वरी कोसळे अंबराचा जिव्हाळा, दुजा स्वर्ग ऐसे दिसे विश्व डोळा
असे हे जगाचे फिरे चक्र बाळा, हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा
...पुन्हा पावसाळा असे जरी असले तरी त्याचे येणे सुखावह असते. प्रत्येक वेळी त्याचे रूप वेगळं असतं. कधी सुखावणार तर कधी दुखावणारं. पण काहिही असलं तरी त्याच्या येण्याने आनंद न होणारा मनुष्य विरळाच. वळवाचा पाऊस, आषाढात गरजत बरसणारा धुवांधार पाऊस, श्रावणात उनपावसाचा खेळ खेळत बरसाणारा पाऊस तर भाद्रपदात रिमझिम झरणारा पाऊस. वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरं या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणाऱ्या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात. अशा या वेड लावणार्या पावसाचे रूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. घाटमाथ्यावर कमी-अधिक तर कोकणात धुवांधार.
घाटमाथ्याला कोकणात जोडणार्या सह्याद्रीच्या घाटरस्त्याचे सौंदर्य तर काही औरच. पुण्याहुन मुळशीमार्गे माणगाव कोलाडला जाणारा "ताम्हिणी घाट", भोर मार्गे महाडला जाणारा "वरंधा घाट", कराडहुन चिपळुणला जाणारा "कुंभार्ली घाट", तर कोल्हापुरहुन कोकणात उतरणारा "अंबा घाट" ,"फोंडा घाट", "गगनबावडा" आणि "आंबोली घाट". प्रत्येक घाटरस्त्याचे सौंदर्य पावसात किंवा पाऊस पडुन गेल्यावर जरा जास्तच खुलते. एखाद्या जर्जर वृद्धेचे अल्लड नवतरूणीत रूपांतर व्हावे असा या घाटरस्त्यांचा पावसात कायापालट होतो. अशाच एका देशावरच्या गावाला कोकणाशी जोडणार्या अशाच एका "वरंधा घाटाचा" हा चित्र परीचय.
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
ऋतु हिरवा..... ऋतु बरवा
प्रचि ०१
सांग चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
निरा भाटघर धरण
प्रचि ०२
चंद्रहार
प्रचि ०३
निरा देवधर धरण
प्रचि ०४
वरंधाच्या वाटेवर
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
वरंधा घाट
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
शिवथर घळ
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
(प्रचि सौजन्यः जिवेश)
प्रचि ३६
पुन्हा भेटुच
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
एकदम फ्रेश सुरूवात झाली
एकदम फ्रेश सुरूवात झाली
प्रचि अन लिखाण नेहमीप्रमाणेच क्लास
मस्त!
मस्त!
सुंदर प्रचि व वर्णन!
सुंदर प्रचि व वर्णन!
जिप्सी, एकापेक्षा एक !!!
जिप्सी, एकापेक्षा एक !!! सुंदर वर्णन आणि प्रचि.
सोमवारची सुंदर सुरवात.
खालून माझेरीकडून गेलात का
खालून माझेरीकडून गेलात का शिवथरला? मधे कावळ्याजवळ उतरून घळीपर्यंत जायची पायवाट आहे का अजून?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
खालून माझेरीकडून गेलात का शिवथरला?>>>>माझेरीच्या अलिकडे एक किमी आधी फाटा होता, तेथुन गेलो.
कावळ्याजवळ उतरून घळीपर्यंत जायची पायवाट आहे का अजून?>>>>>हे माहित नव्हतं.
भोरला इंटर्नशिपला असताना त्या
भोरला इंटर्नशिपला असताना त्या धरणात लाँचवर एक दवाखाना होता, त्यात ड्यूटी असायची. पलिकडच्या गावांसाठी ती ओपीडी असे. तो तरंगता दवाखाना अजून आहे की नाही कल्पना नाही.
तसेच महिन्यातून एकादेवेळीतरी शिवथरला जात असू, सोबत औषधे घेऊन. छोटी ओपीडी चालायची तिथे. तेव्हा माझेरीकडचा रस्ता झालेला नव्हता. पायथ्यापर्यंत गाडी सहज जाउ शकत नसे. ट्रेक करत पायी जाणे सोयीचे होते.
गुहेसमोर कोसळणार्या त्या धबधब्याकडे वर गेलात का? एकाखाली एक मोठी होत जाणारी ६-७ कुंडं अन टिंकू धबधबे आहेत वरती.
प्रचि २५ विशेष आवडला.
प्रचि २५ विशेष आवडला. वाडीचा मुड मस्त टिपलाय.
गुहेसमोर कोसळणार्या त्या
गुहेसमोर कोसळणार्या त्या धबधब्याकडे वर गेलात का? एकाखाली एक मोठी होत जाणारी ६-७ कुंडं अन टिंकू धबधबे आहेत वरती.>>>>नाही ना. वेळेअभावी जाता आले नाही. मुंबईहुन भोर मार्गे एका दिवसाची वरंधा, शिवथर अशी भटकंती होती. वर मोर्यांचा वाडादेखील (म्हणजे वाड्यांचे अवशेष) आहे ना?
अहा... डोळ्यान्ना सुखावणारा
अहा... डोळ्यान्ना सुखावणारा हिरवा हिरवा रन्ग!!
प्रचि २५व्यातल्या गावावर फिदा आपण!!
सुंदर
सुंदर प्रचि..............अप्रतिम
सर्वच प्रची सुरेख!
सर्वच प्रची सुरेख!
वाळवटात बसुन हे फोटु
वाळवटात बसुन हे फोटु पाहिलेत आणी मन प्रसन्न झाले - डोळे निवले....... अती सुन्दर ....
जिप्सी, खुपच भारी फोटोज,
जिप्सी, खुपच भारी फोटोज, तुमच्या फोटोजचा चाहता आहे मी... अप्रतिम..
वरंधा घाटची मजा काही औरच... तिथला चहा, भजी, वडापाव... आहाहा!!
पुण्याहून public transport
पुण्याहून public transport ने शिवथर घळ च्या स्टेशन ला उतरलं तर घळीपर्यंत चाल्नेबल distance आहे का ?
वा! वा! भाटघर धरणाच्या काठाशी
वा! वा!
भाटघर धरणाच्या काठाशी दोन वर्षं राहिलो आहोत. पावसाळ्यात फार भारी असतो तो परिसर. (आणि धरणातलं पाणी लालबुंद! घरी टॉयलेट-बाथरूमला तेच लाल पाणी यायचं नळातून अक्षरशः चहा वाहतोय असं वाटायचं.)
एकदा भर पावसाळ्यात काहीही प्लॅन न करता, अंतरांचा काहीही अंदाज नसताना नातेवाईकांना गोळा करून दोन कार आणि दोन बाईक्स घेऊन दुपारनंतर शिवथरघळीचा रस्ता पकडला होता. जरा वेळानं बरोबरचे ज्ये.ना आणि लहान मूल दोघंही कंटाळले आणि आम्ही अर्ध्या वाटेतून परतलो
अप्रतिम... मस्तच रे.
अप्रतिम...
मस्तच रे.
जिप्सी, खुपच सुरेख फोटोज,
जिप्सी,
खुपच सुरेख फोटोज, धरणाचे अजुन फोटो हवे होते.
नेहमीप्रमाणेच सुंदर !
नेहमीप्रमाणेच सुंदर !
मस्त! अगदी डोळ्याचं पारणं
मस्त! अगदी डोळ्याचं पारणं फिटलं तो हिरवा रंग बघून. चंद्रहार अफलातून!
प्रचि ३५ ही फार आवडला.
जिप्स्या - आता हे गुडीगुडी
जिप्स्या - आता हे गुडीगुडी फोटो पाहून समाधान होत नाही. सह्याद्रीचे रांगडे सौंदर्य तुझ्या कॅमेरातून बघण्याची इच्छा आहे. त्यामुळे लवकरात लवकर एखादा भन्नाट ट्रेक कर आणि तो येऊ दे...
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
आता कोणत्या फोटोला सुन्दर
आता कोणत्या फोटोला सुन्दर म्हणावे देव जाणे.:स्मित: पण जिप्सी तुला सतत अशा सुरेल प्रवासाची सन्धी मिळु दे, म्हणजे आम्हाला पण पोटभर मेजवानी.
एक सान्गावेसे वाटतेय. तू कदाचीत उद्धव ठाकरेन्चे गड किल्ले असे फोटो असलेले पुस्तक बघीतले असशीलच. तर त्या पुस्तकात मी एक गणपती मन्दिराचा लेण्यासदृष्य फोटो बघीतला होता, जवळच मसत धबधबा वगैरे आहे. लोकान्ची वर्दळ आहे. ते ठिकाण मुरबाड तालुक्यात डोन्गरात आहे. आता मस्त पाऊस झालाय. तेव्हा जमल्यास जाऊन ये अगदी सहपरीवार पण जा, कारण फोटोवरुन तरी मला ते आवडले. मात्र ते पुस्तक माझ्या कडे नसल्याने डिटेल्स देऊ शकत नाही.
फोटो पाहून जल्ला कालिज हिरवा
फोटो पाहून जल्ला कालिज हिरवा झाला !
एका पेक्षा एक क्लासिक फोटो
एका पेक्षा एक क्लासिक फोटो आहेत. नं १४, हिरवाईतली लाल एस टी बस एकदम अफलातून.
सुंदर प्रचि व वर्णन! प्रचि ७
सुंदर प्रचि व वर्णन!
प्रचि ७ मध्ये कोणती फुले आहेत.
प्रचि २५ खुप आवडला.
सुंदर!! एकदम फ्रेश!!
सुंदर!! एकदम फ्रेश!!
चंद्रहार बघून खपलो
चंद्रहार बघून खपलो !!!!!
एकूणच डोळे थंडहिरवेगार झाले
अप्रतिम ..
अप्रतिम ..
खूप सुंदर फोटो ! प्रची २४.
खूप सुंदर फोटो ! प्रची २४. मधला रस्ता तर स्वर्गीय !
डोंगर ,मखमली हिरवळ ,धबधबे सारेच मस्त ! चंद्रहार पण सुरेख टिपला आहे .
Pages