हल्ली श्रावण येतोय म्हटलं की ................... लोकांना पहिली गटारी सुचते.
किंवा असेही बोलू शकतो की गटारी आहे म्हणून काही जणांना श्रावण कधी येतोय आणि कधी जातोय याचा पत्ता तरी राहतो.
पण इथला विषय गटारी नाहीये आणि हेच सांगायला वरच्या दोन ओळी खर्चल्या आहेत.
विषय आहे श्रावण पाळण्याच्या आणि या कालावधीत सामिष भोजन वर्ज्य करण्याच्या नियमाबाबतचा.
विषयाचे ज्ञान इथे मी देणार नाहीये, तर मला पडलेले प्रश्न सोडवण्यासाठी हा धागा उघडला आहे.
तर, सर्वप्रथम कोणी मला सांगेल का, श्रावण या महिन्यात मांसमटणमच्छी का खात नाही? नेमके कारण?
चला ते गूगाळून मिळेलही,
पण हा प्रश्न पडण्यामागचे नेमके कारण म्हणजे आमच्या घरात ‘आपल्याच सोयीने’ पाळत असलेला श्रावण आणि त्यामागचे कारण देण्यास घरच्यांची असमर्थतता.
तर कसे, आमच्याकडे श्रावणात चिकनमटण खात नाहीत, मात्र मासे आणि इतर जलचर खाल्लेले चालतात, (खाल्यावर कसे चालतात? नो पीजे प्लीज, ग्रूप धार्मिक आहे)
नुसते खातच नाहीत तर दर बुधवार-रविवार आणि जमल्यास शुक्रवारीही न चुकता खातात.
कोंबडी वर्ज्य असली तरी धरमपाजीचे "संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे" हे सूत्र पाळले जाते. सॉरी चुकलो, मंडे नाही, तर "श्रावणी सोमवार" पाळला जातो. घरातले काही सभासद याउपर जाऊन "श्रावणी शनिवार" देखील पाळतात, मात्र त्याचे सोमवारच्या तुलनेतले महत्व काही त्यांना सांगता येत नाही. बस्स बाहेर कोणाकडे तरी बघून आले आणि आपणही शनिवार पाळायला सुरुवात केली.
आता यातही एक गंमत बघा. चिकनमटण जरी आमच्या घरात शिजवले जात नसले तरी बाहेर हॉटेलात जाऊन खाल्ले तर घरच्यांची काही हरकत नसते. बहुधा याचे कारण म्हणजे मी आणि माझे काका. आम्ही दोघेही रावण, आमचा कसला श्रावण .. या कॅटेगरीतले.
आणि यातही मजा म्हणजे, असा हा श्रावण महिना सुकासुका जराही जात नसला तरी आता महिनाभर चिकनमटण खायचे नाही बाबा, म्हणत गटारी तेवढी जोरात साजरी केली जाते. ती सुद्धा क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि अंतिम फायनल अश्या स्वरूपात आदल्या आठवड्यातील बुधवार-शुक्रवार-रविवार तिन्ही वार साधत.
तर जेव्हा जेव्हा मला कोणी, "तू श्रावण पाळतोस का?" हा प्रश्न विचारतात तेव्हा तेव्हा मला हा वरचा सारा उतारा त्यांना स्टेप बाय स्टेप समजवावा लागतो. तरीही त्यांच्या डोक्यात तो किती उतरतो हे त्यांनाच ठाऊक. "हे असे नेमके का?" या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मला कधीच देता येत नाही आणि म्हणूनच इथे एक ट्राय मारतोय. आणखी इथे कोणाकडे या प्रकारे श्रावण साजरा होतो का?
आणि का?
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
आमच्या बिल्डींग मधे एक डॉक्टर
आमच्या बिल्डींग मधे एक डॉक्टर आहेत जे कोळी/ वैती लोकांपैकी आहेत त्यांच्या बायकोने सार्वजनिक गणपतीत पापलेटच्या कालवणाचा नैवेद्य दाखवला होता. >>>>>> बापरे .. मग हंगामा नाही का झाला?
बाकी गणपतीचे दिवस आम्हीही पाळतो, पण फक्त घरचे गणपती जाईपर्यंत, म्हणजेच गौरीविसर्जनापर्यंतच. ते गेले की येणारा पुढचाच रविवार (जर अनंत चतुर्दशी नसेल तर) लग्गेच महिना दिड महिना वाटच बघत असल्यासारखे तुटून पडतो.
डॉक्टरांकडुन झालं ना, एखाद्या
डॉक्टरांकडुन झालं ना, एखाद्या गरीबाला उभं सुद्धा केलं नसतं लोकां नी; आमच्या पार्क मधे एकाला एक आणि दुसर्याला दुसरा न्याय असतो; पैसेवाल्यांच्या समोर गोड गोड बोलणार पाठीमागे हसणार
(No subject)
(No subject)
आमच्या घरीं सोमवार, गुरुवार,
आमच्या घरीं सोमवार, गुरुवार, श्रावण इ.इ. पाळणं हा प्रकार लहानपणीं कधी पाहीला नाहीं. नंतर इतरांचं ऐकून आपल्याकडे तसं कां नाहीं असं आईला विचारलं, तर तिचं उत्तर होतं, ' अरे, तुम्हाला हवं तसं तुम्हाला करून वाढतें पण मीं मात्र सर्व तिथी, श्रावण वगैरे पाळतेच. तुम्हाला जेंव्हां मनापासून वाटेल तेंव्हां तुम्ही पाळा . मी तुमच्यावर कशाला लादूं हें सारं ! '. नंतर आमच्या भावंडांत एकाला तसं पाळावसं मनापासून वाटलं ... पण अर्थात तो मीं नव्हतों व नाहीं !
अहो विज्ञानदास . तुमच्या त्या
अहो विज्ञानदास . तुमच्या त्या लेखाची लिंक द्या. जिथे माझ्यासाठी प्रश्न आहेत. पळून गेले म्हणायला मी काही तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाहीये . उत्तर द्यायला आमची काहीच हरकत नहि. हरकत आहे ती स्वतालाच अति शहाणे समजणाऱ्या लोकांसोबत वाद घालवून time waste करायला
मला श्रावण पालन वगेरे अजिबात
मला श्रावण पालन वगेरे अजिबात पटत नाही . काय तर म्हणजे महिनाभर nonveg खायचं नाही . दारू प्यायची नाही . पुण्यसंचय करायचा . वायट गोष्टी करायच्या नसतील तर वर्षभर करू नयेत . एकच महिना करू नये ह्या मागे काय logic आहे ?
बाकी गणपतीचे दिवस आम्हीही
बाकी गणपतीचे दिवस आम्हीही पाळतो, >> आमच्याकडॅ कोकणात गणपतीचे दिवस पाळतात्च. पण विसर्जनादिवशी मासे आणुन पाठीमागच्या बाजुस (मांगरात - म्हणजे वस्तु साठवणीची जागा) ठेवले जातात. पुढच्या दाराने गणपती गेले की मागिल दाराने प्रथमावतार घरात दाखल!!
हवामानातील बदलामुळे
हवामानातील बदलामुळे खाद्यपदार्थांवर जिथे अनिष्ट परिणाम होतात, तिथे त्या काळात ते खाऊ नये. जिथे असं काही घडत नाही तिथे गतानुगतिकः सारखं अंधानुकरण करू नये. बाकी ज्याला जे आवडतं, पचतं, रुचतं आणी परवडतं, ते त्यानी खावं - प्यावं आणी सुखात रहावं, ईतरांना राहू द्यावं. - असं मला वाटतं.
मला श्रावण पालन वगेरे अजिबात
मला श्रावण पालन वगेरे अजिबात पटत नाही . काय तर म्हणजे महिनाभर nonveg खायचं नाही . दारू प्यायची नाही . पुण्यसंचय करायचा . वायट गोष्टी करायच्या नसतील तर वर्षभर करू नयेत . एकच महिना करू नये ह्या मागे काय logic आहे ?
>>>>>>
नॉनवेज खाणे आपणास अभिप्रेत असलेल्या अर्थाने वाईट म्हणजे पापकृत्य म्हणून टाळायचे नसून त्या काळात शरीराला वाईट म्हणून टाळायचे असते, फक्त ते देवाधर्माच्या नावावर सांगितले की लोकांना पटते इतकेच.
(मद्यप्राशनाला वाईट म्हणत असाल तर मात्र त्याच्याशी मी देखील सहमत, पण त्याची चर्चा इथे नको)
फेरफटका,
रावण श्रावण शारूख
अरे वा खान पण श्रावण पाळतो
अरे वा खान पण श्रावण पाळतो का?
श्रावण आणि रमझान ओवरलॅप
श्रावण आणि रमझान ओवरलॅप पीरीअडमध्ये पाळणे होत असेल
पण त्यांच्यात बहुधा उपवासच असतो. वेज नॉनवेज नुसार वार पाळणे नसते.
अवांतर - सलमानच्या घरी गणपती येतो (आई मराठी) तेव्हा त्याच्या घरात गणपतीच्या दिवसांत कदाचित मांसाहाराचे नियम पाळणे होत असेल.
मुख्य कारण आरोग्याचेच आहे.
मुख्य कारण आरोग्याचेच आहे. पूर्वी औषधे विशेषतः अॅन्टीबायोटिक्स वगैरे नसल्याने आजाराला झटपट रेमेडी नसे त्यामुळे अन्न हेच औषध या न्यायाने अन्नपदार्थाचे ऋतुप्रमाणे नियोजन करून आरोग्य साधले जायचे. पावसाळी दमट हवेत आजही पचनाचे आजार होतात फक्त आपण ते डॉक्टरच्या साह्याने मॅनेज करू शकतो. शिवाय श्रावणात सारखे सारखे उपास सण येत राहतात त्यामुळे शरीराचे अंतर्बाह्य पावित्र्य रहावे म्हणून ही योजना असावी. ही गोळी धार्मिक आवरणातून दिली म्हणजे लोक मुकाटपणे घेतात
पूर्वी आतासारखे 'असे का?'विचारायची पद्धत नव्हती....
आम्ही तेरा-महीने (आधिक मास
आम्ही तेरा-महीने (आधिक मास धरुन) श्रावण पाळतो.
आम्ही तेरा-महीने (आधिक मास
आम्ही तेरा-महीने (आधिक मास धरुन) श्रावण पाळतो.
>>>>>
मग गटारी कधी करता
हलके घ्या हं
आजचा एक किस्सा - इथे या
आजचा एक किस्सा - इथे या धाग्यावर शेअर करावासा वाटतोय.
श्रावण संपला, बुधवार साजरा करून झाला, आणि आजचा रविवार नेमका गणपतीत आला.
तरीही, आमच्याकडे गणपतीचे मोजकेच दिवस पाळत असल्याने आणि शेजारीपाजारी अगदीच जवळ गणपती नसल्याने आजही मांसाहाराचा बेत केला. घरी न शिजवता बाहेरून मागवले. त्यावर ताव मारायच्या आधी तर्रेदार चिकन करी आणि बिर्याणीचा एक फोटो काढून घेतला. आणि मग ताव मारून झाल्यावर तो व्हॉट्सअॅप ग्रूपवर शेअर केला...
मग काय, लागलीच गदारोळ उठला आणि माझ्यावर वैयक्तिक हल्ले चढवणार्या सात-आठ झणझणीत प्रतिक्रिया आल्या. जणू काही मी सभ्य ग्रुहस्थांच्या ग्रूपवर एखादा अश्लील फोटोच शेअर केला. (अवांतर - बहुधा म्हणूनच अश्लील विनोद, फोटो वा विडिओजना नॉनवेज म्हटले जाते) असो, तर मला हे अपेक्षितच होते. नव्हे, म्हणूनच मी मुद्दाम किडा करायला खास फोटो काढून शेअर केला होता.
मग मी माझ्या शाकाहारी मित्रांना सांगितले की आमच्या गावी कोकणात गौरीला तर खास चिकन-मटणाचा बेत असतो. सारेच पाळत नसतील पण अशी प्रथाच आहे. यावर एकाने या प्रथा म्हणजे फक्त जिभेचे चोचले आहेत असा आरोप करताच मी म्हणालो, मग कोणत्याही सणाला आपण देवाला नैवेद्य म्हणून जे गोडधोड करतो ते तरी देव स्वता कुठे खातो, आपणच तर खातो, म्हणजे एकाअर्थी हे आपल्याच जिभेचे चोचले पुरवणे झाले नाही का ....... बस्स त्यानंतर एक तास झाला, कोणाचा प्रतिसाद नाही, सारेच गूडनाईट न बोलता पसार ..
Pages