"फ्रोझन"
सध्या लहान मुला-मुलींना 'फ्रोझन'या चित्रपटाने अक्षरशः पागल केले आहे त्यातली एल्सा अन अॅना...'लेट इट गो' हे गाणे. आमच्या घरीही या सिनेमाची य पारायण झाली आहेत... मला सगळ्यात आवडतो तो क्युट स्नोमॅन 'ओलाफ' आणि साधाभोळा खिस्तॉफ
आपल्या खास छोट्या दोस्तांना या 'फ्रोझन' निमित्त, त्यांना आवडेल असे काहितरी 'फ्रोझन'... पण पौष्टिक आणि त्यांनाही बनवता येण्यासारखे हे 'फ्रोझन'....
साहित्यः
घट्ट मधुर दही
आवडती फळं
साखर
मध
इसेन्स
ड्रायफ्रुट्स इ इ
'फ्रोझन'
सगळ्यात पहिला मान क्युट ओलाफचा .....
साहित्यः
मधुर घट्ट दही,
आयसिंग शुगर / पिठीसाखर/ मध
केळे;
व्हॅनिला / बटरस्कॉच इसेन्स (ऐच्छिक)
सजावटीसाठी: गाजराचा तुकडा, चॉकलेट चिप्स / चॉकलेट स्टिक्स
कृती:
१. दह्यात पाणी असेल तर ते काढुन टाका आणि फेटुन घ्या.
२. त्यात चवीनुसार साखर / मध मिसळुन एकजीव करा. इसेन्स घालणार असाल तर तो ही घाला.
३. केळे मॅश करुन घ्या.
४. मॅश्ड केळे आणि दही एकत्र करा आणि हवे तर मिक्सर मधुन फिरवुन घ्या. स्मुथ मिश्रण तयार व्हायला हवे.
५. तयार मिश्रण बोल मधे काढुन फ्रिझ करायला ठेवा.
६. मिश्रण घट्ट झाले की आयस्क्रिम स्कूप ने त्याचे गोळे बनवा. आणि हे गोळे परत फ्रिझ करायला ठेवा.
७. टूथपिक वापरुन गोळे एकावर एक बसवा. संत्र्/गाजर्/चॉकलेट चिप्स ने ओलाफ ला सजवा
८. सर्व्ह करताना प्लेट मधे बदामाचा चुरा/डेसिकेटेड कोकोनट किंवा एखादे बिस्किट ठेवा
दुसरा नंबर आपल्या झिपर्या खिस्तॉफ चा
साहित्यः
घट्ट दही
काकडीच्या चकत्या
कोथिंबीर
मिरचीचे तुकडे (ऐच्छिक)
पुदिना (जास्त नको)
मिठ साखर चवीला
कृती:
दही फेटुन घ्या.
कोथिंबीर, मिरचीचे तुकडे, मिठ साखर घालुन नीट मिक्स करा.
वाटीत/मोल्ड मधे तळाला क्लिंग रॅप्/प्लॅस्टिक रॅपचा तुकडा ठेवा. त्यावर काकडीचा एक काप ठेवा.
मिक्स केलेले दही त्यावर ओता. मोल्ड उंचीला जास्त असेल तर २-३ कापांचे लेअर्स लावा.
फ्रिझ करा.
सर्व्ह करताना भात/बुंदी/उकडलेला मॅश्ड बटाटा यावर सर्व्ह करा.
सकाळी ऑफिसला जाताना भातावर एल फ्रोझन गोळा ठेवायचा. दुपारपर्यंन्त मस्त गारेगार कोशिंबीर-दही भात रेडी
आणि आता हे छोट्यांचे इतर दोस्त....
१. करमिट द फ्रॉगी -
किवी फ्रुट + मध + घट्ट मधुर दही + थोडासा हिरवा रंग, पुदिना रस. सजावटीसाठी - मार्शमेलोज, स्ट्रॉबेरीचा तुकडा.
किवी चा एक स्लाईस काढुन, बाकी मॅश करा. त्यात मध, रंग आणि दही नीट मिसळा.
वाटीत स्लाईस तळाला ठेऊन त्यावर दह्याचे मिश्रण ओता आणि फ्रिझ करा. मिश्रण पूर्ण फ्रिझ होऊ द्या.
सर्व्ह करताना मार्शमेलोज, स्ट्रॉबेरीने फ्रॉगी बनवा किंवा जेली बरोबर सर्व्ह करा.
२. चर्पी चिक
संत्र/मँडरीन, दही, थोडा पिवळारंग, ऑरेंज इसेन्स (ऐच्छिक), आयसिंग शुगर. सजावटीसाठी: स्ट्रॉबेरीचे तुकडे, संत्राची साल्/फोडीचा तुकडा.
संत्र्याची एक फोड मधे कापुन वाटीच्या तळाला ठेवा.
दह्यात रंग, थोडासा संत्र्याचा ज्युस, साखर नीट मिसळा आणि हे मिश्रण वाटीतल्या स्लाईसवर ओता आणि फ्रिझ करा. मिश्रण पूर्ण फ्रिझ होऊ द्या.
सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीज आणि संत्र्याच्या सालीने/फोडीने सजवा. किंवा कस्टर्ड / फ्रेश व्हिप्ड क्रिम बरोबर सर्व्ह करा.
३. पेपा पिग
स्ट्रॉबेरीज, घट्ट मधुर दही, गुलाबी रंग, आयसिंग शुगर, स्ट्रॉबेरी क्रश्/सॉस/जॅम (ऐच्छिक). सजावटीसाठी मार्शमेलोज.
स्ट्रॉबेरीचा एक स्लाईस वाटीत तळाला ठेवा. उरलेल्या स्ट्रॉबेरीज चे तुकडे करा आणि ते दही + सखर + जॅम्/सिरप (घालणार असाल तर) यात नीट मिक्स करा. मिश्रण पूर्ण फ्रिझ होऊ द्या.
सर्व्ह करताना मार्शमेलोज ने त्यावर सजावट करा किंवा फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि चॉकलेट सॉस बरोबर सर्व्ह करा.
अश्या प्रकारे विविध फ्लेवर्स ची फ्रोझन योगर्ट्स बनवुन ठेवता येतिल. आणि मुलांना देताना थोडी सजावट करुन देता येतिल.
दह्यात आवडी नुसार फळं, सुकामेवा, काजु-बदाम-पिस्ते इ चे तुकडे वगैरे घालता येतिल.
मी अजुन एक केलेला प्रयोग म्हणजे 'फ्रोझन काकडी' -
काकडीची तुकडा स्युअर वर लावायचा. दह्यात चवीनुसार मीठ, साखर, हिरवी मिरची-कोथिंबीर, जीरे पावडर घालुन एकजीव करायचे. काकडी या दह्यात बुडवुन फ्रिझ करायची.... फ्रोझन कोशिंबीर पॉप - उन्हाळ्यात बेस्ट
१. दही घट्ट घ्या. जास्तीचे पाणी काढुन टाका पण अगदी चक्का देखिल नको.
२. साखर वापरली तर आयसिंग शुगर वापरा.
३. रसदार फळे घातली तर मिश्रणात थोडे कॉर्न फ्लार घाला.
वा! पुन्हा एकदा _/\_ आता खरचं
वा! पुन्हा एकदा _/\_
आता खरचं मास्टरशेफ मधे भाग घे प्लीज..
एकदम भारी.
एकदम भारी.
वॉव, एकापेक्शा एक छान कल्पना
वॉव, एकापेक्शा एक छान कल्पना आहेत.
it looks so too delicious
it looks so too delicious
मस्तच. काय आयडिया आहे !
मस्तच. काय आयडिया आहे !
बापरे, कसले एकसे एक प्रकार
बापरे, कसले एकसे एक प्रकार आहेत. ओलाफ भारी क्यूट जमलाय. खाली काय आहे? निळी जेली?
आणि शेवटचा प्रकार निव्वळ अफलातून आहे.
सही आहेत!!
सही आहेत!!
वॉव ! लाजो अमेझिंग आहे हे.
वॉव ! लाजो अमेझिंग आहे हे. खरोखर ग्रेट आहेस ____/\_____.
__/\__
__/\__
मस्त कल्पना!! एक से एक !!
मस्त कल्पना!! एक से एक !!
अमेझिंग!!!!
अमेझिंग!!!!
एकदम अफलातून आयडिया!!
एकदम अफलातून आयडिया!!
वॉव! लाजो तुझी कल्पकता आणि
वॉव! लाजो तुझी कल्पकता आणि उत्साह नेहेमीप्रमाणेच लाजवाब!
किविचे दही मस्तच!!
किविचे दही मस्तच!!
थंडगार पडलो !!! फ्रोजन
थंडगार पडलो !!!
फ्रोजन काकडी __/\__
टू गुड!!
टू गुड!!
मस्त मस्त
मस्त मस्त
क्रियेटीव्हीटी !!
क्रियेटीव्हीटी !!
भारी!
भारी!
भारी!
भारी!
भारी आहे. मस्तच.
भारी आहे.
मस्तच.
_/\_
_/\_
लाजो केवढी ती कल्पकता.
लाजो केवढी ती कल्पकता.
खरच
खरच ____________/\____________
काय मस्त कल्पना आहे...नक्कि करून बघणार
नतमस्तक का काय ते म्हणतात ना
नतमस्तक का काय ते म्हणतात ना तसे!
महान आहेस!
गो ऑस्सी गो!
वॉव! _/\_
वॉव! _/\_
अप्रतिम आयडिया..
अप्रतिम आयडिया..
वॉव! कमाल आहे..प्रत्येक
वॉव! कमाल आहे..प्रत्येक फ्रोयो आत्ता उचलून खावेसे वाटत आहे!
वाहच वा! फ्रोझन कोशिंबीर ऑन द
वाहच वा!
फ्रोझन कोशिंबीर ऑन द गो तर लय भारी!
भन्नाट
भन्नाट
Pages