"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !
डिसक्लेमर - घटनेतील सर्व नावे बदलली आहेत.
नायक = रुपेश. आमच्या ऑफिसमधील एक अविवाहीत पण कमिटेड कर्मचारी. गर्लफ्रेंड आहे आणि प्रेमप्रकरण सिरीअस आहे.
नायिका = हेमांगी. आमच्याच ऑफिसमधील महिला कर्मचारी. विवाहीत आहे. विवाहाला ४-५ वर्षे झालीत. एक लहान मुलगी आहे.
नायक-नायिका संबंध = निखळ मैत्री !
रुपेश आणि हेमांगी हे केवळ मित्र नव्हते तर त्यांची जोडीच होती. दोघांचे कामाचे डिपार्टमेंट एकच आणि बसण्याच्या जागा गप्पांच्या अंतरावर म्हणून सतत त्यांची आपसात बडबड चालूच असायची. जेवायला जायचे असो वा अॅडमिन डिपार्टमेंटमध्ये कामाला जायचे असो दोघेही एकत्रच दिसायचे. त्यांच्यातील मैत्री किती घनिष्ट होती हे सांगायला आता किस्से रंगवत बसत नाही मात्र कॉर्पोरेट लाईफमधील सारे शिष्टाचार पाळूनही टिकलेल्या त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटावा अशी जोडी. त्याचबरोबर आपण मित्र असलो तरी स्त्री-पुरुष भिन्न लिंगाचे आहोत याची जाण ठेऊन त्या मर्यादा पाळून असलेली मैत्री.
हेमांगीने महिन्याभरापूर्वी जॉब बदलला आणि जोडी तुटली. यात रुपेशचे मात्र वांधे झाले. आधी सतत कामाचे आठ तास हेमांगीबरोबरच जोडी बनवून फिरत असलेला रुपेश आता अचानक एकटा पडल्यासारखा झाला. आम्हा इतरही ऑफिस कर्मचार्यांचा ग्रूप होताच आणि त्या पातळीवर तो आमच्यात कम्फर्टेबलही होताच, पण हक्काचा असा मित्र असतो तो गेल्याने त्याला गर्दीतही एकटे एकटे वाटणे साहजिकच होते. हेमांगीबरोबर फोनवरून त्याचा थोडाबहुत संवाद साधला जात असेलही पण नेहमीचे जवळ दिसणारे सवयीचे माणूस गेले होते. त्यामुळे आता नव्याने सवय होईपर्यंत निदान ऑफिसचा आठ-नऊ तासांचा वेळ त्याला खायला उठत होता.
अश्यातच हेमांगी आणि रुपेशची एका सुट्टीच्या संध्याकाळी मॉलमध्ये फिरताना अनपेक्षितपणे भेट झाली. रुपेशबरोबर त्याची गर्लफ्रेंड रुपाली होती तर हेमांगीबरोबरही तिचा नवरा हिमेश होता. अचानक दोघांचा आमनासामना झाल्याने रुपेशने आनंदाच्या भरात अनवधानाने हेमांगीला हलकेसे आलिंगन दिले (Hug केले). या आधी खरे तर ऑफिसमध्येही त्याने कधी असा प्रकार केला नव्हता ना कधी करायचा विचारही केला असावा. अगदी सहजच घडावे तसे घडले आणि लगेच तो दूरही सरला. मात्र आपण काहीतरी वेगळे केलेय, काहीतरी लिमिट क्रॉस केलेय, ते देखील हेमांगीचा नवरा तिच्याबरोबर असताना असे वाटल्याने तितक्याच पटकन तो सॉरी देखील म्हणाला. प्रसंगावधान राखत त्याच्या गर्लफ्रेंड रुपालीने, "इट्स ओके ! हो जाता है यार ..." म्हणत त्याच्या मनावरचा ताण आणि अपराधीपणाची भावना दूर सारत विषय संपवून टाकायचा प्रयत्न केला. मात्र जे व्हायचे ते घडून गेले होते. त्यानंतर तिथे आणखी काही रामायण महाभारत घडले नाही. अवघडलेल्या अवस्थेतच त्यांची ती भेट संपून दोन्ही जोड्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
पुढे जे घडले त्याला अपेक्षित म्हणावे वा दुर्दैवी वा धक्कादायक हे मी वाचकांवरच सोडतो. पण त्यानंतर दोघांची मैत्री तिथेच संपली. रुपेशच्या गर्लफ्रेंडने म्हटलेले "हो जाता है यार.." हे तेवढ्यापुरतेच नसून तिने तसेच या प्रकाराला फारसे महत्व देणे गरजेचे समजले नाही. कदाचित या आधीही रुपेशने आपल्या मैत्रीची कल्पना रोजच्या किस्स्यांकहाण्यांमधून तिला दिली असावी. मात्र हेमांगीने आपल्या नवर्याला ऑफिसमधील मित्राची काय किती कल्पना दिली होती हे तिलाच ठाऊक. पण तिच्या नवर्याला मात्र त्या दिवशीचा प्रकार पाहता त्यांची मैत्री रुचली नाही. परिणामी हेमांगीने रुपेशला तसे स्पष्टपणे सांगून त्याच्याशी संपर्क आणि मैत्रीचा संबंध कायमचा तोडून टाकला. आपल्या फेसबूकलिस्टमधूनही त्याला हटवत ब्लॉक करणे यावरून याची गंभीरता लक्षात यावी. आणि ती तशी रुपेशच्या लक्षात आल्याने त्यानेही मग आपल्या मैत्रीणीला त्रास होईल असे न वागण्याचे ठरवत स्वताहून पुन्हा येनेकेन प्रकारे कसलेही संबंध जोडण्याचे प्रयत्न पुढे रेटले नाहीत.
यापुढे रुपेशच्या आयुष्यात अजूनही मैत्रीणी येतील, मात्र हेमांगीच्या आयुष्यात यापुढे कधीही पुरुष कर्मचार्यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही. रुपेशच्या गर्लफ्रेंडने कितीही "इट्स ओके ! हो जाता है यार" म्हटले असले आणि तशीच वागली असली, तरी इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली होती एवढे मात्र खरे !
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
वरची घटना हुंडाबळीची आहे
वरची घटना हुंडाबळीची आहे का???? उगाच उदाहरण द्यायचे म्हणून काहीही देऊ नका.
यामध्ये कुणीही कसलाही कायदा मोडलेला नाही, तिनं त्या मित्राशी मैत्री तोडली ती नवर्याच्याच सांगण्यावरून अणि त्याच मीठीवरून हे तुम्ही इतक्या ठामपणे कसं काय सांगताय? मुळात आपल्या आजूबाजूला काम करणार्या लोकांबद्दल असं गॉसिपिंग करणं हेच चुकीचं नाही का? भलेही नाव बदललेलं असू देत.
पुढे जे घडले त्याला अपेक्षित
पुढे जे घडले त्याला अपेक्षित म्हणावे वा दुर्दैवी वा धक्कादायक हे मी वाचकांवरच सोडतो.... असे तूम्ही लिहिल्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया येणारच.
असुरक्षित वाटण्याचा हक्क ! तो काय असतो ?
घरी तो तिला, " माझ्यासमोर मिठी मारलीत, मग मी नसताना काय काय केले असेल ? " असा पण बोललाच असेल ना ?
>>>आपण अजून मिठीमध्येच का
>>>आपण अजून मिठीमध्येच का अडकला आहात?<<<
अभिषेक, ह्या लेखनाचा स्त्री पुरुष समानतेशी काय संबंध आहे?
तिनं त्या मित्राशी मैत्री
तिनं त्या मित्राशी मैत्री तोडली ती नवर्याच्याच सांगण्यावरून अणि त्याच मीठीवरून हे तुम्ही इतक्या ठामपणे कसं काय सांगताय?
>>>>>
आता एवढ्या सोप्या उकलीसाठी मग सीआयडी बोलवायचे का ?
हे म्हणजे असे झाले की एकीकडे
हे म्हणजे असे झाले की एकीकडे दिल चाहता है आणी दुसरीकडे दिल है की मानता नही. >>> हे वाक्य एकदम जबरदस्त आहे.
विषय मात्र दिलखेचक आहे. खूप दौलतजादा होणार इथे.
>>> आता एवढ्या सोप्या
>>> आता एवढ्या सोप्या उकलीसाठी मग सीआयडी बोलवायचे का ?<<<
दिनेश, हो तर, विषयाशी
दिनेश,
हो तर, विषयाशी प्रतिसादांचे स्वागतच आहे.
असुरक्षिततेचा हक्क म्हणजे आपले नाते तुटू नये साठी केलेली उपाययोजना. पण या केसमध्ये हक्क/ अधिकार गाजवल्यासारखी. हेमांगीच्या नवर्याने लागलीच त्या हक्काची अंमलबजावणी करत जास्त खोलात न शिरता दोघांमधील मैत्रीला कायमची कात्री लावली. याउलट रुपेशच्या गर्लफ्रेंडने मात्र त्याला समजून घेतले. अगदी तेव्हाही जेव्हा हा प्रकार घडला. कारण तिला (एका स्त्रीला) ते नाते टिकवायचे होते. आणि दुसरीकडे हेमांगीनेही नवर्याची मर्जी राखत आपल्या मित्राला कायमचा सोडला. कारण तिलाही (एका स्त्रीला) ते नाते टिकवायचे होते.
ऋन्मेषभाऊ, तुम्ही दिलेल्या
ऋन्मेषभाऊ, तुम्ही दिलेल्या घटनेत चार शक्यता संभवतात :
१. हेमांगीच्या नवर्याने आक्षेप घेणे + रुपेशच्या जीएफनं आक्षेप न घेणे
२. हेमांगीच्या नवर्याने आक्षेप घेणे + रुपेशच्या जीएफ आक्षेप घेणे
३. हेमांगीच्या नवर्याने आक्षेप न घेणे + रुपेशच्या जीएफ आक्षेप घेणे
४. हेमांगीच्या नवर्याने आक्षेप न घेणे + रुपेशच्या जीएफ आक्षेप न घेणे
आता यातली क्रमांक १ ची शक्यता ( योगायोगाने म्हणा, त्यातील व्यक्तींच्या स्वभावधर्माने म्हणा) खरी झाली. त्यावरून एकदम जनरलायझेशन नको. नंदिनीचं देखिल हेच म्हणणं आहे.
>>>आपण अजून मिठीमध्येच का
>>>आपण अजून मिठीमध्येच का अडकला आहात?<<<
arrrrrrrrrrrr
यात कसली आल्येय स्त्री-पुरुष
यात कसली आल्येय स्त्री-पुरुष समानता? तुम्ही वावरता त्या समाजात असे मिठी मारणे शिष्ठ संमंत नसेल तर तसे करणे faux pas. त्यात मित्राच्या सॉरीला त्याच्या गर्ल फ्रेंडच चलता है रिस्पॉन्स घटनेला वेगळाच रंग देतो. एकंदरीतच असे भावनांचे प्रदर्शन ती स्त्री आणि तिचा नवरा दोघांनाही आवडले नसेल. गरजे पेक्षा जास्त गुंतवणूक समोरच्या पार्टीकडून झाली आहे जी नको आहे म्हणून एकदाच काय तो क्लिन कट बरा असा विचार असेल. नवर्याला आक्षेप आहे हा समोरच्या व्यक्तीचा इगो न दुखावता मैत्री तोडायचा सेफ मार्ग स्विकारला असेल. हाकानाका.
>>हेमांगीच्या आयुष्यात यापुढे कधीही पुरुष कर्मचार्यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही>> कशावरुन?
बाकी ऑफिसमधे कामाचे आठ नऊ तास एखाद्या व्यक्तीच्या नसण्याने खायला उठत असतील तर कठीण आहे.
रेड फ्लॅग.
अरेरे ऋन्मेष...
अरेरे ऋन्मेष...
ऋन्मेष दादा, स्त्री आणि
ऋन्मेष दादा,
स्त्री आणि पुरुषात मैत्री असू शकते हेच मला मान्य नाही. कारण हे दोघे एकमेकाना सेक्शूअली पुरक प्राणी असल्यामुळे शेवटी हे नातं नर-मादी या वाटेवर जातं. आणि तेच नैसर्गिक आहे. जर एखादे नाते मैत्रीतच अडकून पडले व नर-मादीच्या नात्याची अवस्था गाठता आली नसेल तर त्याला सामाजीक व कृत्रीम बंधनांचा अडथडा रोखून धरतो. स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत जेंव्हा केंव्हा हे कृत्रीम बंध तुटतात किंवा गडून पडतात तेंव्हा तेंव्हा या नात्याला नरमादी असेच रुप प्राप्त होत आले आहे.
सारः- स्त्री-पुरुषात मैत्रीचे नाते असूच शकत नाही. तसे आढळल्यास त्याला कृत्रीम नाते मानावे. अशा नात्यात कधीही नैसर्गिकपणा उसळण्याची अतीव संभावना असते. (ईथे मागणी आणि पुरवठ्याचा अर्थशास्त्रीय नियम लागू पडतो हे लक्षात असू द्यावे. त्याच बरोबर संस्कार व संस्कृतीचे दडपण अन तिसरी गोष्ट म्हणजे भावनांचा उद्रेक... या तिघापैकी जो वरचढ तसा निकाल!)
एकत्र काम करतात म्हणून मिठी
एकत्र काम करतात म्हणून मिठी मारायची ........... हम्म्म्म (नाय पटत किमान आपल्या इथे म्हणा हव तर)
मग उद्या व.ना.स्टॅ झाले तर इट्स ओके ! हो जाता है यार" .. असे म्हणून चालेल का , लग्नानंतर स्री पुरुष दोघेही पझेसीव असणारच मग समानतेचा प्रश्न येतोच कुठे.
क्रमशः ........
स्त्री-पुरुषात मैत्रीचे नाते
स्त्री-पुरुषात मैत्रीचे नाते असूच शकत नाही. तसे आढळल्यास त्याला कृत्रीम नाते मानावे. अशा नात्यात कधीही नैसर्गिकपण उसळण्याची अतीव संभावना असते.
>>> असं डायरेक्ट लिहू नये. लोणी आणि विस्तवाची उपमा कशाकरता शोधून काढलीये? ती आवर्जून वापरावी.
वा मामी उत्तम पोस्ट. खरे तर
वा मामी उत्तम पोस्ट.
खरे तर स्टॅटीस्टीकली विचार करता चारही शक्यतांमध्ये पहिली शक्यता होण्याची प्रोबॅबिलेटी जास्त आहे का याचा विचार आपण करू शकतो. अर्थात याचा सर्व्हे करून तर आपण शोध घेऊ शकत नाही... पण.... इथे विचार नुसता ईथेच येऊन थांबत नाही. म्हणजे हे झाले आपल्या जोडीदाराकडून आक्षेप घेण्याबद्दलची मीमांसा.. त्या आक्षेपानंतरची प्रतिक्रिया काय आहे हे देखील इथे महत्वाचे आहे..
जसे
१.) गर्लफ्रेंडच्या आक्षेपानंतर रुपेशने मैत्रीणीला सोडले.
२.) गर्लफ्रेंडच्या आक्षेपानंतर रुपेशने मैत्रीणीला न सोडता गर्लफ्रेंडची समजूत काढायचा प्रयत्न केला. (त्यातही यश अपयशाचे प्रमाण कन्सिडर केले तर गणित आणखी कॉम्प्लिकेटेड)
३) नवर्याच्या आक्षेपानंतर हेमांगीने मित्राला सोडले.
४) नवर्याच्या आक्षेपानंतर हेमांगीने मित्राला न सोडता नवर्याची समजूत काढायचे प्रयत्न केले. (आता यातही यश अपयश आले)
वरील आकड्यात
१) घडण्याचे चान्सेस खूपच कमी पण ३) इथे सहज घडले
२) मध्ये यश मिळण्याचे चान्सेस ४) मधील चान्सेस पेक्षा नक्कीच ब्राईट
एक घटना घडली मानवी
एक घटना घडली मानवी स्वभावधर्मानुसार त्या त्या व्यक्तींची त्यावर प्रतिक्रिया आली. हेमांगाच्या नवर्याला जे रूचले नाही ते त्याने आपल्या पत्नीला सांगितले कारण त्याची मानसिकता तशी आहे. पण त्यावर मैत्री ठेवावी की न ठेवावी हा पुर्ण अधिकार हेमांगीचा होता त्याचा निर्णय तिने घेतला एवढचं. ह्यापुढे हेमांगी तिच्या कार्यालयातील एखाद्या पुरूष कर्मचार्यासोबत ती मैत्री ठेवंणारच नाही हा निर्ष्कष तुम्ही स्वतः काढलेला आहे. पण कार्यालयीन मैत्रीची हेमांगीची अपेक्षा वेगळी असु शकेल त्यामुळे ती पुढेही पुरूष कर्मचार्यांबरोबर मैत्री ठेवू शकते. ह्या घटनेमध्ये स्त्री-पुरूष समानता गंडली आहे हे कसे?
अरे लोकांच्या [ नवरा / गफ्रे
अरे लोकांच्या [ नवरा / गफ्रे ] आक्षेपावर का जाता लगेच. तुमच्या म्हणण्यानुसार आधी कधी असे ( मिठी मारणे ) घडले नव्हते. मग कदाचीत हेमांगीलाच ते अनपेक्षित असेल आणि आवडले नसेल. अजुन पुढे वाढायला नको म्हणुन संपवले असेल तिथेच मैत्री.
स्त्री-पुरुषात मैत्रीचे नाते
स्त्री-पुरुषात मैत्रीचे नाते असूच शकत नाही. तसे आढळल्यास त्याला कृत्रीम नाते मानावे. अशा नात्यात कधीही नैसर्गिकपण उसळण्याची अतीव संभावना असते.>>>>>>>>
तत्कालीन सामाजिक परीस्थिती मधे असे नाही म्हणता येणार.
याच अनुषंगाने. मैत्रीदिनाच्या दिवशी लोकसत्ताच्या लोकरंग मधे एक छान लेख आला होता. त्यात आपले स्वातंत्र्यपुर्व काळातले काही थोर स्री पुरुष यांच्या मैत्री विषयी लिहिले होते. सापडल्यास लिंक देतो.
एकंदरीतच असे भावनांचे
एकंदरीतच असे भावनांचे प्रदर्शन ती स्त्री आणि तिचा नवरा दोघांनाही आवडले नसेल. गरजे पेक्षा जास्त गुंतवणूक समोरच्या पार्टीकडून झाली आहे जी नको आहे म्हणून एकदाच काय तो क्लिन कट बरा असा विचार असेल. नवर्याला आक्षेप आहे हा समोरच्या व्यक्तीचा इगो न दुखावता मैत्री तोडायचा सेफ मार्ग स्विकारला असेल. हाकानाका.
>>>>>>>
स्वाती, आपला मुद्दा एकदम रास्त आहे. हेमांगीला स्वतालाच हे आवडले नसून तिनेच रुपेशचा पत्ता कट केला असण्याची शक्यता आपण जी व्यक्त केली ती नाकारता येत नाही. पण तुर्तास हि शक्यता सदर घटनेत इतर कॉमन फ्रेंडसमार्फत चाचपून झालीय, पण तसे नसून आणि नवर्याला ते न रुचल्याने हा मैत्रीतला दुरावा आहे हे कन्फर्मड आहे.
गर्लफ्रेंड रुपालीने, "इट्स
गर्लफ्रेंड रुपालीने, "इट्स ओके ! हो जाता है यार ..." >>>>
अरर्र, हे वाक्य लक्ष देउन नव्हतं वाचलं, हो जाता है यार हे रुपालीने म्हटलय (आधी ते हेमांगीने म्हटल्यासारखं वाटलं होतं), म्हणजे मिठी मारणं हेमांगीला सुद्धा नाही आवडलं असं मानायला चान्स आहे.
बाकी, सध्या दिवस बरे नाहित हो, बर्याच दिवसांनी भेटलेल्या पुरुष मित्राने पुरुष मित्राला मिठी मारल्यावर सुद्धा आजुबाजुचे वेगळ्या नजरेने पाहतात. हिंदी सिनेमा वाल्यांनी भलतिच गोची करुन ठेवलिये.
स्त्री-पुरुष मैत्रीचे नाते
स्त्री-पुरुष मैत्रीचे नाते असूच शकत नाही वगैरे विचार कागदावर मांडायला ठिक मात्र ते मनाशी ठाम करून आपण कधीच जग बघत नाही, ना स्वता ते डोक्यात ठेऊन जगतो. अन्यथा इथे कोणाही पुरुषाची मैत्रीण नसती वा कोण्या महिलेचा मित्र नसता.
अर्थात याचा सर्व्हे करून तर
अर्थात याचा सर्व्हे करून तर आपण शोध घेऊ शकत नाही >>> का नाही? करू शकता नक्कीच.
एक दिवस एखादी मंडई, द्वाखाना किंवा वाण्याचे दुकान शोधा. इथे स्त्रीपुरुष एकत्र आलेले दिसले तर त्यातील स्त्रीला मिठी मारून पहा. वर अगं वैशाली / प्रज्ञा / हेतल किती वर्षांनी दिसते आहेस! असं म्हणून बघा.
काही टिपा :
१. काही प्रमाणात परिणामांना सामोरं जायचं मनाची तयारी ठेवा.
२. मंडई, द्वाखाना आणि वाण्याचे दुकान येथे एकत्र येणारे स्त्रीपुरुष एकमेकांशी लग्न झालेले असतात. याव्यतिरिक्तच्या ठिकाणी उदा बाग, थिएटर, हॉटेल वगैरे ठिकाणांची गॅरंटी नाही.
३. नावे तुम्ही तुमच्या कल्पनेने कितीही छान छान वापरू शकता.
अन्यथा इथे कोणाही पुरुषाची
अन्यथा इथे कोणाही पुरुषाची मैत्रीण नसती वा कोण्या महिलेचा मित्र नसता.>>>
बरोबर आहे, पण ही मैत्री होतानाच दोन्ही बाजुंनी मर्यादा पाळल्या तरच ती टिकते नाहीतर वर लिहिलय त्यासारखच होतं.
ह्या प्रसंगात, "जेवायला जायचे असो वा अॅडमिन डिपार्टमेंटमध्ये कामाला जायचे असो दोघेही एकत्रच दिसायचे." "ऑफिसचा आठ-नऊ तासांचा वेळ त्याला खायला उठत होता." म्हणजे ती असताना बाकी ऑफिसमध्ये कोणी अस्तित्वात नसल्यासारखे जर होत असेल तर ही (फक्त) मैत्री नक्किच नव्हती असं म्हणायला वाव नाही का?
नावे तुम्ही तुमच्या कल्पनेने
नावे तुम्ही तुमच्या कल्पनेने कितीही छान छान वापरू शकता. >> चुकीची आणि कुठल्याही महिलेला .. धुलाई नाही का होणार मग.... सर्वे काय मग माझे हात तुटले का दात तुटले, आपटला की धोपटला याचा करायचा का
मनातले मत अगदी प्रामाणिकपणे
मनातले मत अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या धाग्यावर गंभीर चर्चा होत आहे ह्याचे नवल वाटत आहे.
अभिषेक, नो ऑफेन्स इन्टेन्डेड अॅट ऑल.
अग्निपंख, तसाच वाव असता तर
अग्निपंख,
तसाच वाव असता तर इतरांनी आधीच त्या दोघांबद्दल गॉसिपिंग केली असती आणि सदर प्रकरणात लोकांना मग त्यांच्याबद्दल सहानुभूती कमीच वाटली असती.
उलट ज्या लोकांना कशात काही नसतानाही धूर शोधायची सवय असते त्यांनाही तसे काही कधी दिसले नाही तर हे त्यांच्या निखळ मैत्रीचे यशच म्हणूया ना.
बेफिकीर, आपल्या प्रामाणिक
बेफिकीर,
आपल्या प्रामाणिक मताबद्दल धन्यवाद, मी देखील तेच करतोय, माझ्या पाहण्यातला किस्सा पदरचा शब्दही न घालता प्रामाणिकपणे मांडला. त्यातून मला योग्य वाटलेला निष्कर्षही लोकांसमोर ठेवला. त्यावर लोकांनी प्रामाणिक मते द्यावी हिच अपेक्षा, ज्यांना यात टाईमपासच दिसत असेल त्यांनी प्रामाणिकपणे टाईमपास केल्यास हरकत नाही (किंबहुना ती घेणारा मी कोण) उलट विनोद चांगला असेल तर त्याला दादही दिली जाईल. पण कोणाला मुद्दामून धागा भरकटवायचा असेल तर त्या हेतूने आलेल्या पोस्टना मी इग्नोर करतो इतकेच.
अवांतर - आपले नाव बेफिकीर यावेळी काळजीपूर्वक बघून टकलेय पण यापुढे कधी घाईत टंकताना र्हस्व दीर्घच्या चुका झाल्या तर त्याबद्दल आधीच क्षमस्व
तुर्तास रजा घेतोय
ऋन्मेऽऽष
बेफिकीर, एक भा प्र. तुमच्या
बेफिकीर,
एक भा प्र. तुमच्या नावात 'फि' खाली जो टिम्ब आहे तो कसा टंकायचा?
ते मला मागे एकदा केश्विनींनी
ते मला मागे एकदा केश्विनींनी शिकवले होते. 'जे' ह्या अक्षराला विचित्र पद्धतीने दाबले की तसा कुटाणा होतो बहुधा! पण आता मला ते जमतच नाही. असो!
ते झाले तेव्हा कोणीतरी बेफिकीर हे सदस्यनामही लग्गेच घेऊन टाकले. (काय ही वृत्ती एकेकाची)! त्यामुळे मला पुन्हा प्लेन बेफिकीर असे नांवही घेता येत नाही आहे.
(आणि तुम्ही जाणताच की प्रशासकांकडे तक्रारी करणे माझ्या स्वभावात नाहीच)
अवांतराबद्दल क्षमस्व अभिषेक!
ते मला मागे एकदा केश्विनींनी
ते मला मागे एकदा केश्विनींनी शिकवले होते. 'जे' ह्या अक्षराला विचित्र पद्धतीने दाबले की तसा कुटाणा होतो बहुधा! >>>
f दाबुन नंतर shift + J
जमलं जमलं बेफ़िकीर
Pages