फोटो मस्तच हो
धन्यवाद अमित
फोटो मस्तच
हो तोच धबधबा आहे. धबधब्याखाली थोडी गर्दी होती म्हणुन वरच्या भागाचाच फोटो काढला.
सर्वच प्रचि, खुप
सर्वच प्रचि, खुप सुंदर!!!!!!!!!
वाह!!! एकेक फोटो म्हंजे
वाह!!! एकेक फोटो म्हंजे आँखोंकी ठंडक आहेत रे..
घरीच घेऊन आलास थेट सगळा निसर्ग... __/\__
वावा!!! काय सुंदर आलेत
वावा!!! काय सुंदर आलेत फोटो!!
तिथे कुठे राहिलात जिप्सी की एक दिवसाची सहल केलीत?
मस्त ! डोळे निवले.
मस्त ! डोळे निवले.
ज्याम भारी ..
ज्याम भारी ..
वा! एकसे एक सुरेख!!
वा! एकसे एक सुरेख!!
जिप्सी: समर्थांच्या
जिप्सी:
समर्थांच्या वास्तव्याने मंतरलेला प्रदेश हा.. त्याचे फार अप्रतिम फोटोज आणि साजेसे वर्णन...
एकदम फ्रेश वाटतं तुझे फोटोज बघून...
अप्र्तिम!!!!!!!!!!!!!!
अप्र्तिम!!!!!!!!!!!!!!
जिप्स्या मस्तच फोटो.. काही
जिप्स्या मस्तच फोटो.. काही फोटो तर फ्रेम करण्यासारखे आलेत विशेषतः घाट उतरल्या नंतरचे.... असाच फिरत रहा पण वर आशु म्हणाल्याप्रमाणे एखाद्या ट्रेकचे पण फोटो येऊदेत..
वर मोर्यांचा वाडादेखील (म्हणजे वाड्यांचे अवशेष) आहे ना?>>>>> मोर्यांचा वाडा घळीपासून वर जाणार्या वाटेने गेल्यावर येतो (चेरवडी गावाच्या दिशेने) पण शिवथरघळ ते वाडा अंतर बरेच आहे अंदाजे ४५-६० मिनीटे चालावे लागते ...
रच्याकने.. अरे मी पण १३-१४ च्या विकेंडला रविवारी शिवथरघळीतच होतो... आम्ही केळदवरून ट्रेक करून आलेलो..
मी उनाळ्यात गेलो होतो मागच्या
मी उनाळ्यात गेलो होतो मागच्या वर्षि पन फोटो बघुन पुढ्च्या पावसाळ्यात नक्कि जाइन.....
मी याच गावाची. पुन्हा एक्दा
मी याच गावाची. पुन्हा एक्दा माझी गावाशी नव्याने ओळ्ख..:)
क्या बात है मस्त अमोल केळकर
क्या बात है
मस्त
अमोल केळकर
जिप्सी खूपच अप्रतिम
जिप्सी खूपच अप्रतिम फोटो.तुम्ही भेट दिली त्या जवळच रामदास पठार नावाच गाव आहे. समर्थांचे वास्तव्य असलेली शिवथर प्रांतातिल घळ तेथे आहे तुम्ही त्या ठिकाणी भेट द्याल तर चांगला अनुभव मिळेल.घळईतून समोर दिसणार द्रुश्य खूपच मोहक आहे.
तुमच्या कँमेरातून ती द्रुश्य बऱ्याच लोकांपर्यंत पोहचू शकतील.
जिप्स्या, अप्रतिम फोटो आलेत
जिप्स्या, अप्रतिम फोटो आलेत रे..
घाटाचे फोटो अक्षरशः breath taking आहेत.
बाकी कितीही जूनी झालेली असली तरी लालचुटूक S.T. बस घाटाची शोभा कायच्या काय वाढवते हे मात्र खरं.
हीच S.T. बस बघून पूर्वी मी प्रचंड Nostalgic होत असे. आतल्या लोकांचा हेवा करीत असे.. ते कोकणात चाललेत म्हणून.
सह्ही, ग्रेट, चाबूक,
सह्ही, ग्रेट, चाबूक, क्लास....
जिप्स्या, नेहेमीप्रमाणेच
जिप्स्या, नेहेमीप्रमाणेच अतिशय खल्लास!
अप्रतिम !
अप्रतिम !
एकसे बढकर एक फोटो आहेत रे...
एकसे बढकर एक फोटो आहेत रे... दिल गार्डन गार्डन हो गया !
अप्रतिम !!
अप्रतिम !!
Pages