Submitted by मन-कवडा on 27 May, 2009 - 08:10
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
मगच्या
मगच्या वीकेन्ड ला "मिर्च मसला" ला गेलो होतो. service हळू आहे, पण पनीर लहसूनीया छान होता
कोथरुड stand
कोथरुड stand जवळ Asian Melange इथे टेरेसवर बार्बेक्यू सेक्शन आहे. मस्तच! नवीन आहे तेंव्हा लवकर try करा. quality कधी ढासळेल सांगता येत नाही.
महेश विद्यालायाशेजारी नवीन metro mix , सीझलर्स आणि थाय फूड मस्त!
आमच्या घराजवळ रुग्वेद (कोथरुडच्या नवीन D P Road वर नाट्यगृहाकडुन पुढे जाणारा) शाकाहारी
छानच मिळते आणि बाजुलाच जरे मेरीडिअन मध्ये triple Sunday or other type of ice-cream variety
quality कधी
quality कधी ढासळेल सांगता येत नाही.
>> हे हे खरे आहे..
ॠग्वेद तर अगदी जवळ होते घरापासून.. पण सुरुवातीची quality राहिली नाही आता
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
ॠग्वेद तर
ॠग्वेद तर अगदी जवळ होते घरापासून.. >>> मी एक दोनदा गेलो पन आता नाही जावे वाटत!
तिथेच वेदान्त आहे, ते कसे आहे?
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
वेदान्त
वेदान्त खास नाही एवढे... विशेष असे काही नाही... पण डहाणुकर च्या कामत वैगेरे मधे १-२ तास वेटिंग करण्यापेक्षा तिकडे गेलेले निश्चितच चांगले आहे
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
कुमार
कुमार परिसर मधलं कुठलं ते?? हा पोटोबा....ठीक वाटलं होतं.
आणि पूर्वी डहाणूकर मध्ये वडा-पाव मिळायचा दिप्ती देसाईच्या दवाखान्याजवळ्....मस्त असायचा.
त्यानंतर शेजारी ऊसाचा रस!!!
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!
पोटोबा मधे
पोटोबा मधे घरगुती पदार्थे चांगले मिळतात - मला त्यांचा आलू पराठा आवडतो (एक खाल्ला तर पोट भरत)
बटाटावडाही छान मिळतो.
वेदांत बेकार आहे. आणि डहाणुकर मधल कामतही आता तेव्हढ चांगल राहिल नाही, सोडा फार घालतात
आणि चटणी तर बेचव चोथ्यासारखी लागते. (मी सर्व प्रकारच्या तर्हेतर्हेच्या चटण्या खूप छान करते
त्यामुळे मला बाहेरच्या चटण्या तेव्हढ्या आवडतच नाहीत पण कामत मधली चटणी बेकारच)
कर्वेनगरा
कर्वेनगरात 'हॉटेल यज्ञकर्म' अप्रतिम चिकन मिळते,सुरुवात लेमन कोरिएंडर सुपाने करा.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
(No subject)
पूर्वी
पूर्वी डहाणूकर मध्ये वडा-पाव मिळायचा >>>
अन्नपुर्णा! छान होता! त्याची चटणी देखिल मस्त असायची बंद झालाय आता!
पृथ्वी ठीक आहे अजून!
पौड रोडला वनाज कॉर्नरला 'समर्थ' आहे त्याचे देखिल ठीक असते!
पण ऋग्वेद मला नाही मला अजिबात आवडले! पहिल्याच प्रयत्नात नापास ते!
गणंजय मध्ये 'सदानंद' भेळ, पाणीपुरीचे दुकान आहे छान आहे त्याच्या कडची चव!
पार्सल देखिल मिळते!
कर्वेनगर मध्ये स्पेन्सर्स समोरील रस्त्याच्या सुरुवातीला एक बटाटावड्याचे दुकान आहे. छान वडे मिळतात!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
योगेशभाऊ,
योगेशभाऊ, वरती वेदांत आणि ॠग्वेद झालेच आहे त्यामुळे आता यज्ञकर्म!! तो करायला अनेक मार्गाने जाता येते,मी गेलो तो मार्ग -डहाणूकर कॉलनीच्या चौकावरुन सरळ पुढे या नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो.त्यावरून सरळ पुढे येऊन उजव्या हातास वळा स्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा उजव्या हातास वळुन तसेच सरळ जा शेवटी 'T' जंक्शन येते तिथेच'यज्ञकर्म' आहे.
हुश्श....
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
(No subject)
पोटोबा खरच
पोटोबा खरच छान आहे... तिथे थालिपीठ लोणी , उपवासाचे थालिपीठ चन्गले असतात...
non-veg साठी Konkan expess छान... मी non-veg खात नाही पण मला तिथली egg curry खूप आवडते...
'Naad Khula Kata Kirrr'
'Naad Khula Kata Kirrr' हे कुठे आहे ? ते यज्ञकर्म नावाचं हॉटेल चालू असतं हे आज कळलं. लोकहो झकास डेटाबेस तयार झालाय.
ऋग्वेद आणि वेदांत दोन्ही नाही आवडत मला. अभिषेक, मिर्च मसाला, दुर्गाची कॉफी, हिंदुस्थानचे पॅटीस १ नंबर. कर्वेनगरमधे लकी बेकरी चांगली वाटली. त्या बेकरीबाहेरच्या गाडीवर कच्छी दाबेली पण चांगली वाटली.
डहाणूकरच्या सर्कलजवळ सागर स्वीटसमधली कचोरी चांगली आहे.
(No subject)
या सगळ्या
या सगळ्या जागा गूगल अर्थवर टाका रे. उगीच इकडे वळा अन तिकडे वळा लै कटकट...
कर्वे
कर्वे रोडवरचे काटा किर्र गेल्या महिन्यात तरी चालु होते. लै झक्कास मिसळ
रुग्वेद
रुग्वेद आणि वेदांत दोन्ही टुकार आहेत.. !!! पोटोबा बरं आहे पण बळच महाग आहे..!
डहाणूकर मधला वडापाव मस्त असायचा एकदम.. डिपी रोड च्या कॉर्नर ला आता नविन माँजिनिज सुरू झालय... पूर्वी रोहन प्रार्थना मधे होतं.. पण तिथल्या पेस्ट्रीज शिळ्या वाटायच्या बर्याचदा...
पोटोबा पण
पोटोबा पण टुकारच आहे. मला अजिबात आवडत नाही. त्यातल्या त्यात थालिपीठ आणि आलु पराठा चांगला आहे तिथे. अगदी अगदी रोहन प्रार्थना मधल्या माँजिनीज मधे शिळ्याच पेस्ट्रीज असायच्या.
पण आता महेश विद्यालयाच्या समोरच्या बाजूला नविन पेस्ट्रीच नविन दुकान झालंय तिथे चांगल्या आहेत पेस्ट्री. कुमार परीसरच्या रस्त्यावर आता बरेच खादाडीचे पर्याय आहेत नवनविन. रच्याकने, इथे वाचताना कळलं की बरेच लोक आहेत जवळजव़ळ राहणारे. आता महात्मा, सहजानंद, कुमार, गोपिनाथ, गणंजय, गुरुगणेश असं नवं गटग करावं का काय?
पुढच्या
पुढच्या भारतवारीत ह्याचा printout घेऊन जाणार आहे.
डहाणूकर वडापाव झकास!! त्यांच्या कडेच मूगभजी मिळायची. ती पण एक नंबर असायची.
पौड रस्त्यावरची गणेश भेळ पण छान. तिकडे आपापली 'पाखरं' हुडकायला पब्लिक जातं
मिर्च मसालाला मी जवळ जवळ ८-९ वर्षापूर्वी गेले होते. नविनच होतं तेव्हा.
आमचं त्या वेळेचं आवडतं म्हणजे २४ कॅरेट. कबाबस् मस्त मिळायचे तिकडे!
(No subject)
योगेश त्या
योगेश त्या पोटोबा प्रमाणेच मेहेंदळे गॅरेज जवळचे हॉटेल... आता तिथे गॅरेज ऐवजी सांस्कृतिक हॉल आणि हॉटेल आहे... तिथेही खिचडी, थालिपीठ, फोडणीचा भात वैगेरे पदार्थ मिळतात..पण तेवढच महाग आणि quantity पण कमी असते..
ऋग्वेद आणि वेदांत जेव्हा नविन सुरु झाली होती तेव्हा जाम खुष झालो होतो...पण quality चांगली नाही आजिबात.. त्याच्याजवळ्...आतल्या गल्लीमधे.. फक्त Take-out साठीचे हॉटेल आहे.. फोन वरुन वैगेरे पण orders करता येते... घरपोच देतात आणुन..त्यांच्या पंजाबी डिशेस ची चव झकास असते एकदम..
(No subject)
फोडणीचा
फोडणीचा भात, फोडणीची पोळी, वरणफळं >>>>
या गोष्टी हॉटेलमध्ये मिळतात आजकाल??? ऐ.ते. न.
वरणफळं
वरणफळं एकदम मस्त असतात.
- सुरुचि
यज्ञकर्म
यज्ञकर्म उपहारगृह
पत्ता:
१) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला 'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
२) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.)
३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
धन्यवाद.
इथे आहे का
इथे आहे का ते?
अधिक
अधिक जवळून.............
कर्वे रोड
कर्वे रोड बाजूने...............
भाडार् कर्
भाडार् कर् रओड वर साने चि खुप भारि पानिपुरि मिलते.........
Pages