कुठून हे बावळट ध्यान माझ्या गळ्यात पडल कोण जाणे ...कोण ?... म्हणून काय विचारताय अहो तुमच लाडक श्रीबाळ ...मी सहजच एकदा त्याला म्हंटले, “आठवणी विसरता येतात पण प्रेम नाही” झाल आता तेच वाक्य आठवून रोज रडत बसलेला असतो येडछाप कुठला आणि दिसेल त्या बाईला आई म्हणण्याची त्याची सवय पार डोक्यात जाते माझ्या ...तरी नशीब माझे मला ‘बायको आई’ म्हणत नाही...हे श्रीबाळ परवडल पण त्याच्या त्या सहा आयांनी डोक्याला वात आणला आहे नुसता..सहाजणींच्या सहा तरा...
सगळ्यात आधी श्रीची पदरआई म्हणजे आमच्या सासूबाई त्यांना तर कायम रड लागलेली असते पदर कायम तोंडाला लावलेला रडतानाही आणि हसतानाही... त्यांच्या त्या रडराडीला कंटाळूनच तर श्री चे बाबा घर सोडून गेलेले ते आता कुठे उगवले आहेत तरीही आपली ह्यांची रडारडी अजून सुरूच ते बहुतेक परत कल्टी मारतील....दुसऱ्या म्हणजे मोठी आई त्यांच्यासाठी कथालेखक संवाद लिहिण्याची तसदीच घेत नाही (त्या आपल्या ह्यांनी त्यांनी म्हंटलेले संवाद बोलून दिवस ढकलत आहेत) असो ते जावूदे ..तर माझ्या कृपेनेच त्याचं स्वतःच एक बुटिक आहे ...आता एवढ बुटिक आहे तर सुनेसाठी कधी काळी चार चांगले ड्रेस शिवावेत तर कसलं काय....मी आपले कळकटलेले मळकटलेले जुने ड्रेस घालून फिरत असते (माझी आई म्हणते ना गोखल्यांची कोणाला काही देण्याची दानत नाही तेच खरे )....आमच्या छोट्या आई तशा प्रेमळ आहेत पण विसराळू ...त्यांना गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या हे शिकवता शिकवता मी च सगळे विसरले आता त्यांना सगळ आठवतंय पण माझी मेमरी मात्र करप्ट..त्या सरू मावशी म्हणजे सगळा आनंदी आनंदच आहे अत्यानंद महाराजांच्या भक्तीत एवढ्या रममाण असतात की त्यांना कशाचाच भान नाहीएय ...आणि त्या बेबी आत्यानी स्वतःच घर सोडून इथेच कायमच बस्तान ठोकल आहे प्रत्येक गोष्ट ह्यांना सांगूनच करा नाहीतर ह्यांचे गाल रागाने फुगणार जरा म्हणून privacy नाही ह्या घरात ..आता राहिल्या आईआजी ..आमच्याकडे आई आजींचा एवढा दबदबा आहे की त्या म्हणतील तीच पूर्व दिशा ...पूर्वी त्यांना घरातल्या सगळ्या पुरुषांना घराबाहेर काढून घरात मातृसत्ताक पद्धत स्थापन करण्याचा नाद होता आता माझ्यामुळे सुधारल्या आहेत त्या ...हल्ली मी आईआजींच्या खोलीत राहते आता एवढा मोठा पलंग आहे तरीही मला मात्र जमिनीवर झोपवतात (मी ढिक म्हणेन मला जमिनीवर झोपायला आवडत पण ह्यांनी आग्रह करायला नको ??? )...वर घोरून घोरून माझी झोप उडवली आहे ती वेगळीच ,ह्याला म्हणतात सासुरवास ...काय सांगू तुम्हाला नुसता छळवाद मांडला आहे माझा ...हल्ली तर माझ्या पाच सासवा माझ्यासाठी पाच प्रकारचा नाश्ता करून तो खायला लावतात मला सुद्धा त्यांच्या सारख वजनदार करण्याचा कट आहे त्यांचा.. त्यामुळे मायबोलीवर आता लोक मला ढोली ढोली म्हणायला लागले आहेत .. काहीही हं असता हा त्याचं ..आता ह्यात माझा काय दोष ?? ...तुम्हीच सांगा एवढ खाल्ल्यावर माणूस चवळीच्या शेंगेसारख कस राहणार ??
तरी बर माझे ते दोन सासरे फारसे त्रासदायक नाहीएय्त काकांना सारख्या कुकीज कुक करण्याचा नाद लागला आहे आणि बाबांना सोफ्यावर बसून चहा ढोसण्याशिवाय दुसरा काही उद्योग नाहीएय सध्या ... पण ह्या बाबांनी आधीच एक उद्योग करून ठेवला आहे त्याच काय ..तिकडे अमेरिकेत श्रीबाळा साठी एक बहिण दत्तक घेवून ठेवली आहे..ती ही येईल काही दिवसांनी श्रीबाळाची ‘ताई आई’ बनून माझ्या डोक्यावर मिरा वाटण्यासाठी..ह्या सहा जणी कमी होत्या कि काय म्हणून ही आणखी एक 'ताई आई' आय मिन माझी नणंद बाई
कधी कधी मला त्या सायलीच्या नशिबाचा हेवा वाटतो सुटली बाई ती ह्या सगळ्यांच्या तावडीतून आणि मी मात्र अडकले ..तो अपघात झाला आणि माझा एक आटा सैल झाला( तसाही आधीही तो सैलच होता ) ..वाटल आता तरी हे सगळे पिछा सोडतील पण कसलं काय आल ना ते श्रीबाळ परत बस स्टॉप वर ...आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न...
मामा , या बाफवर होसुमीयाघचे
मामा , या बाफवर होसुमीयाघचे अपडेट्स देताय का ?!
जाई ते कंटाळलेत आता होसुमी
जाई ते कंटाळलेत आता होसुमी चे अपडेट्स देऊन
जान्हवी आणि श्री गोखले -
जान्हवी आणि श्री गोखले - वेताळाला नव्हती बायको आणि भावकाईला नव्हता नवरा!
जाई.... नाही गं....तुमच्या
जाई....
नाही गं....तुमच्या "कोतबो" च्या निमित्ताने पुन्हा मी एकदा गोखल्यांच्या घरात गेलो आणि भाचीची हालहवाल पाहिली....हवाल नाहीच, पण हाल बाकी भरपूर चालू आहेत. घरची झाली थोडी की काय म्हणून इथल्या मुलींदेखील त्या बिचारीच्या मागे हात धुवून लागल्या आहेत असेच विदारक चित्र इथे उभे राहिले आहे....म्हणून तिचीही बाजू थोडीफार मांडावी या उदात्त हेतूने मी या धाग्यावर आलो.
सुजा म्हणते "कंटाळलेत आता होसुमी चे अपडेट्स देऊन..." यात काहीसे तथ्य आहेच. विशेषतः अपघातानंतर जे काही दाखवित होती ती टीम, त्यामुळे फारच उदास वाटत गेले...म्हणून थांबलोच.
हवाल नाहीच, पण हाल बाकी भरपूर
हवाल नाहीच, पण हाल बाकी भरपूर चालू आहेत
जान्हवी आणि श्री गोखले -
जान्हवी आणि श्री गोखले - वेताळाला नव्हती बायको आणि भावकाईला नव्हता नवरा!>>:हहगलो:
ते असे पण आहे. सटवाईला नव्हता
ते असे पण आहे. सटवाईला नव्हता नवरा आणी म्हसोबाला नव्हती बायको.:खोखो:
Pages