मंदार...

Submitted by सायु on 27 August, 2014 - 06:38

मंदार.... या फुलाची महती काही न्यारीच आहे..

मंदाराला वेगवेगळ्या नावाने संबोधीले जाते जसे की, पाढरी रुई, अर्क, श्चेतारक..
या फुलाला हिंदु संस्क्रुतीत एक धार्मीक स्थान आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गणपती बाप्पा, त्याच्या प्रीय
फुलांपैकी हे एक फुल...म्हणुन ही हे फुल नेहमी माझे लक्ष वेधुन घेते...

साधारण दोन ते अडीच इंच परीघ असलेले हे फुल खुपच मोहक आणि दणकट असते..
शुभ्र पाच पीळदार पाकळ्या आणि मधोमध मंद सुवास असलेल्या परागांचा मुकुट.. म्हणुनच याला "क्राऊन फ्लावर" असेदेखील म्हणतात...थायलंड मधे पुष्परचने साठी याचा वापर जास्त प्रमाणात होतो.

mandar_0.jpgmandar_2.jpg

श्वेतारक, नाव देखील अगदी समर्पक आहे... मला आठवते, लहानपणी हनुमान मंदीराच्या आवारात याचे झाड होते..याचे फुलांनी बहरलेले झाड न्ह्याहळने हा माझा लहान पणा पासुनचा छंद Happy ह्याचे बहरलेले झाड म्हणजे असंख्य शुभ्र टप्पोर्‍या चांदण्या जणु काही एखाद्या झाडावर विराजल्या आहेत असे भासते Happy

मला आठवते आजी सांगत असे, याच्या मुळाशी साक्षात गणपतीचा वास असतो.. म्हणुन या झाडावर विशेष श्रद्धा.. बरेच लोकं मंदार व्रुक्षाच्या बुंद्याशी दिवा लावतांना दिसतात.. हळद कुंकु, लाल फुल, अक्षदा, उदबत्ती, कापुर अशी साधीशीच पण खुप मनोभावे पुजा करतांना दिसतात.. आजी सांगायची की अशी पुजा सलग एकवीस वर्षे केली की, याच्या मुळाला गणेशाचा आकार येतो.. त्याला सा़क्षात गणपती पावतो.. काही लोक अशी पुजा एक वर्ष करतात आणि नंतर त्याच्या एखाद्या फांदीतुन गंंणेशा साकारुन देवघरात प्राणप्रतीष्ठा करता.. त्याला श्चेतारक गणेश म्हणतात.. मुदग्ल पुराणातही याचा उल्लेख आहे..

याचे जेवढे धार्मीक महत्व आहे तेवढेच आयुर्वेदातही...
हे झाड उंचीला साधारण ५ ते ६ फुट असते.. ह्याच्या फांद्या म्रूदु आणि किंचीत पिंगट असतात, फांदी किंवा पान तोडल्यावर दुधा सारखा तरल द्रव बाहेत येतो. पायात काटा वगैरे गेला की आपण सगळे याच्या दुधाचाच प्रयोग करतो..

तसेच याची फि़कट हिरवी लंबगोल / अंडाक्रुती पाने, याची घनता इतर पानांपेक्षा जास्तच असते. ही सुद्धा औषधी...
पोटदुखी वर हयाचे पान दिव्यावर गरम करुन पोटावर बांधतात..

याच्या कोवळ्या कळ्यांचा रस हा कानदुखीवर रामबाण ईलाज आहे..

ह्याच्या मुळाबद्द्ल काय सांगावे, अल्सर, एक्झीमा सारखा भयंकर रोगावरचे औषध यापासुन तयार करतात.
तसेच वेगवेगळ्या त्वचा रोगांचे निवारण पण होते..

हे झाड बारामासी म्हणजेच बारामहिने फुलं देणारे आहे. फुलं गळली की याला फळे धरतात..

mandar 1.jpg

विविध किटक, फुलपाखरे आणि पक्षी त्याकडे आकर्षीत होतात. पक्षी याची फळे चोचीने फोडतात, आत कापुस आणि असंख्य काळपट बिया असतात.. त्यातुनच त्याचे संवर्धन आणि बिज प्रसार पण होतो...
seedss broken_0.jpg

तर असे हे बहुगुणी मंदार केवळ गणेशाचेच नव्हे तर शंकराचे पण प्रीय आहे...

" मंदार बिल्वे बकुळे सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी" असा उल्लेख "शिवस्तुती" मधे पण आहे...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केळशीकर | 27 August, 2014 - 16:23 नवीन

स्मित
<<<

केळशीकर,

फुलाबद्दल चाललंय!

================

मस्त माहिती!

वा सायली, किती सुंदर लिहिलयस, माहिती पण छान दिलीस,

इथे मुंबईच्या आसपास पांढरी रुई जास्त नाही बघितली पण श्रीरामपूरला अगदी प्रत्येक घराच्या दाराशी बघितली.

खुप छान माहिती.

मंदार ह्या वृक्षासंबंधी आज प्रथमच वाचतोय आजपर्यंत कधीही हे फुल पाहण्यात वा ऐकण्यात आले नव्ह्ते. मुंबईत किंवा गावीसुध्दा कधी हा वृक्ष पाहिला नाही. त्यामुळे धन्यवाद.........

वा वा... छानच माहिती, सायली.
हे झाड माझ्या शाळेच्या वाटेवर एका घरात होतं. आणि अगदी लखलखीत फुलायचं... ते आठवलं... फुलं बघून.
मोहक अन दणकट फुलं हे कसं छान व्यक्तं केलयस.