आता कशाला शिजायची बात - लाजो - 'फ्रोझन'

Submitted by लाजो on 8 September, 2014 - 10:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

"फ्रोझन"

सध्या लहान मुला-मुलींना 'फ्रोझन'या चित्रपटाने अक्षरशः पागल केले आहे Happy त्यातली एल्सा अन अ‍ॅना...'लेट इट गो' हे गाणे. आमच्या घरीही या सिनेमाची य पारायण झाली आहेत... मला सगळ्यात आवडतो तो क्युट स्नोमॅन 'ओलाफ' Happy आणि साधाभोळा खिस्तॉफ Happy

आपल्या खास छोट्या दोस्तांना या 'फ्रोझन' निमित्त, त्यांना आवडेल असे काहितरी 'फ्रोझन'... पण पौष्टिक आणि त्यांनाही बनवता येण्यासारखे हे 'फ्रोझन'.... Happy

साहित्यः

घट्ट मधुर दही
आवडती फळं
साखर
मध
इसेन्स
ड्रायफ्रुट्स इ इ

क्रमवार पाककृती: 

'फ्रोझन'

सगळ्यात पहिला मान क्युट ओलाफचा .....

frozen18.JPG

साहित्यः
मधुर घट्ट दही,
आयसिंग शुगर / पिठीसाखर/ मध
केळे;
व्हॅनिला / बटरस्कॉच इसेन्स (ऐच्छिक)

सजावटीसाठी: गाजराचा तुकडा, चॉकलेट चिप्स / चॉकलेट स्टिक्स

कृती:

१. दह्यात पाणी असेल तर ते काढुन टाका आणि फेटुन घ्या.
२. त्यात चवीनुसार साखर / मध मिसळुन एकजीव करा. इसेन्स घालणार असाल तर तो ही घाला.
३. केळे मॅश करुन घ्या.
४. मॅश्ड केळे आणि दही एकत्र करा आणि हवे तर मिक्सर मधुन फिरवुन घ्या. स्मुथ मिश्रण तयार व्हायला हवे.
५. तयार मिश्रण बोल मधे काढुन फ्रिझ करायला ठेवा.
६. मिश्रण घट्ट झाले की आयस्क्रिम स्कूप ने त्याचे गोळे बनवा. आणि हे गोळे परत फ्रिझ करायला ठेवा.

frozen06a.jpg

७. टूथपिक वापरुन गोळे एकावर एक बसवा. संत्र्/गाजर्/चॉकलेट चिप्स ने ओलाफ ला सजवा Happy
८. सर्व्ह करताना प्लेट मधे बदामाचा चुरा/डेसिकेटेड कोकोनट किंवा एखादे बिस्किट ठेवा Happy

frozen17.JPG

दुसरा नंबर आपल्या झिपर्‍या खिस्तॉफ चा Happy

साहित्यः

घट्ट दही
काकडीच्या चकत्या
कोथिंबीर
मिरचीचे तुकडे (ऐच्छिक)
पुदिना (जास्त नको)
मिठ साखर चवीला

frozen14.JPG

कृती:

दही फेटुन घ्या.
कोथिंबीर, मिरचीचे तुकडे, मिठ साखर घालुन नीट मिक्स करा.
वाटीत/मोल्ड मधे तळाला क्लिंग रॅप्/प्लॅस्टिक रॅपचा तुकडा ठेवा. त्यावर काकडीचा एक काप ठेवा.
मिक्स केलेले दही त्यावर ओता. मोल्ड उंचीला जास्त असेल तर २-३ कापांचे लेअर्स लावा.
फ्रिझ करा.
सर्व्ह करताना भात/बुंदी/उकडलेला मॅश्ड बटाटा यावर सर्व्ह करा.
सकाळी ऑफिसला जाताना भातावर एल फ्रोझन गोळा ठेवायचा. दुपारपर्यंन्त मस्त गारेगार कोशिंबीर-दही भात रेडी Happy

frozen13.jpg

आणि आता हे छोट्यांचे इतर दोस्त....

१. करमिट द फ्रॉगी -

frozen11a.jpg

किवी फ्रुट + मध + घट्ट मधुर दही + थोडासा हिरवा रंग, पुदिना रस. सजावटीसाठी - मार्शमेलोज, स्ट्रॉबेरीचा तुकडा.

किवी चा एक स्लाईस काढुन, बाकी मॅश करा. त्यात मध, रंग आणि दही नीट मिसळा.
वाटीत स्लाईस तळाला ठेऊन त्यावर दह्याचे मिश्रण ओता आणि फ्रिझ करा. मिश्रण पूर्ण फ्रिझ होऊ द्या.
सर्व्ह करताना मार्शमेलोज, स्ट्रॉबेरीने फ्रॉगी बनवा Happy किंवा जेली बरोबर सर्व्ह करा.

frozen11b.JPG२. चर्पी चिक

frozen09a.jpg

संत्र/मँडरीन, दही, थोडा पिवळारंग, ऑरेंज इसेन्स (ऐच्छिक), आयसिंग शुगर. सजावटीसाठी: स्ट्रॉबेरीचे तुकडे, संत्राची साल्/फोडीचा तुकडा.

संत्र्याची एक फोड मधे कापुन वाटीच्या तळाला ठेवा.
दह्यात रंग, थोडासा संत्र्याचा ज्युस, साखर नीट मिसळा आणि हे मिश्रण वाटीतल्या स्लाईसवर ओता आणि फ्रिझ करा. मिश्रण पूर्ण फ्रिझ होऊ द्या.
सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीज आणि संत्र्याच्या सालीने/फोडीने सजवा. किंवा कस्टर्ड / फ्रेश व्हिप्ड क्रिम बरोबर सर्व्ह करा.

frozen09b.JPG३. पेपा पिग

frozen10a.jpg

स्ट्रॉबेरीज, घट्ट मधुर दही, गुलाबी रंग, आयसिंग शुगर, स्ट्रॉबेरी क्रश्/सॉस/जॅम (ऐच्छिक). सजावटीसाठी मार्शमेलोज.

स्ट्रॉबेरीचा एक स्लाईस वाटीत तळाला ठेवा. उरलेल्या स्ट्रॉबेरीज चे तुकडे करा आणि ते दही + सखर + जॅम्/सिरप (घालणार असाल तर) यात नीट मिक्स करा. मिश्रण पूर्ण फ्रिझ होऊ द्या.
सर्व्ह करताना मार्शमेलोज ने त्यावर सजावट करा किंवा फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि चॉकलेट सॉस बरोबर सर्व्ह करा.

frozen10b.JPG

अश्या प्रकारे विविध फ्लेवर्स ची फ्रोझन योगर्ट्स बनवुन ठेवता येतिल. आणि मुलांना देताना थोडी सजावट करुन देता येतिल.
दह्यात आवडी नुसार फळं, सुकामेवा, काजु-बदाम-पिस्ते इ चे तुकडे वगैरे घालता येतिल.

मी अजुन एक केलेला प्रयोग म्हणजे 'फ्रोझन काकडी' -

काकडीची तुकडा स्युअर वर लावायचा. दह्यात चवीनुसार मीठ, साखर, हिरवी मिरची-कोथिंबीर, जीरे पावडर घालुन एकजीव करायचे. काकडी या दह्यात बुडवुन फ्रिझ करायची.... फ्रोझन कोशिंबीर पॉप - उन्हाळ्यात बेस्ट Happy

frozen03.JPGfrozen04.JPGfrozen15.JPG

वाढणी/प्रमाण: 
हवे तेव्हढे :)
अधिक टिपा: 

१. दही घट्ट घ्या. जास्तीचे पाणी काढुन टाका पण अगदी चक्का देखिल नको.
२. साखर वापरली तर आयसिंग शुगर वापरा.
३. रसदार फळे घातली तर मिश्रणात थोडे कॉर्न फ्लार घाला.

माहितीचा स्रोत: 
फ्रोझन योगर्ट सध्या खुप आवडते आहे :) त्यावरुन सुचलेली कल्पना...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, कसले एकसे एक प्रकार आहेत. ओलाफ भारी क्यूट जमलाय. खाली काय आहे? निळी जेली?

आणि शेवटचा प्रकार निव्वळ अफलातून आहे.

__/\__

_/\_

खरच ____________/\____________

काय मस्त कल्पना आहे...नक्कि करून बघणार

Pages