दुबई / अबु धाबी सहल - भाग ३

Submitted by दिनेश. on 23 August, 2014 - 05:41

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

वादी हत्ता हून आल्यावर आम्ही दुबई मॉल्स मधे गेलो. अगदी आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण आहे हे.
हजार बाराशे दुकाने आहेत.. पण ती बहुतेक " महाग " या कॅटेगरीतली आहेत. तिथे जायचे ते केवळ नयनसुखासाठी.

तिथे फारसे कुणी खरेदी करताना दिसत नाही.. सगळे जण फुड कोर्टातच "खरेदी" करतात. मला लहान मुलांसाठी
काही खेळणी घ्यायची होती, म्हणून खरेदी झालीच.

फुडकोर्टात भरपूर चॉईस आहे. मी भारतीय मसाल्यातले फलाफल रॅप घेतले सोबत अवाकाडो जिलेटो.. दोन्ही मस्त होते.

या मॉलच्या बाहेरच दुबई फाऊंटन आहे आणि त्याला लागूनच जगातील सर्वात उंच इमारत.. बुर्ज अल खलिफा.
( या इमारतीच्या बाबतीत अनेक जागतिक विक्रम आहेत. ) या इमारतीत जायचे तर तिकिटही आहे आणि आधी
बुकिंगही करावे लागते. पण बाहेरून बघायला तिकिट लागत नाही. मॉलमधे जायला आणि कारंजालाही तिकिट
नाही Happy

इथेच भलामोठा सूक आहे. सूक म्हणजे पारंपारीक बाजार. असे बाजार अजूनही आहेत. त्यात अत्तरापासून गालिच्यापर्यंत अनेक वस्तू मिळातात. इथे आहे ते या सूकचे सॉफिस्टीकेटेड रुप..

तर चला.. हरवू नका मात्र..

१)

२)

३) हे अक्वेरियम बाहेरून तसेच आतूनही बघता येते. इथेच अंडर वॉटर झू आहे.

४)

५) ही सजावट मला खूप आवडली

६)

७)

८) काही दुकानांच्या सजावटीदेखील खुप छान होत्या.

९)

१०)

११)

१२)

१३) त्या बाळाने !!!

१४)

१५)

१६) जरा नीट बघा बरं... खरं काय आणि खोटं काय ते

१७) रात्रीच्या अपुर्‍या उजेडात हा बुर्ज अल खलिफा.. पूर्णपणे कॅमेरात पकडणे शक्यच नव्हते.. तरी

१८) कारंजाच्या नर्तनासाठी रंगमंच उजळला

१९)

२०)

२१)

२२)

२३) क्लीप्स बघितल्या की नाही ?

२४) हा पण प्रयत्नच !

पुढच्या भागात सूक बघू या..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

beautiful... दुबई च्या फेमस अरेबिक आणी लेबनीज मिठाया चाखल्यास कि नाही... माय फेव ,'बकलावा'

वर्षू,
बकलावा नंतर फार फेमस झाले गं.. मस्कतमधे ५ वर्षे काढलीत. त्याशिवायही बर्‍याच तुर्की , ओमानी मिठाया खाल्ल्यात. केळ्याच्या शिकरणात ( रंगासाठी ) पिस्ते वाटून घालण्याची ऐश पण केली तिथे !
सध्या मात्र गोडावर बंधने आलीत !

मृणाल १
मेट्रोचे काम सुरु झाले त्यावेळी मी दुबईतच होतो. नंतर सहा महिन्यानी गेलो तर मेट्रो सुरु पण झाली होती. एअरपोर्टवरूनच एक फेरी मारली.
यावेळेच मोनोरेल मधून फेरी मारली.. आता ट्रामचे पण काम चालू आहे.