जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न विरघळणारे पदार्थ नदीत फेकायचे आणि मग नद्या साफ करायच्या घोषणा करून निवडून यायचे.

भाजपवाले असलेच!

त्या चारपाचजणांना सांगा हे, त्यांचा एक दिवस जाईल त्रागा त्रागा खेळण्यात!>>>>>:हहगलो:

हातात सूप घेऊन लहान बाळाकडे लाडाने बघतात तसे त्या सुपाकडे बघत मेदे 'कशी मी नाचू' म्हणत ठुमकत होती. सांगतंय कोण नाचायला? दहापाच वैश्विक आकाराच्या बायका तोंडाला येईल ते स्तोत्र उच्चारत होत्या आणि काही जणी जमीनीवर लोळून निषेध व्यक्त करत होत्या. मध्येच सगळ्यांनी एकमेकींना आनंदाने टाळ्या द्यायला सुरुवात केली. नवरात्रातल्या अष्टमीला अंगात आलेल्या बायकाही ह्यापेक्षा सुसंबद्ध वागताना दिसतात.>>>>>:हहगलो: आईग!

सुमोबाई गौरी बसवल्यासारख्या एका खुर्चीवर बसून होत्या.>>>>:हाहा: सुमोच काय मेदेची आई पण चेहेरा भान्ड्यात पाडुन बसली होती. जणू काही माई ( सुमो) ने चहातुन एरन्डेल दिलय आणी टॉयलेट बिझी ( कुणीतरी दुसरे अडवुन) असे भाव होते चेहेर्‍यावर.:फिदी:

ह्या गावचा, त्या गावचा, असं काहीतरी चाललं होतं! मी लाजून आतल्या खोलीत पळालो>>>>:फिदी:

कालचा भाग सुसह्य होता बेफी मंगळागौरीच्या खेळांमुळे.. नैतर एरव्ही सुकन्याबाईंची जहाल नजर आणि मेदेचे सुस्कारे यांनी ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर घातल्यासारखी वाटत असते, बघा न पाउसही पडेनासा झालाय गेले काही दिवस...

न विरघळणारे पदार्थ नदीत फेकायचे आणि मग नद्या साफ करायच्या घोषणा करून निवडून यायचे. भाजपवाले असलेच!....इथे हे अवांतर होतेय बरंका Happy

येऊन जाऊन ती अर्चूच काय ती खत्तरनाक दिसत होती.>> आता अर्चू चांगली दिसू लागली का? फळ्यांचे काय?

वाईट बघेल त्याला वाईटच दिसते सगळीकडे! कालच हे वाक्य जानूबाळाच्या वडिलांनी टोमणा म्हणून वापरलेले पाहिले. (एका अन्य, क्रोधजनक मालिकेत). अनिष्कांना फळ्या दिसतात, त्यांना फळ्याच दिसणार! आम्हाला लांबसडक पापण्या आणि काळेभोर डोळे दिसतात, आम्ही ते बघणार!

Lol फारच सिरियसली बघता वाटते सिरियली!! चांगले आहे, अन्यथा अर्चूचा टीआरपी वाढायची शक्यता कमीच होती..

चनस Proud

सकाळीच ३० प्रतिसाद दिसले.. म्हटलं 'सिरियल बंद' झाल्याचा आनंद झाला असावा लोकाना...
.
.
.
.
.
पण तसे काही दिसत नाहीय... Sad

.
.
.
.
Happy

चनस Lol

आज काय विशेष घड्ल का?<<<

अख्खा फोकस त्या कबूतरीय हिरविणीच्या मंगळागौरीय स्वच्छंद क्रीडाप्रकारांवर असताना एका कोपर्‍यात अर्चू तेच क्रीडाप्रकार करताना काय दिसत होती हे पाहण्याचे औदार्य तुमच्या मनात काल सायंकाळी निर्माण झाले होते काय?

असते तर विशेष काय घडले हे समजले असते आबासाहेब!

>>>पण अर्चू नाही पाहिली नाचताना.
तेवढी हिम्मत नाही ओ आमच्याकडे<<<

आग आहे नुसती आग!

Pages