मायबोली गणेशोत्सव २०१४ "बाप्पा माझ्या मनातला"- विनार्च (अनन्या)

Submitted by संयोजक on 23 August, 2014 - 07:43
हाय! मी आहे अनन्या!
ananya_clay_doll.jpg
यावर्षी मायबोलीच्या गणेशोत्सवात मला गणपती तयार करायचे आहेत, हे आईने मला सांगितल्यावर जो आनंद झालाय ! मी तर नाचायलाच लागले. त्या नादात माझ्या पायाला पण खरचटलं...पण फिकर नॉट! मी आईला विचारलं "जास्तीत जास्त किती बनवू शकते?" ती म्हणाली, "बनव पाच- सहा". मग मी आठ बाप्पा तयार केले. शेवटचा बाप्पा तयार करत असताना आई म्हणाली ,"एक बनवायला पण शिकव ना...किती भाव खाशील?" म्हणून मग एक टिटोरियल पण केलं आहे हं! आईने थांबवल म्हणून हे आठच बाप्पा आहेत. नाही तर डोक्यात इतक्या आयडिया होत्या की काय सांगू ! तर बघा कसे झाले आहेत माझे गणपती बाप्पा-

१) गादीवर आरामात झोपून,मागे लोड ठेवून विचार करण्याची पोझ म्हणजे माझी आवडती :-) मी अशी कित्तीही तास बसू शकते, म्हणून हा बाप्पा -
ananya ganesh_1.jpg

२) मी एक Secret सांगू? मला ना बाबाच्या गोष्टी वापरायला खूप मजा येते. जसं की त्याचा टी-शर्ट,पँट,बेल्ट,घड्याळ... हा बाप्पा पण तसाच आहे. शंकर बाप्पाचा म्हणजे त्याच्या बाबाचा साप पोटावर बांधलाय त्याने बेल्टसारखा :फिदी:

ananya ganesh_2.jpg

३) माझा फेव्हरेट बाप्पा माझ्यासारखा असणारच ना! मग मी कशी "यो" आहे तसा हा बाप्पा पण "यो"
ananya ganesh_3.jpg

४)हा बाप्पा पहा कसा पुस्तक वाचत मस्त पहुडलाय चटईवर.....आणि आई फोटो काढतेय म्हणून तिच्याकडे बघतोय
ananya ganesh_4.jpg
ananya ganesh_5.jpg

५) बाबा माझा फेव्हरेट आहे ना आणि त्याचं फेव्हरेट क्रिकेट, म्हणून हा बाप्पा....बाबासाठी खास!
ananya ganesh_6.jpg

६) हा माझा सिनियर बाप्पा...माझ्या आवडत्या 'हॅमर किक'ची प्रॅक्टीस करताना...
ananya ganesh_10.jpg

(मला पण आता लवकरच ब्लॅक बेल्ट मिळणार आहे :-) )


७) हॅरी पॉटरच्या शाळेत छोट्या-शिशूमध्ये दाखल झालेला बाप्पा.....उडायचे प्रयत्न चालले आहेत त्याचे!
ananya ganesh_9.jpg

८) आणि हा शेवटचा एकदम साधा सोप्पा बाप्पा! हा कसा बनवायचा हे खालच्या व्हीडिओत दाखवलंय मी-
ananya ganesh_8.jpg


कसे वाटले माझे सगळे बाप्पा? नक्की सांगा हं! :-)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवलचे आभार मानावे तितके कमी आहेत...इतक्या शाॅर्ट नोटिस वर व्हिडियो एवढा छान एडिट करून दिलाय तिने.
अवल तु अनन्याला अचूक ओळखलस हो...एका डोळ्यावर केस ट्रेडमार्क हाय आमचा Wink
नलिनी तुमची रंगीत क्लेची कृती कधीच सेव्ह करुन ठेवली आहे..आता नेक्स्ट प्लान तोच आहे.
शशांकजी कमी प्रकाशाची गोष्ट अवलनेही ध्यानात आणुन दिलेली पण हाती वेळ कमी असल्याने रीशुट नाही करता आलं. पुढच्यावेळेस लक्षात ठेवेन.
प्राजक्ता तुमचा नैवेध अनन्याला खूप आवडला. Happy

अप्रतिम!!! अनन्याला माझ्यातर्फे खुप खुप शाबासकी. खूप गुणी मुलगी आहे तुझी विनार्च. तिला हवं तसं बहरू देत.

अनन्या..
सुन्दर सुन्दर बाप्पा बनवले आहेस गं... आणि ते करताना त्यामागची कल्पना आम्हाला सान्गितलीस ती पण खुप छान च. .. कलाकार आहेस बेटा...!!!

आता तुला आमचे क्लास घ्यायला हरकत नाही. Happy
लोळत पुस्तक वाचणारा बाप्पा तर अगदी आपल्याच रांगेतला वाटतोय... एकदम ब्येश्ट!!
तु बनवलेली अनन्या पण खुप आवडली... मस्त.. कुरळ्या केसांची क्रियेटीव्ह आणि हुशार, स्वच्छंदी अनन्या!!

अनन्या, खुप मस्त कलाकृती आहेत. त्यामागची thought process आवडली.
भन्नाट डो़कं चालतं तुझं. अप्रतिम मुर्त्या आहेत :स्मितः

तु मुर्ती नंतर कशी जपुन ठेवतेस ?
खुप सार्‍या शुभेच्छा !!

अनन्या, किती सुंदर बनवलेस गं सगळे बाप्पा. मला शिकवशील का?
मला तो निळ्या रंगाचं पुस्तक वाचत आरामात पहुडलेला बाप्पा तर खूपच आवडला.
आभिनंदन, विनार्च तुमचेही अभिनंदन.

मस्त!
पहिल्या बाप्पाचा उंदीर, यो बाप्पाची बोटं नि घड्याळ आणि 'सिनियर' बाप्पाची हेयरस्टाइल एकदमच भारी!
अनन्या ऑनलाइन क्लास घेतेस का? Happy

Pages