ये गुलाबी

Submitted by kamini8 on 12 August, 2014 - 04:50

आकाशात इंद्रधनुष्य पाहताना मनात विचार आला. किती सुंदर रंग आहेत हे, मन एकदम प्रसन्न झाले. रंगाला आपल्या आयुष्यात खुपच महत्व आहे. ज्यानां रंग पाहता येत नाहीत त्यांच्याबद्दल खुप वाईट वाटत आहे. रंग नसते तर जीवन कसे भकास असते. रंगामुळे आपले जीवन रंगीत झाले आहे. आपल्याला साध्या टीवी पेक्षा रंगीत टीवी पहायला जास्त आवडते. निसर्गात सर्व रंगाच्या छटा असतात. निसर्गात सर्व रंगाची उधळन होत असते. आपल्याकडे रंगांचा उत्सव असतो. रंगपंचमी, होळी.
शाळेत असताना एक धडा होता. आकाश पहीले रंगीत होते, आणि सर्व फुले सफेद होती. फुलांना वाटले की आपण सुगंधी तर आहोतच आपल्याला रंग मिळाले तर आपणही रंगीत आणि सुगंधी होवु. त्यांनी आकाशाकडे रंगाची मागणी केली. आकाश फुलांना रंग देण्यासाठी खाली आले. फुलांना रंग मिळाले. पण काही फुले सफेदच राहीली, कारण आकाश फुलांना रंग देण्यासाठी आले तेव्हा काही फुले झोपली होती. म्हणुन ती सफेदच राहीली.
मोराचा रंग मोरपिसी, मेंदीचा रंग, गुलबक्षीचा रंग गुलबक्षी, डाळींबाचा रंग डाळींबी, मखमलीचा रंग मखमली हे आपण नाव दिलेले रंग. सातच रंग असतात जांभळा, तांबडा, नारंगी, पांढरा, नीळा, पिवळा, हिरवा. हे रंग मिळुन विविध रंग तयार होतात. रंगाबद्दल खुपकाही लिहीले गेले आहे. त्यातील मला दोन ओळी आठवत आहे. १)रंगात रंगुनी पण रंग माझा वेगळा २) पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमे डाला उसके जैसा.
मला सर्व रंग आवडतात. त्यात लाईट रंग जास्त आवडतात.
मला गुलाबी रंग फार आवडतो. ( बेबी पिंक ) लाल + सफेद रंग मिळुन गुलाबी रंग तयार होतो.
गुलाबी रंग म्हटले की डोळ्यासमोर येतात :
गुलाबी गुलाब
गुलाबी शहर (जयपुर)
गुलाबी बगळे (फेमींगो पक्षी)
गुलाबी केकचे क्रीम
मला गुलाबी रंग फार आवडतो. तसाच तो सर्वांना आवडत असेल का?
तुम्हाला गुलाबी रंग म्हटले की काय आठवते.
तुम्ही तुमचा आवडीचा रंग लिहा.
रंगाबद्दल अजुन काही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मॉव रंगाच्या म्हणजे साधारण जांभळट रंगाच्या सगळ्या छटा आवडतात. गुलाबीही आवडतो पण अगदी लाडक्यात नाहीय... त्यात मला बेबी पिंक आवडतो.

मला गुलाबी रंग म्हटले की आठवते:-

१. गोरी गोरी पान गुलाबी गालांची छोटी मुलगी (बाहुलीसारखी)
२. बुढ्ढी के बाल
३. स्ट्रॉबेरी आइसक्रीम
४. लहान मुलींच्या बेबी पिंक रंगाच्या वस्तू, उदा. फ्रीलवाला फ्रॉक, त्याला मॅचिंग पिना, हेअरबँड वगैरे.
५. संध्याकाळी कधीतरी आकाशात दिसणारी गुलाबी छटा
६. गुलालाची उधळण

मला स्वतःला गुलाबी रंगही आवडतो व पिवळाही, पिवळ्या रंगाच्या सर्व छटा, ऑफ व्हाइट पासुन केशरीपर्यंत.
पिवळा रंग म्हटले की आठवते-
१. पिवळ्या रंगाच्या सर्व छटा सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेस आकशात दिसतात.
२. मंत्रोच्चारांच्या साथी ने धगधगणारा होमकुंडातील पवित्र अग्नी
३. मंदिरातील शेंदुर फासलेली हनुमंताची मूर्ती
४. केशराची फुले, केशर घालुन बनवलेली विविध केशरी पक्वान्ने
५. फळ बाजारातील संत्रे व मोसंब्यांची रास, कापलेल्या अननसाच्या चकत्या, फणसाचे गरे
६. पिवळे व केशरी गुलाब, सूर्यफूल, अगदी नाजुक आणि सुंदर असा सोनचाफा
७. सोन्याचे दागिने तसेच मोती
७. अंगावर हळद लागलेली व पिवळेजर्द वधुवस्त्र ल्यालेली नवी नवरी
८. कार्टून पिकाचू
९. कॅनरी नावाचा पक्षी
१०. लहान मुलांचे मल्टिविटामिनचे औषध बीकॉसुल

माझ्या मते पिवळा हा उत्साहवर्धक रंग आहे, नजरेत भरणारा आकर्षक असा.