मूग किती उपयुक्त कडधान्य. एकतर पचायला तसं हलकं. आणि कोणत्याही रुपात त्याला खाता येतं. मला सुचलेले हे पदार्थ. तुम्हीही अजून सुचवा
1. मुगाच्या डाळीचे वरण - मूगडाळ हळद हिंग घालून कुकरमधे शिजवून नंतर त्यात मीठ घालून केलेले वरण
2. मूगाचे तिखट वरण- वरील वरणाला मिरच्या, कढिपत्ता अन लसूण यांची फोडणी दिलेले तिखट वरण
3. मूगाची डाळ - मोहरी, हिंग, कढिपत्ता, तिखट, हळद यांच्या फोडणीवर भिजवलेली मूगडाळ घालून मंद आचेवर शिजवून नंतर मीठ, कोथिंबीर घातलेली कोरडी मूगडाळ
4. कोशिंबीर- हिरवे मूग भिजवून, वाफवून, दही, मीठ, मिरची, साखर, कोथिंबीर अशी केलेली कोशिंबीर
5. उसळ - हिरवे मूग भिजवून, मोड आणून सालासकट, मोहरी, हिंग, हळद, तिखट, कांदा, टॉमेटो, यांवर परतून नंतर त्यात मीठ, गूळ,,अमसूल टाकून केलेली उसळ.
6. बिरडं - हिरवे मूग भिजवून, मोड आणून, सालं काढून , हिंग, हळद, कांदा, धणेजिरेपूड, तिखट यावर परतून, शिजवून, त्यात लसूण, ओलं खोब-याचे किंवा तळके वाटण घालून, चिंच, गूळ, मीठ घालून केलेले बिरडे.
7. स्प्राऊट्स - हिरवे मूग भिजवून, त्यांना मोठे मोड आणून, ते वाफवून इतर सँलेड्स मधे किंवा चायनिज पदार्थात वापरणे.
8.खिचडी- साधी वा भाज्यांसह केलेली. साधी वा तिखट
मूग, मूग आणि मूग
Submitted by अवल on 10 August, 2014 - 02:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पालक/ कांदा पात/
पालक/ कांदा पात/ पत्ताकोबी/ढोबली मिर्ची/दुधी/गिलके/दोडके/झुकिनी/मेथी/कांदा यापैकी कोणतीही भाजी भिजवलेली मुगाची डाळ घालून छान लागते.
मो हि मू व डाळिंबाचे सलाड
मो हि मू व डाळिंबाचे सलाड अप्रतिम लागते. फक्त काळे मीठ / सैंधव, मिरपूड. लिंबाचा रस. काकडी कोचवून / किसलेले गाजर हेही यात घालता येते. किसलेला मुळाही घालतात.
फ्लॉवरच्या कोवळ्या पानांची
फ्लॉवरच्या कोवळ्या पानांची मूगडाळ घालून केलेली भाजी सुद्धा मस्त होते. जरा पेशन्स चं काम आहे मात्र. ती पानं फार हट्टी असतात. आमच्याकडच्या पोळ्यावाल्याकाकू मस्तच करायच्या ही भाजी.
मूंग दाल की कचोरी हे स्वतंत्र
मूंग दाल की कचोरी हे स्वतंत्र प्रकरण, मानबिंदू, इ. आहे. त्याची गणती मूगडाळीच्या इतर पदार्थांत जाता जाता करण्याची गुस्ताखी अकु, तुम्ही केली आहे.
मूग दाल का हलवा करण्यासाठीच काय, खाण्यासाठीही मनाची तयारी करावी लागते. त्याला मुगाचा शिरा-बिरा म्हणू नये.
अजून एक आठवलं - मुगडाळीच्या
अजून एक आठवलं - मुगडाळीच्या पुरणपोळ्या मी दोन वेळा प्रायोगिक तत्वावर केल्या .छान होतात, फार सोप्या जातात .Density हवी ती आणण्यासाठी पुरणाचे ( मऊ-दाट शिजवलेली मुगडाळ+ किसलेला गूळ / पिठीसाखर - आवडीनुसार ) मिश्रण पातळ झाल्यास अव्हनमध्ये आटवता येते.
मूग हलवा .. मला आवडणारा
मूग हलवा .. मला आवडणारा .
हल्ली सकस चे मुगदळ वापरून करते . झटपट होतो .
मुगाची भजी लिहिलीत का कुणी
मुगाची भजी लिहिलीत का कुणी इथे?
मुगाची भजी >> वाफाळता चहा नि
मुगाची भजी >> वाफाळता चहा नि पाऊस.. अल्टिमेट कॉम्बो!
आज मी मोड आलेले मुग घालुन खिचडी केलीय ..
मूडाकचोरी... हो, केली खरी
मूडाकचोरी... हो, केली खरी गुस्ताखी!! खूप दिवसांत खाल्ली नाही!
मूंग दाल वापरून ओळखीतल्या एक भाभी दालबाटीही करायच्या. बेसन / तूरडाळी ऐवजी मूडापीठ किंवा मूडा वापरायच्या.
परवा वरणफळं करताना तुरीऐवजी मूगडाळ वापरली. छान चव आली होती.
स्टर फ्राय भाज्यांमध्ये मो हि मूंची चव मस्त लागते. पनीर भुर्जीतही ढकलता येतात. स्वीटकॉर्न भुर्जीत सुध्दा.
एक दाक्षिणात्य मित्राने त्यांच्याकडे हिरवे मूग भाजून, त्यात वेलदोडे, गूळ , पाणी व मिरपूड घालून मिक्सरमधून काढतात व थंडगार सरबत बनवतात असे सांगितले. काहीजण हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटताना त्यात नारळही घालतात व गाळून घेतात म्हणे! मोड आलेल्या हिमूचेही असेच पेय बनवतात.
संपादन
संपादन
मंगोडी : मुगाची डाळ वाटून
मंगोडी :
मुगाची डाळ वाटून त्याचे सांडगे घालून सुकवलेले बाजारात मि़ळतात. उत्तर प्रदेशीय या मंगोडीची रस्साभाजी करतात. किंवा ते तुपावर परतून मग त्यातच तांदूळ घालून 'टहाडी' बनवतात.
माझी आई मूगाचं नक्त्याचं
माझी आई मूगाचं नक्त्याचं बिरडं करते.
मोड आलेले मूग सालं काढून घेणे. छोट्या कुकरमध्ये मग तुपावर जिरे, कढिपत्ता, हिंगाची फोडणी करून त्यात हे मूग घालून थोडे परतून मग त्यात तिखट, मीठ, साखर, मिर्याची पूड, आंबोशी अथवा आमचूर घालून आणि मग हवं तेवढं पाणी घालून घोटून येण्याइतपत शिजवणे. गरमागरम भात, नक्त्याचं बिरडं आणि सोबत भाजलेला पोह्याचा पापड अथवा लिंबाच्या लोणच्याची फोड..... पावसाळी रात्री हा बेत फक्कड लागतो.
माझ्या सा. बा. मुगाच्या वड्या
माझ्या सा. बा. मुगाच्या वड्या करतात.
सालाची मुग डाळ किंवा पिवळी मुग डाळ तासभर पाण्यात भिजवून ठेवायची. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर थोडेसे आले, हळद, तिखट, जीरे-धणे पावडर व चविपुरते मीठ घालुन पाणी न घालता वाटायचे. मग हे मिश्रण कुकरात वाफवून घ्यायचे आणि त्याच्या वड्या पाडुन शॅलो फ्राय करायच्या.
भिजवलेले मूग, थोडे बेसन,
भिजवलेले मूग, थोडे बेसन, पालक, आले, हिरवी मिरची एकत्र वाटून त्यात थोडे दही घालून.. इनो वापरून ढोकळा छान होतो.
मलाही एक मुगाचा पदार्थ
मलाही एक मुगाचा पदार्थ सांगावा वाटला ...
मुगाची डाळ भिजवून वाटलेली ...ती तुपावर खरपूस परतून अगदी कुरकुरीत होईपर्यंत ...त्यावर बारीक कांदा, टोमाटो, दही, चाटमसाला, तिखट मीठ ,शेव घालून ....अतिशय सुंदर लागते...पण थोडे हेवी होते इतकेच ...
शेपु + भिजवलेली मुग डाळ
शेपु + भिजवलेली मुग डाळ भाजी.
भो. मिरची + भिजवलेली मुग डाळ भाजी.
मूग डाळ भजी
मूग डाळ भजी
मी मुगाचे ३ वेगवेगळ्या
मी मुगाचे ३ वेगवेगळ्या प्रकारचे वरण करते
१.साध वरण तुप + हळद + हिन्ग +मिठ
२.मुगाचे तिखट वरण मिरची फोडणी + काळा मसाला
३.शेवग्या ची शेन्ग घाउन + कडीपत्ता लसुन कोथी.न्बीर सुके खोबरे
श्रिया ला खुप आवडते
श्रि आणी श्रिया
फक्त मुग डाळच चालते , बाकीच्या डाळी अ.न्गावर उठतात दोघान्च्या
[उष्ण शरीर असल्याने ]
दाल - फ्राय... मस्त होते
दाल - फ्राय... मस्त होते मुगडाळीचे..
मूग +थोडी मसूरडाळ +तूर डाळ
मूग +थोडी मसूरडाळ +तूर डाळ यांचे तूप +लिंबू+गूळ+ हळद + हिंग +मीठ असं वरण मस्त लागतं.
राजस्थानला मिळणारी मूगबर्फी टेस्टीच.
हो देवकी राजस्थानची मुगबर्फी
हो देवकी राजस्थानची मुगबर्फी एकदम टेस्टी असते.
हो हो. ही मूगबर्फी मी एकदाच
हो हो. ही मूगबर्फी मी एकदाच लहानपणी खाल्ली होती. पण ती चव अजूनही विसरले नाहीये.
सिंधी लोकं पण मूगबर्फी करतात बहुतेक.
मूगडाळीचा ढोकळा ही छान
मूगडाळीचा ढोकळा ही छान होतो.
मूगडाळ भिजवून वाटायची आणि नंतर लगेच त्याचा इनो घालुन ढोकळा करायचा.
मामी, तू म्हणतेस त्या
मामी, तू म्हणतेस त्या मंगोड्यांबद्दल परवाच एक मैत्रीण सांगत होती. ह्याचीच एक रेसिपी मागे बहुतेक मृ ने टाकली होती. शोधायला हवी.
मो हि मू + तोफू + इतर
मो हि मू + तोफू + इतर भाज्यांचे स्टर फ्राय - चायनीज स्टाईल : हेही छान लागते ना?
मो हि मू वापरून चायनीज / कोरियन / थाई रेसिपीज माहित असतील तर त्याही सांगा की!
सायो,
सायो,
http://www.maayboli.com/node/2605 - वांगं मुगवडी फ्राय
ही रेसिपी ना? मस्त होते ही भाजी.
अरे तळलेल्या मूगडाळीला विसरले
अरे तळलेल्या मूगडाळीला विसरले काय सगळे?
अवल अग जमल्यास सगळ्यांनी जे
अवल अग जमल्यास सगळ्यांनी जे प्रकार सांगितलेत ते हेडरमध्ये टाक. म्हणजे एकत्रपणे समजतील.
माझ्या मुलीला जसे चटपटे चणे आपण बनवतो तसे मुग आवडतात. मुग उकडून त्यात कांदा, कोथिंबीर, मिरची, मिठ, लिंबूरस, चाटमसाला घालून एकत्र करायचे. टोमॅटो आणि उकडलेला बटाटाही चुरुन घालता येतो.
मुगाच्या डाळीची पेज माझी आई दर गुरुवारी करायची. ती पण मस्त लागते.
अजुन आठवून सांगते.
बाकिस सगळ्यांचे प्रकारही छान आहेत.
मुगडाळीचे पापड
मुगडाळीचे पापड
उकडलेले मुग तव्यावर
उकडलेले मुग तव्यावर थोड्याश्या तेलात मीठ अन लाल तिखट टाकुन खरपुस परतायचे.. कोरडे खायला मस्त लागतात
Pages