Submitted by श्यामली on 21 February, 2008 - 02:17
पुन्हा एकदा आलंच!
(येणारच होतं ते).....
गेल्या वेळेस बरीच मोडतोड करून गेलेलं,
यंदा पण झालंय बरंचसं नुकसान,
कुंपणाच्या तारा गोळा झाल्यात;
खांब उखडून पडलेत
("अजूनही बरीच नासधूस झालीये")
आता मात्र पक्का बंदोबस्त करावा लागेल अस दिसतंय
सिमेंट्ची पक्की भिंत बांधून घ्यावी!
आणि हो, वरती फुट्क्या बाट्ल्यांच्या काचा पेरायला हव्यात
म्हणजे नुसतं डोकवायचं म्हणलं तरी घायाळ झालं पाहिजे हे वादळ.
....
("आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना" )
चिंता करायची नाहीच काही गरज ,
बंदोबस्त झालाय!...
--------------------
गुलमोहर:
शेअर करा
छानच
जमलीये गं..:)
पण वादळाची वाट पहाणे काही थांबणार नाही..:)
क्या बात है!
वादळाला घायाळ करायला निघालीयेस..... जरा जपून गं पोरी.
छान
छान आहे ग कविता श्यामली.
धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद दोस्तहो
फारच वादळी
फारच वादळी आहे कविता,
शेवटच्या तिन ओळी खासच
बंदोबस्त झालाय....
छानच जमल्ये
सुधीर
जमलय!!
शेवटी मनातल वादळ पडल म्हणायच बाहेर.. सगळ वाहून जाऊ दे आता.
कल्पना
वादळाला घायाळ करायची कल्पना आवडली.
संदिप खरेंनी कुठेतरी लिहुन ठेवलेय जे न जमे रविला ते सुचे कविला असा काहीतरी त्याच अर्थ. त्या ओळी पुरेपुर उतरल्या या कल्पनेत.
वादळं
सैरभैर करतं झालं!
("आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना")
ही ओळ भिडली गं. मनाभोवती भिंत बांधून घेतांना नेमके हेच विसरून जातो आपण.
छान लिहिलंस.
नवीन मायबोलीची किमया :)
इकडे अजून वाचताय तुम्ही लोक क्या बात है!
केदार,पमा,चिन्नू धन्यवाद
श्यामलीता
श्यामलीताई, आधी ओझरती वाचली होती. आज वेळ मिळाला म्हणून व्यवस्थित वाचून प्रतिक्रिया देता आली.
नव्या मायबोलीची किमया खरी!
अगं ए!!
ओये!! काय लिहिलंय गं!
वादळाला घायाळ करू पाहतेय..
उफ्फ!!
शेवट मस्त
"आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना" ही पंच लाईन मला फार आवडली... ह्या ओळीत सगळी कविता उतरली आहे.
आदाब...
वाचलीच
वाचलीच नव्हती ही मी.
मस्तय कल्पना. आणि मुक्तछंद म्हणजे तर हवं ते बंधनाविना शब्दांत उतरणारं.
फुटक्या काचा पेरायला हव्यात खरंच.
आपण मूर्ख! रंगीबेरंगी फुलझाडं लाऊन वर ती आणि मग ते बघून आपणही घायाळ व्हायचेच पर्याय देतो वादळाला.
आह्हा..सन्मी
आज्जुका, सत्याभाय्,सन्मी तुम्हा सगळ्यांचे कविता वाचून आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार
सन्मी कविता येतीये बहुतेक काढ तीला बाहेर.
छान
एकदम सही जमलयः-)
धन्यवाद
धन्यवाद अभिजीत
श्यामली , वाद्ळाची अगदी मूळच
श्यामली ,
वाद्ळाची अगदी मूळच खोदून काढलि आहेस...
"आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना">>> हे वाक्य विषेश आवड्ले...
श्यामली, हि वाचली नाही
श्यामली, हि वाचली नाही त्याबद्दल सॉरी. सुरेख आहे.
ओह... क्या चीज लिखी है...
ओह... क्या चीज लिखी है... अप्रतीम!!!! अप्रतीम !!!
भन्नाटच आहे
भन्नाटच आहे
वादळाला घायाळ करायलाच
वादळाला घायाळ करायलाच हवे.
फारच सुंदर कविता..!
कल्पना शान आहे
कल्पना शान आहे पण............................कवितेसारखि काहि वाटत नाही तुमची कविता..........
सहीरे!
सहीरे!
धन्यवाद, कवितेसारखी न वाटणारी
धन्यवाद, कवितेसारखी न वाटणारी असून देखील माझी कविता वाचल्याबद्दल आणि आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल
गि-या येल्कमबॅक खाली हात क्युं? कविता कुठय?
जितेंद्र गावंडे यांच्याशी
जितेंद्र गावंडे यांच्याशी सहमत!
-'बेफिकीर'!
वादळाला चॅलेंज देणारी मनाची
वादळाला चॅलेंज देणारी मनाची तयारी आवडली.
जितेंद्र गावंडे यांच्याशी
जितेंद्र गावंडे यांच्याशी सहमत! >>>>>
सुंदर जाण दिसतेय आपली बेफिकीरजी!
पण का तेही स्पष्ट कराच!
(अवांतर- कवियित्रींच्या वतीने मी बोलतोय असा पळपुटा यूक्तीवाद नका करू, जे विचारले आहे त्याची उत्तरे हवी आहेत, अन् इथेच नाही तर जिथे जिथे असे खड्डे खणलेत तिथे! ती द्यावीत अन्यथा अशा कमेंट करण्याचा आपणांस नैतीक अधिकार उरत नाही याचे भान ठेऊन आपला बहुमुल्य वेळ, श्रम वाचवावेत हि अपेक्षा! हे मी कवितेच्या बाजूने बोलतोय, अन् यापुढे प्रत्येक कवितेच्या बाजूने बोलेनच!)
वादळावरचा राग कवितेत ओत:प्रोत
वादळावरचा राग कवितेत ओत:प्रोत भरलाय......खूप भन्नाट कल्पना आहे ही!
मस्तय मनातले वादळ.
मस्तय मनातले वादळ.
जुन्याच कवितेवरच्या या नव्या
जुन्याच कवितेवरच्या या नव्या प्रतिसादांना धन्यवाद अनामिका आणि केपी.
Pages