कोल्हापुरी पेशल शब्दकोष

Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22

फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!

कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए गंजक्या -
>>>

लै भारी .. माझ्या कोलापुरी मित्राच्या तोंडात न्येमी असतोया ह्यो Happy
भाजीवाल्या-वाले, लोक सुट्ट्या पैश्याला 'मोडकं' म्हणतात :).. हा मी बाकी ठिकाणी ऐकला नाही शब्द.

मोडकं नाही - मोड (कडधान्याची असते तशी...)

होय हो गिरिशजी... मोड हा शब्द आहे... पण मी मोडकं असा पण ऐकला आहे.. खासकरुन KMT Bus आणि वडाप मधे सुट्ट्-मोडकं न्ह्याहित असे म्हणतात बायका.. Happy

अरे लोकानो..." कट्टात" राह्यला की राव!!
कट्टात= छानछोकीत/ चान्गले अशा अर्थाने वापर्तात्.....लई कत्टात फिराय्लीयास आज्काल!
फुलरानी

फुलरानी झक्कास :).... हा शब्द विसरलाच होता...
लईच कटात हायस आज....

एवढा सगळा उपद्व्याप कोण करत बसणार ? या अर्थानी
कशाला ''उगंच उसावर"? (बहुधा उस्तवार चा अपभ्रंश असावा .. )

हे शब्द झाले आहेत का आधी ? -

डांब - विजेचा खांब
मोळा - खिळा
इंझन - पाणी भरलेले पीप
फोलार - अलगद , हलक्या हाताने
नाद्या बाद - जो याचा नाद करेल तो बाद
चाडगीचपाती - चहाड्या करणारी (बहुधा मुलीच चहाड्या करतात म्हणून स्त्रीलिंगी शब्द आला असेल Happy )
आणि एक नेहेमी ऐकलेली म्हण - याचा उगम कोल्हापूर आहे की नाही - कोण जाणे

"खेड्यास्नं आलंया येडं आन भज्याला म्हंतय प्येडं"

Happy

प्रिया,
इंझन - पाणी भरलेले पीप
>> रांजण म्हणतात का त्याला? 'इंजन' कधी ऐकलेले नाही..:-)

"खेड्यास्नं आलंया येडं आन भज्याला म्हंतय प्येडं"....:हाहा:

फुलरानी,

कटात >> लय भारी..विसरलेलोच!

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

केदार,
अगदी बरोबर. मोड आणि मोडकं हे दोन्ही शब्द "सुट्टे पैसे" यासाठी वापरतात.

>>>"खेड्यास्नं आलंया येडं आन भज्याला म्हंतय प्येडं"<<< Rofl लई भारी.

मी ऐकलेले काही शब्दः
नादखुळा
नादबन्ड्या
नाद-फुलपाखरु
कुळ -- भाडेकरु
चपटी -- दारुची बाटली

आणि हो,

कोल्हापुरची तुलना पुण्याबरोबर करु नये. पुण्याला culture काही राहीलेले नाही.

बहुतेक करुन हे सर्व शब्द सतारा, सान्गली, कोल्हापुर जिल्ह्यामधे सर्वत्र वापरतात.

>>पुण्याला culture काही राहीलेले नाही.<<
पंकु, हे असलेच वाद घालण्यात मराठी माणसे गुंगली. जेथे जातो तेथे मजला माझीच भावंडं दिसताहेत, असं काय आपल्या मनात येणार नाही. महाराष्ट्राची अवस्था काय झालीय ती डोळे उघडून बघा. न्हाय तर हायेच मग.... चांगभलं.

खट्क्यावर बोट जाग्यावर पलटी!!
This 1 is special during elections in kolhapur, if voter gives vote (press button) then opposite party falls (palati) Happy

काटा किर्र् र्र् र्र् र्र् र्र्.....
टान्गा पलटी, घोडा फरार....

नाद बाद...
काय मर्दा, काय म्हन्तुयास र सुकाळीच्या....

जय मराठी जय महाराष्ट्रा !!!

प्रभुणे तुला सर्व भावंडे दिसत असतील तर कवटाळुन बस!!!

काय सभा लावलियास?

व्होल्टम ल्@च हाय.

गा@@त पाचर मारिन.

काटा किर्र......गड्डा गार्.....जाग्याव पल्टी.

सायकल हात सोडुन चालवाय लागला की त्येला म्हनायचो "तुमचा बा काय सर्कशीत हुता काय?"

तुमचा बा काय सर्कशीत हुता काय?">>
हा हा हा हा... Lol Lol Lol

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

>>"तुमचा बा काय सर्कशीत हुता काय?" >> Lol

आणि कोल्हापूरात भोक पडलं असलं तर बिळूक पडलं म्हणतात.. Lol

आणखी एक शब्द
ढेंगा खालनं जाईन....
(म्हणजे जे बोलशील ते हरेन)
उदाहरणार्थः- रावसाहेब तुमच्या नलीचं आणि त्या अव्याचं खॅट-मॅट मी सवताच्या डोळ्यांनी पाह्यलयं .... इच्चारतायसा न्हवं तिला... खोटं आसल तर ढेंगा खालनं जाईन.

आणखी एक शब्द
ढेंगा खालनं जाईन....
(म्हणजे जे बोलशील ते हरेन)
उदाहरणार्थः- रावसाहेब तुमच्या नलीचं आणि त्या अव्याचं खॅट-मॅट मी सवताच्या डोळ्यांनी पाह्यलयं .... इच्चारतायसा न्हवं तिला... खोटं आसल तर ढेंगा खालनं जाईन.

आणखी एक शब्द
ढेंगा खालनं जाईन....
(म्हणजे जे बोलशील ते हरेन)
उदाहरणार्थः- रावसाहेब तुमच्या नलीचं आणि त्या अव्याचं खॅट-मॅट मी सवताच्या डोळ्यांनी पाह्यलयं .... इच्चारतायसा न्हवं तिला... खोटं आसल तर ढेंगा खालनं जाईन.

पायतानानं मारीन, हा शब्द्प्रयोग जुना झालाय का रे? का अजून वापरात आहे.
येड लागलंय का याला कुत्रं चावलंय का? असं म्हन्त्यात.
उदाहरण - त्ये खवाट ब्येनं कुटचं पैसं काडायला? वर्गनी मागायला आमाला काय कुत्रं चावलया व्हय?

>>"तुमचा बा काय सर्कशीत हुता काय?" >> Lol

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

ह्यलम्यांड
शब्द्प्रयोग : सच्या ह्यलम्यांड कुठं गेलाय?

कि-यानिष्ट
शब्द्प्रयोग : बंड्या लय कि-यानिष्ट बेणं हाय.

फडेक्टर : कलेक्टर.
काडवान : उंच मुलगी.
बरसान : सर्दी होणे.
पैरण : सदरा.

पायतानानं मारीन, हा शब्द्प्रयोग जुना झालाय का रे? का अजून वापरात आहे.>>>>>>

अजुन वापरतात ना Happy
पण ते "पायताणानं क्यास काडीन" असं वापरतात Happy

************
To get something you never had, you have to do something you never did.

नल्ला बाड = काळी पोरगी
यर्‍रा बाड = चिकणी पोरगी
खर का भर = खरं की खोटं Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

कोळसा ओढणे = एखाद्या गोष्टीत मोडता घालणे

************
To get something you never had, you have to do something you never did.

आमच्या इकडचा अजून एक शब्द आठवला, पोरानी दंगा करून डोकं उठवलं असलं तर म्हणतात
काय योट लावलाय पोरांनी...

<<तुमचा बा काय सर्कशीत हुता काय?">>
तुमच्या बान तरी केल्त का ? अस पन म्हणतात

Pages