मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - खाद्ययात्रा "

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:41

गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!

हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...

हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -

modak2.JPG
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ हर्षातै, नैवेद्य, स्वयंपाक, जेवण, खाण्याचे ताट, ताटातले पदार्थ, फराळ, उपवासाचे पदार्थ असलं काही चालत नाई बरं का Proud
एकच पदार्थ हवा Wink

इथे तुच रेसिपी दिली होतीस ना???
माझ्याकडे पण फोटो शोधावा लागेल. एकदा काढलेला अस वाटत. माझी अक्का त्याला टायगर राईस म्हणते. Lol

.

रेसिपी दिली होती, पण फोटो काढला नाही. आधीचे बरेचसे फोटो एका हार्ड डिस्कमध्ये आहे, ती नेमकी इथं नाहीय.

Sad

टोमॅटो राईसचा फोटो फार मस्त आहे.

आता ल वरून पदार्थ येऊ द्या.

.

मुग्धा तूझा चीडो पाहून स्मायली दिली त्या अगोदर अमेयने दिल. Happy
ल्या चा कोणता शब्द घ्यायचा.

टेस्टी दिसतायेत चकोल्या
सर्लप.

आरती, मला वाटतंय सेम आयडीने सेम फोटो टाकलेला चालायला नको. दुसर्‍या आयडीने टाकला तरी चालेल पण्मग क्रम रिपिट झाला तर बोअर होईल खेळायला Uhoh

Pages