Submitted by मन-कवडा on 27 May, 2009 - 08:10
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
कर्वे रोड
कर्वे रोड वर नळस्टॉप जवळ समुद्र [व्हेज], निसर्ग [सी-फुड],
एरंडवण्यात अभिषेक एक्झिक्युटीव्ह [व्हेज, नॉन व्हेज स्वतंत्र आहेत समोरासमोर]
पालवी आणि पृथ्वी - फार जुनी आणि सगळ चांगल मिळत
समर्थ ची महाराष्ट्रीयन थाळी
१) मयुर
१) मयुर कॉलनीच्या कॉर्नरला महाराष्ट्र बँकेसमोरच्या टपरीवरील इडली सांबार, वडा इत्यादी.
२) योगीशेजारील शुभा मधील पंजाबी
३) मयुर (कर्वेनगरमधील) पावभाजी, कॉफी, ज्युस, उशिरापर्यंत गप्पा मारत बसायचे ठिकाण.
४) तिथेच अलिकडे एका दुकानातील वडापाव, पोळीभाजी ( श्री समर्थ बहुतेक)
५) शिवदीप (कर्वेनगर) मधील अप्रतीम वडापाव.
६) हॅपी कॉलनीतील कोकण एक्स्प्रेस (?)
१. अरे
१. अरे दुर्गा कॅफे हाउस ला कसे विसरलात ?
२. नात्या, कोकण एक्स्प्रेस्स, कोथरुड स्टँड जवळ आहे.
३. मन्या, मी एरंडवण्यात एक वर्ष राहुन सुद्धा कधी गेलो नाही अभिषेक मधे....अरे भयानक वेटिंग असते तिथे
त्यापेक्षा, मेहेंदळे गॅरेज मधे जे हॉटेल आहे...तेथे थालिपिठ, भाकरी वैगेरे पदार्थ खुप चांगले मिळतात
४. कमिन्स कंपनीच्या समोर ऐश्वर्या मधली मिसळ चांगली असते.
५. कोथरुड चा फ्लाय्-ओवर उतरुन डेपो कडे जाताना, लगेच डाव्या साइड्ला तिरंगा हॉटेल आहे.. नोन्-वेज आणि वेज जेवण सुद्धा एकदम झणझणित असते.
कोथरूड
कोथरूड तिरंगा चे मलई कबाब आणि शोले कबाब झकास.
अभिषेक (जुनं, नॉनव्हेज मिळतं ते) चं अभिषेक स्पेशल चिकन चांगलं आहे.
समुद्र मधे चायनीज ची क्वांटिटी भरपूर. बेबी कॉर्न चिली फ्राय आणि फ्राइड राईस हे काँबो अप्रतीम, पण स्प्रिंग रोल्स घेऊ नयेत.
स्वीकार ची फिल्टर कॉफी मस्त.
फ्लायओव्हर वरनं येऊन गीताई मॉल पाशी दुर्गा साठी यू टर्न मारताना कॉर्नर ला 'रोल क्लब' आहे.
मस्त रोल्स / फ्रँकीज मिळतात. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. मिक्स्ड डबल्स रोल नामक प्रकार पण मिळतो.
(मोठे ऑर्डर असेल, २०+ वगैरे; तर २०-३०% सवलत पण मिळते...)
गीताई मॉल शेजारी चैतन्य पराठा हाऊस आहे...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
>>अरे भयानक
>>अरे भयानक वेटिंग असते
हो रे खरय!!!
स्वीकार चा व्हेज खीमा पण चांगला असतो....
दुर्गा समोर, बेडेकर गणपतीजवळ सकाळी एक काकू पोहे, उपमा आणतात्...लय झक्कास असतो...९-९:३० ला संपलेले असते सगळे
पुर्णान्न
पुर्णान्न नविन सुरु झाले तेंव्हा ट्राय केले एकद्म छान होते!
पण दुसर्यावेळी गेलो तर परत जाण्याची इच्छा नाही राहिली!!
-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको
१. पौड
१. पौड रस्त्यावर, कृष्णा हॉस्पिटलच्या चौकात (हॉस्पिटलच्या digonally opposite) संध्याकाळी गाडी उभी असते ... तिथे वडापाव आणि मूगभजी अप्रतिम मिळतात.
२. पौड रस्त्यावर, गीताई / रिलायन्स मॉलच्या समोर गणेशकृपा (रोल क्लबच्या शेजारी) मध्ये मेदुवडा सही असतो.
३. गीताई / रिलायन्सच्याच शेजारी चैतन्य विसरलेत की सगळे. तिथे परठे मस्त मिळतात. पतियाला लस्सी पण चांगली असते त्याची.
४. कर्वे रस्त्यावर मयूर कॉलनी बॅंक ऑफ महाराष्ट्रजवळच्या टपर्या - दावणगिरी दोसा - इथे सेट दोसा आणि लोणी दोसा चांगला मिळतो.
५. कर्वे रोड - काव्हा कॅफे - निवांत गप्पा मारत बसायला कॉफी हाऊस.
आता तुमच्या जबाबदारीबर ट्राय करण्यासारख्या काही गोष्टी :
१. पौड रस्ता - मोरे विद्यालयाच्या गल्लीजवळच्या टपर्या - इथल्या 'झकास नॉनव्हेज्'मध्ये घरी घेऊन जायला फिश आणि चिकन चांगलं मिळतं अशी ऐकीव माहिती आहे.
२. कर्वे रस्ता - कर्वे पुतळ्याजवळ शीतल ... इथे बर्यापैकी नवरा मिळू शकतो
- गौरी
अरे काय
अरे काय छान छान नाव काढताय पदार्थांची.........:तोंडाला पाणी सुटलेला बाहुला:
----------------------------------
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो.
>>कर्वे
>>कर्वे पुतळ्याजवळ शीतल ... इथे बर्यापैकी नवरा मिळू शकतो
म्हणजे
इथे
इथे बर्यापैकी नवरा मिळू शकतो>>>>>>
कसा देतात किलो ???
----------------------------------
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो.
इथे
इथे बर्यापैकी नवरा मिळू शकतो>>>>>> हा हा हा... बरोबर आहे...
बर्याच बायका नवर्याला खाउन टाकत असतील... :फिदी:.
का हो... बायको पण मिळते का तिथे (एभाप्र)
नतद्रष्ट
नतद्रष्ट ठोकाण-
कर्वे रोड चं किमया...
दुसरा काहीच ऑप्शन नसेल तर आणि तरंच जा...
केंव्हाही, कुठल्याही वेळी, कुठल्याही दिवशी , कुणाबरोबरही जा...
ओळखीचं कुणीतरी त्या वेळी भेटू नये असं भेटतंच...
उदा.- ऑफिसच्याच पब्लिक बरोबर ऑफिस नंतर चकाट्या पिटायला गेलो तर शेजारच्या टबलवर दोन्ही डायरेक्टर्स सपत्नीक....
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
ice cream-somwar peth near
ice cream-somwar peth near to GM communications
cheese kut dosa-opp to KEM hospital
pani puri-shiv sakti gadewala in anand nagar... sahi aste
गौरी, आज
गौरी,
आज काल रेसेशनच्या काळात किलो पेक्षा नगावर नवरा हवा असेल तर काय procedure आहे?कारण ते जास्त किफायती ठरेल ना.आणि चार पाच नग पाहीले तर जरा सिलेक्शनला वाव राहील, जरुर कळव
जोशी स्वीटस् ची मटार करंजी व ओल्या नारळाची करंजी
शैलेश पुलावरची मटका कुल्फी
करीश्मामधील ice magicची कॅड बी आणि बर्फाचा hygenic गोळा
ते नगाचं तेवढं लक्षात असू द्या..
ओळखीचं
ओळखीचं कुणीतरी त्या वेळी भेटू नये असं भेटतंच...
>>>> अँक्या अरे कर्वे रोड वरची बरीच ठिकाणे या सदरात मोडतात
करिश्मा मधला चोकोलेट शेक (त्यात फक्त चोकेलेट असते...) खूपच अप्रतिम
अरे मी
अरे मी शीतलला गेले होते तेंव्हा नवरा पहिल्यांदा भेटला. बरा निघाला नग ;), त्यामुळे म्हटलं 'तुमच्या जबाबदारीवर ट्राय करा (take away)' म्हणून सांगायला हरकत नाही
- गौरी
मिर्च
मिर्च मसाला( डहाणूकर कॉलनी ) बेस्ट ! तिथली तंदुरी चिकन मस्त झणझणीत अन टेस्टी.
मिर्च
मिर्च मसाला ख्ररंच बेस्ट. ज्यांना लसुण खुप आवडतो त्यांनी तिथे पनीर लसुणी जरुर खाउन बघावी. अप्रतिम असते.
- सुरुचि
ALL TIME MASTI
ALL TIME MASTI
महेश हायस्कूल समोर नवीन निघालय इथे पिझ्झाचे आणी sandwiches चे भरपूर प्रकार मिळतात
खूप टेस्टी आणी reasonable try करायला हर्कत नाही!!!!!!!!!
एक खास
एक खास पदार्थ आहे.
फक्त पुण्यात, तेही फक्त रविवारी सकाळी, मात्र होटेल मधे नाही तर बेकरीत आणि किराणा दुकानात.
हिंदुस्थान बेकरीचे गरम गरम पॅटीस.
हिंदुस्था
हिंदुस्थान बेकरीचे गरम गरम पॅटीस. >> जोगेश्वरी समोरच्या गल्लीत न्यु पुना बेकरी आहे तिथली पॅटिस अप्रतीम असतात. एकदा नक्की खाऊन बघा..
(No subject)
अँक्या,
अँक्या, किमयाचे फूड पण बेकार आहे. मागच्या वर्षी नवर्याला तिथे खाऊन फूड पॉयझनींग झाले. काही ऑप्शन नसले तरी तेथे जाऊ नये.
लोक, गणेश भेळ विसरले का?
अभिषेकला गर्दी खूप असते, पण फूड नं १ आहे.
किमयात नको
किमयात नको ते लोक आल्यानी कायमच जेवण फक्त गिळले आणि कल्टी मारली...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!
चाट
चाट साठी(भेळ, पाणीपुरी साठी) आई ग विसरलात का?
महेश
महेश हायस्कूल समोर नवीन निघालय >>
हे महेश हायस्कूल कोठे आहे?
आईग..
आईग.. पुण्यात जायचे नाव नाही, आणि हे असलं वाचतेय!
मीही एरंडवण्यात राहायचे.. ही सगळी ठिकाणं आवडती..
हे वाचून इतकी भूक लागलीय की नवीन नावं सुचतंच नाही आहेत!
www.bhagyashree.co.cc
संह्याद्र
संह्याद्री हॉस्पीटलच्या बाहेर बिपीन- व. पाव्,बव, कापो,ऊपमा एकदम बेस्ट!!!
गौरी ल़क्ष
गौरी
ल़क्षात ठेवीन मी नक्कीच !
अभिनवच्या
अभिनवच्या चौकातच एक दुकान आहे पेस्ट्री corner तिथले वेगवेगळे rolls, Burgers,आणि कधी कधी pastries पण छान असतात. त्याच्याच अलिकडे पद्मा नावाचे घरगुती snack सेंटर आहे तिथे टिपीकल साउथ इंडियन मिळते, फिल्टर coffee अप्रतीम!!!!
Pages