१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
मदत करा!
मदत करा! घरात खूप काकड्या आहेत. त्याचे सॅलड, खमंग काकडी सोडून काय करता येइल? शक्यतो तिखट पदार्थ सुचवा प्लीज.
ok तर मग! मी
ok तर मग! मी पण फेकते. एकच सांगा सगळ्याजणी की, दुधाच्या can वर sell by date आहे १६ जुलाई आणी १६ जुलाईलाच ते नासले. हे कसे काय? साधारण एखाद week चालायला हवे की नको?
भजी,
भजी, थालीपीठ, चिल्ड सूप, काकडी घालून कढी.
झी, असं काही नाही. उन्हाळ्यात बरेचदा होतं असं. फ्रीजबाहेर राहिलं होतं का? मोठा कॅन वेळेत संपत नाही असे लक्षात आले तर लहान आणावा.
किसलेली
किसलेली काकडी घालून केलेली थालीपीठं खूप छान लागतात.
काकडिचे
काकडिचे थालिपिठ करता येइल. मिनोतिच्या (कराडकर)ब्लॉगवर आहे.
काकडीची
काकडीची पीठ पेरून भाजी (कोरोडा) मस्त होते. शिजून अगदीच कमी होत असल्यामुळे काकड्या भरपूर लागतात. काकडीचा किस तेल-मोहरी-हिंग्-हिरव्यामिरच्यांच्या फोडणीत घालायचा. परतून त्यावर हळद, तिखट, मीठ घालायचं. अगदी थोडं पाणी उरलं असताना त्यावर पीठ भुरभुरवायचं. शिजवून खमंग करता येईल. वरून चिरलेली कोथिंबीर. ए-वन लागतं फुलक्याशी.
विदर्भात
विदर्भात काकडीचा कोरडा करतात - म्हणजे काकडीचा कीस घालून पिठले. मस्त लागते एकदम.
हिंग, जिरे,, लसूण, कढिपत्त्याची फोडणी करायची, हळद तिखट, अन भरपूर काकडीचा कीस घालायचा, अन जरा परतायचं. पाणी , मीठ घालून उकळी आली की पीठ पेरायचं , झाकण ठेवून शिजवायचं, अन शेवटी कोथिंबीर. पोळी / भाताबरोबर अतिशय टेस्टी लागतो हा कोरडा. विदर्भात लोक हे खाताना यावर परत वरून हिंगाची चरचरीत फोडणी घालतात.
अगदी. अगदी.
अगदी. अगदी. मैत्रेयी आणि मृण. काकडीची ब्येष्टेष्ट कृती आहे ही.
चिनू- सौदिंडियन दहीभातात काकडी किसून घालायची. वाटल्यास सांडगी मिरची तळून वरून कुस्करुन घालायची. सही लागते. आवडत असल्यास गाजराचाही किस घालता येतो.
साधे काकडी किसून पराठेही छान लागतात.
१६ जुलै
१६ जुलै होऊन गेलीये, फेकुन दे दूध.
हे
हे पार्ल्यातलं कबाबांचं डिस्कशन
पार्ल्यातल्या सुगरणींनो,
मला चिकन रेशमी कबाब कसे करायले कुणी सांगेल का? मी एकदा प्रयत्न केला होता पण खूप dry झाले कबाब भाजल्यावर. बोनलेस, स्किनलेस चिकनचे २ इंचाचे तुकडे आणि ३ तास marination केलं होतं. लालू, शोनू, मृ, please help. उद्या BBQ आहे माझ्याकडे त्यासाठी करायचे होते.
lalu | 17 जुलै, 2009 - 09:28
अंजली, जास्त वेळ marinate कर. overnight तरी. मसाला लावून २-३ तास बाहेर ठेवल्यावर रात्री फ्रीजमध्ये ठेव. भाजण्यापूर्वी पुन्हा रुम टेम्प ला येऊदे. अजून एक म्हणजे मॅरिनेट करताना ऑलिव्ह ऑइल घाल.
Anjali28 | 17 जुलै, 2009 - 09:40
Thanks a Lot लालू! आजच marinate करायला ठेवते. ऑऑ किती घालायचे? २-३ टे.स्पू?
lalu | 17 जुलै, 2009 - 10:01
सगळ्या तुकड्यांना नीट लागेल एवढे घे. त्यामुळे मऊ आणि ज्यूसी होतात.
Arch | 17 जुलै, 2009 - 10:46
अंजली, रेशमी कबाब करताना दही आणि चीज फेटून लावायच ग्रील करायच्या आधी एक तास. त्यात थोडी, कोथिंबीर, वेलची पावडर वगैरे घालायच. मी कधी तेल नाही घातलं.
Arch | 17 जुलै, 2009 - 10:49
आणि हो, मॅरिनेट करताना मीट टेंडरायजर घालते. तेंव्हा दही नाही घालत. हवं असेल तर रेसिपी घरी गेल्यावर लिहिते. हे कबाब अवनमध्येही छान होतात ब्रॉईल्वर ठेवून.
Anjali28 | 17 जुलै, 2009 - 10:56
आर्च,
कोणतं चीज वापरतेस तू? please रेसेपी लिही
lalu | 17 जुलै, 2009 - 10:57
मी कधी चीज नाही लावलं. टेन्डरायजर म्हणून दही आहेच रेसिपीत आणि ऑऑ लावलं. इथले retaurant वाले लावतात असं ऐकून आहे. मला फरक वाटला त्याने.
ashwini | 17 जुलै, 2009 - 11:00
टेन्डरायजर म्हणून पपई पण लावतात. पण दही आणि तेल (मी साधच लावते, ऑऑ नाही) पुरतं मला.
Mrinmayee | 17 जुलै, 2009 - 11:04
माझ्या पाकिस्तानी मैत्रिणीच्या रेसिपीनुसार मॅरिनेडमधे क्रीम आणि भिजवलेल्या बदामांची पेस्ट घालायची. ग्रिल करताना उरलेलं मॅरिनेड मीटवर थोडं थोडं लावायचं. साधारण दीड्-दोन इन्चाचे तुकडे असतील तर मीट शिजायला वेळ लागत नाही. जास्त वेळ ग्रिल केल्यामुळे कोरडे होतात कबाब. तीच्या देखरेखीखाली दोनदाच केलेत आत्तापर्यंत. मऊ आणि सक्युलंट.
lalu | 17 जुलै, 2009 - 11:06
किती वेळ marinate करायला सांगितले तिने?
Mrinmayee | 17 जुलै, 2009 - 11:09
२४ तास! मला इतका वेळ मुरवणं अती वाटलं, पण खाणार्यांनी 'असंच मुरव' सांगीतलं!
cinderella | 17 जुलै, 2009 - 11:10
आई गं इतक्या पोस्ट नुसत्या रेशमी कबाबसाठी. ह्या पानाची प्रिंट घेऊन त्यात गुंडाळले चिकन तरी मऊ होइल
बरं हे सर्व सामान वापरुन पनीर करायचे असेल तर कितीवेळ मॅरिनेट केले पाहिजे ?
naynishv | 17 जुलै, 2009 - 11:10
आयला मुरवायला २४ तास आणी खायला १ मिनीटं
lalu | 17 जुलै, 2009 - 11:11
हो , मी पण कमीत कमी रात्रभर, १२ तास तरी marinate करावे हेच ऐकले. रेसिपीमध्ये २४ तासच लिहिलेत.
अंजली, कुठल
अंजली,
कुठलेही प्रोटीन इतक्या वेळ शिजवल्यावर चिवट व कोरडं होतेच. चिकन तर लवकर होते माश्यापेक्षा.
रात्रभर मुरवले असेल तर मोजून ३ मेनीटे एक बाजूने मग तो skewer turn over करून दुसर्या बाजून ३ मिनीटे कोळश्यावर भाजावे. ओवन मध्ये अवन अगदी ४०० वर ठेवून १५ मिनीटे गरम झाले की हेच प्रकार ४ मिनीटे एका बाजूने व ४ मिनीटे दुसर्या बाजून. turn केल्यावएर कोळश्याव्र भाजत असेल तर पुन्हा उरलेले तेल मिश्र दही लावायचे तेच ओवन मध्ये करताना. मस्त होते. मी कधी कधी ८ तास्(सकाळी मूरवून संध्याकाळी) नाहीतर मटण असेल तर (मटणाचे कबाब) तर रात्रभर ठेवते. लिंबू वापरू नये रात्रभर ठेवायचे असेल तर. दही बेस्ट.
रेशमि कबाब
रेशमि कबाब continue.....
marinate करायला दह्याएवजि सोअर क्रिम वापरावे अस फूड नेटवर्क वर बघितल होत.
प्राजे,
प्राजे, काय एकदम टायमींग आहे. मी शेवटी हीच रेसीपी लिहायला आले नी तुझी पोस्ट.
माझी रेसीपी अशीच आहे, ह्याने कबाब बिघडणे शक्यच नाही.
२ चमचे सॉअर क्रीम, १ अंड्याचे फक्त पांढरे, जे काय मसाले आवडतील ते,लसून सी सॉल्ट बरोबर बारीक करून घ्यायची, ऑऑ १ चमचे. हे ४ कबाब साठी. रात्रबह्र फ्रीजमध्ये ठेवायचे.
तसेही फार मसाले कब्बाब लावू नये. दही बाद जर सॉअर क्रीम असेल तर.
अंजली करून बघ.
झी,
झी, नासलेल्या दुधापासुन पनीर बनवुन त्याचे पनीर पराठे किन्वा पनीर भुर्जी अगदी छान होते...
अरे वा!
अरे वा! खूपच धन्यवाद. आता काकडी सप्ताह सुरु
काकडी घालून कढी.. interesting idea. काकडीचं कोरडं ऐकलं होतं. करतेच आता. परत एकदा थांकु.
चिनू
चिनू काकडीच धोंडस करता येत. हा गोड पदार्थ असला तरी चविष्ट आहे. जुन्या मा.बो. वर त्याची रेसिपि आहे.
रुषीच्या भाजीत काकडी चांगली लागते.
तुला जर काही तिखट नाही करता आले तर सरळ काकडी कापुन तिखट मिठ लाउन खा.
<चिनू मदत
<चिनू मदत करा! घरात खूप काकड्या आहेत. त्याचे सॅलड, खमंग काकडी सोडून काय करता येइल? शक्यतो तिखट पदार्थ सुचवा प्लीज.>
काकडि किसुन आंबोळिच्या रेडिमेड पिठात टाक. त्यात कोथिंबीर, मिठ, मिरचि, जिरा पावडर टाक. नेहमि सारख्या आंबोळ्या काढुन चटणि बरोबर घे. (ह्याला काकडिचे पोळे म्हणतात, असेच कलिंगडाचे पोळे पण बनतात.
गिफ्टसचे
गिफ्टसचे गुलाब जाम बनवताना गोळ्यांना चिरा पडु नये म्हणुन काय करावे? कारण गोळे करताना एक जरी चीर पडली तर पाकात टाकल्यावर गुलाब जाम फाटल्या सारखा दिसतो. बाहेरच्या सारखे एकजीव झालेले गोळे करण्यासाठी काहितरी युक्ती सांगा ना प्लीज.
त्या
त्या पाकिटावर लिहिलेय तितकेच मोजून पाणी घ्यायचे. हाताला थोडेसे तूप लावून गुलाबजाम वळायचे. दाब न देता गोलगोल फिरवायचे. यावेळी त्यावर चिरा असू नयेत. तसेच वळताना ( तळेपर्यंत ) ते ओल्या करुन घट्ट पिळलेल्या कपड्याखाली झाकून ठेवावेत.
वाटल्यास
वाटल्यास थोडा दुधाचा हात लाव, गोळे वळताना
धन्यवाद
धन्यवाद दिनेशदा, आरती. नक्किच करुन पाहिन.
धन्यवाद
धन्यवाद सर्वांना!
घराच तुप
घराच तुप संपलं म्हणुन मदर डेअरीचे एक किलो तुप विकत आणले. पण त्यात बहुतेक डालडा मिसळला असावा. डालड्यासारखी चव अन वास येतोय. फक्त एक दिवस फुलक्यांना लावले होते, पण वास आल्यामुळे ते फुलके पण खावे वाटले नाही. काही करता येईल का? मला फारशी आशा नाहीये म्हणा.
अल्पना,
अल्पना, केक मधे वापरत जा ते तुप. अगदीच आवडला नसेल स्वाद्/वास तर सरळ पुजेसाठी तुपाचा दिवा लावतो तेव्हा वापरुन टाक
-------------------------------------------
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात, आज आजची करुया बात
अल्पना,
अल्पना, तुपाला एक कढं आण. विकतची तुप नीट कडवलेली नसतात त्यामुळे त्याला एकप्रकारचा वास येतो आणि चवीला पण जरा वेगळी लागतात. एक कढ आणली की बर्याच वेळेला तुपाची चव सुधारते. इथे मी विकतचे तुप आणले की हेच करते. आणि चव नाहीच बदलली तर कविताने सांगितलेले उपयोग आहेतच...
अग एकदआ
अग एकदआ कढवुन घेतलं होतं मी.. आता कविताने सांगितलेलेच उपाय. नवरा तर म्हणतोय फेकुन दे सरळ. पण नाही फेकवत ग.
दुकानदाराशी चांगली भांडुन आले. :)पण नेमकं तुप आणल्याबरोबर लगेच कढवुन घेतलं, अन नेमकं त्याचं पाकीट कचर्यात टाकलं. माझ्याकडे बॅच नं. वैगरे नसल्यामुळे काही उपयोग नाही झाला त्या भांडणाचा.
नक्को आणत
नक्को आणत जाऊ विकतची तूपं. कविताचा उपाय कर. अन गरज पडली तेव्हा लोणी चांगल्या डेरीतून आणून तुप करत जा.
अग अॅना
अग अॅना पण तिने या तुपाच काय करायच ते विचारलय, पुढे भविष्यात काय करु असे नाही
हो ग. आता
हो ग. आता गरज पडलीच कधी तर तसंच करणार आहे. घरी काढते मी तुप, पण आमच्या घरी मी पंधरा दिवसांच्या सायीचं काढलेलं तुप २-३ दिवसात संपतं. गावाकडुन वैगरे कुणीही आलं की येताना घरचं एखादं किलो तुप घेवुन येतात, पण तरीही क्वचित अशी परिस्थिती येते. (अग माझ्या नवर्याला अन दीराला तुप चक्क बरणीतुन पानात ओतुन घ्यायची सवय होती पुर्वी, म्हणे हमने कभी घी को चम्मच नही लगाया. आता तरी बर्यापैकी कमी केलय त्या दोघांचं तुप खाणं, तरीही महिन्या दीड्-दोन किलो तुप सहज खपतं घरात)
आता मात्र कानाला खडा.. कधीही विकतचं तुप आणनार नाही.
आपण खात
आपण खात नाही ते देवाला कसे देउ शकतो? म्हनजे नाही ना चांगले तर द्या देवाला हे पटत नाही. बाकी आपापले मत म्हणा.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
Pages