"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 06:04

"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

डिसक्लेमर - घटनेतील सर्व नावे बदलली आहेत.

नायक = रुपेश. आमच्या ऑफिसमधील एक अविवाहीत पण कमिटेड कर्मचारी. गर्लफ्रेंड आहे आणि प्रेमप्रकरण सिरीअस आहे.
नायिका = हेमांगी. आमच्याच ऑफिसमधील महिला कर्मचारी. विवाहीत आहे. विवाहाला ४-५ वर्षे झालीत. एक लहान मुलगी आहे.
नायक-नायिका संबंध = निखळ मैत्री !

रुपेश आणि हेमांगी हे केवळ मित्र नव्हते तर त्यांची जोडीच होती. दोघांचे कामाचे डिपार्टमेंट एकच आणि बसण्याच्या जागा गप्पांच्या अंतरावर म्हणून सतत त्यांची आपसात बडबड चालूच असायची. जेवायला जायचे असो वा अ‍ॅडमिन डिपार्टमेंटमध्ये कामाला जायचे असो दोघेही एकत्रच दिसायचे. त्यांच्यातील मैत्री किती घनिष्ट होती हे सांगायला आता किस्से रंगवत बसत नाही मात्र कॉर्पोरेट लाईफमधील सारे शिष्टाचार पाळूनही टिकलेल्या त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटावा अशी जोडी. त्याचबरोबर आपण मित्र असलो तरी स्त्री-पुरुष भिन्न लिंगाचे आहोत याची जाण ठेऊन त्या मर्यादा पाळून असलेली मैत्री.

हेमांगीने महिन्याभरापूर्वी जॉब बदलला आणि जोडी तुटली. यात रुपेशचे मात्र वांधे झाले. आधी सतत कामाचे आठ तास हेमांगीबरोबरच जोडी बनवून फिरत असलेला रुपेश आता अचानक एकटा पडल्यासारखा झाला. आम्हा इतरही ऑफिस कर्मचार्‍यांचा ग्रूप होताच आणि त्या पातळीवर तो आमच्यात कम्फर्टेबलही होताच, पण हक्काचा असा मित्र असतो तो गेल्याने त्याला गर्दीतही एकटे एकटे वाटणे साहजिकच होते. हेमांगीबरोबर फोनवरून त्याचा थोडाबहुत संवाद साधला जात असेलही पण नेहमीचे जवळ दिसणारे सवयीचे माणूस गेले होते. त्यामुळे आता नव्याने सवय होईपर्यंत निदान ऑफिसचा आठ-नऊ तासांचा वेळ त्याला खायला उठत होता.

अश्यातच हेमांगी आणि रुपेशची एका सुट्टीच्या संध्याकाळी मॉलमध्ये फिरताना अनपेक्षितपणे भेट झाली. रुपेशबरोबर त्याची गर्लफ्रेंड रुपाली होती तर हेमांगीबरोबरही तिचा नवरा हिमेश होता. अचानक दोघांचा आमनासामना झाल्याने रुपेशने आनंदाच्या भरात अनवधानाने हेमांगीला हलकेसे आलिंगन दिले (Hug केले). या आधी खरे तर ऑफिसमध्येही त्याने कधी असा प्रकार केला नव्हता ना कधी करायचा विचारही केला असावा. अगदी सहजच घडावे तसे घडले आणि लगेच तो दूरही सरला. मात्र आपण काहीतरी वेगळे केलेय, काहीतरी लिमिट क्रॉस केलेय, ते देखील हेमांगीचा नवरा तिच्याबरोबर असताना असे वाटल्याने तितक्याच पटकन तो सॉरी देखील म्हणाला. प्रसंगावधान राखत त्याच्या गर्लफ्रेंड रुपालीने, "इट्स ओके ! हो जाता है यार ..." म्हणत त्याच्या मनावरचा ताण आणि अपराधीपणाची भावना दूर सारत विषय संपवून टाकायचा प्रयत्न केला. मात्र जे व्हायचे ते घडून गेले होते. त्यानंतर तिथे आणखी काही रामायण महाभारत घडले नाही. अवघडलेल्या अवस्थेतच त्यांची ती भेट संपून दोन्ही जोड्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

पुढे जे घडले त्याला अपेक्षित म्हणावे वा दुर्दैवी वा धक्कादायक हे मी वाचकांवरच सोडतो. पण त्यानंतर दोघांची मैत्री तिथेच संपली. रुपेशच्या गर्लफ्रेंडने म्हटलेले "हो जाता है यार.." हे तेवढ्यापुरतेच नसून तिने तसेच या प्रकाराला फारसे महत्व देणे गरजेचे समजले नाही. कदाचित या आधीही रुपेशने आपल्या मैत्रीची कल्पना रोजच्या किस्स्यांकहाण्यांमधून तिला दिली असावी. मात्र हेमांगीने आपल्या नवर्‍याला ऑफिसमधील मित्राची काय किती कल्पना दिली होती हे तिलाच ठाऊक. पण तिच्या नवर्‍याला मात्र त्या दिवशीचा प्रकार पाहता त्यांची मैत्री रुचली नाही. परिणामी हेमांगीने रुपेशला तसे स्पष्टपणे सांगून त्याच्याशी संपर्क आणि मैत्रीचा संबंध कायमचा तोडून टाकला. आपल्या फेसबूकलिस्टमधूनही त्याला हटवत ब्लॉक करणे यावरून याची गंभीरता लक्षात यावी. आणि ती तशी रुपेशच्या लक्षात आल्याने त्यानेही मग आपल्या मैत्रीणीला त्रास होईल असे न वागण्याचे ठरवत स्वताहून पुन्हा येनेकेन प्रकारे कसलेही संबंध जोडण्याचे प्रयत्न पुढे रेटले नाहीत.

यापुढे रुपेशच्या आयुष्यात अजूनही मैत्रीणी येतील, मात्र हेमांगीच्या आयुष्यात यापुढे कधीही पुरुष कर्मचार्‍यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही. रुपेशच्या गर्लफ्रेंडने कितीही "इट्स ओके ! हो जाता है यार" म्हटले असले आणि तशीच वागली असली, तरी इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली होती एवढे मात्र खरे !

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकांच्या भानगडीमध्ये लक्ष खुपसायचंच आणि गॉसिपिंग करायचं.

>>
याला तुम्ही भानगड म्हणता ? शिव शिव ! रिलेशन्शिप म्हणा रिलेशन्शिप...

आणि कोण मिठी म्हणतय ते मिठी नव्हे हग....हग ते !! ते कसं अस्तं त्ये फ्याशन पिक्चरमंदी मुश्रनकडून शिका !!
हग इनोसट अस्तय . मिठी .. जौ द्या !

( इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा)

आणि कोण मिठी म्हणतय ते मिठी नव्हे हग....हग ते !!>>>>>>>>

आता ह्या हग..... हग ला मराठी शब्द काय?:अओ:

हिंदीवाले निदान मुन्नाभाई MBBS मध्ये आहे त्याप्रमाणे जादू की झप्पी तरी म्हणतील.:D

धन्यवाद हृन्मेश.
अवांतर: एक मजेशीर सल्ला - अशाच प्रसंगी मिठी मारावी कि मारू नये असा प्रश्न पडल्यास एक उपाय आहे. म्हणजे एकाच हाताने मिठी मारणे. म्हणजे अगदीच परकेपणा नाही अन जास्त जवळीकीचा आरोप नाही. Lol

त्यात काय एवढ? हेमांगीच्या नवर्यानी आणि रुपेशच्या गर्ल फ्रेंड नी एकमेकांना मिठी मारायची .फिट्टमफाट.
म्हणजे मग ( तुमच्या मते असलेली) सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली नसती Lol

प्रसंगावधान राखत त्याच्या गर्लफ्रेंड रुपालीने, "इट्स ओके ! हो जाता है यार ..." म्हणत त्याच्या मनावरचा ताण आणि अपराधीपणाची भावना दूर सारत विषय संपवून टाकायचा प्रयत्न केला. >>
:द अशी कुठली गर्लफ्रेंड असते हो ? हेमांगीच्या नावर्याआधी त्या गर्लफ्रेंड नेच रुपेश ला फैलावर घेतलं असणार . आणि हेमांगी काय इतकी पिच्कू आहे का ? नवर्याचा स्वभाव तिला माहित असणारच ना . नाहीतर तिने रुपेश शी एवढी मैत्री केलीच नसती .

अशी घटना मीसुद्द्धा पाहिली आहे. आम्ही पोलंडच्या प्रोजेक्टमध्ये Onsite असताना माझ्या एका अविवाहित कलिगला आमच्याच office मधल्या एका विवाहित मुलीने dinner नंतर stay साठी थांबवून घेतले. त्यानंतर पूर्ण Europe ते दोघेही सोबत फिरले. इतके की आमचे पोलिश मित्र त्यान्ना couple समजून complements द्यायचे.
पण भारतात परत आल्याबरोबर दोघेही अगदी एकमेकांना फारसे ओळखत नाहीत या अविर्भावात वागू लागले.
विचारले तर म्हणतात की just friends...

अशी कुठली गर्लफ्रेंड असते हो ? >>>>>>>>>>>>>>>>> तुमच्या मते "समजुतदार मुलगी" असुच शकत नाही ? Uhoh

अत्यंत स्फोटक वाक्य ............:खोखो:

>>>लोकांच्या भानगडीमध्ये लक्ष खुपसायचंच आणि गॉसिपिंग करायचं.
<<<<

नंदीनी, अहो हे तुम्ही म्हणता तुम्ही? मग "चटपटीत गॉसिप " बाफ कशाला हवा मग? का तिथे फक्त सिनेतारकांविषयी असे गॉसिप केलेलं /बोललेलं चालतं असे का? Happy

आम्ही पोलंडच्या प्रोजेक्टमध्ये Onsite असताना माझ्या एका अविवाहित कलिगला आमच्याच office मधल्या एका विवाहित मुलीने dinner नंतर stay साठी थांबवून घेतले.

>>>>>>>

म्हात्रे साहेब आपली पोस्ट वन नाईट स्टँण्डच्या धाग्यात जास्त शोभेल Wink

Pages