मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden

Submitted by दिनेश. on 4 August, 2014 - 08:59

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

सोमवारपासून माझ्या सहली सुरु झाल्या. एकेका दिवसात बरीच ठिकाणे बघून व्हायची.
सुरवात झाली ती तिथल्या बोटॅनिकल गार्डन पासून. याचे लोकप्रिय नाव आहे Pamplemousses Botanical Garden तर शासकीय नाव आहे Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden.

३७ हेक्टरवर पसरलेले हे उद्यान जगपसिद्ध आहे. फक्त एकच प्रॉब्लेम होता कि सध्या तिथे हिवाळा असल्याने
फारशी फुले नव्हती. हे ड्रायव्हरने आधीच सांगितल्याने सहलीतली अर्धी माणसे उतरायला नाखुष होती.
पण माझ्या गटातल्या लोकांची मेजॉरिटी झाल्याने आमची जीत झाली. मर्यादीतच वेळ दिला होता.
त्यामूळे मनसोक्त भटकता आले नाही... आणि अशा ठिकाणी माझे व्हायचे तेच झाले.. मी हरवलो:

ड्रायव्हरसकट काही माणसे मला शोधायला आत शिरली आणि त्यांनाही मी अडकवून ठेवले.

हे खरे आहे कि फुले नव्हती, पण ती जागा खुपच सुंदर राखलेली आहे. आणि फुले नसल्याने एक मात्र झाले,
तिथे परत त्यांच्या वसंत ऋतूमधे जायचे मी मनात ठरवून टाकले.. तर चला हरवू या !

प्रभाते करदर्शनम.. प्रमाणे नमनाला समुद्र हवाच

१)

२)

३)

४) तिथे इंद्रधनुष्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, हा नमुना बघा

५)

६) हॉटेलच्या लॉनवर दिसलेली देखणी चिमणी

७) "वडगावाच्या" आत

८) हॉटेलच्या बाजूला एक देवालयही होते. भाविकांची ये जा होती ( सोमवार होता ) तरीही किती सुंदर राखले होते बघा.

९) इथून पुढचे फोटो त्या बोटॅनिकल गार्डनमधले

कमळाचे फळ व बिया.. या बियांच्या लाह्या म्हणजेच मखाणे

१०) बिक्सा अनोटा म्हणजेच आपले कुंकवाचे झाड.. या फळातील बियांपासून सुरक्षित खाद्यरंग तयार करतात.

११)

१२)

१३) मला आवडलेली एक फ्रेम

१४)

१५)

१६) पैगाम / कमांडमेंट्स / आकाशवाणी वगैरे

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२) हे झाडासमोरचे चौथरे दिसताहेत त्यावर प्रत्येक झाडाचे नाव आणि माहिती होती

२३)

२४)

२५)

२६)

२७) Brownea Grandiceps, Rose de Venezulela, Scarlet Flame Bean

२८) या ब्राऊनिया ग्रँडीसेप्स ची शेंग पण खुप सुंदर होती ( तर फुल किती सुंदर असेल !! )

२९) एक अजूबा बघितला

३०) जवळ जाऊन बघितले तर असे होते

३१)

३२)

३३) वॉटर लिलीचे खुप फोटो टाकले आजवर... तरी हे दोन टाकतोच

३४)

३५)

३६) खर्‍या कमळाचे हे कोवळे पान

३७) ही जून पाने ( सहज अर्धा मीटर व्यासाची )

३८) हा कळा

३९) पहिल्या दिवशी असे

४०) दुसर्‍या दिवशी असे

४१)

४२)

४३)

४४)

४५) Le Château de Mon Plaisir, पण आत जायला वेळ नव्हता

४६) जीव गुंतला...

पुढे चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर फोटो.. या बागेत मी अख्खा दिवस घालवायला तयार आहे.. मामे, तुझे झब्बुही लै भारीच. कासवे आवडली.== =+१००
चिमणी कित्ती गोड आहे.
कमळाचे कोवळे,जुन पान, क़ळा छान आहे.
शेंग, अजुबा पण खुप सुंदर .
१३, ४४ मधे कोणती फळे आहेत.

माधव, या झाडाला कोकणात कुंकवाचे झाड म्हणतात एवढेच.. कुंकू हळदीपासून किंवा इतर साहित्यांपासून बनवतात. या झाडाचे फळ सहज उकलते ( ओले असताना हाताने आणि सुकल्यावर आपोआप )
ओल्या बियांवर बोट चोळले तर बोटाला शेंदूर किंवा कुंकू ( जातीप्रमाणे रंग वेगवेगळा असतो ) लावल्यासारखा रंग दिसतो.
कधी कधी सुकलेल्या बिया तेलात परतून घेतात व त्या तेलात दुसरा पदार्थ करतात.. छान रंग येतो.

आमच्या सोसायटीत ४० वर्षांपुर्वी लावली होती मी झाडे.. पण पीतमोहोराच्या आक्रमक झाडांमूळे ती तग धरु शकली नाहीत.

साधना, आपण गेलो होतो का पनवेलला ? पंकज पण होता बरोबर.
कामिनी, ती केवड्याची एक जात आहे. त्याला अननसासारखी फळे लागतात.
४४ मधली फळे मला अनोळखी Happy

Pages