Submitted by श्यामली on 21 February, 2008 - 02:17
पुन्हा एकदा आलंच!
(येणारच होतं ते).....
गेल्या वेळेस बरीच मोडतोड करून गेलेलं,
यंदा पण झालंय बरंचसं नुकसान,
कुंपणाच्या तारा गोळा झाल्यात;
खांब उखडून पडलेत
("अजूनही बरीच नासधूस झालीये")
आता मात्र पक्का बंदोबस्त करावा लागेल अस दिसतंय
सिमेंट्ची पक्की भिंत बांधून घ्यावी!
आणि हो, वरती फुट्क्या बाट्ल्यांच्या काचा पेरायला हव्यात
म्हणजे नुसतं डोकवायचं म्हणलं तरी घायाळ झालं पाहिजे हे वादळ.
....
("आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना" )
चिंता करायची नाहीच काही गरज ,
बंदोबस्त झालाय!...
--------------------
गुलमोहर:
शेअर करा
राहिली वाचायची
राहिली वाचायची तेव्हा...
श्यामली, कमाsssल लिहिलं आहे!!
कंसातल्या ओळींमुळे अजून खुललं आहे मनोगत...
केपी, वर काढल्याबद्दल आभार!
Pages