मंगळागौर फक्त बायकांची असते म्हणून! पुरुषांचीही असती तर घरातले सगळे पुरुष माझ्याभोवती फेर धरून विव्हळले असते "हास रे आदे" आणि मी पुटपुटलो असतो "कसा मी हासू"!
आज मी मन मोकळे करणार आहे. इतके दिवस काय काय मोकळे करायचा प्रयत्न केला, शेवटी समजले की आपल्या नशिबात फक्त मनच मोकळे करणे आहे.
माझ्या बायकोचे वडील बाबाजी बाबाजी असे ओरडत झोपेतून उठतात आणि माझी बायको 'आजी की माजी' असे ओरडत उठते. मी तिला थोपटत 'माजी हो, माजीच' असे समजावून पुन्हा झोपवतो तेव्हा ती किती प्रेमाने मला म्हणते, 'तुझं मन किती मोठंय, जा आता वर पलंगावर'!
हिचं प्रेम आदित्यवर, माझं नांव आदित्य, पण हिचं प्रेम माझ्यावर नाही. मग मी पाहिजे कशाला? तो एक इस्पितळात जातोय का राहतोय ह्या अवस्थेत उताणा पडलाय त्याला वाचवायला? का गाडीच्या रिअर व्ह्यू मिररमधून शेजारी बसलेला माणूस पाहण्याचे कसब शिकायला?
माझ्यावर इतक्याजणी मरतात. सुकुमार तरुणींपासून ते 'हल्ली वाटतं पण होत नाही, नाही?' कॅटेगरीपर्यंतच्या सगळ्याजणी मरतात. पण नशीबच फुटकं! ते एक हातपाय तुटकं तिकडे रुग्णालयात पडलंय त्याच्यासाठी घरचा प्रत्येकजण तडफडतोय. आणि मी एक वर्ष पलंगावर लोळीलोळी करत होतो त्याचे कुणाला काही नाही. सिंगल बेडच बनवायला हवा होता. उरलेल्या पैशात चार दागिन्यांच्या पेट्या आणून त्या अर्चू आणि वहिनीसमोर आपटल्या असत्या. पात्रांची नावं तरी वेगळी ठेवायची ना? तेही नाही. तोही आदित्य, मीही आदित्य! हल्ली तर मला माझे बाबा, दादा, अर्चूचा नवरा, तो बाबाजीवाला हे सगळे आदित्यच असावेत असे वाटते. असे वाटते की लग्न झालेल्या किंवा न झालेल्या पुरुषांना आदित्य असे म्हंटले जाते.
म्हणे 'कशी मी नाचू'! हवी तशी नाच म्हणाव! गेल्या वर्षी नवीन फरश्या बसवल्या होत्या, एका मंगळागौरीत नामशेष झाल्या. काय बायका का काय! मला वाटतं ह्या बायकांचे नवरे अनेक वर्षे जमीनीवर एकटेच झोपत असावेत.
तुम्ही कधी जेजुरीच्या ३६५ पायर्या चढला आहात का? माणूस घामाघूम होतो. मांड्या लाकडासारख्या होतात. पोटर्या आपल्या नसून दुसर्या कोणाच्या आहेत असे वाटू लागते. छातीचा भाता फुटायची वेळ येते. हा सगळा त्रास मुळीच होऊ नये म्हणून म्हणे स्वतःच्या बायकोला उचलून त्या पायर्या चढाव्यात असे म्हणतात. कारण तसे केले की माणूस पहिल्याच पायरीवर लुढकतो व नंतरचे त्रास होत नाहीत. आम्ही तेच केले. पहिल्या पायरीवर मी हिला उचलल्यासारखे केले आणि लुढकलो. मग बाकीच्या पायर्या ही माझे फुलासारखे वजन हतात घेऊन चढली आणि वर पोचल्यावर पुन्हा मी हिला उचलल्यासारखे केले आणि त्याचे शूटिंग घेतले. पण मला सांगा, तेथे मला हात द्यायला तो दुसरा आदित्य आला का? तेव्हा मात्र मी एकट्याने हिला उचलायचे. आणि जमीनीवर ठेवले की हिचा 'आदू आदू' जप सुरू! धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय!
तो माझ्याआधी टेंपररी पांढरं कपाळ मिरवून जातो तो श्रीबाळ बरा! निदान त्याच्या बायकोला काही आठवतच नाही. आमच्याकडे नाही तेच फक्त आठवते. हिला सतरा ठिकाणी घेऊन फिरलो, तुला तुझा आदू मिळवून देईन अश्या अन्याय्य हम्या दिल्या तेव्हा कुठे हिच्या तोंडातून आले की वटपौर्णिमेला माझे खरे प्रेम कोणावर आहे ते सांगेन!
हिंदूंमध्ये हा सण नसता तर माझे काही खरे नव्हते. एका जन्मात मिळालेला पती सात जन्म मागायच्या लायकीचा तरी आहे की नाही हेही अजून हिने पाहिलेले नाही अन् ही काय माझ्यावर प्रेम व्यक्त करणार?
बरं सगळं ठीकठाक झाल्यावर हिला सत्यवादाचे स्फुरण चढले. काय तर म्हणे आजवर आपण बाकीच्यांना फसवले. आता सगळ्यांना खरे सांगू. एक्स्पायरी डेट संपलेला वगैरे मेंदू आहे का काय हिचा? म्हणजे आजवर जी ससेहोलपट मी सहन केली ती आता सगळ्यांना सांगायची? म्हणजे आधी मूर्खासारखे वागा आणि ते कोणाला समजलेच नाही म्हणून शहाणे झाल्यानंतर सगळ्यांना सांगा की आम्ही मूर्ख होतो.
माई तर असली भडकली. अर्चूने तर हातपायच गाळले. आधी तिच्या अॅक्शन्स बघून मला वाटले कोणी गचकले की काय! हा विषय बायकांनाही इतका महत्वाचा वाटतो? मग माझ्याच नशिबी ही अशी वैराग्यकांक्षिणी का आलीय?
आता खरे तर आमच्याकडे सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही आहे. पण आजवर तरी कुठे काय होते असा प्रतिवाद करून आम्हाला मुदत वाढवून देत आहेत. भुवईच्या केसांचा भांग कसा पाडावा ह्यावर एक एपिसोड ठेवलाय म्हणे!
तुमची मात्र हद्द आहे. ज्यावेळी बायकापोरांना घेऊन बागेत वगैरे जावे त्यावेळी तुम्ही माझ्या कुचंबणेचा आस्वाद घेत बसता?
नवरात्रात आमच्या घरी गरबा आहे. मलाही सरावाला धाडतायत सध्या! बहुधा प्रथमच मला कोणा माणसाच्या नाही तर एखाद्या गाण्याच्या तालावर नाचताना दाखवायचे असेल. ह्या गावचा, त्या गावचा, आदे नाही आला, आन नाही आला, कसा मी हासू!
============================================
-'बेफिकीर'!
हे काहीतरी जबरी दिसत आहे, पण
हे काहीतरी जबरी दिसत आहे, पण मूळ सिरीयल चा संदर्भ (रेशीमगाठी? ) पूर्ण माहीत नसल्याने सगळे समजले नाही << होना, श्री बाळ लिहील आहे म्हणुन सिरीयल बद्दल आहे. पण त्यात आदे कधी आला ते कळम नाही.
(No subject)
शेवटची ओळ
शेवटची ओळ
(No subject)
सर्वात जास्त आवडलेला कोतबो
सर्वात जास्त आवडलेला कोतबो
(No subject)
अप्रतिम........
अप्रतिम........

मस्तच !
मस्तच !
भारिये
<<बहुधा प्रथमच मला कोणा
<<बहुधा प्रथमच मला कोणा माणसाच्या नाही तर एखाद्या गाण्याच्या तालावर नाचताना दाखवायचे असेल. ह्या गावचा, त्या गावचा, आदे नाही आला, आन नाही आला, कसा मी हासू!>>
<<तुला तुझा आदू मिळवून देईन अश्या अन्याय्य हम्या दिल्या>>
ओळन ओळ प्रचंड जबरी
मस्त ! जेजुरीच्या प्रसंगाच
मस्त ! जेजुरीच्या प्रसंगाच आपण केलेल विश्लेषण फारच आवडल. पुर्वीच्या काळी नवरा - बायकोत वयाच अंतर असे. मग असले भीम पराक्रम जमत. ( ते ही लग्न झाल्या झाल्या ).
आताशा सिंधुच उचलुन नेईल सुधाकराला आणि घालेल खंडोबाच्या पायी.
(No subject)
ओ . हे मलाही कोतबो काय प्रकरण
ओ . हे मलाही कोतबो काय प्रकरण आहे ? सगळीकड आपलं मलाही कोतबो मलाही कोतबो चाललंय. कुणीतरी सांगा .
आदित्य देसाइ कुठल्या
आदित्य देसाइ कुठल्या ग्रहावरचा रहिवासी आहे हे माहिती नसल्यामुळे, कायबी नाय कळलं.
ओ . हे मलाही कोतबो काय प्रकरण
ओ . हे मलाही कोतबो काय प्रकरण आहे ? सगळीकड आपलं मलाही कोतबो मलाही कोतबो चाललंय. कुणीतरी सांगा .>>
मोहिनी ट्रिपल थ्री,
कोतबो>> कोणाशी तरी बोलायचय..
सॉलिड.
सॉलिड.
(No subject)
आदित्य देसाइ कुठल्या
आदित्य देसाइ कुठल्या ग्रहावरचा रहिवासी आहे हे माहिती नसल्यामुळे, कायबी नाय कळलं>>ग्रह नाही अग्निपंख..उपग्रह.. उपग्रह वाहिनी- झी मराठी वरील जुळून येती रेशिमगाठी या मालिकेतील एक मुख्य पात्र आहे हे आदित्य देसाई..
एकदम जबरी.. अशक्य हसतेय.
एकदम जबरी..
अशक्य हसतेय.
कोणाशी तरी बोलायचय >>> आसं
कोणाशी तरी बोलायचय >>>
आसं हाय व्हय ... मालिका कधी बघितली नाही. पण मध्ये मध्ये add दाखवतात त्यावरून बर्यापेकी माहित आहे. झकास लिहिलंय
सही
सही
(No subject)
हाहा...मस्त...तुम्ही
हाहा...मस्त...तुम्ही होसुमीयाघ मधल्या पिंट्या बद्दल लिहायला हवं होतं....नाहीतर आपटे
आपटे परफेक्ट ! न्याय मिळाला
आपटे परफेक्ट !
न्याय मिळाला असता
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
>>>माझ्या बायकोचे वडील बाबाजी
>>>माझ्या बायकोचे वडील बाबाजी बाबाजी असे ओरडत झोपेतून उठतात आणि माझी बायको 'आजी की माजी' असे ओरडत उठते. मी तिला थोपटत 'माजी हो, माजीच' असे समजावून पुन्हा झोपवतो तेव्हा ती किती प्रेमाने मला म्हणते, 'तुझं मन किती मोठंय, जा आता वर पलंगावर'!<<<<< मी हसुन हसुन मेलो इथे बाबाजी....आय मीन बेफीजी

भारी ! काही काही पंचेस मस्त
भारी ! काही काही पंचेस मस्त जमलेत

"म्हणजे आधी मूर्खासारखे वागा
"म्हणजे आधी मूर्खासारखे वागा आणि ते कोणाला समजलेच नाही म्हणून शहाणे झाल्यानंतर सगळ्यांना सांगा की आम्ही मूर्ख होतो. " हे भन्नाट आहे.
मस्त लेख आवडला हा आदित्य
बापरे केवढी हसतेय मी !!
बापरे केवढी हसतेय मी !!
(No subject)
Pages