Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 August, 2014 - 11:35
बारा गावचा पाटील
टक्का मागे आरक्षण
देश सोडून निघाला
दूर दृष्टीचा ब्राह्मण
टक्का हवा प्रत्येकाला
जातीमध्ये राखलेला
प्रजा नागडी रानात
तिला कधी ना कळला
देश जातीत बांधला
देश जातींनी तुटला
देश नकाशी उरला
फक्त झेंडा वंदनाला
अशी जातींची डबकी
वर्ष हजार कुजली
धरू धरुनि किड्यांनी
प्रजा वाढ वाढवली
ज्यांनी संपवावी जात
त्यांनी बलवान केली
क्षुद्र करंट्या अंधांनी
घरे भरुनी घेतली
राष्ट्र हवाय कुणाला
धर्म हवाय कुणाला
साऱ्या जातीचेच राज्य
सुख हवंय वंशाला
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षुद्र करंट्या अंधांनी घरे
क्षुद्र करंट्या अंधांनी
घरे भरुनी घेतल
फार आक्षेपार्ह विधान.. म्हणजे आतापर्यंत ज्यानी आरक्षणाचा फायदा घेतलाय ते अपात्र होते. आसे म्हणायचे आहे का ?
देश सोडून निघाला दूर दृष्टीचा
देश सोडून निघाला
दूर दृष्टीचा ब्राह्मण
फारच विनोदी विधान.. दूरदृष्टी असती तर जातीव्यवस्था कशाला तयार केली यांनी?
जातीव्यवस्था ब्राह्मणानी
जातीव्यवस्था ब्राह्मणानी निर्माण केली का?
बोंबललं
बोंबललं
विधान ? की माणूस?
विधान ? की माणूस?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धागा
धागा
सर्वार्थाने..... क्षमता
सर्वार्थाने..... क्षमता होतीच...
देश जातीत बांधला देश जातींनी
देश जातीत बांधला
देश जातींनी तुटला
देश नकाशी उरला
फक्त झेंडा वंदनाला
<<
<<
छान.
छान. भारतातल्या वेदशाळा ह्या
छान.
भारतातल्या वेदशाळा ह्या जातीनिर्मुलनासाठी मागच्या दोनहजार वर्षात प्रचंड प्रयत्न करत आहेत, तरीही ब्राह्मणांना जातीयवादी ठरवण्यात येतेय व आता तर उद्विग्न होऊन ब्राह्मण देश सोडत आहेत ,हे खरंच खेदजनक आहे.
वेदाध्ययनासाठी प्रत्येकाला मोफत प्रवेश असायचा, जातपात वेदागृहाबाहेर .आरक्षणासाठी हपापलेल्या जातसमूहांनी प्राचीन व अर्वाचीन वेदशाळांची 'जातीविरहीत, गुणवत्तेवर आधारीत' विचारसरणी अवलंबली पाहीजे.
(No subject)
अख्खा सोडूनी तू टक्का का
अख्खा सोडूनी तू टक्का का मागतो,
श्रीखंड सोडूनी तू चक्का का मागतो,
पुन्हा तेच तेच चघळाया लागता
गुलाल उधळताना बुक्का का मागतो......
क्रूपया कवितेचा आस्वाद घ्या त्याचे आपपल्या परिने अर्थ लावू नका, तसेतर खूप अर्थ निघतील
प्रतिसादाबद्दल सर्व मित्रांचे
प्रतिसादाबद्दल सर्व मित्रांचे आभार ..किरण कुमार यांनी केलेले विधान मी करायला हवे होते ..त्याबद्दल त्यांचे विशेष आभार ..मुळात sensative विषय असल्याने थोडाफार गदारोळ होणारच होता ..आरक्षणा बद्दल प्रत्येकाची एक भूमिका असणार हे तर स्पष्टच आहे त्यामुळे मतभेद ही होणार असो....पण आरक्षण धोरणाने देशाचे वाटोळे होणार ..हे सुज्ञास सांगणे न लगे .माझा कुणाला दुखवायचा हेतु नाही पण तसे झाले असल्यास क्षमस्व .