टीप - हा एक राजकीय धागाच आहे. मायबोलीवर अनेक प्रकारचे राजकीय धागे अस्तित्वात असताना व जोरात चालू असताना हा आणखी एक धागा का असावा? ह्याचे उत्तर हे की सगळ्या जगात जे मोदी सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या समजामुळे अस्वस्थता किंवा इतर कोणतीही भावना निर्माण झाली आहे, त्या मोदी सरकारच्या अस्तित्वाने बिथरलेल्या पाकिस्तानने उघड हल्ला केलेला आहे. ह्याशिवाय, निषेध व्यक्त करणे, अद्दल घडवू असे म्हणणे, आंतरराष्ट्रीय समुदायाला दखल घेण्यास भाग पाडणे हे सर्व पारंपारीक उपाय बाजूला ठेवून मोदी सरकारने भारतीय सेनेला 'योग्य वाटेल ती कृती करण्याचे' आदेश दिलेले आहेत. परिणामतः, शौर्याच्या भावनेने सळसळलेल्या जवानांनी जोमदार प्रत्युत्तर देणे सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.
==============================================
विषारी सापाचे खरे रूप कधी प्रकट होणार हाच जणू प्रश्न होता. पाकच्या सर्वोच्च नेत्याला आपल्या शपथविधीला बोलावण्यातील नावीन्यावर जगभर चर्चा घडवून आणणारे मोदी मुळात हिंदूत्ववादी असल्याने पाकिस्तानला त्यांचे नेतेपदी असणे फार काळ सहन होणार नाही असे वाटत होते. त्याचाच परिपाक बासित ह्यांनी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात झाला. ही कुरापत एक लक्षण होते चवताळलेल्या सापाच्या आगामी कृतीचे! पाकशी चर्चा रद्द करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या साक्षीने सापाच्या शेपटीवर पाय ठेवला. हा निर्णय निराशाजनक आहे वगैरे मुक्ताफळे जगभरातील नेते उधळत असतानाच पाकिस्तानने बॉर्डरवर हल्ला सुरू केला व निरपराध भारतीय नागरीक मारले गेले.
पण ह्यावेळी, आपापसातील सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रखर राष्ट्रप्रेमाच्या भावनेचे तुषार मनात उडावेत असे काहीतरी घडले.
संरक्षण मंत्रालयाने भारतीय जवानांना 'योग्य वाटेल ती कृती करा' असे खुल्लेआम 'गो अहेड' दिलेले आहे.
युद्ध बाजूलाच राहो, साध्यासाध्या कुरबुरीही अनेक प्रकारे महागच पडतात हे सर्वमान्यच आहे. पण कधी ना कधी इंगा दाखवणेही अतिशय महत्वाचे आहे. आशा आहे की पाकला ह्यावेळी लवकरच अद्दल घडेल आणि अक्कल येईल.
जय हिंद!
हे पण तुम्हीच ठरवणार का ? कसा
हे पण तुम्हीच ठरवणार का ? कसा प्रतिसाद द्यायचा ?
>>> उदयन.. | 25 August, 2014
>>> उदयन.. | 25 August, 2014 - 11:07 नवीन
हे पण तुम्हीच ठरवणार का ? कसा प्रतिसाद द्यायचा ? अ ओ, आता काय करायचं
<<<
हो का? लोकांनी कसे प्रतिसाद द्यावेत ह्यावर निबंध लिहिणारे आणि लोकांच्या प्रतिसादांच्या लिंका जेथेतेथे डकवणारे बसलेत गप्प आणि तुम्ही त्यांच्या वतीने बोलताय? कशाला?
हा धागा राष्ट्रभक्तीशी संबंधीत आहे, येथे पक्षीय राजकारण आणू नये असे आवाहन केले होते. तरीही तो विनोद केला गेला.
दिवसभर लिंका शोधून पेस्टणे,
दिवसभर लिंका शोधून पेस्टणे, अॅडमीनच्या विपूत तक्रारींच्या रांगोळ्या काढणे, आणि दुसर्यांच्या वावराचे स्क्रीन शॉट्स डकवत बसणे ह्या ज्यांच्या शौर्याच्या व्याख्या आहेत त्यांनी भारताच्या पंतप्रधानांनी पाक सैन्याला भाषण द्यावे ही सूचना करण्यासारखे दुर्दैवी काहीही नाही.
मी माझ्या प्रतिसादा बद्दल
मी माझ्या प्रतिसादा बद्दल बोलतोय.. इतर काय बोलतात त्याच्याशी माझे काही घेणेदेणे नाही... जोडु देखील नव्हे .
मी माझा प्रतिसाद हवा तसा लिहिल... योग्य वाटत नसल्यास इग्नोर करु शकतात ..
ठीक आहे, पण काही सद्भावना
ठीक आहे, पण काही सद्भावना जागृत असली तर वरील मुद्यांबाबतही एखादे विधान करायला हरकत नव्हती.
पाकीस्तानातील अंतर्गत
पाकीस्तानातील अंतर्गत राजकारणात जेव्हा जेव्हा गंभीर पेच निर्माण होतो तेव्हा तेथील राज्यकर्ते नेहमीच त्यावेळी भारताची कुरापत काढून युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण करतात. आताही हीच खेळी खेळलेली आहे.
भारत सरकारने आपल्या सैन्याला 'योग्य असेल ती कृती करा' असा दिलेला आदेश सैन्यदलाचे मनोबल नक्कीच उंचावणारा आहे. अगदी योग्य निर्णय. आणि दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे मुत्सदेगिरीत ही कुठे कमी पडू नये ह्याची सरकारने काळजी घेणे गरजेचे आहे.
जो माझा प्रांत नाही त्यावर मी
जो माझा प्रांत नाही त्यावर मी भाष्य करत नाही... तुमच्या गझलेवर कवितेवर कधी प्रतिसाद केला का ? नाही.. जो आपला प्रांत नाही त्यावर मी बोलत नाही..
निर्णय चांगला आहे. परंतू ह्या
निर्णय चांगला आहे. परंतू ह्या निर्णयाने एकदम सैन्य जिंकु किंवा मरु अशा भावनेनी युध्दाला तोंड फोडतील याची शाश्वती नाही. ते केवळ प्रतिकार करतील. आला टप्प्यात कि मार एवढेच.
पाकिस्तानात जेव्हा जेव्हा अस्थिरता निर्माण होते तेव्हा तेव्हा तो लक्ष विचलीत करण्यासाठी असे गोळीबाराचे प्रकार करतो.
मला तर वाढते सरळ रणशिंग फुंकायला हवे.
शान्तता म्हणजे नक्की काय?
शान्तता म्हणजे नक्की काय? समोरचा आग लावतोय, मग लाव रे भाऊ तू आग, मी त्यावर बट्ट्या भाजतो असे काही करावे का? आणी आग लावणारे नुसते पाकीस्तान कुठेय, चीन पण आहेच की. शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या नात्याने चीन पण कुरापती काढतय. हे समोरुन भान्डतात आणी ते पाठीत खन्जीर खुपसत बसतात. कस्ले पुरावे न कस्ले काय? सगळ्या जगाला माहीत आहे की पाकिस्तान काय आहे ते.
आणी उगाच कशाला म्हणायचे की नाही हो, ते युद्ध बिद्ध ना फक्त आर्मीलाच हवे आहे, सामान्य जनतेला नकोय ते, त्याना भाईचारा आणी मित्रत्व हवे आहे. मग इतके दिवस काय झोपले होते? तिकडे ते येड इम्रान खान, शरीफ विरुद्ध बन्ड करतय. ह्या माणसाचा जन्म भारतातला, तरीही याने कायम भारतालाच शिव्या दिल्या.
बन्डाळीकडे चाललेल हे राष्ट्र एके दिवशी स्वतःच पाय कुर्हाडीवर घालुन मरेल. भारताची अफगणिस्तानशी मैत्री पण सहन होत नाही पाकीस्तानला.
बेफीकीर्जी, इंदिरागांधींना
बेफीकीर्जी,
इंदिरागांधींना ७२ साली दुर्गेची उपमा देणारे अटलबिहारी सारखे विरोधी पक्षाचे नेते ( त्यावेळेला अटलबिहारी संसदेत विरोधी पक्ष नेते होते की नव्हते माहित नाही. यावरुन वाद व्हायचा ) अद्याप जन्माला यायचे आहेत. बरे झाले ते संसदेतले विरोधी पक्षनेते पद रिकामे ठेवले. आडात नसेल तर पोहोर्यात कुठुन येणार. काँग्रेसच्या लोकांना टिका करायला फक्त संधी हवी आहे. ते संसदेत असो नाहीतर मायबोलीवर.
असो. ही कुरापत भारताच्या विरुध्द नाही. पाकिस्थानी संसदेच्या समोर गेले ८-१० दिवस बसलेल्या विरोधी पक्षाच्या कारावायाकडुन पाकिस्थानी जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी आहे.
मोदीजींनी सीमेवर जाऊन आपल्या
मोदीजींनी सीमेवर जाऊन आपल्या आणि पाकच्याही सैन्याला उद्देशून भाषणे केली पाहिजेत. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने आपल्या सैन्याला स्फुरण चढून ते त्वेषाने लढतील. तर पाक सैन्याला चांगलीच जरब बसेल>>
भाषण वगेरे देवून पकड्यांवर काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? लातोन के भूत बातोन से नाही मानते म्हणतात ना. एकदाच काय तो ह्यांचा सोक्षमोक्ष लावावा असं वाटतंय (अर्थात ते सोपं नाही). एकदा रोजे संपले कि त्यांची नाटकं सुरु होतात हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे .
पाकिस्तानला उत्तर कसे द्यावे,
पाकिस्तानला उत्तर कसे द्यावे, हा स्वातंत्र्य मिळाल्या पासून आज पर्यंत कायमच एक गुंतागुंतीचा आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या अतिशय कठीण प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती कायमच बदलत आली आहे (भारत आणि पाकिस्तान दोघांचीही आपल्या शेजारी राष्ट्रं आणि अमेरिका यांच्याशी असलेली जवळीक या अनुशंगाने केलेले हे वाक्य आहे) त्यामुळे हा प्रश्न अतिशय मुत्सद्दीपणाने हाताळणे हा सत्तेत असलेल्या सरकारसाठी गरजेचे आहे. कोणतेही सरकार असले तरी एक भक्कम संदेश आपल्या कारवाईतून देणे सद्यस्थितीत गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर आपल्या लष्कराला त्यांना योग्य वाटेल अशी कारवाई करण्याची मुभा देणे हा एक स्तुत्य निर्णय म्हणला पाहिजे.
इंदिरागांधींना ७२ साली
इंदिरागांधींना ७२ साली दुर्गेची उपमा देणारे अटलबिहारी सारखे विरोधी पक्षाचे नेते ( त्यावेळेला अटलबिहारी संसदेत विरोधी पक्ष नेते होते की नव्हते माहित नाही. यावरुन वाद व्हायचा ) अद्याप जन्माला यायचे आहेत. बरे झाले ते संसदेतले विरोधी पक्षनेते पद रिकामे ठेवले. आडात नसेल तर पोहोर्यात कुठुन येणार. काँग्रेसच्या लोकांना टिका करायला फक्त संधी हवी आहे. ते संसदेत असो नाहीतर मायबोलीवर
>>>>>>>>> बेफी बहुतेक हे तुम्हाला चालते वाटते ... (येथे पक्षीय राजकारण आणू नये असे आवाहन केले होते) हे आवाहन विशिष्ट लोकांनाच केलेले का... तसे असेल तर कृपया स्पष्ट लिहा..
मी ज्यांच्या ज्या
मी ज्यांच्या ज्या प्रतिसादाबद्दल लिहिलेले आहे त्यांनी तो प्रतिसाद दिला नसता तर हा प्रतिसाद आला नसता.
साधे समीकरण आहे.
मला एक कळत नाही..हे सगळे कठोर
मला एक कळत नाही..हे सगळे कठोर निर्णय फक्त राजकिय पातळीवरच का घेतले जातात....
नुसत्या चर्चा बंद करून काय साध्य होणार आहे. असेही इतकी वर्षे चर्चांचे दळण दळून काय साध्य झाले आहे.....
भारत-पाकिस्तानचे क्रिकेट सामने भारतात होत नाही पण बाकी खेळांचे होतातच ना..आत्ताच आपण हरलो आहोत फुटबॉलमध्ये...त्यांचे अनेक कलाकार इथे येऊन यशस्वी होतात... म्हणजे ज्या काही गप्पा त्या फक्त राजकियच....
असेल हिंमत तर सुनावा ना की जो पर्यंत पाकच्या कुरापती बंद होत नाहीत तोपर्यंत एकाही पाकिस्तानी खेळाडूला किंवा कलाकाराला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार नाही म्हणून....
>>>>>असेल हिंमत तर सुनावा ना
>>>>>असेल हिंमत तर सुनावा ना की जो पर्यंत पाकच्या कुरापती बंद होत नाहीत तोपर्यंत एकाही पाकिस्तानी खेळाडूला किंवा कलाकाराला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार नाही म्हणून....<<<<
असे का अजुन होत नाही हेच वाटते कित्येक वेळा. भारत असा का निर्णय घेत नाही सर्व पातळी वर त्यांच्याशी व्यवहार बंद.
इंदिरागांधींना ७२ साली
इंदिरागांधींना ७२ साली दुर्गेची उपमा देणारे अटलबिहारी सारखे विरोधी पक्षाचे नेते >>>>> @ नितीनचंद्र - बाजपाईंचे फार कौतुक करु नका. त्यांचे एकुण च वागणे बोलणे संघाला/भाजपला सत्तेच्या कसे बाहेर ठेवता येइल असेच होते. नव्वदीच्या दशकातच भाजपला बहुमत मिळणे शक्य होते पण बाजपाईं नी ती घालवली. संघाच्या हिंदु अजेंड्याला भाजपच्या आत च राहुन खिंडार पाडणे हेच त्यांचे काम होते म्हणुनच "राजधर्म" वगैरे ची बडबड केली.
५ वर्ष सत्ता मिळाली होती त्यात बाजपाईंनी झपाटा लाउन काम केले असते तर काँग्रेस तेंव्हाच संपली असती.
ईटरेस्टींग टोचा!! संघाच्या
ईटरेस्टींग टोचा!!
संघाच्या हिंदु अजेंड्याला भाजपच्या आत च राहुन खिंडार पाडणे हेच त्यांचे काम होते म्हणुनच "राजधर्म" वगैरे ची बडबड केली. >> ओह, म्हणजे त्यांनी मोदीं/तोगडीया कंपनीला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे होते असे आपले म्हणणे आहे तर.
>>>>>असेल हिंमत तर सुनावा ना
>>>>>असेल हिंमत तर सुनावा ना की जो पर्यंत पाकच्या कुरापती बंद होत नाहीत तोपर्यंत एकाही पाकिस्तानी खेळाडूला किंवा कलाकाराला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार नाही म्हणून....<<<<
असे का अजुन होत नाही हेच वाटते कित्येक वेळा. भारत असा का निर्णय घेत नाही सर्व पातळी वर त्यांच्याशी व्यवहार बंद.
>>>>>>>>>>
निर्णय सरकारनी का घ्यावा? सर्व सरकारनी का करायचे? सरकारला जनता काय मेसेज देत आहे पाकीस्तानच्या मॅच बघुन. आतातर टीवी वर त्यांच्या सिरियल पण असतात.
असे का होत नाही की ज्या मॅच मधे पाकिस्तानी खेळाडु आहे त्या मॅच ला स्टेडियम ओस पडले आहे, कोणी टीव्ही वर पण बघत नाहीयेत. प्रत्रकार बातम्या छापन नाहीयेत.
आतातर "खूबसुरत" नावाच्या सिनेमात पाकीस्तानी हीरो आहे. तो सिनेमा पूर्ण पाडुन जनतेने दाखवून दिले पाहीजे की भारतातल्या लोकांना पाकीस्तानचे कौतुक चालणार नाही. बघु या. मला तर असे वाटते की माबो वरच रिव्हु येइल त्या सिनेमाचा.
कमीतकमी माबोकरांनी तरी बघु नयेत अश्या मॅचेस आणि असे सिनेमे.
म्हणजे त्यांनी मोदीं/तोगडीया
म्हणजे त्यांनी मोदीं/तोगडीया कंपनीला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे होते असे आपले म्हणणे आहे तर.>>>>> ही समजुन घेण्याची गोष्ट आहे. मी हे पण लिहीले होते, ते मात्र तुम्ही दुर्लक्षलेत
"५ वर्ष सत्ता मिळाली होती त्यात बाजपाईंनी झपाटा लाउन काम केले असते तर काँग्रेस तेंव्हाच संपली असती""
हाय बेफि, हॅप्पी पोळा!
हाय बेफि,
हॅप्पी पोळा!
>>> इब्लिस | 25 August, 2014
>>> इब्लिस | 25 August, 2014 - 18:46 नवीन
हाय बेफि,
हॅप्पी पोळा!
<<<
काही काही सणांच्या शुभेच्छा समजातीयांपुरत्याच मर्यादीत ठेवता आल्या तर बघा कृपया. धन्यवाद!
हा धागा 'भारतीय नागरिक' ह्या प्रजातीशी निगडीत आहे.
बेफि, हा प्रतिसाद तुमाच्या
बेफि,
हा प्रतिसाद तुमाच्या हाऊसहस्बंडवर टाकायचा तो इथे चूकून पडला.
अन मीदेखिल बैलासारखं काम करतो.
कुणी मला हॅपी पोळा म्हटलं, तर मी सेम टू यू म्हणून हॅप्पी होतो.
तुमच्यासारखा बार्तीया नाग्रीक मधे आणत नाही.
रच्याकने. ३-४ दिवसांपूर्वी मी
रच्याकने.
३-४ दिवसांपूर्वी मी त्या मोदीसरकारच्या वाहत्या धाग्यावर काही लिंका डकवून मागचे सर्कार किमान कडक शब्दांत निषेध तरी करीत असे, अशी पोस्ट टाकलेली.
तेव्हा तुमचा जाज्वल्य राष्ट्राभिमान, प्लस, पक्षीय राजकार्णाच्या आरपार जाणारे गजकर्णीय विचार दिसले नव्हते? ४ दिवसांत असा नक्की काय फरक पडला साहेब?
तुम्ही तिथे काय लिहिलं ते आठवतंय का?
की पीडीएफ पाठवू संपर्कातून?
इब्लिस | 25 August, 2014 -
इब्लिस | 25 August, 2014 - 21:00 नवीन
बेफि,
हा प्रतिसाद तुमाच्या हाऊसहस्बंडवर टाकायचा तो इथे चूकून पडला.<<<
अजूनही तेथे टाकू शकता.
अन मीदेखिल बैलासारखं काम करतो.<<<
मी बैलासारखं काम करत नाही.
कुणी मला हॅपी पोळा म्हटलं, तर मी सेम टू यू म्हणून हॅप्पी होतो.<<<
आनंदी असण्याचे निकष सापेक्ष असतात.
तुमच्यासारखा बार्तीया नाग्रीक मधे आणत नाही<<<
येथे केंद्रीय मुद्दाच भारतीय नागरीक आहे, बैलपोळा हा 'मधे' आणलेला विषय आहे. मी बैलपोळ्यावर धागा काढला तर अभिष्टचिंतनाच्या प्रतिसादांसाठी आपल्याला सूचित करेन हा विश्वास बाळगावात.
एकेका वाक्याला << टाकून
एकेका वाक्याला << टाकून प्रतिवाद केला, की काय सिद्ध होते ते इथे लिहूच का?
गुजरात के लाल किले से क्या
गुजरात के लाल किले से क्या भाषण किया गया था ?
आंतराराष्ट्रीय स्तरावर पण
आंतराराष्ट्रीय स्तरावर पण जास्त मुसद्देगिरी दाखवावी लागेल,
अनुमोदन.
पण त्याला सामर्थ्य लागते. बळी तो कान पिळी. धडधडित खोटे पुरावे युनोत दाखवून इराकवर हल्ला केला. यात मुत्सद्देगिरी काय होती? केवळ बळजबरी. तेव्हढी हिंमत आहे का भारतात? नि असली तरी असले बेजबाबदार वर्तन करणे आपल्या रक्तातच नाही. कारण इतर जग अजून रानटी आहे, भारतात संस्कृती आहे.
धडधडित खोटे पुरावे युनोत
धडधडित खोटे पुरावे युनोत दाखवून इराकवर हल्ला केला.
------ सद्दाम हुसैन यान्नी पण सन्शय वाढेल असेच वर्तन ठेवले होते, काहीच नसताना उगाचच खुप काही आहे असा आव आणला होता.
आजच्या आय एस आय एस च्या मानाने सद्दाम खुप मवाळ आणि शान्ती प्रिय वाटतात.
इदिरा गान्धीनी सुद्धा जशास
इदिरा गान्धीनी सुद्धा जशास तसे पाकला उत्तर दिले होते.....त्यावेळेला फक्त रशिया आपल्याबरोबर होत बाकी कुणीही मदत केली नव्ह्ती..
------ जशास तसे असे नव्हते ते... पाक अन्तर्गत अडचणित होता आणि भारताने मोक्याची चालुन आलेली सन्धी साधली. बस. रशिया सोबत २० वर्षान्चा शान्ती-मैत्री-सहकार्य असा करार केलेला होता. अर्थात दोन्हीचे श्रेय श्रीमती गान्धी यान्नाच जाते.
Pages