मूग, मूग आणि मूग

Submitted by अवल on 10 August, 2014 - 02:46

मूग किती उपयुक्त कडधान्य. एकतर पचायला तसं हलकं. आणि कोणत्याही रुपात त्याला खाता येतं. मला सुचलेले हे पदार्थ. तुम्हीही अजून सुचवा
1. मुगाच्या डाळीचे वरण - मूगडाळ हळद हिंग घालून कुकरमधे शिजवून नंतर त्यात मीठ घालून केलेले वरण
2. मूगाचे तिखट वरण- वरील वरणाला मिरच्या, कढिपत्ता अन लसूण यांची फोडणी दिलेले तिखट वरण
3. मूगाची डाळ - मोहरी, हिंग, कढिपत्ता, तिखट, हळद यांच्या फोडणीवर भिजवलेली मूगडाळ घालून मंद आचेवर शिजवून नंतर मीठ, कोथिंबीर घातलेली कोरडी मूगडाळ
4. कोशिंबीर- हिरवे मूग भिजवून, वाफवून, दही, मीठ, मिरची, साखर, कोथिंबीर अशी केलेली कोशिंबीर
5. उसळ - हिरवे मूग भिजवून, मोड आणून सालासकट, मोहरी, हिंग, हळद, तिखट, कांदा, टॉमेटो, यांवर परतून नंतर त्यात मीठ, गूळ,,अमसूल टाकून केलेली उसळ.
6. बिरडं - हिरवे मूग भिजवून, मोड आणून, सालं काढून , हिंग, हळद, कांदा, धणेजिरेपूड, तिखट यावर परतून, शिजवून, त्यात लसूण, ओलं खोब-याचे किंवा तळके वाटण घालून, चिंच, गूळ, मीठ घालून केलेले बिरडे.
7. स्प्राऊट्स - हिरवे मूग भिजवून, त्यांना मोठे मोड आणून, ते वाफवून इतर सँलेड्स मधे किंवा चायनिज पदार्थात वापरणे.
8.खिचडी- साधी वा भाज्यांसह केलेली. साधी वा तिखट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग उकडुन घ्यायचे...त्याला चुरुन घ्यायचे.... त्यात हि मि , लसुण , आलं , मीठ , किंचित साखर हे पण त्यातच मिक्स करायचे. आणि ते कणकेत मळुन त्याचे जाडसर पराठे लाटायचे...मस्त बटर लाउन हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर हादडायचे

Pages