कुठून हे बावळट ध्यान माझ्या गळ्यात पडल कोण जाणे ...कोण ?... म्हणून काय विचारताय अहो तुमच लाडक श्रीबाळ ...मी सहजच एकदा त्याला म्हंटले, “आठवणी विसरता येतात पण प्रेम नाही” झाल आता तेच वाक्य आठवून रोज रडत बसलेला असतो येडछाप कुठला आणि दिसेल त्या बाईला आई म्हणण्याची त्याची सवय पार डोक्यात जाते माझ्या ...तरी नशीब माझे मला ‘बायको आई’ म्हणत नाही...हे श्रीबाळ परवडल पण त्याच्या त्या सहा आयांनी डोक्याला वात आणला आहे नुसता..सहाजणींच्या सहा तरा...
सगळ्यात आधी श्रीची पदरआई म्हणजे आमच्या सासूबाई त्यांना तर कायम रड लागलेली असते पदर कायम तोंडाला लावलेला रडतानाही आणि हसतानाही... त्यांच्या त्या रडराडीला कंटाळूनच तर श्री चे बाबा घर सोडून गेलेले ते आता कुठे उगवले आहेत तरीही आपली ह्यांची रडारडी अजून सुरूच ते बहुतेक परत कल्टी मारतील....दुसऱ्या म्हणजे मोठी आई त्यांच्यासाठी कथालेखक संवाद लिहिण्याची तसदीच घेत नाही (त्या आपल्या ह्यांनी त्यांनी म्हंटलेले संवाद बोलून दिवस ढकलत आहेत) असो ते जावूदे ..तर माझ्या कृपेनेच त्याचं स्वतःच एक बुटिक आहे ...आता एवढ बुटिक आहे तर सुनेसाठी कधी काळी चार चांगले ड्रेस शिवावेत तर कसलं काय....मी आपले कळकटलेले मळकटलेले जुने ड्रेस घालून फिरत असते (माझी आई म्हणते ना गोखल्यांची कोणाला काही देण्याची दानत नाही तेच खरे )....आमच्या छोट्या आई तशा प्रेमळ आहेत पण विसराळू ...त्यांना गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या हे शिकवता शिकवता मी च सगळे विसरले आता त्यांना सगळ आठवतंय पण माझी मेमरी मात्र करप्ट..त्या सरू मावशी म्हणजे सगळा आनंदी आनंदच आहे अत्यानंद महाराजांच्या भक्तीत एवढ्या रममाण असतात की त्यांना कशाचाच भान नाहीएय ...आणि त्या बेबी आत्यानी स्वतःच घर सोडून इथेच कायमच बस्तान ठोकल आहे प्रत्येक गोष्ट ह्यांना सांगूनच करा नाहीतर ह्यांचे गाल रागाने फुगणार जरा म्हणून privacy नाही ह्या घरात ..आता राहिल्या आईआजी ..आमच्याकडे आई आजींचा एवढा दबदबा आहे की त्या म्हणतील तीच पूर्व दिशा ...पूर्वी त्यांना घरातल्या सगळ्या पुरुषांना घराबाहेर काढून घरात मातृसत्ताक पद्धत स्थापन करण्याचा नाद होता आता माझ्यामुळे सुधारल्या आहेत त्या ...हल्ली मी आईआजींच्या खोलीत राहते आता एवढा मोठा पलंग आहे तरीही मला मात्र जमिनीवर झोपवतात (मी ढिक म्हणेन मला जमिनीवर झोपायला आवडत पण ह्यांनी आग्रह करायला नको ??? )...वर घोरून घोरून माझी झोप उडवली आहे ती वेगळीच ,ह्याला म्हणतात सासुरवास ...काय सांगू तुम्हाला नुसता छळवाद मांडला आहे माझा ...हल्ली तर माझ्या पाच सासवा माझ्यासाठी पाच प्रकारचा नाश्ता करून तो खायला लावतात मला सुद्धा त्यांच्या सारख वजनदार करण्याचा कट आहे त्यांचा.. त्यामुळे मायबोलीवर आता लोक मला ढोली ढोली म्हणायला लागले आहेत .. काहीही हं असता हा त्याचं ..आता ह्यात माझा काय दोष ?? ...तुम्हीच सांगा एवढ खाल्ल्यावर माणूस चवळीच्या शेंगेसारख कस राहणार ??
तरी बर माझे ते दोन सासरे फारसे त्रासदायक नाहीएय्त काकांना सारख्या कुकीज कुक करण्याचा नाद लागला आहे आणि बाबांना सोफ्यावर बसून चहा ढोसण्याशिवाय दुसरा काही उद्योग नाहीएय सध्या ... पण ह्या बाबांनी आधीच एक उद्योग करून ठेवला आहे त्याच काय ..तिकडे अमेरिकेत श्रीबाळा साठी एक बहिण दत्तक घेवून ठेवली आहे..ती ही येईल काही दिवसांनी श्रीबाळाची ‘ताई आई’ बनून माझ्या डोक्यावर मिरा वाटण्यासाठी..ह्या सहा जणी कमी होत्या कि काय म्हणून ही आणखी एक 'ताई आई' आय मिन माझी नणंद बाई
कधी कधी मला त्या सायलीच्या नशिबाचा हेवा वाटतो सुटली बाई ती ह्या सगळ्यांच्या तावडीतून आणि मी मात्र अडकले ..तो अपघात झाला आणि माझा एक आटा सैल झाला( तसाही आधीही तो सैलच होता ) ..वाटल आता तरी हे सगळे पिछा सोडतील पण कसलं काय आल ना ते श्रीबाळ परत बस स्टॉप वर ...आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न...
aaTaa nusataa sail naahee
aaTaa nusataa sail naahee jhaalelaa, suToon paDoon haravalaay kuThetaree. :haahaa:
masta lihilay.
सगळ्यात आधी श्रीची पदरआई
सगळ्यात आधी श्रीची पदरआई म्हणजे आमच्या सासूबाई त्यांना तर कायम रड लागलेली असते पदर कायम तोंडाला लावलेला रडतानाही आणि हसतानाही...
(No subject)
मस्तच लिहिलंय.
मस्तच लिहिलंय.
दिसेल त्या बाईला आई
दिसेल त्या बाईला आई म्हणण्याची त्याची सवय पार डोक्यात जाते माझ्या ...तरी नशीब माझे मला ‘बायको आई’ म्हणत नाही >> :D.
जबरी :). इतके एपिसोड्स पाहून सुद्धा सायली कोण ते मला अजूनही माहीत नाहे. तसेच त्याची आई त्यातील नक्की कोण ते ही.
(No subject)
जबरी . इतके एपिसोड्स पाहून
जबरी . इतके एपिसोड्स पाहून सुद्धा सायली कोण मला अजूनही माहीत नाहे. >>>> फ़ारेण्ड , ती श्रीची होणारी पहिली बायको होती। पण श्री बाळ जान्हवीच्या गळ्यात पडल

त्याची आई त्यातील नक्की कोण ते ही.>>> नर्मदा गोखले उर्फ़ सुहिता थत्ते

हे भन्नाट आहे .. फार आवडलं
हे भन्नाट आहे .. फार आवडलं
बायको आई>>>
बायको आई>>>
हाहा! हे भारी जमलंय!
हाहा! हे भारी जमलंय!
तरी नशीब माझे मला ‘बायको आई’
तरी नशीब माझे मला ‘बायको आई’ म्हणत नाही >>
मस्त लिहिलंय!
हायला. सहा आया परवडल्या. पण
हायला. सहा आया परवडल्या. पण हापिसातले स्मितुडी बोरकरसाहेब आणि चौवीस तास प्रेमात गीता;
माहेरी खुरडत चालणारे पण ऑपरेशन न करणारे बाबा, पैसा पैसा , कंबर कंबर, चहा चहा करणारी सावत्र आई, भरकटलेला पिंट्या आणि लास्ट बट नॉट द लीस्ट बसस्टॉपवर श्री नसेल तेव्हा आपटे.
एकेकीच्या कपाळी काय काय भोग लिहिलेले असतात नाही?
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद..पहिल्यांदाच इथे काही तरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटल

.
.
माहेरी खुरडत चालणारे पण
माहेरी खुरडत चालणारे पण ऑपरेशन न करणारे बाबा, पैसा पैसा , कंबर कंबर, चहा चहा करणारी सावत्र आई, भरकटलेला पिंट्या आणि लास्ट बट नॉट द लीस्ट बसस्टॉपवर श्री नसेल तेव्हा आपटे

एकेकीच्या कपाळी काय काय भोग लिहिलेले असतात नाही? >>> +१
छान लिहीले आहे मला वाटले
छान लिहीले आहे मला वाटले श्रद्धा ह्या आयडीनेच लिहीले आहे आणि फारसा लेखनशैलीत फरक ही नाही जाणवला.
चला...छान वाटले
चला...छान वाटले वाचून....गणेशोत्सवाच्या एवढ्या दंग्यात कुणीतरी आमच्या जान्हवीचीही बाजू मांडली ते वाचून आनंद झाला. बाकीच्यांनी या बिचारीला केन्द्रस्थानी ठेवूनच इतरांच्या बाजूने लिखाण केल्याचे दिसत होते. त्यामुळे जानू अधिकच केविलवाणी आणि बारीक दिसू लागली होती. निदान श्रद्धाने तरी तिला ढोली म्हटले नाही हे वाचून बरे वाटले.
चांगली गुणाची आणि मनमिळाऊ आहे आमची जान्हवी.... मेंदू काम करीत नसतानाही सहा आया + दोन सासरे + एक नवरा....यांच्या चेहर्यावर हसू आणण्यासाठी ती धडपडत आहे हे पाहून ती किती गोड स्वभावाची मुलगी आहे हे स्पष्ट होते.
सहा आया + दोन सासरे +एक
सहा आया + दोन सासरे +एक नवरा
नवर्यांचा पण काउंट ठेवला ते बरे झाले. एक होता होता राहिलेला, पण तरीही होऊ पाहणारा नवरा राहिला.
चला...छान वाटले
चला...छान वाटले वाचून....गणेशोत्सवाच्या एवढ्या दंग्यात कुणीतरी आमच्या जान्हवीचीही बाजू मांडली ते वाचून आनंद झाला. बाकीच्यांनी या बिचारीला केन्द्रस्थानी ठेवूनच इतरांच्या बाजूने लिखाण केल्याचे दिसत होते. त्यामुळे जानू अधिकच केविलवाणी आणि बारीक दिसू लागली होती. निदान श्रद्धाने तरी तिला ढोली म्हटले नाही हे वाचून बरे वाटले.
चांगली गुणाची आणि मनमिळाऊ आहे आमची जान्हवी.... मेंदू काम करीत नसतानाही सहा आया + दोन सासरे + एक नवरा....यांच्या चेहर्यावर हसू आणण्यासाठी ती धडपडत आहे हे पाहून ती किती गोड स्वभावाची मुलगी आहे हे स्पष्ट होते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
भरत.... "...एक होता होता
भरत....
"...एक होता होता राहिलेला, पण तरीही होऊ पाहणारा नवरा राहिला...." ~ अरेच्या, होय...याचा उल्लेख राहिलाच. कितीही आगाऊ असला तरीही याच्याशी आमच्या मऊ रेशमी स्वभावाच्या जान्हवीने कधीही संतापून वा शिव्याशाप अर्थाने संभाषण केलेले नाही.
अरे देवा!
अरे देवा!
मामा, इथे आणि रियाच्या
मामा, इथे आणि रियाच्या धाग्यावर पण तुम्ही मनापासून जान्हवीची बाजु घेऊन लिहिताय की sarcastically लिहिताय हेच कळेनासं झालंय.
बायको आई <<<
बायको आई <<<
(No subject)
इश्श, ते मनापासून आहे बाई
इश्श, ते मनापासून आहे बाई
अरे देवा! >>>
श्रद्धा मस्त लेख
गणेशोत्सव काळात स्पर्धेसाठी का नाही लिहिलात?
इश्श.....अगं ती पोरगी मला
इश्श.....अगं ती पोरगी मला खरंच माझ्या भाचीसारखीच वाटते....अगदी पहिल्या भागापासून मी तेवढाच कार्यक्रम पाहात असतो. आज इथल्या सार्या पोरी आणि पुरुषही त्या बिचारीला टोचून टोचून बोलण्यात मग्न आहेत ना, ते एकेकाळी तिला डोक्यावर घेऊन नाचत होते...."होणार...." चा धागा वेळ मिळाल्यास जरूर वाच.....आता मात्र अपघातानंतर तिच्या मेंदूवर जो परिणाम झाला आहे त्याची काळजी इथल्या सदस्यांना वाटत नाही....आणि मग तिच्या हातून होत असलेल्या बारीकसारीक चुकांवर ह्या लगेच शस्त्रक्रियातील हत्यारे घेऊन धावत आहेत. बिचारीचे भोग.
sarcastically काही नाही....मी मनापासून तिच्यावतीने खिंड लढवित आहे.....रीयाला भरपूर रसद मिळत आहे. निदान तू तरी तिच्या बाजूची होऊन जान्हवीला "ढोली...रडकी" ही विशेषणे देऊ नकोस.
मामा..अहो जोपर्यंत
मामा..अहो जोपर्यंत "होणार..."धागा पळत होता तोपर्यंत न चुकता वाचत होते. आता तुम्ही अपडेट्स देणे बंद केल्यामुळे तो थंडावलाय.
अशीही मी मालिका बघत नाही (फक्त माबो वरचे धागे वाचते) पण साबा बघतात रोज न चुकता, म्हणुन अधुनमधुन कानावर पडत असते काहीतरी.
जान्हवीबद्दल म्हणाल तर, तुम्ही म्हणताय म्हणुन "ढोली...रडकी" नाही म्हणत पण ती डोक्यात जाते माझ्या.
बाकी तुमच्या सहनशक्तीला सलाम :)..(दिवे घ्या)
पदरआई <<<
पदरआई <<<
इश्श.... "...तुम्ही म्हणताय
इश्श....
"...तुम्ही म्हणताय म्हणुन "ढोली...रडकी" नाही म्हणत ...." ~ गुड गर्ल यू आर....
"...पण ती डोक्यात जाते माझ्या...." ~ जाऊ देवू नको ना तसे....माया कर गं त्या पोरीवर....रीयासारखं छळू नकोस तिला.
अशोकमामा ही सिरीयल सुरु झाली
अशोकमामा ही सिरीयल सुरु झाली तेव्हा ती खरंच बरं काम करायची त्यामुळे सर्वजण कौतुक करत होते पण नंतर ती स्वतःच्या भूमिकेच्या अति प्रेमात पडली आणि लोकांनी कौतुक केलं ते तिच्या डोक्यात गेलं आणि ती ओवर acting करायला लागली. त्यामुळे हळूहळू सर्वजण तिच्या विरोधात गेले.
मीपण हि सिरीयल सोडून आता बराच काळ लोटला. तुम्ही अपडेट्स द्यायचात तेव्हा वाचायला तरी जायचे आता ते पण नाही.
Pages