मंदार.... या फुलाची महती काही न्यारीच आहे..
मंदाराला वेगवेगळ्या नावाने संबोधीले जाते जसे की, पाढरी रुई, अर्क, श्चेतारक..
या फुलाला हिंदु संस्क्रुतीत एक धार्मीक स्थान आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गणपती बाप्पा, त्याच्या प्रीय
फुलांपैकी हे एक फुल...म्हणुन ही हे फुल नेहमी माझे लक्ष वेधुन घेते...
साधारण दोन ते अडीच इंच परीघ असलेले हे फुल खुपच मोहक आणि दणकट असते..
शुभ्र पाच पीळदार पाकळ्या आणि मधोमध मंद सुवास असलेल्या परागांचा मुकुट.. म्हणुनच याला "क्राऊन फ्लावर" असेदेखील म्हणतात...थायलंड मधे पुष्परचने साठी याचा वापर जास्त प्रमाणात होतो.
श्वेतारक, नाव देखील अगदी समर्पक आहे... मला आठवते, लहानपणी हनुमान मंदीराच्या आवारात याचे झाड होते..याचे फुलांनी बहरलेले झाड न्ह्याहळने हा माझा लहान पणा पासुनचा छंद ह्याचे बहरलेले झाड म्हणजे असंख्य शुभ्र टप्पोर्या चांदण्या जणु काही एखाद्या झाडावर विराजल्या आहेत असे भासते
मला आठवते आजी सांगत असे, याच्या मुळाशी साक्षात गणपतीचा वास असतो.. म्हणुन या झाडावर विशेष श्रद्धा.. बरेच लोकं मंदार व्रुक्षाच्या बुंद्याशी दिवा लावतांना दिसतात.. हळद कुंकु, लाल फुल, अक्षदा, उदबत्ती, कापुर अशी साधीशीच पण खुप मनोभावे पुजा करतांना दिसतात.. आजी सांगायची की अशी पुजा सलग एकवीस वर्षे केली की, याच्या मुळाला गणेशाचा आकार येतो.. त्याला सा़क्षात गणपती पावतो.. काही लोक अशी पुजा एक वर्ष करतात आणि नंतर त्याच्या एखाद्या फांदीतुन गंंणेशा साकारुन देवघरात प्राणप्रतीष्ठा करता.. त्याला श्चेतारक गणेश म्हणतात.. मुदग्ल पुराणातही याचा उल्लेख आहे..
याचे जेवढे धार्मीक महत्व आहे तेवढेच आयुर्वेदातही...
हे झाड उंचीला साधारण ५ ते ६ फुट असते.. ह्याच्या फांद्या म्रूदु आणि किंचीत पिंगट असतात, फांदी किंवा पान तोडल्यावर दुधा सारखा तरल द्रव बाहेत येतो. पायात काटा वगैरे गेला की आपण सगळे याच्या दुधाचाच प्रयोग करतो..
तसेच याची फि़कट हिरवी लंबगोल / अंडाक्रुती पाने, याची घनता इतर पानांपेक्षा जास्तच असते. ही सुद्धा औषधी...
पोटदुखी वर हयाचे पान दिव्यावर गरम करुन पोटावर बांधतात..
याच्या कोवळ्या कळ्यांचा रस हा कानदुखीवर रामबाण ईलाज आहे..
ह्याच्या मुळाबद्द्ल काय सांगावे, अल्सर, एक्झीमा सारखा भयंकर रोगावरचे औषध यापासुन तयार करतात.
तसेच वेगवेगळ्या त्वचा रोगांचे निवारण पण होते..
हे झाड बारामासी म्हणजेच बारामहिने फुलं देणारे आहे. फुलं गळली की याला फळे धरतात..
विविध किटक, फुलपाखरे आणि पक्षी त्याकडे आकर्षीत होतात. पक्षी याची फळे चोचीने फोडतात, आत कापुस आणि असंख्य काळपट बिया असतात.. त्यातुनच त्याचे संवर्धन आणि बिज प्रसार पण होतो...
तर असे हे बहुगुणी मंदार केवळ गणेशाचेच नव्हे तर शंकराचे पण प्रीय आहे...
" मंदार बिल्वे बकुळे सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी" असा उल्लेख "शिवस्तुती" मधे पण आहे...
खुप छान माहिति
खुप छान माहिति
धन्यवाद प्रिती...
धन्यवाद प्रिती...
(No subject)
छानच आहे माहीती...
छानच आहे माहीती...
केळशीकर | 27 August, 2014 -
केळशीकर | 27 August, 2014 - 16:23 नवीन
स्मित
<<<
केळशीकर,
फुलाबद्दल चाललंय!
================
मस्त माहिती!
बेफिकीर, मी फुलाबद्दलच
बेफिकीर, मी फुलाबद्दलच अप्रिशिएट केलं.
छान माहिती.. अष्टविनायकांपैकी
छान माहिती.. अष्टविनायकांपैकी एका गणेशाच्या देवळाच्या आवारात खुप मोठे झाड आहे. मी ते बहरलेले बघितले आहे.
मुग्धटली, केळशीकर,बेफिकीर
मुग्धटली, केळशीकर,बेफिकीर दिनेश दा, खुप खुप धन्यवाद
छान माहिती!
छान माहिती!
वा सायली, किती सुंदर लिहिलयस,
वा सायली, किती सुंदर लिहिलयस, माहिती पण छान दिलीस,
इथे मुंबईच्या आसपास पांढरी रुई जास्त नाही बघितली पण श्रीरामपूरला अगदी प्रत्येक घराच्या दाराशी बघितली.
धन्यवाद स्वाती, अन्जु.. ताई
धन्यवाद स्वाती, अन्जु..
ताई काही लोक आवर्जुन अंगणात लावुन घेतात, सौख्याचे प्रतिक म्हणुन.:)
छान माहिती!
छान माहिती!
फारच छान माहीती, अगदी गहीवरुन
फारच छान माहीती, अगदी गहीवरुन आलं वाचताना!
विशेष धन्यवाद!
- मंदार
मंजु ताई, मंदार
मंजु ताई, मंदार धन्यवाद....
मंदार
सायली, मस्त महिती आणि अगदी
सायली, मस्त महिती आणि अगदी योग्य वेळेला लिहीलीस,
छान माहिती.
छान माहिती.
आम्ही रुई म्हणतो.. उन्हाळ्यात
आम्ही रुई म्हणतो.. उन्हाळ्यात ह्या "म्हातार्या" (पिसांसकटच्या बिया) धरुन वहीत ठेवायला खुप आवडायचं!
खुप छान माहिती. मंदार ह्या
खुप छान माहिती.
मंदार ह्या वृक्षासंबंधी आज प्रथमच वाचतोय आजपर्यंत कधीही हे फुल पाहण्यात वा ऐकण्यात आले नव्ह्ते. मुंबईत किंवा गावीसुध्दा कधी हा वृक्ष पाहिला नाही. त्यामुळे धन्यवाद.........
धन्यवाद. आवडले.
धन्यवाद. आवडले.
हेमा ताई,अंकु, धनुकली,नरेश,
हेमा ताई,अंकु, धनुकली,नरेश, सुसुकु धन्यवाद सगळ्यांचे...
छान आहे माहिती. आवडली
छान आहे माहिती. आवडली
धन्यवाद नंदिनी ताई..
धन्यवाद नंदिनी ताई..
>>>हे फुल खुपच मोहक आणि दणकट
>>>हे फुल खुपच मोहक आणि दणकट असते.. >>> अगदी अगदी. मस्तं जमलाय लेख !
वा वा... छानच माहिती,
वा वा... छानच माहिती, सायली.
हे झाड माझ्या शाळेच्या वाटेवर एका घरात होतं. आणि अगदी लखलखीत फुलायचं... ते आठवलं... फुलं बघून.
मोहक अन दणकट फुलं हे कसं छान व्यक्तं केलयस.
राधिका, दाद खुप खुप आभार...
राधिका, दाद खुप खुप आभार... लखलखीत शब्द खुप साजेसा आहे
व्वा छान माहिती, सायली
व्वा छान माहिती, सायली ........:स्मित:
धन्यवाद स्मितु..
धन्यवाद स्मितु..
मस्तच, माहितीपूर्ण लेख !
मस्तच, माहितीपूर्ण लेख !
खुप छान माहिती.
खुप छान माहिती.