कॅन्डी क्रश सागा

Submitted by अमोल सूर्यवंशी on 15 July, 2014 - 08:20

नमस्कार मायबोलीकरांनो,

unnamed_1.jpg

कॅन्डी क्रश सागा गेम चे सध्या तुफान वादळ प्रत्येकात जोरदार फिरत आहे. म्हणूनच हा धागा त्यासाठी.

यात तुम्ही सगळे या गेम बद्दलचे मत, तुम्ही जर खेळत असाल तर आता कोणत्या लेवेल पर्यंत पोहचला अहत. चीट कोड्स इत्यादी सर्व काही तुम्ही इथे लिहू शकता. तर, चला वाट कसली बगताय पटापट तुमच्या प्रतिक्रिया इथे टाका.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी २५४ वर आहे सध्या.
ऑर्डर्स कलेक्ट करायच्या असल्या की हमखास वेळ लागतो लेव्हल सुटायला.
घुबडाच्या गेम मध्ये ४७ वर अडकलेय. सारखं ते घुबड खाली पडतंय.

मी आरामात आहे १३६ व्या लेवल वर , वाटलं तर खेळतीये नाही तर पहायला वेळ सुद्धा नाही मिळत आणि इतकं आकर्षण नाहीये कँडी क्रश सागाचं

रॉबीनहूड, मनोरूग्णांची संख्या घटणार. या गेमला लोक वैतागल्यामुळे कंपनीच्या नफ्यात घट झाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

२०४८

मी ८७०+ लेवल वर आहे. कॅन्टीनच्या क्युमधे, कॉफी शॉपमधे कॉफी तयार होत असताना, टीवी बघताना आणि कुठेही बोअर झालं आहे / वाट बघायची आहे अशा ठिकाणी मी कॅन्डी क्रश चालु करते. कंपनीची गरज पडत नाही. कंटाळा येत नाही.

ड्रीमवर्ल्ड मात्र एका गेम अपडेट नंतर अचानक गायब झालं आहे. कारण माहित नाही. तसंही एका ठराविक लेवल नंतर ड्रीम वर्ल्ड वेगळी ५ लाइफ देतच नव्हतं. सागा आणि ड्रीमवर्ल्ड मिळुन एकत्रित ५ लाइफ झाल्यामुळे एक एपि संपल्यावर ३ दिवसाच्या मो़कळ्या वेळातच फक्त तिथे जात होते, त्यामुळे फार काही मिस करत नाही.

A cube , तुम्ही आमच्या ऑफिसातल्या प्रिंटरवाल्याला competition देताय. तो ही जवळपास ह्याच लेव्हलला आहे. आम्ही सगळे अजि म्या ब्रह्म पाहिले मोडात असतो त्याच्याकडे पाहत .

मी चीटींग करतो म्हनजे पी सी , लॅटॉ आणि टेबवर खेळतो.प्रत्येकाला वेगळ्या लाईफ मिळतात. शिवाय टॅबवर सिस्टीम घड्याळ ३ तासानी पुढे न्यायचे . पुन्हा सीसीएस उघडयाचे ५ लाईफ येतात. आठवणीने पुन्हा घढ्याळ ३ तास पूर्ववत मागे आणून पुन्हा सीसीएस उघदायचे . ती ५ लाइफ्स तशीच राहतात. अशा रीतीने अमर्याद लाइफ्स मिळतात. शिवाय मी २०१४ पासून खेळतोय.... मी फेसबूक मधून खेळतो त्याने ते कुठेही सिन्क्रोनाइज होते.

A cube>> हे मस्तय...

ए टू द पावर थ्री,
लेव्हल १००० नंतर मला आता लाईफ साठी वाट बघावी लागत नाही...अनलिमिटेड लाईफ मिळतात मला...खेळून बोर होईस्तोवर...
मी १५६३ वर आहे... मधे १ दिड वर्ष खेळलीच नाही...कंटाळा आला .. आता करेल परत सुरु...
मध्यंतरी इतरांना लेव्हल पार करुन ट्रिट उकळायचे कार्यक्रम करायची मी Wink
वासरात लंगडी गाय शहाणी .. Proud

एक आहे. हा पेशन्सचा मामला आहे. मी काही लेव्हल्स्वर महिनोन महिने होतो. अक्षरशः हजारो वेळा एकच लेवल खेळलो असेल. पण पेशन्स नाही सोडला. बरेच लोक खेळायचे सोडतात . गेम डिलिट करतात. मझा प्रवास ४-५-६ तासांचे आणि रिपिटेटिव असतात अशा वेळी लै भारी टैम पास.

बापरे...मला नाही इतका वेळ लागला कधीच क्रॉस करताना..
पुढील लेव्हल कश्या असतील ते मात्र माहिती नाही...
पण सुरुवातीच्या लेव्हल्स पेक्षा आत्ता खेळते त्या कठिण आहे हे मात्र खरं..
सद्ध्या परत मी रेस्ट्रिक्टेड टू फाईव्ह लाइव्ह्स Sad