अंबाडीची भाकरी

Submitted by हर्ट on 27 August, 2014 - 11:46

अंबाडीचे नाव काढता काहीजणांचे दात आंबत असावेत इतकी आंबट असते अंबाडी. पण भाकरीच्या पिठात मिसळून अंबाडीची भाकरी खाताना ह्या भाजीचा आंबटपणा जिभेला हवाहवासा वाटतो.

ह्या भाकरीची पाककृती लिहिण्यापुर्वी एक चित्र पाहूया ह्या भाजीचे आणि हे चित्र नेटवरुन घेतलेले आहे. नेटला धन्यवाद.

plant.jpg

आता कृती:

साहित्य: अंबाडीची भाजी, तिखट हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे

१) अंबाडीछी पाने निवडून धुवून घ्या:

gongurapappucopyrightedimage1.jpg

२) मंद आचेवर एका पातेल्यात पाणी उकळयाला ठेवा आणि पाणी कोमट झाल की मगच ही निवडलेली पाने पाण्यात सोडा. पानी झिजली की ती तळाशी बसतात आणि पानांचा रंग आणखी गडद दिसायला लागतो. पाण्याला एक शेवाळी झाक यायला लागते. की समजून घ्यायचे आता आच बंद करायची.

३) ताव्यावर तेलात हिरव्या मिरच्या आणि जिरे अरत परत कराव्यात आणि मिरच्यातील बिया बाहेर येतील पण तव्यावरच राहतील ह्याची काळजी घ्यावी. हे करताना तेल वा एखादी बी डोळ्यात उडणार नाही ह्याचीही काळजी घ्यावी. जिरे सहसा मोहरीसारखे उडत नाही. हे सर्व करुन झाले की ह्या मिरच्या पोळपाटावर किंवा पाट्यावर रगडून घ्याव्यात.

३ ला दुसरा पर्यायः

३) भाजी शिजवतानाच त्यात मिरच्या घालायच्या. दोन्ही एकत्र मऊ शिजतात. आणि मग भाकरीचे पिठ मळवताना पिठाशी मस्त एकजीव देखील होतात.

४) ज्वारीच्या पिठामधे आधी चमचाभर मिठ घालायचे. अंबाडीच्या भाकरीला जरा जास्तच मिठ लागत. मिठ कमी घातली की हवी तशी चव येत नाही भाकरीला. पिठामधे एक खळ करुन पातेल्यातील ऊन ऊन पाणी थोडे थोडे सोडायचे आणि सराट्यानी पिठ, पाणी आणि भाजी एकत्रित एकजीव करुन हाताला गार पाणी लावून समांतर पसरवून घ्यावे. एकदमच खूप पाणी टाकले की पिठाचा उंडा पातळ होऊ शकतो. तेंव्हा थोडे थोडे घालून त्याला एकजीव करत राहावे.

एकजीव झालेला भाकरीचा उंडा असा दिसतो:
Ambadi01.jpg

५) आता एक मेणकापड घेऊन ते पोळपाटावर ठेवून भाकरी थापावी:

Ambadi05.jpg

६) ताव्यावर भाकरी टाकण्यापुर्वी भाकरी थापतानाच तावा चुलीवर ठेवावा. तापलेल्या ताव्यावर अलगद हाताने भाकरी टाकावी.

Ambadi07.jpg

७) भाकरी दोन्हीबाजूनी कडेपर्यंत खरपूस भाजून शेकून घ्यावी:

Ambadi09.jpgAmbadi13.jpg

ही झाली अंबाडीच्या भाकरीची कृती. ह्यामधे तुम्ही बदल करु शकता. जसे की थालीपिठाप्रमाणे ह्यात इतर साहित्य घालू शकता. किंवा हिवाळ्याचे दिस असतील तर तिळ घालू शकता. तेल कडेकडेला सोडून भाकरीची पोळी करु शकता. जशी तुमची चव. .तसे तुमचे बदल!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast recipie

बी,
हि आंबट नाहे लागत का? कारण ज्या पाण्यात उकळतात भाजी तेच पाणी वापरले तर खूपच आंबट होइल ना?

वा! अषी भाकरी खाल्ली नव्हती. आता करेनच...

पण (२) तसेच का करायचे? जास्त गरम पाणी झाले तर काय होते? करून बघता येईल पण विचारले.

मस्त. कधी अशी भाकरी खाल्ली नाहीये पण खायला आवडेल नक्कीच.
ती मेणकापडावर का थापलीये त्याने थालीपीठ वाटते, भाकरी पीठ लावून ताटात किंवा परातीत थापायला हवी ना.

बी छान रेसिपी. करून बघणार.

रूनी, पण तेल अजिबात नाहीये पिठामधे म्हणजे भाकरीच की गं.

मला पण झंपीचाच प्रश्न पडलाय पण. अंबाडीची भाजी करतानाही शिजवून घेतल्यावर पाणी काढून टाकतो आपण जास्त आंबट होऊ नये म्हणून. तर मग इथे ते काढून घ्यायचे नाही का?

नीधप, धन्यवाद. माझी आई नाही काढत उलट तेच पाणी ती पिठात ओतते आणि तेच पाणी ती भाकरीला लावते. शिवाय आमच्याकडे भाकरी जाड आणि आकाराने मोठ्या करतात त्यामुळे दात आंबतील इतपत नक्कीच आंबट नाही लागत ह्या भाकरी.

मी फक्त इथे कृती लिहिली. मला तरी कुठे जमल्यात. शाळेत असताना आई ९ जणांसाठी भाकर्‍या करायची. डोळ्यासमोर दिसतं ते दृष्य. आमच्याकडे मिसळीचे वरण म्हणजे उडदाच्या डाळीचे गोडा मसाला घालून केलेले वरण आणि ह्या भाकरी कायम होत. आम्ही सगळे चुलीपुढे निखार्‍यासमोर बसून मांडी न घालता दोन्ही पाऊल जमिनीला टेकवून जेवायचो. ओसरी भरुन जायची Happy आता किती विखुरलीत सगळी भावंडे आणि पुर्वीची ती मजा राहिलीच नाही.

अंबाडीची भाजी आणि भाकरी हे माझं कंफर्ट फूड आहे.
अंबाडीची भाजी भाकरीच्या पीठात घालून कधी ऐकलेलीच नाही. आता इथे लिहिल्यानुसार करून खाऊन बघेन नक्की!

बी, आत्ता जेवण झाले आणि ही रेसिपी पाहिली.. छान आहे.. आजच आंबाडीची भाजी केली होती.. रेसिपी आधी पाहिली असती तर थोडा पाला वगळला असता भाकरी करून बघायला.. इथे तू दाखवलेली आंबाडी लाल देठाची आहे.. मुंबईत तशीच मिळायची.. पण बेळगावात कधीतरी जी मिळते ती पांढर्‍या देठाची असते आणि तिची चव लाल देठाच्या आंबाडीएवढी आंबट नसून थोडी कडवट, तुरट असते. पुढच्या वेळेस आठवणीने वगळेन भाकरीसाठी भाजी. Happy

सातीताई, तुम्ही रेसिपी लिहा ना फक्त तूरडाळ आणि पाला घालून कशी भाजी करता ते.

Ash11,

gongura या नावाने भारतीय वाण्याकडे बघ.. तेलगू मंडळी Gongura Pickle (आंबाडीचे लोणचे) खूप आवडीने खातात.
तेव्हा नक्की मिळेल..

अंबाडी म्हणजे घोंगुरा!! जबरीच.
मला एकदम आवडते ते गोंगुरा लोणचे. भाजी / भाकरी कधी खाल्लेली नाही.

Pages